• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

एकता

- सारिका कुलकर्णी (मी काय म्हणते)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 16, 2025
in भाष्य
0

एकताचे हे वैशिष्ट्य होते. कुठल्याही व्यवसायात ती फार काळ नसे. तिच्याकडे एक वेगळेच विक्रीकौशल्य होते. फटकळ असूनही तिच्याकडून गिर्‍हाईक पटत असे. पण चांगला चाललेला व्यवसाय सोडून तिला नेहमीच कसलेतरी भलतेच व्यवसाय भुरळ घालीत. तिला चित्रविचित्र व्यवसाय करावेसे वाटत.
– – –

१९८०च्या दशकापासून ते आतापर्यंतचा भारतीय महिलांच्या प्रगतीचा आलेख जर कोणाला रेखाटायचा झालाच तर तो आमच्या ‘एकता’ शिवाय रेखाटताच येणार नाही. म्हणजे ती विविधतेत एकतावाली एकता नव्हे बरं का! ही म्हणजे आमची जिवंत चालती बोलती मैत्रीण असलेली एकता.
आमची मैत्रीण एकता आहेच एवढी उद्योगी. तिच्या कार्यकर्तृत्वाची नोंद नीट झाली असती तर आतापर्यंत तिला कित्येक उद्योगरत्न पुरस्कार असे बोलता बोलता मिळाले असते. प्लॅस्टिकपासून पेट्रोल तयार करणे ते बायकांच्या केसापासून कॅन्सरचे औषध तयार करण्यापर्यंत सगळे उद्योग एकताने एकहाती केलेले आहेत. सतत नवीन काहीतरी अद्भुत उद्योग करत राहणे हाच एकताचा महत्वाचा व्यवसाय आहे. तिच्या व्यवसायांची यादी करायची ठरवली तर त्यासाठी एखाद्या माणसाला पगारी ठेवावे लागेल.
एकताच्या आईच्या मते एकता लहानपणापासून अशीच होती. तिचे नाव एकता ठेवण्यामागे काय कारण आहे हे आम्हाला समजलेले नाही. म्हणजे आईवडिलांची ‘एकता’ म्हणून ती एकता झाली की कसे ते लक्षात आलेले नाही. दमयंती, देवयानी, श्रावणी अशी गोड गोड नावे ठेवण्याच्या काळात त्यांना मुलीचे नाव ‘एकता’ असे का ठेवावे वाटले असेल हा प्रश्न आहेच; शिवाय असे वेगळे नाव असणारी व्यक्ती काहीतरी जगावेगळे उद्योग न करेल तरच नवल.
एकताची माझी ओळख ज्या पद्धतीने झाली ती कहाणीदेखील रोचकच आहे. एके दिवशी आमच्या ऑफिसमध्ये एक बाई फिंगर बाकरवडी विकायला आल्या. म्हणजे बाकरवडी विकण्याबद्दल आमचा आक्षेप नव्हताच. एखाद्या प्रसिद्ध ब्रॅण्डची बाकरवडी सोडून आम्ही दुसरी खात नाही असा काही आमचा पण नव्हता… मुळातच असे बाहेरून येऊन कोणीतरी आमच्या ऑफिसमध्ये काही विकू शकत नव्हते. त्यामुळे अर्थातच त्या बाईंना ऑफिसमध्ये असे काही विकण्याची परवानगी मिळाली नाही. पण बाई भन्नाटच होत्या. त्यांनी बरोबर ऑफिसच्या गेटपाशी स्टॉल लावला आणि येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाला एकेक बाकरवडी खाऊ घालू लागल्या. मी ऑफिसमधून घरी जाताना मला देखील थांबवले. बाकरवडी खायला दिली. छान होती. मी म्हटले, ‘चांगली आहे.’ ‘असणारच. घरी केलेली आहे. शिवाय माहिती आहे का मॅडम, आमचा यूएसपी वेगळा आहे. एका पाकिटात मोठ्या आकाराच्या फक्त दहा बाकरवड्या असतील. बरोबर आपल्या दहा बोटाच्या आकाराच्या असतात.’
‘म्हणूनच त्याला फिंगर बाकरवडी म्हणतात का?’ मी उगीचच काहीतरी बोलले.
‘बरोब्बर. तसेच आहे. मला सांगा. नाहीतर त्याला फिंगर बाकरवडी कशासाठी म्हणायचे? त्या वस्तूने त्या नावाला सार्थ करायलाच हवे. समजा एखाद्या कलाकाराचा एखादा फॅन आहे असे का म्हणतात? बोला बोला, का म्हणतात?’
‘तो चाहता असतो म्हणून.’
‘अहो, चाहता वगैरे दुसर्‍या भाषेतील शब्द झाले. त्याला फॅन शब्दाची सर नाही. नाही ना ठाऊक?’
बाईंना मला कोड्यात टाकायला मजा येत होती. माझा चेहरा बघून म्हणाल्या, ‘गोंधळून जाऊ नका. कलाकाराच्या कलेचा आनंद घेताना फॅनला एकदम फॅन लावल्यासारखे गारेगार वाटते म्हणून त्याला फॅन म्हणतात.’
ही बाई गंमत करते आहे की गंभीरपणे बोलते आहे हे आजमावण्यासाठी मी तिच्या चेहेर्‍याकडे बघितले. पण बाई अगदी गंभीरपणे सांगत होती. पहिल्यांदाच मी तिला नीट न्याहाळले. बॉयकटपेक्षाही बारीक केलेले बारीक केस. इतके बारीक केस मी बायकांचे कधीही बघितले नव्हते. कॉलर असलेला टीशर्ट. जीन्सची पॅन्ट, एका हातात घड्याळ. पायात सॅन्डल. कानात काही नाही, कसला मेकअप नाही. म्हणजे बाई असल्यासारखी राहणी अजिबातच नव्हती. आपण चांगले दिसायला हवे अशी आस बाईच्या चेहर्‍यावर आणि वागण्यात अजिबातच नव्हती. एकदम तडकफडक वागणे, स्पष्ट बोलणे. आमच्या ऑफिसमध्ये बाईंना बाकरवडी विकायला परवानगी मिळालेली नसली तरीही परवानगी नाकारणार्‍या साहेबांपासून आम्ही सगळ्यांनीच तिच्याकडून बाकरवडी विकत घेतलेली होती. या पहिल्या भेटीनंतर तिने मला तिचा फोन नंबर दिला. ती बाकरवडीच्या व्यवसायात होती तोपर्यंत मी न चुकता तिच्याकडून त्या घेत होते.
एकताचे हे वैशिष्ट्य होते. कुठल्याही व्यवसायात ती फार काळ नसे. खरे तर तिच्याकडे एक वेगळेच विक्रीकौशल्य होते. फटकळ आणि तोंडाळ असूनही तिच्याकडून गिर्‍हाईक पटत असे. पण चांगला चाललेला व्यवसाय सोडून तिला नेहमीच कसलेतरी भलतेच व्यवसाय भुरळ घालीत. कसलेतरी चित्रविचित्र व्यवसाय तिला करावेसे वाटत. एकदा तर तिने चक्क शेळीच्या लेंड्यांपासून वीजनिर्मिती कशी करायची याचा व्यवसाय करायला घेतला होता. त्या लेंड्या गोळा करण्यासाठी ती दिवसभर उन्हातान्हात फिरत असे. भारतभरात बंदिस्त शेळीपालन करणारे सगळे व्यावसायिक तिला ठाऊक झालेले आहेत.
कुठलाही अजब व्यवसाय सांगा आणि तो एकताने करून बघितला नाही असे होणेच शक्य नाही.
आमची चांगली ओळख झाल्यावर म्ाी पुष्कळ वेळा तिला जाणून घेण्यासाठी दिवस दिवस तिच्याबरोबर घालवले. तिच्या अंगात असलेला उत्साह इतका अभूतपूर्व आहे की एखादा व्यवसाय यशस्वी होईल की नाही याची जराशी सुद्धा शंका तिच्या मनाला स्पर्श करत नाही. प्रत्येक नवीन व्यवसाय ती तितक्याच आत्मविश्वासाने सुरू करते. प्रत्येक व्यवसाय सुरू करताना तितकाच आनंद तिच्या चेहर्‍यावर झळकत असतो. ती खरे तर व्यवसाय करण्यासाठीच जन्माला आलेली आहे. तिने लग्न वगैरे भानगडीत अडकायला नकोच होते असे वाटते. तिने कधी स्वप्नात तरी कुठला मुलगा, प्रेम वगैरे असे काही बघितले असेल की नाही कुणास ठाऊक? मला खात्री आहे की ज्या स्वप्नील वयात आपल्यासारखे लोक प्रेमाचा वगैरे विचार करतात, त्या वयात देखील तिच्या स्वप्नात लोकांच्या प्रेमाच्या ऊर्जेचा वापर करून शेतातील पेरणीची कामे कशी करता येतील, वगैरे काहीतरी दिसत असणार.
सांसारिक गोष्टीत अडकून वेळ वाया घालवणे हा तिचा पिंडच नाही. घरी स्वयंपाकाचे रोजचे पदार्थ ठरलेले आहेत. त्याचे वेळापत्रक तिच्या स्वयंपाकाच्या ओट्यावर लावलेले आहे. आम्हालाही आता ठाऊक आहे की मंगळवार म्हणजे आज तिच्याकडे मटकीची उसळ असणार. संध्याकाळी स्वयंपाक करायला तिला वेळ नसतो, त्यामुळे घरात जबाबदारी वाटून दिलेली आहे. रोजचा रात्रीचा स्वयंपाक तिच्याकडे वरणभात हाच असतो. घरात जी व्यक्ती असेल तिने कुकर लावायचा असा नियम आहे. घरी मुलांना सगळी कामे तिने शिकवून ठेवलेली आहेत. त्यामुळे ती नसली तरीही घरातील कुठलेही काम अडत नाही.
एकतासारख्या लोकांना बघितले की वाटत राहते की हिच्यात कधी मायेचा झरा पाझरत असेल का ? एकदा बोलण्या बोलण्यात समजले की तिचा प्रेमविवाह आहे. हिच्या प्रेमात कधी कोणी पडू शकते या गोष्टीवर अजिबातच विश्वास बसला नाही. पण ही आणि हिचा नवरा दोघेही एका व्यवसायात भागीदार होते म्हणे. तिथे दोघांचं जमलं. ती म्हणते, ‘तेवढा एकमेव व्यवसाय आहे की ज्यात मला तोटा झाला. पण आयुष्यात भागीदारी मिळाली हे काही कमी नाही. धंदा म्हणून करता येत नाही माझ्या नवर्‍याला, कशाला यात पडला त्यालाच ठाऊक? उगीच मला प्रेमात पडावं लागलं, लग्न करावं लागलं. केवढा वेळ वाया गेला. तेवढ्यात अजून एक दोन व्यवसाय करून झाले असते.’
मी तिला पुष्कळदा विचारते की ती एका व्यवसायात स्थिर का होत नाही? तर म्हणते की जे वाटेल ते करून घ्यावे माणसाने, काही राहायला नको.
कपड्यांच्या निवडीमध्ये देखील वेळ घालवू नये असे तिचे स्पष्ट मत आहे. कपड्यांची निवड करण्याच्या ती भानगडीत पडत नाही. दुकानदार म्हणाला की अमुक अमुक कपडा तुम्हाला चांगला दिसेल की ती ते कपडे घेऊन टाकते. टी शर्ट आणि जीन्सची पॅन्ट या व्यतिरिक्त पंजाबी ड्रेसमध्ये मी तिला फक्त एकदाच बघितलेले आहे. तेदेखील एका व्यावसायिकांच्या मीटिंगमध्ये भारतीय पोशाख घालून यायचे होते म्हणून ती तो ड्रेस कोणाकडून तरी घेऊन घालून आली होती. पंजाबी ड्रेसमध्ये मी तिला ओळखलेच नाही. बटणे लावण्यात वेळ वाया जाऊ नये म्हणून ती बटनाचे शर्ट्सदेखील घेत नसे.
‘टी शर्ट कसा अगं, असा डोक्यातून घातला आणि डोक्यातून काढला. काही सेकंदात काम संपलं,’ असे तिचे कपड्यांचे तत्वज्ञान होते.
पण पठ्ठीने कपड्यांचा देखील व्यवसाय एकदा केलाच होता. अगदी साड्यादेखील विकल्या होत्या. तिच्या व्यवसायात नेहमीच एक वेगळेपण असे. साड्या विकताना देखील तिने भारतीय पशू, पक्षी, प्राणी, किडे अशी सगळी चित्रे असलेल्या साड्या मिलमधून तयार करून घेतलेल्या होत्या. प्रदर्शनात तिला त्या साड्या विकताना बघणे हा एक वेगळा अनुभव होता. ‘घ्या हो ताई. ही साडी नेसून निसर्गाच्या अजून जवळ जा. हे बघा, आपण प्राणीसंग्रहालयात का जातो? वेगवेगळे प्राणी जवळून बघायला ना? मग या साडीवर तेच प्राणी आहेत. बघा, ही नाकतोडा साडी घ्या. नेसून तर बघा.’
इतक्या चित्रविचित्र प्रिंट असलेल्या साड्या एकताने कशा विकल्या कुणास ठाऊक?
आपण हालचाल केली की त्या उर्जेवर चालणारे पंखे, कुठल्या तरी एका विशिष्ट मातीच्या कढया, मिक्स डाळींपासून तयार केलेल्या शेवया, लहान मुलांची वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, पाण्याच्या शक्तीवर चार्ज होणार्‍या पॉवर बँक अशी कित्येक कधीही न ऐकलेली उत्पादने ती बाजारात आणत असे. सुप्रसिद्ध ब्रँडचे रेडी मिक्स पॅकेट्स बाजारात येण्याच्या कितीतरी आधी एकताचा तो व्यवसाय करून देखील झाला होता. तिला ही अशी उत्पादने घेऊन कोण संपर्क साधत असते, ते तिचे तिलाच माहिती. पण त्या उत्पादनाच्या खोलात जाऊन मगच ती ते विकायला घेते.
एकताला एखादा व्यवसाय करायला तयार करणे एवढे सोपे नव्हते. भल्या भल्यांना तिने प्रश्न विचारून जेरीस आणलेले आहे. मी तर असे ऐकले आहे की केंद्रीय उद्योग आणि विकास मंत्र्यांना देखील तिने एका मीटिंगमध्ये असेच काही प्रश्न विचारून त्यांची पाचावर धारण बसवली होती. वर ‘उद्योगधंद्यातील काही कळत नाही तर कशाला झालात त्या खात्याचे मंत्री?’ असेही ती त्यांना बोलली होती म्हणतात.
आपल्या उत्पादनात दम असला ना की विक्रेत्याचे अर्धे काम तिथे होते असे तिचे म्हणणे आहे.
एकताला लग्न समारंभात, किंवा कुठल्याही कौटुंबिक कार्यात जावे लागत असेल की नाही कुणास ठाऊक? लग्न, मुंजी, केळवण, बारसे असले प्रकार तिच्यासाठी नाहीतच. आणि जर ती तिथे जात असेल तर तिथेही कसल्या तरी नवीन व्यवसायाच्या शोधातच असेल असे वाटते.
इतकी वर्षे वेगवेगळे व्यवसाय करून तिला एकंदरच उत्पादकांची मानसिकता तर ठाऊक झालीच आहे, पण घाऊक खरेदीदारांची, किरकोळ खरेदीदारांची देखील मानसिकता चांगलीच समजली आहे. आपली वस्तू कोणते गिर्‍हाईक नक्की घेणार आहे, हे ती एका नजरेत ओळखते. त्यामुळेच काही गिर्‍हाईकांवर ती तासंतास घालवेल आणि काहींना मात्र पहिल्या मिनिटात घालवून देईल. तिचा गबाळा वेष, तिचं दिसणं हे तिच्या व्यवसायाच्या आड कधीही आलेलं नाही, किंबहुना तिने येऊ दिलेलं नाही.
सगळं समजणार्‍या एकताला प्रेमात पडताना नवरा कळला नसेल असे कसे होईल? शांत राहून बायकोला वेगवेगळे व्यवसाय करताना बघणे हेच तिच्या नवर्‍याचे काम. तो फारसे काही काम करत नसावा असे वाटते. म्हणजे एकता तसे कधी म्हणत नाही. एकंदरच ती घरच्या कुठल्याही गोष्टीवर फार बोलत नाही. जे आणि जसं आहे तसं तिने स्वीकारलं आहे असं वाटतं. तिच्या आयुष्यात छंद, आनंद, काम असं सगळं एकच आहे ते म्हणजे तिचे विविध व्यवसाय. एकता फक्त एक चांगली विक्रेती नाही तर तिने एकदा एरंडाच्या पानापासून तयार होणार्‍या चपलांचा कारखाना चालवलेला आहे. मिसाईलपासून ते पोस्टाच्या स्कीम्सपर्यंत तिला सगळं ठाऊक आहे. या प्रत्येक क्षेत्रात तिचे काम करून झालेले आहे. तिला काही अब्जावधी रुपये असलेली उद्योजिका वगैरे होण्याची आस नसावी. नवता हा तिचा प्राण आहे. तोच ती हरतर्‍हेने जपते. त्यामुळेच एकच एक व्यवसाय केला असता तर कुठल्या कुठे पोचली असती असा विचार एकताच्या बाबतीत कधीही डोक्यात येत नाही. एकच एक व्यवसाय करण्यासाठी देवाने हे उत्पादन जन्माला घातलेलं नाही.
किती कमाल आहे नाही, नाव एकता असलेली बाई व्यवसायात मात्र विविधता जपते.
मी काय म्हणते, उद्या तुमच्या कुठल्या कंपनीत कुठल्यातरी विचित्र उत्पादनावर बोलायला एखादी बाई आली. जिने टी शर्ट, जीन्सची पॅन्ट, एका हातात जुने घड्याळ, पायात सॅन्डल घातलेली असेल. जी बाई दर दोन वाक्यांमागे हे म्हणेल की ‘घेऊन तर बघा आणि नंतर सांगा,’ तर तिच्याकडची वस्तू नक्की विकत घ्या. कारण बाई जरी जुन्या फॅशनचे कपडे घालत असली तरी तिच्याकडच्या वस्तू मात्र दहा वर्षे पुढच्या असणार आहेत.

Previous Post

अशी ही सुंदर चॉकलेटची दुनिया!

Next Post

सोसले चटके तरी टिकवा गोडी, सांगे श्रीखंड वडी

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

सोसले चटके तरी टिकवा गोडी, सांगे श्रीखंड वडी

तो सस्पेंड कर दूंगा...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.