• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शहीद भूषण सतई यांच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 29, 2020
in घडामोडी
0
शहीद भूषण सतई यांच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

13 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात काटोलचे सुपुत्र  भूषण रमेश सतई हे शहीद झाले होते. शहीद भूषण यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून मदत मिळावी यासाठी अनिल देशमुख यांनी पाठपुरावा केला. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शहीद भूषण यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री व काटोल विधानसभेचे आमदार अनिल देशमुख यांनी दिली.

शहीद भूषण सतई हे 2010 मध्ये नायक या पदावर लागले होते. सध्या श्रीनगर येथील गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते. तेथे कार्यरत असतांना त्यांना वीरमरण आले. युद्धात युद्धजन्य परिस्थिती मध्ये तसेच देशातील सर्व क्षेत्रा अंतर्गत सुरक्षा संबंधी मोहिमेत शहीद झालेल्या जवानांना मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. याच निर्णयाअंतर्गत शहीद भूषण सतई यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मंजूर व्हावी यासाठी मी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर शहीद भूषण यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

देशासाठी प्राणाची आहुती देऊन शहीद भूषण सतई यांनी आई-वडिलां सोबतच काटोल व  जिल्ह्याची मान उंचावली आहे. शहीद भूषण यांच्या कुटुंबीयांना कितीही मदत दिली तरी त्यांच्या कुटुंबावर जे दुःख आले आहे ते कमी होणार नाही. परंतु शहीद भूषण यांनी देशासाठी जे बलिदान दिले त्याचा सन्मान व्हावा यासाठी ही मदत कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

सौजन्य : दैनिक सामना

Previous Post

‘वर्क फ्रॉम होम’ हवंय! 53 टक्के हिंदुस्थानी नोकरी बदलण्यास इच्छुक

Next Post

नगरचा बीएसएफ जवान अडकला हनिट्रॅपमध्ये, पंजाब पोलिसांकडून चौकशी सुरू

Next Post
नगरचा बीएसएफ जवान अडकला हनिट्रॅपमध्ये, पंजाब पोलिसांकडून चौकशी सुरू

नगरचा बीएसएफ जवान अडकला हनिट्रॅपमध्ये, पंजाब पोलिसांकडून चौकशी सुरू

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.