ग्रहस्थिती- हर्षल वृषभेत, गुरू मिथुन राशीत, केतू सिंहेत, बुध वृश्चिक राशीत, रवि मंगळ शुक्र धनु राशीत, राहू कुंभेत, शनि, नेपच्युन मीनेत, प्लूटो मकरेत दिनविशेष -१० जानेवारी,कालाष्टमी,१४ जानेवारी-षटतिला एकादशी आणि मकर संक्रांती.
*******
मेष : आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी, व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागल्याने मानसिक ताण वाढेल. ध्यान-धारणा करा. समाजकार्यात सन्मान होईल. मित्रांशी मतभेद होतील. साहसी खेळांमध्ये यश मिळेल. घरासाठी अचानक मोठा खर्च कराल. तरुणांना यश मिळवण्यासाठी अधिकचा घाम गाळावा लागेल. कामात हयगय नको. संयम ठेवा. नोकरीत तत्वाला धरून काम करा. नातेवाईक, मित्रांवर खर्च होईल. व्यवसायात वायफळ खर्च टाळा. अनोळखी व्यक्तीवर अतिविश्वास टाकू नका. घरात वाद टाळा. हेकटपणा त्रासदायक ठरू शकतो.
वृषभ : अनेक वर्षांपासून जाणवणारी आर्थिक चणचण दूर होईल. व्यवसायात नव्या संधी चालून येतील. निर्णय घेताना घाई नको. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. लॉटरी, शेअरमध्ये चांगला लाभ मिळेल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. पगारवाढ, प्रमोशनचे योग जुळून येतील. आठवड्याच्या मध्यास उत्साहवर्धक घटना घडतील. कोणाला सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. व्यवसायात आर्थिक बाजू सांभाळा. यशामुळे हुरळून जाऊ नका. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागेल.
मिथुन : जुने आजार त्रास देतील. ज्येष्ठांशी वाद मनावर घेऊ नका. तरुणांचे उच्चशिक्षणाचे प्रश्न मार्गी लागतील. नोकरीनिमित्ताने विदेशात जाल. आर्थिक बाजू भक्कम ठेवा. सामाजिक क्षेत्रात नवी दालने उघडतील. कर्तृत्वाच्या जोरावर उत्तम यश मिळेल. योग्य प्रयत्न करा. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबासाठी अधिकचा वेळ द्यावा लागेल. व्यवसायात आर्थिक नियोजन सांभाळा. जनसंपर्क क्षेत्रात चांगले दिवस अनुभवाल. मित्र मंडळींकडून सन्मान मिळेल. फक्त बोलताना काळजी घ्या, त्यांची मने दुखावू नका.
कर्क : नोकरीनिमित्ताने केलेल्या दूरच्या प्रवासात पाकीट सांभाळा. जपून आर्थिक व्यवहार करा. बँकेच्या कामांत घाई नको. तरुणांची दगदग होईल. मात्र, काही सकारात्मक ऊर्जा वाढवणार्या घटना घडतील. नवे काम मिळेल. स्पर्धेत यश मिळेल. छोट्या कारणामुळे मनाची अस्वस्थता वाढू देऊ नका. आठवड्याचा उत्तरार्ध उत्साहवर्धक राहील. खेळाडूंना घवघवीत यश मिळेल. व्यवसायात यश मिळेल. व्यवसायविस्तार योजना पुढे सरकतील. नोकरीत चुका टाळा, चित्त विचलित होऊ देऊ नका. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालणे जिकिरीचे बनेल.
सिंह : अडकलेली कामे मार्गी लागतील. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवे मार्ग सापडतील. नव्या मित्रांमुळे वाढीव कामे होतील. समाजकार्यात सन्मान वाढेल. तरुणांना यशासाठी कष्ट घ्यावे लागतील. नोकरीत वाद होतील. नातेवाईकांशी जुने वाद संपुष्टात येतील. अहंकारी वृत्ती बाजूला ठेवा. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. मोठे निर्णय लगेच घेऊ नका, मालमत्तेचे विषय लांबणीवर टाका. घरात सबुरीने घ्या. प्रतिक्रिया देऊ नका. काही गोष्टी मनातच ठेवा. व्यवसायात यश मिळेल. मनासारख्या घटना घडतील. संततीकडून शुभवार्ता कळतील.
कन्या : आर्थिक बाजू भक्कम राहील. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. काही ठिकाणी धाडस उपयुक्त ठरेल. अति विश्वास दाखवू नका. सामाजिक कार्यात मान सन्मान मिळतील. मुलांकडून आनंदवर्धक बातमी कळेल. आरोग्याचे प्रश्न सोडवा. तरुणांचा उत्कर्ष होईल. व्यवसायात मनासारख्या घटना घडतील. भागीदारीत सबुरीने घ्या. टोकाचा निर्णय घेऊ नका. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. करमणुकीवर खर्च कराल. गुंतवणुकीतून लाभ मिळेल, तो योग्य ठिकाणी खर्च करा. तब्येत सांभाळा. त्यागाची भावना ठेवा.
तूळ : व्यवसायात फायदा मिळेल. नवीन निर्णय जपून घ्या. नोकरीत प्रमोशन, पगारवाढ होईल. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ. मुलांकडे लक्ष द्या. गुरुकृपा राहील. कामे मार्गी लागतील. नोकरीनिमित्ताने विदेशात जाण्याची संधी मिळेल. मित्रांशी वाद होऊन वितुष्ट येईल. घरात आनंदी वातावरण ठेवा. छोटे वाद जागेवरच सोडून द्या. आजचे काम उद्यावर ढकलू नका. व्यवसायात निर्णय घेताना गडबड नको. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या. तरुणांची कामे मार्गी लागतील. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. सामाजिक क्षेत्रात सावधानता बाळगा. कलाकारांचे कौतुक होईल, अहंकारामुळे नुकसान होईल.
वृश्चिक : काही कामे न झाल्याने मन:स्वास्थ्य बिघडू देऊ नका. योगा, ध्यान यांचा फायदा होईल. छंदातून व्यवसायाची कल्पना आकाराला येईल. नोकरीत अधिक कष्ट करावे लागतील. वेळेचे नियोजन चुकू देऊ नका. व्यवसायात धनलाभ होईल. कुटुंबासाठी भरपूर वेळ खर्च करावा लागेल. सरकारी कामे पुढे सरकतील. आर्थिक बाजू चांगली राहील, पण अवास्तव खर्च नकोच. सामाजिक कामात सहभागी व्हाल. प्रवासात अनोळखी व्यक्तींकडून फसवणूक होऊ शकते. नोकरीत कामाशी काम ठेवा, उगाच सल्ले देऊ नका. हेका चालवू नका.
धनु : व्यवसायात नवीन प्रयोग यशस्वी होतील. सामाजिक क्षेत्रात लौकिक वाढेल. आरोग्याच्या किरकोळ कुरबुरींकडे दुर्लक्ष नको. तरुणांना इतरांशी जमवून घ्यावे लागेल. वादाचे प्रसंग टाळा. आर्थिक बाजू नीट तपासूनच पुढे जा. बँकाचे व्यवहार जपून करा. नोकरी-व्यवसायात वेळेचे गणित जमवताना तारेवरची कसरत करावी लागेल. मनासारख्या घटना न झाल्यामुळे राग अनावर होईल. सकारात्मक राहा. मन शांत ठेवा. संततीकडे लक्ष द्या, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र यांच्याशी सल्लामसलत फायदेशीर ठरेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.
मकर : अचानक धनप्राप्ती होईल. नियोजनपूर्वक खर्च करा. व्यवसायात जुने येणे वसूल होईल. नवीन ओळखींतून अडकलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत कामाचे कौतुक झाले तरी दगदग होईल. तब्येत सांभाळा. आर्थिक व्यवहार सांभाळा. कामानिमित्त प्रवास कराल. चित्रकार, शिल्पकारांना कामे मिळतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. घरात कोणताही निर्णय घेताना घाई नको. तरुण बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवतील. नवीन वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. गायक, संगीतकारांना नव्या संधी मिळतील. कुटुंबासाठी वेळ खर्च होईल.
कुंभ : कुटुंबासाठी वेळ खर्च होईल. जुने विषय मार्गी लागतील. नोकरीत मनासारखी स्थिती राहील. आर्थिक बाजू भक्कम होईल. कामाचे दडपण घेऊ नका, मन:स्वास्थ बिघडू शकते. व्यवसायात चांगली स्थिती राहील. कामाचा हुरूप येईल. व्यवसायात बुद्धिचातुर्याच्या जोरावर यश मिळेल. दोन कामे अधिकची होतील. व्यवसायाच्या नव्या कल्पना पुढे सरकतील. नियोजन करून काम करा. नोकरीत तुमच्या अधिकारात वाढ होईल. कुटुंबात कोणतीही कृती विचारपूर्वक करा. सामाजिक कार्यात वेळ खर्च होईल. कलाकारांना यश मिळेल.
मीन : नवीन घर घेण्याचा विषय मार्गी लागेल. मामा, मावशींकडून मदत मिळेल. उधार-उसनवारी टाळा. भागीदारीत आर्थिक बाबीवरून किरकोळ वाद होतील. आई-वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरीत पगारवाढ, प्रमोशन होईल. जुन्या मित्रांबरोबर गेट टुगेदर होईल. घरासाठी वेळ खर्च कराल. मार्केटिंग क्षेत्रात उत्तम काळ आहे. अचानक धनलाभ होईल. सामाजिक क्षेत्रात नावलौकिक वाढेल. अडकून पडलेल्या कामांना गती मिळेल. मनासारखी नोकरी मिळेल. कुटुंबातील मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागण्यास विलंब होईल.

