साप्ताहिक मार्मिकच्या स्थापनेपूर्वी बाळासाहेबांच्या कुंचल्याचे फटकारे अनेक माध्यमांमधून रसिकांसमोर येत असतं. मार्मिक सुरू झाला १९६० साली. मराठी माणसाला त्याच्या राज्याच्या हक्काच्या राजधानीत योग्य स्थान मिळत नाही, हे पाहिल्यावर मराठी माणसाच्या मनात जो असंतोष खदखदू लागला, त्याला मार्मिकमधून वाट मिळू लागली आणि त्या धगधगत्या संतापातून जन्माला आली शिवसेना. मात्र, हे सगळे होण्याच्या किती तरी आधीपासून बाळासाहेबांना मुंबईवर कोणाचा आणि कशासाठी डोळा आहे, हे चांगलेच ठाऊक होते. हे व्यंगचित्र आवाज या विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरचे. तिथेही बाळासाहेबांनी लक्ष्मीमातेकडे ‘बम्बई हातची ज्याऊ देऊ नको’ असं साकडं घालणारा शेठजी दाखवला आहे आणि त्याचं ब्रीदवाक्य आहे सट्टा मेव जयते! आज हे सगळे सटोडिये भारताचे भाग्यविधाते बनून दिल्लीत बसले आहेत आणि त्यांचं गुजरात कार्टेल महाराष्ट्राचे लचके तोडतंय. त्याला महाराष्ट्राचे गद्दार सत्ताधीश लाळ घोटत आणि बूट चाटत साथ देत आहेत. आज बाळासाहेबांच्या संतापाचा किती कडेलोट झाला असता?