लॉकडाऊनमुळे अनेक सेलिब्रेटींचे लुक बदलले. केस आणि दाढी प्रचंड वाढल्यामुळे बहुतांश सेलिब्रेटीज ओळखूही येत नव्हते. तोच त्यांचा नवा लुक ठरला होता. ‘बिग बॉस मराठी’मुळे गाजलेला मराठी अभिनेता माधव देवचके हादेखील लॉकडाऊनपूर्वी भोळाभाबडा इनोसन्ट अभिनेता म्हणून परिचीत होता. पण लॉकडाऊनमध्ये त्यानेही छानपैकी आपली दाढी वाढवून आपला लुक सपशेल बदलला आहे. आता तो डॅशिंग वगैरे काय तसा वाटायला लागला आहे. त्याच्या या नव्या लुकवर त्याचे चाहते, विशेषत: त्याच्या महिला चाहत्या प्रचंड खुश झाले आहेत.
इन्स्टाग्रामवरील आपल्या पेजवर माधव देवचकेने आपल्या या बदललेल्या लुकचे तीन-चार फोटो टाकले आहेत. ते पाहून त्याच्या स्त्री चाहत्यांना अक्षरश: वेड लागायची वेळ आली आहे. इतका त्यांना त्याचा लुक आवडला आहे. मस्तपैकी कटिंग केलेली दाढी आणि त्यावर माधव देवचकेचे नेहमीचे चिरपरिचीत हसू… यावर त्याच्या महिला चाहत्या का फिदा होणार नाहीत? त्याचे हे फोटो पाहून अलीकडेच तो एखाद्या ट्रेकवर गेला असावा असे वाटते. पण त्यातूनही त्याने आपल्या लुकवर लक्ष दिले आहे याची कमाल वाटते. इन्स्टाग्रामवरील त्याच्या या फोटोंना महिलांच्या कमेंटचा पाऊस पडतोय. माधव देवचके नुकताच (म्हणजे लॉकडाऊनपूर्वी) ‘विजेता’ या मराठी चित्रपटात दिसला होता. सध्या तो काय करतो हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.