अलिकडेच ‘मन फकिरा’ या सिनेमाद्वारे आपले दिग्दर्शन कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या आपल्या पतीसोबत गोव्यातील समुद्रकिनार्यावर व्हेकेशन घालवतेय. तिला आपण सगळेच एक खूप गुणी अभिनेत्री म्हणून ओळखतो. पण आपण उत्तम दिग्दर्शिका आहोत हेही तिने दाखवून दिले आहे. आजच्या तरुणाईचा नात्यांचा झालेला गुंता तिने या सिनेमाद्वारे छान उलगडला होता. आताही लवकरच मृण्मयीचं दिग्दर्शन असलेला ‘मनाचे श्लोक’ हा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू असल्यामुळे या काळात शूटींग शेड्यूलमधून ब्रेक घेत मृण्मयी सध्या पती स्वप्नील राव यांच्यासोबत मस्त रोमॅण्टीक व्हेकेशन एन्जॉय करतेय. मृण्मयी आणि तिचे पती स्वप्निल राव हे गोवा व्हेकेशनवर आहेत.
सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी मृण्मयी तिथले छान छान फोटो चाहत्यांसोबत शेअर करतेय. गोव्याच्या किनार्यावर हे दांपत्य क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतंय.
मृण्मयी देशपांडेच्या या रोमॅण्टिक गोवा डायरीजवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. अनेकदा मृण्मयी पतीसोबत सुट्टी घालवल्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. मृण्मयी देशपांडेने बिझनेसमन स्वप्नील रावसोबत ३ डिसेंबर २०१६ साली लग्न केले.