• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ट्रम्प बदलताहेत!

टोक्या टोचणकर

marmik by marmik
January 31, 2026
in टोचन
0
ट्रम्प बदलताहेत!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन माझा मानलेला परममित्र पोक्या याला अधून मधून येत असतो. भारतातील घडामोडींची खडान्खडा सत्य माहिती देणारा छुपा पत्रकार म्हणून पोक्याशी ट्रम्प यांची मैत्री मोजक्या लोकांनाच माहिती आहे. पोक्याही ट्रम्प यांच्या अलिकडच्या सुसाट वागण्याने खूप भारावलाय. पोक्याला त्यांनी अमेरिका भेटीचं आमंत्रणही दिलंय. त्यांच्या आवडीनिवडी पोक्याला माहित आहेत. त्यांना मालवणी खाजा कसा काय आवडतो हे मात्र पोक्याला पडलेलं कोडं अजून सुटता सुटलेलं नाही. ट्रम्पना आपलं मन मोकळं करायला अमेरिकेत कुणीही माणूस मिळत नाही हे सत्य पोक्याला कळलं तेव्हा त्याला खूप आश्चर्य आणि वाईटही वाटलं. पत्नीशीही त्यांचं पटत नाही आणि त्यांचा सुपुत्रही त्यांना मॅड चॅप म्हणतो हे सत्यही जगाला कळून चुकलंय. एकदा त्यांनी पोक्याला फोनवरून सांगितलंसुद्धा की मी महत्त्वाकांक्षी असलो तरी मी अनेक बाबतीत आक्रमकपणे वागतो तो केवळ दुसर्‍यांची गंमत करण्यासाठी. मी जगाला मॅनेज करू शकतो इतकी ताकद माझ्यात आहे. त्या फालतू नोबेलसाठी मी मुळीच हपापलेलो नाही. मी ते कधीही मिळवू शकतो. आता मला त्याची गरजही नाही. कारण मी जागतिक शांततेचा पाईक आहे हे माझ्याशिवाय कुणालाही माहित नाही. डेन्मार्कच्या ताब्यात असलेलं ग्रीनलँड मी केव्हाही ताब्यात घेऊ शकतो. व्हेनेझुयेला तर आमच्या मालकीचंच आहे. इराणला कधीही अद्दल घडू शकतो. पण मी तसं कधीच करणार नाही. शेवटी जगाची जबाबदारी माझ्या डोक्यावर आहे.

चॅनल्सवाल्यांची फिरकी घेण्यासाठी मुद्दाम आगलावी तर्कविसंगत विधानं करतो. ही प्रसारमाध्यमं मला वेडा ठरवतात, पण लक्षात ठेवा, जगातील सर्व राष्ट्रप्रमुखांपैकी मी एकच शहाणा माणूस आहे त्याला अमेरिकेच्या जनतेचीच नव्हे तर सार्‍या जगाची काळजी आहे. तुमचे मोदी माझ्या सल्ल्यानेच तुमच्या देशाबाबत निर्णय घेतात. ते रशियाचे पुतीन, चीनचे जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधानही मला टरकून असतात. यावरून तरी माझी पॉवर जगाला कळायला हवी, पण नाही कळणार. त्यांना माझी टिंगलटवाळी आणि बदनामी करण्यातच इंटरेस्ट आहे. ते काहीहीr असलं तरी मला तुमच्या महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष रस आहे. त्यात त्या फडणवीसांचं जास्त कौतुक वाटतं. तुमच्या महाराष्ट्राच्या नगरपालिका निवडणुकांवर माझं बारकाईने लक्ष होतं. जास्तीत जास्त वेड्यांची भरती असलेल्या मित्रपक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना फडणवीसांनी तीन वर्ष कसं काय ताब्यात आणि काबूत ठेवलं याची कमाल वाटते. ते शिंदीया ते पॅवॉर एकेक नग आहेत. आमच्याकडे असे कारस्थानी मंत्री असते तर मी त्यांचे केव्हाच बारा वाजवले असते. सरकारातून हाकलून दिले असते. शेवटी, सीएमचीसुद्धा जबाबदारी असते. म्हणूनच असले भ्रष्ट मंत्री सरकार वाचवण्यासाठी त्यांना पोसावे लागतात. तुमच्या निवडणुका म्हणजे तर पोरखेळच आहे. निवडून येण्यासाठी मतदारांना अब्जावधी रुपये, गृहोपयोगी भेटवस्तू लाच म्हणून देतात, निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करतात, हे आश्चर्य आहे. त्यात मतदानाशिवाय काही उमेदवार बिनविरोध कसे काय निवडून येतात? त्यात त्या बंडलबाज ईव्हीएम मशीनचा घोळ असतोच. निवडणूक आयोगाला आपला नोकर समजून आपल्यासाठी राबवून घेणारं सरकार तुमच्या देशाशिवाय मी कुठेच पाहिलं नाही. आमच्याकडे रस्ते बघा किती गुळगुळीत असतात आणि तुमचे रस्ते म्हणजे खड्डेच खड्डे! कसं काय चालवून घेते तुमची जनता? महाराष्ट्रातल्या कंपन्यांशी करार करण्यासाठी तुमचे मुख्यमंत्री दावोसला कशाला जातात? जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारं हे फसवं राजकारण आमच्या अमेरिकेच्या जनतेने तर कधीच सहन केलं नसतं. सगळा हुकूमशाही कारभार! तुमची जनता सर्व राज्यातल्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत का मिळवून देत नाही याचा विचार मोदींनी करायला हवा. तुम्ही जर विकासाच्या गोष्टी करता तर तुमच्यावर जनतेने विश्वास टाकायला हवा, पण नाही टाकत. याचाच अर्थ सत्ताधार्‍यांची बदमाशी जनता ओळखते. आमच्याकडे असं नाही चालणार. पैसे वाटून निवडणुका जिंकू पाहणार्‍यांच्या हिप्पांवर लाथ मारून जनताच त्यांना चोप देईल. तुम्ही लोकांनीच अशा भ्रष्ट नेत्यांना लाडावून ठेवलंय. मी माझ्या राजकीय कारकर्दीत एक पैसा खाल्ला नाही. बायकांची लफडी केली, पण तो माझा छंद आहे. त्याची मला अजिबात खंत वाटत नाही. आमचा चावटपणा जगाला दाखवा हे माझं खुलं आव्हान आहे. याबाबतीत मला तुमच्या कॅरेट सोम्याचा स्वभाव आवडतो. त्याची खुल्लमखुल्ला मौजमस्ती व्हिडिओवर जगाने पाहिली. आमच्या अमेरिकेत तर सोम्याच्या व्हिडिओला लाखो लाईक्स कसे मिळाले. त्याला अमेरिकेत बोलावून आम्ही त्याचा सत्कार करणार आहोत आणि या रंगेल विषयावरील त्यांची अनुभवांची व्याख्याने ही आयोजित करणार आहोत. मला पुचाट राजकारणी नाही आवडत. नेता कसा माझ्यासारखा हवा. बिनधास्त, बेदरकार आणि आक्रमक. सगळ्यांची तंतरवून टाकणारा. तुमच्या मोदींपुढे शेपूट घालणारे राजकारणी मला नाही आवडत. मी रात्री सूर्यनमस्कार घालतो, जेव्हा तुमच्याकडे उजाडतं. ध्यानधारणा, प्राणायामही करतो. तुमची संस्कृती महान आहे पण काही नेते नालायक आहेत. त्यामुळे धर्माचं, जातीचं राजकारण ते करतात आणि जनतेमध्ये फूट पाडतात. मंदिराचा वापर राजकारणासाठी करतात. आम्ही नाही चर्चचं राजकारण करत. लोकांना स्वातंत्र्य आहे. लव्ह करा, लिव्ह इनमध्ये रहा, मॅरेज करा, घटस्फोट घ्या, काय वाट्टेल ते करा. हे आहे खरं लोकशाही स्वातंत्र्य. माणुसकी ही एकच जात आणि एक धर्म. प्रेम वाटा, म्हणून मला साने गुरुजी आवडतात. सध्या मी त्यांच्या पुस्तकाचा अभ्यास करतोय. काही दिवसांनी तुम्हाला वेगळाच ट्रम्प दिसेल. मुळापासून बदललेला!

Previous Post

पांडबा मिसळ

Next Post

नाय नो नेव्हर

Next Post
नाय, नो. नेव्हर…

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.