• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
May 15, 2025
in टपल्या आणि टिचक्या
0

□ मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाची ३० मेची डेडलाईन हुकणार! काम अजून अर्धेच पूर्ण.
■ कोकणात जाणार्‍या येणार्‍या प्रत्येकाला या रस्त्याची सध्याची स्थिती माहिती आहे. दर वर्षी कोकणवासी या रस्त्याच्या नावाने खडे फोडतात आणि ही माती करणार्‍यांनाच निवडून देतात. अशा रस्त्याच्या बाबतीत अशा डेडलाइन देणार्‍यांच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे! त्यांचा त्याच रस्त्यावरच्या एखाद्या रुंदीकरण कार्याच्या ठिकाणी जाहीर सत्कार केला पाहिजे.

□ लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध खटला चालविण्यास राष्ट्रपतींची मंजुरी.
■ यात बातमी काय आहे? लालूप्रसाद यादव यांच्या जागी कोणीही एक्सवायझेड असते तरी राष्ट्रपतींनी त्या खटल्याला मंजुरीच दिली असते. त्यांचं काम फक्त सरकारच्या हाताला हात लावून मम म्हणायचं आहे. त्यात विद्यमान राष्ट्रपती तर मोदी जिंकले म्हणून दहीसाखर भरवणार्‍या आहेत त्यांना. त्यांच्याकडून स्वतंत्र विचारांची अपेक्षा करता तरी येईल का?

□ अमरावतीत मिंधे गटातील शेकडो महिला कार्यकर्त्या शिवसेनेत दाखल.
■ आपण फक्त निवडणुकांपुरत्याच लाडक्या असतो, निवडून आणण्याचं काम झालं की तोंडाला पानं पुसली जातात, हे या तायांच्या लक्षात आलेलं आहे. राज्यभरातल्या तायांच्या ते लक्षात येईल लौकरच.

□ नालेसफाई नाहीच, पुरावे केवळ कागदावर! यंदा मुंबईची तुंबई होणार.
■ दरवर्षीची बातमी हीच. माध्यमांमध्ये मे महिन्यापासून नालेसफाईच्या बातम्या सुरू होतात. इतके टक्के झालं काम, तितके टक्के झालं काम, असं सांगितलं जातं. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईची तुंबई होणार हेही सांगितलं जातं. मधल्या काळात शेकडो कोटी इकडून तिकडे गेलेले असतात. ते मुंबईकरांसाठी नाल्यातच गेलेले असतात.

□ ठेकेदारांपुढे महायुती सरकारचे लोटांगण! वादग्रस्त अ‍ॅम्ब्युलन्स टेंडर सुमित, एसएसजी, बीव्हीजी कंपनीलाच.
■ ठेकेदारांपुढे लोटांगण म्हणजे? नाहीतर काय मतदारांपुढे लोटांगण घालायचं. त्यांच्यासाठी काम करायचं? त्यांना दंडवत फक्त निवडणुकीपुरतं, नंतर गंडवत बसायचं. हे राज्य ठेकेदारांचं, उद्योगपतींचं आहे, त्यांनी नेमलेले इमानी चाकर आणि चौकीदार यापेक्षा वेगळं काय करतील?

□ राज्य सरकारने पसरले केंद्राकडे हात; महायुती सरकारची वित्त आयोगाकडे १ लाख २८ हजार कोटींची मागणी.
■ एकेकाळी सगळ्या देशाची जबाबदारी खांद्यावर घेणारा घरातला कर्ता मुलगा होता महाराष्ट्र. आता त्या कर्तबगार मुलाला धर्माच्या अफूचं व्यसन लावून बुद्धिभ्रष्ट करून टाकलं गेलं आहे. जो भीक घालत होता, तो आज हात पसरतो आहे.

□ जागेच्या वादामुळे कांजुर कारशेडच्या कामाला हायकोर्टाचा २५ जूनपर्यंत ब्रेक.
■ मेट्रोचं काम आम्ही पाहिलं असं बहुतेक लोक शंभरएक वर्षं सांगणार मुंबईत. जेव्हा खरोखरच ती सुरू होईल, तोवर एअर टॅक्सी आणि बसची कविकल्पनाही प्रत्यक्षात आलेली असेल.

□ राज्यात ६० हजार स्कूल बसेस अनधिकृत; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
■ पहिलीपासून हिंदीची सक्ती, शिक्षकांना गणवेश, मुलांच्या पुस्तकांना वह्यांची पानं वगैरे महान उद्योगांमध्ये शिक्षण खातं मग्न आणि सरकारला फक्त निवडणुका जिंकण्यापुरती मतदारांची काळजी. स्कूल बस कोण तपासत बसतो? काही मलईदार काम असेल तर सांगा.

□ शेतकर्‍यांची नुकसान भरपाई रखडवू नका – हायकोर्टाने राज्य सरकारला बजावले.
■ आता पंचाईत अशी आहे की खरोखरच नुकसान भरपाई द्यायचा विचार असला सरकारचा, तरी पैशांचं सोंग आणणार कुठून? मग कटुता घेऊन खडे बोल सुनावायला आहेतच अजित दादा!

□ नालेसफाईत दिरंगाई केल्यास बिले मंजूर करणार नाही – केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांचा ठेकेदारांना इशारा.
■ सफाई पूर्ण झाली आणि बिलं मंजूर झाली आणि नंतर नाले तुंबले तर काय रोखायचं? कसं रोखायचं? कोणाचं रोखायचं?

□ राजकारण हा पैसे कमवण्याचा धंदा नाही – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुनावले.
■ गडकरी साहेबांना सरसंघचालक वगैरे व्हायचं आहे की काय? असली निष्फळ सुभाषितं तेच इकडे तिकडे बोलत असतात. राजकारणात, अगदी गडकरी यांच्या संघटनेत आणि पक्षातले लोकही शंभर टक्के समाजकारणासाठी आलेत अशी खात्री गडकरी देऊ शकतील काय?

□ नवी मुंबईत भाजपचे गणेश नाईक विरुद्ध मिंधे गट असे कोल्ड वॉर सुरूच; आता नाईकांचा मिंधेंच्या विजय चौगुलेंवर सर्जिकल स्ट्राईक.
■ नाईकांना महाशक्तीने जे काम नेमून दिलेलं आहे, ते करतायत ते इमाने इतबारे. गद्दारांमध्ये पर्सनल काही नसतं, सगळं मालकांच्या हुकुमाने करावं लागतं.

□ सावरकर सदनाला ऐतिहासिक दर्जा कधी? हायकोर्टाने राज्य शासनाला धाडली नोटीस.
■ सावरकरांचं नाव ठराविक काळात ठराविक समाजाच्या भावना चाळवून मतं मिळवण्यासाठी उपयोगाला येतं. एरवी त्यांना अडगळीत ठेवणंच राजकीयदृष्ट्या परवडतं, मग असे विषय मागे पडतात.

□ एक रुपयात पीक विमा बंद; आता शेतकर्‍यांना पैसे भरावे लागणार.
■ अशा योजनांमध्ये शेतकरी राहतो बाजूला आणि इतरांचंच उखळ पांढरं होतं. शिवाय बदनाम होतो तो साधा, गरीब शेतकरी. नुकसानही त्याचंच होतं.

□ सायबर सुरक्षेचे धडे गिरवायला आशिष शेलार निघाले स्पेनला; आयपीएस ब्रिजेश सिंग यांना लांब ठेवले.
■ उन्हाळ्याचा कडाका असह्य आहे. सुखद हवामानात काहीतरी वेगळं शिकण्याची मजा काही और आहे. ती उपभोगू द्या त्यांना.

Previous Post

मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

Next Post

जातगणना : एक चुनावी जुमला!

Related Posts

टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 8, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 5, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

April 25, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

April 17, 2025
Next Post

जातगणना : एक चुनावी जुमला!

माणसांनी माणसांना माणसासम मारणे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.