• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय, नो, नेव्हर…

- संतोष पवार

Nitin Phanse by Nitin Phanse
May 15, 2025
in भाष्य
0

साधं झुरळ बघितल्यावर ज्यांची फाफलते, त्यांना युद्धाचा इतका चेव कसा येत असतो? सीमेवर दुसर्‍यांची मुलं लढणार आणि हे घरात मंत्रजाप करून त्यांना बळ देण्याचा दावा करणार, स्वत: सुरक्षित राहणार, आपली मुलं परदेशात पाठवणार. असल्या काका काकूंचं काय करावं?
– निनाद पाटील, सातारा
आपण जे झुरळाचं करता तेच अशा काका काकूंचं करा… अशी बिच्चारी माणसं झुरळसुद्धा दुसर्‍याच्या काठीने मारत नाहीत; त्यासाठी त्यांना माणूसही दुसरा लागतो. त्यांना येतं तेच करणार ना. ते दुसरं काय करणार? पण तुम्ही पण तसंच करताय… अशा काका काकूंचं काय करायचं म्हणून आम्हाला विचारा… म्हणजे काय करायचं हे आम्ही सांगितलं, की हे काका काकू आमच्याविरुद्ध सोशल मीडियावर युद्ध पुकारणार (हे पण त्यांना येतं. मग ते तेवढेच करणार ना!) की तुम्ही आमच्यावरच्या ट्रोलिंगची मजा घ्यायला मोकळे… कसं काय पाटील बरोबर हाय ना? आम्ही काय बोललो ते खरं हाय ना?

न्यूज चॅनेलच्या अँकर मंडळींना सीमेवर युद्धाच्या ठिकाणी सगळ्यात आघाडीवर ठेवायचा निर्णय लष्कराने घ्यायला हवा, असं मत गेला आठवडाभरातल्या बातम्या पाहिल्यावर झालं आहे. देशाच्या संरक्षणासाठी हे कामी आले तर देशाचं दुहेरी भलं होईल, असं वाटतं. तुमचं काय मत आहे संतोषराव?
– विलास पेटकर, अमरावती
तुम्ही एकाच बाजूने विचार करताय विलासराव… आम्ही युद्ध पुकारलेले नाही असं खुद्द सैन्याने सांगूनसुद्धा, युद्ध सुरू झालेच आहे… शत्रू राष्ट्र बेचिराख झालेलं आहे… अशा बातम्या देणं येड्या गबाळ्याचं काम आहे का? असे शहाणे गबाळे नसतील तर मग युद्ध हव असणार्‍या लोकांसाठी काय खरंच युद्ध करायचं? देशाचे वाईट दिवस आलेयत असं वाटणार्‍या लोकांना चांगले दिवस येणार आहेत अशा आशा दाखवणार्‍या बातम्या कोण देणार? जे घडतंय त्याची बातमी लपवून ठेवून, जे घडत नाही त्याची बातमी देणे हे एक वेगळ स्किल आहे…

मी विनोदी लेखक, विनोदी नाटककार, अभिनेता, प्रश्नोत्तराचे सदर चालविणारा वगैरे वगैरे होऊ की बुवाबाजी, बाबागिरी करू?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव, पुणे.
स्वत:च्या कामधंद्यातून आनंद, लोकांची वा वा आणि पोटापुरता पैसा मिळवायचा असेल तर बुवाबाजी, बाबागिरी सोडून दुसरं काहीही करा.. आणि दुसर्‍यांना धंद्याला लावून, वारेमाप पैसा आणि विकृत आनंद मिळवायचा असेल तर दुसरं काहीही न करता बुवाबाजी, बाबागिरी करा… असा काहीही अर्थ माझ्या उत्तराचा काढू नका. कारण बुवाबाजी, बाबागिरी करणार्‍यांचे भक्त, त्यांची कामं सोडून आम्हाला दमदाटी करण्याच्या धंद्याला लागतील. आम्हाला त्यांना उगाच त्रास द्यायचा नाही…

अलीकडे सरकारचे किंवा सरकारप्रमुखांचे भक्त असणे ही देशभक्त असण्याची सोपी व्याख्या झाली आहे. खासकरून तणावाच्या काळात तर प्रत्येकाला देशभक्ती ‘दाखवावी’ लागते. तुम्ही ती कशी दाखवता?
– चंद्रिका उन्हाळे, संभाजीनगर
आम्ही कोणालाही काहीही दाखवायला जात नाही. तुम्ही सुद्धा कोणालाही काहीही दाखवायला जाऊ नका… उगाच देशभक्ती दाखवायला जाल आणि देशद्रोही ठराल… आमचं बोलणं खोटं वाटत असेल तर जे देशद्रोही डिक्लेअर झालेले आहेत त्यांना हाच प्रश्न विचारा… बाकी कोणाचीही कसलीही परीक्षा घ्या. पण ज्यांनी स्वत:ला देशभक्त म्हणून डिक्लेअर केलेले आहे, त्यांच्या देशभक्तीची परीक्षा घेऊ नका. तुमच्या एका प्रश्नाने आणि त्यावरच्या आमच्या एका उत्तराने आपण देशद्रोही म्हणून डिक्लेअर होऊ शकतो..??

मराठी सिनेमा ‘आता थांबायचं नाय’ असं म्हणून मुसंडी मारत यशाचा ‘गुलकंद’ चाखतो आहे आणि प्रेक्षक मराठी सिनेसृष्टीसाठी ‘देवमाणूस’ बनून थिएटरला गर्दी करतो आहे, हे आश्वासक चित्र पाहिल्यावर तुमची एक्स्पर्ट कॉमेंट काय?
– रोशनी कांबळे, बदलापूर
आम्ही कलाकार आहोत. रंगकर्मी म्हणून काम करतोय हे बघवत नाही का? की, आम्हाला एक्सपर्ट बनवून घरी बसवायची सुपारी दिली आहे तुम्हाला कोणी? प्रत्येक कलाकृती, ही बनवणार्‍यांच्या मेहनतीप्रमाणे आणि टॅलेंटनुसार चालते. प्रेक्षकही त्यांच्या आवडीप्रमाणे ती स्वीकारतात किंवा नाकारतात. त्यामुळे कलाकृती आणि प्रेक्षक यांच्यामध्ये बोलण्याएवढा मी एक्सपर्ट नाही.

एका मुलीवर माझं फार प्रेम आहे. पण, ती व्हॉट्सअपवर फॉरवर्ड येणारा कचरा आणि अर्णब गोस्वामीच्या बातम्या (म्हणजे पुन्हा कचराच) यांच्यावर विश्वास ठेवते, तेच खरं मानून चालते. तिच्याशी संबंध ठेवू की नको ठेवू? तुम्ही सल्ला द्या, प्लीज संतोष दादा!
– प्रणय पंडित, रत्नागिरी
‘निवडणूक’ करताना चुकायचं, मग ‘सोडवणूक’ कशी होणार? मग डोक्याला हात लावून बसायचं, अशा टिपिकल देशप्रेमींसारखे प्रेमी आहात तुम्ही… फायदे सोडवत नाहीयेत, पण लोकांच्या शिव्या नकोत असं झालंय तुमचं… आता एक काम करा… वाईटातून चांगलं होतं या वाक्प्रचारावर विश्वास ठेवा आणि ती कधी तुम्हाला सोडते याची वाट बघा… देशप्रेमीसुद्धा अशीच वाट बघतायत असा अर्थ माझ्या या बोलण्यातून प्लीज काढू नका… आधी बोलायचं आणि मला असं बोलायचं नव्हतं असं नंतर बोलायचं… यापेक्षा मला असं बोलायचं नाहीये असं बोलतानाच बोललेलं बरं नाही का? नाहीतर उगाच कचरा फेस करायला लागायचा… (हे आम्ही तुमच्या प्रेयसीच्या डोक्यातल्या कचर्‍याबद्दल बोलतोय… तुम्ही म्हणताय त्या दुसर्‍या कुठल्या कचर्‍याबद्दल नाही.)

Previous Post

चल उड जा रे पंछीऽऽऽ

Next Post

टूर निघालीऽऽ पुंवाकऽऽ पुक पुकऽऽ…

Next Post

टूर निघालीऽऽ पुंवाकऽऽ पुक पुकऽऽ...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.