• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

फटकारे बाळासाहेबांचे

फटकारे बाळासाहेबांचे

marmik by marmik
January 27, 2026
in बाळासाहेबांचे फटकारे
0
फटकारे बाळासाहेबांचे

सोविएत रशियाचे अध्यक्ष लिओनिद ब्रेझनेव यांच्या १९७३ सालातल्या भारतभेटीवर आधारलेलं हे व्यंगचित्र आहे २ डिसेंबर १९७३ या तारखेचं. यात व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेबांच्या कल्पनेची अफाट झेप दिसते. त्यांनी ब्रेझनेव यांचा लिंगबदल करून त्यांना मोनालिसा या जगातल्या सगळ्यात प्रसिद्ध चित्रातली मोनालिसा बनवलं आहे. मोनालिसा या चित्राचं सगळं आकर्षण दडलं आहे ते मोनालिसाच्या गूढ स्मितहास्यामध्ये. हेच बाळासाहेबांनी या चित्राच्या आशयात्मक रचनेत वापरलं आहे. ब्रेझनेव विमानतळावर असल्यापासून किती मिनिटे सुहास्यमुद्रेत होते, हे ते चित्राच्या ओळीत सांगतात आणि समोर हे हास्य पाहून आनंदलेल्या इंदिरा गांधी त्यांनी रेखाटल्या आहेत. हा काळ अमेरिका आणि सोविएत रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्धाचा. पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंनी अलिप्ततेचा सिद्धांत मांडला आणि अलिप्त राष्ट्रांचा वेगळा सवतासुभा मांडला. नंतरच्या टप्प्यात मात्र सोविएत रशिया भारताचा मित्र बनला आणि अमेरिकेने पाकिस्तानच्या रूपाने आपला एक शेजारी त्यांचा मांडलिक बनवून टाकला. या सत्तासंतुलनाच्या संदर्भात ब्रेझनेव यांचा दौरा आणि त्यांचा आनंद महत्त्वाचा होता… तो काळ देशाला काही ठोस परराष्ट्रधोरण आणि ठाम राष्ट्रप्रमुख असण्याचा होता. जिकडे सरशी, तिकडे पारशी असलं केविलवाणं धोरण तेव्हा नव्हतं. आता चीन सीमाप्रदेश बळकावतोय, पण आपण गप्प बसायचं, अमेरिकेचा अध्यक्ष आदेश देतो, मग युद्ध थांबवायचं, लगेच चीनच्या गळ्यात पडायला जायचं, मध्ये पुतीनला पायघड्या घालायच्या, असं बुळचट आणि दिशाहीन परराष्ट्र धोरण सुरू आहे. त्यामुळे अमेरिकेने एक देश गिळला तरी आपल्याकडून ब्र निघत नाही आणि आपला कायम मित्र असलेल्या इराणवर अमेरिकेने डोळे वटारले तरी त्या देशासोबत ठाम उभं राहण्याची हिंमत नाही. चिरकुट देशांमध्ये जाऊन फॅन्सी ड्रेस स्पर्धा करायची आणि ठिकठिकाणचे ढोल वाजवायचे, त्यांचे पुरस्कार घ्यायचे आणि राष्ट्रीय उद्योगपतीचा बिझनेस सेट करायचा, हे जिथलं धोरण तिथे भविष्यात किती अंधार असेल, त्याची कल्पनाच नको.

Previous Post

हिंदुस्थान की अदानीस्थान?

Next Post

मुंबईच्या ‘महाविजया’ची पोल खोल!

Next Post
मुंबईच्या ‘महाविजया’ची पोल खोल!

मुंबईच्या ‘महाविजया’ची पोल खोल!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.