ग्रहस्थिती- हर्षल वृषभेत, गुरु मिथुन राशीत, केतू सिंहेत, बुध वृश्चिक राशीत, रवि-मंगळ-शुक्र-बुध-प्लुटो मकरेत, राहू कुंभेत, शनि-नेपच्युन मीनेत.दिनविशेष- २५ जाने. रथसप्तमी, २६ जाने. प्रजासत्ताक दिन आणि दुर्गा भीमअष्टमी, २९ जाने. जया एकादशी, भीष्म द्वादशी, ३० जाने. प्रदोष.
***

मेष : नोकरी-व्यवसायात मनासारख्या घटना घडतील. नातेवाईक, मित्रांचे सहकार्य मिळेल. नोकरीत पगारवाढ, प्रमोशन मिळेल. खेळाडूंना यश मिळेल. सरकारी कामे पुढे सरकतील. पत्नीची साथ मिळेल. वास्तूसंदर्भातील प्रलंबित व्यवहार मार्गी लागेल. घरगुती कार्यक्रमात नातेवाईकांची भेट होईल. आर्थिक बाजू चांगली राहील, पण पैसे सांभाळून वापरा. तरुणांची स्वप्ने प्रत्यक्षात येतील. व्यवसायात जुनी येणी वसूल होतील. घरासाठी वेळ खर्च होईल, त्यातून आनंद मिळेल. मालमत्तेसंदर्भातील कौटुंबिक चर्चांना गती मिळेल. काही नवे शिकाल. कामाचा ओघ वाढेल, करियरमध्ये चांगल्या संधी मिळतील.

वृषभ : कशाचाही हट्ट करू नका. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा. व्यवसायात यश मिळेल. लॉटरी, सट्ट्यातून लाभ होईल. नोकरीत विदेशात जाण्याची संधी मिळेल. सरकारी कामांत घाई टाळा. मनस्वास्थ्य सांभाळा. तरुणांनी धीराने आणि संयमाने घ्यावे व वाढीव काम करावे. वैवाहिक जीवनात कटकटी होतील. जुने येणे वसूल होईल. एखाद्या चिंतेपासून सुटका होईल. व्यवसायात यश मिळेल. नव्या नोकरीच्या शोधात असणार्यांना चांगली संधी मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. काही आपल्या मतांवर ठाम राहण्याची भूमिका टाळा.

मिथुन : अनपेक्षित यशाने हुरळून जाऊ नका. अहंकार टाळा, संयम ठेवा. नोकरीत उत्तम संधी मिळेल. व्यवसायात मोठे यश मिळेल. समाजकार्याचे कौतुक होईल. तरुणांना जास्त काम करावे लागेल, मानसिक ताण येईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्या. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. पत्नी, मित्र, नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. लांबलेले काम नव्याने ओळखी झालेल्यांच्या संपर्कातून मार्गी लागेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. कामाचा उत्साह वाढेल. रोख व्यवहारात काळजी घ्या. नवीन व्यवसायाला मुहूर्त मिळेल.

कर्क : काळजीपूर्वक काम करा. आर्थिक व्यवहारात आश्वासनावर विश्वासू नका. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात मनासारखी कामे होतील. मित्रांच्या मदतीला धावून जावे लागेल. उधार-उसनवारी टाळा. नोकरीनिमित्त दूरचे प्रवास घडतील. दाम्पत्यजीवनात तुटेपर्यंत ताणू नका. घरातील वातावरण गढूळ होऊ देऊ नका. अचानक धनलाभाचे योग आहेत. नियमात राहूनच काम करा. अचानक खर्च वाढेल. सामाजिक कामात पत प्रतिष्ठा वाढेल, मान-सन्मान मिळेल. कोणताही निर्णय घाई-गडबडीने घेऊ नका.

सिंह : मनातली कामे पुढे सरकतील. नोकरीत कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी साधा. व्यवसायात विदेशात कामाची संधी मिळेल, तिचा लाभ घ्या. प्रेमप्रकरणात वादाची ठिणगी पडू शकते. नवी नोकरीr स्वीकारताना विचार करूनच पुढे जा. नातेवाईकांना मदत करावी लागेल. मित्रांशी चेष्टा-मस्करी टाळा. गैरसमजातून वाद होतील. नोकरीत माझेच म्हणणे बरोबर म्हणू नका. आनंददायी घटना घडेल. खाण्या-पिण्यात जीभ सैल सोडू नका. पोटाच्या विकाराला निमंत्रण मिळेल. व्यवसायात आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.

कन्या : आनंदात भर पडेल. घरात उत्साहाचं वातावरण राहील. छोटेखानी कार्यक्रम होईल. तरुण मौजमजेवर खर्च करतील. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. नव्या नोकरीच्या व विदेशात नोकरीच्या संधी चालून येतील. कलाकारांना यश मिळेल. मानसन्मान, गौरव होईल. नोकरीच्या ठिकाणी गैरसमज टाळा. मुलांकडून आनंदवार्ता कळेल. व्यवसायात मोठे यश मिळेल. भागीदारीत किरकोळ कुरबुरी होतील. अभियांत्रिकी क्षेत्रात चांगला काळ. मित्रांच्या भानगडीत पडू नका. खर्च वाढेल. लेखन, रियल इस्टेट क्षेत्रात चांगला काळ.

तूळ : शुभ फळे मिळतील. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. तरुणवर्गाच्या मनासारखी कामे होतील. घरातील मंडळींबरोबर सहलीचे योग आहेत. धार्मिक कार्यातून मनशांती मिळेल. वाहन चालवताना वेग सांभाळा. घरामध्ये वाद टाळा. मित्र-मंडळींबरोबर भरपूर वेळ खर्च होईल. नोकरीत आनंद वाढेल. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात विदेशात जाण्याचे योग आहेत. महिलांना चांगल्या बातम्या कळतील. व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक लाभ मिळेल. घरासाठी महागडी वस्तू खरेदी कराल. दाम्पत्यजीवनात सुख मिळेल. सामाजिक जीवनात काही गोष्टी पटणार नाहीत. पण, कोणाची मने दुखावू नका.
![]()
वृश्चिक : व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरीत कौतुक होईल. मित्रांशी आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घ्या. नव्या कल्पनांचे व्यवसायात रूपांतर होईल. आर्थिक बाजू सांभाळताना काळजी घ्या. अचानक जुने येणे येईल. कलाकार, संगीतकार, चित्रकारांना मान सन्मान मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. कुटुंबाबरोबर सहलीला जाल. आध्यात्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल. बुद्धीच्या जोरावर व्यावसायिक मोठे यश खेचून आणतील. नोकरीत आपले काम भले आणि आपण हेच धोरण ठेवा. कौटुंबिक धावपळ होईल.

धनु : नोकरी-व्यवसायात यश मिळेल. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. बँकेच्या व्यवहारांत विशेष काळजी घ्या. शुभ वार्ता समजतील. अडलेली कामे पुढे नेताना नशिबाची साथ मिळेल. उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. गुरुकृपेमुळे हातातली कामे मार्गी लागतील. कलाकारांसाठी उत्तम काळ. एखादा पुरस्कार मिळेल. मित्र, नातेवाईकांकडून मदतीची अपेक्षा नको. अपेक्षाभंग होऊ शकतो. व्यवसायात घाई टाळा. ध्यान-धारणा, अध्यात्म यांत मन रमवा. जुने आजार डोके वर काढतील. ज्येष्ठांच्या मताचा आदर करा. अन्यथा वाद होतील.
![]()
मकर : कंटाळा केल्यामुळे कामे विलंबाने पुढे जातील. व्यवसायात वेळ आणि कामाचा ताळमेळ साधा. कुणाचे मन दुखावू नका. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. सामाजिक कार्यातून प्रतिष्ठा वाढेल. नव्या कामाच्या संधी चालून येतील. मुलांकडून आनंदवर्धक बातमी कळेल. छोटेखानी समारंभ होईल. सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होणे टाळा. कामानिमित्ताने बाहेरगावी जाल. स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्याल. शिक्षकांना चांगले अनुभव येतील. देवदर्शनासाठी बाहेरगावी जाल. मन:शांती मिळेल. व्यवसायात जुनी कामे झटक्यात पूर्ण होतील.

कुंभ : नव्या वर्षात मोठ्या संधांrचा लाभ घ्या. तरुणांना द्विधा अवस्थेत निर्णय घ्यावा लागेल. त्यात चुका टाळा. प्रवासात काळजी घ्या. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात अपेक्षित लाभ होतील. शेजार्यांशी वाद होतील. नवीन गुंतवणूक योग्य ठिकाणी करा, कागदपत्रे तपासूनच पुढे जा. विचारपूर्वक काम करा. शिक्षणाचे प्रश्न सुटतील. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात अधिक मेहनत करावी लागेल. त्यामधून आर्थिक बाजू भक्कम होईल. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे.
![]()
मीन : घरासाठी भरपूर वेळ खर्च होईल. मोठे निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यवसायात भरपूर काम करावे लागेल. वेळ आणि पैसा याचा ताळमेळ घालताना कसरत होईल. लेखक, प्रकाशक, कलाकार, संशोधकांचा आनंद व उत्साह वाढेल. नोकरीत आपले स्थान भक्कम होईल. अधिकची जबाबदारी मिळेल. घरात मोकळेपणाने संवाद करा. शंका बिनधास्तपणे विचारा. मनासारख्या घटना घडतील. तरुणांचा उत्साह वाढेल. अति आत्मविश्वास दाखवू नका, भ्रमनिरास होईल. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती कराल.

