• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

दुर्बळांचा निष्फळ दौरा

- मर्मभेद

Nitin Phanse by Nitin Phanse
February 21, 2025
in मर्मभेद
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा नुकताच झाला. तो कशासाठी होता, याचं उत्तर या दौर्‍याचा खर्च जिच्या पैशातून झाला त्या भारतीय जनतेला कधी मिळणार नाही… मोदी यांनी देशासाठी दौरा केला, असं म्हणावं, तर या दौर्‍यातून भारताच्या हिताचा एक तरी निर्णय झाला का?
अमेरिकेच्या अध्यक्षपदी मोदींचे एकतर्फी मित्र ‘माय फ्रांड डोलांड’ विराजमान झाल्यापासून भारताला हीन वागणूक देण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे, तो मोदींच्या अमेरिका भेटीतही कायम राहिला. ट्रम्प यांनी मोदींसाठी खुर्ची ओढली वगैरे बालिश माहिती फोटोसह फिरवून मोदींचे भक्त गेलेल्या अब्रूवर पाला घालण्याचे केविलवाणे प्रयत्न करत आहेत. पण, व्हाइट
ऑफिसमध्ये आलेल्या सगळ्या नेत्यांसाठी ट्रम्प हे करतातच, तो प्रोटोकॉलचा भाग असतो. याच प्रोटोकॉलप्रमाणे आपल्या थोर मित्राचं स्वागत करायला ट्रम्प विमानतळावर तर गेले नाहीतच, व्हाइट हाऊसमध्येही मोदींचं स्वागत कुणा दुय्यम अधिकारी महिलेनेच केलं. ट्रम्प मोठ्या तोंडाने मोदींना वुई मिस्ड यू असं म्हणाले, ते त्यांची फार आठवण येऊन उचक्या लागत होत्या, म्हणून नव्हे, तर सत्ताग्रहण समारंभाला तुम्हाला जाणीवपूर्वक टाळलं गेलं होतं, याची आठवण करून द्यायला! मिस्टर प्राइम मिनिस्टर, यू आर ग्रेट असं ट्रम्प म्हणतात, तेव्हा ते मोदींबद्दल बोलत नसतात, ते ग्रेट म्हणतायत ते सव्वाशे कोटींची बाजारपेठ असलेल्या भारताला आणि त्या देशाच्या संवैधानिक सर्वोच्च पदाला.
मोदीकाळातला भारत देश ट्रम्प यांना आणि अमेरिकेला ग्रेट वाटतो का, हे या काळातली अमेरिकेतली वर्तमानपत्रं आणि त्यांनी मोदी भेटीला दिलेलं नगण्य कव्हरेज पाहिल्यावर लक्षात येतं. त्यांच्यासाठी भारत ग्रेट आहे ते फक्त एक बाजारपेठ म्हणून. इतर बाबतीत भारत ग्रेट वाटावा, अशी कोणतीही कामगिरी भारताने मोदीकाळात केलेली नाही आणि अमेरिकेला दखल घ्यावीशी वाटेल असा पाठीचा कणाही दाखवलेला नाही. पं. जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, राजीव गांधी असोत की डॉ. मनमोहन सिंग असोत किंवा अगदी मोदी यांचे पूर्वसुरी अटलबिहारी वाजपेयी असोत, भारताशी आणि भारतीय पंतप्रधानांशी अशा प्रकारे वागण्याची हिंमत अमेरिकेने आधी केली नव्हती. १९७१ साली संघर्षाचा काळ होता तेव्हा, तेव्हा इंदिरा गांधींनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना ठणकावून सांगितलं, भारत अमेरिकेला आपला मित्र मानतो, आपला बॉस नव्हे. स्वत:चे भवितव्य स्वत: लिहिण्याची क्षमता भारतात आहे. परिस्थितीनुरूप एकमेकांशी कसे वर्तन करायचे ते आम्हाला माहिती आहे. अमेरिकेच्या आरमार धाडण्याच्या धमकीची पर्वा न करता त्या दुर्गेने पाकिस्तानचे दोन तुकडे करून दाखवले होते.
आज काय चित्र आहे? चीनने बळकावलेली भारताची भूमी त्यांच्याच ताब्यात आहे, त्यात गावं वसवली गेली आहेत. प्रिय मित्र अदानीच्या नफ्यासाठी भारत पाकिस्तान सीमेची सुरक्षा धोक्यात घालण्यापर्यंत मोदी सरकारची मजल गेली आहे. ज्या देशांकडून भारताला सर्वाधिक धोका आहे, तिथे आपण हे धोरण स्वीकारलं असेल, तर अमेरिका आपल्याला किंमत कशी देईल? मेक्सिको, ग्वाटेमाला, कोलंबिया यांच्यासारखे देश अमेरिकेच्या दादागिरीला आव्हान देतात, तुम्ही आयातकर वाढवाल तर आम्हीही तो वाढवू असं डोळ्याला डोळा भिडवून सांगतात. कोलंबिया अमेरिकेच्या, कोलंबियन घुसखोरांना घेऊन येणार्‍या विमानाला आपल्या भूमीवर उतरण्याची परवानगी देत नाही, त्यांना मानवी वागणूक देण्याची भूमिका घेते. आपल्याकडचे बोटचेपे सर्वोच्च नेते आणि मंत्री ‘बेकायदा वास्तव्य करणार्‍यांच्या बाबतीत नियमानुसार कारवाई होतेच’ अशा शब्दांत लोटांगण घालतात (जणू भाजपच्या काळात भारतात काटेकोर कायद्याचं राज्यचं चालू आहे!)… मग तिथे भारत ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्व मानतो, वगैरे उदात्त भाषणबाजी कशासाठी केली गेली? मुळात एका विशिष्ट धर्माच्या नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी सीएए आणि एनआरसी हे वादग्रस्त कायदे आणणार्‍या आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोहिमा चालवणार्‍या राजवटीने ‘वसुधैव कुटुंबकम’ वगैरे न झेपणारी आणि न शोभणारी आदर्शवादी वचनं सांगावीत कशाला?… मोदी अमेरिकेत होते तेव्हा भारतीय घुसखोरांची पुढची तुकडी पुन्हा लष्करी विमानाने आणि बेड्या घालूनच पाठवण्यात आली. सुरक्षेचे कारण दाखवून शीख नागरिकांच्या पगड्याही उतरवण्यात आल्या. मोदींनी भारतीयांना अशी हीन वागणूक दिली जाऊ नये, यासाठी चकार शब्द उच्चारला का? मुळात त्यांना एक उद्योगपती मित्र सोडल्यास इतर भारतवासीयांबद्दल प्रेम, करुणा किमान आपलेपणा तरी आहे का? आपण केलेल्या अडाणी नोटबंदीच्या काळात ऐन लग्नसोहळ्यांमध्ये मुलींच्या बापांची कशी पंचाईत झाली, याचं जपानला जाऊन स्टँड अप कॉमेडी शैलीत वर्णन करून हसणार्‍या असंवेदनशील नेत्याकडून ही अपेक्षा जरा जास्तच झाली म्हणायची!
मग मोदींनी अमेरिकेत जाऊन केलं काय? त्यांच्या प्रिय मित्रावर अमेरिकेत होणारी कारवाई स्थगित होईल, अशी पक्की खात्रीही त्यांना तिथे मिळालेली नाही. असल्या व्यक्तिगत कामांसाठी देशांचे नेते एकमेकांना भेटत नाहीत म्हणे! पण मग ते भेटतात कशासाठी? अमेरिका आयात-निर्यातीसंदर्भात जे जे निर्बंध लादेल, आदेश देईल, ते निमूटपणे स्वीकारण्यासाठी?
डॉलर विकून रुपयाची इभ्रत वाचवली जात असताना इलॉन मस्क ज्यांना भंगार म्हणतो ती एफ ३५ विमानं आणि अशी इतर संरक्षण सामुग्री खरेदी करण्यासाठी?
भारतातल्या दुर्बलांपुढे बेटकुळ्या काढून दाखवणार्‍यांची त्यांच्यापेक्षा मोठ्या धटिंगणाशी गाठ पडली की त्यांचा कणा कसा लिबलिबीत होतो, त्याचं लाजिरवाणं दर्शन घडवण्यापलीकडे या दौर्‍याने साधलं तरी काय?

Previous Post

मराठी साहित्य संमेलन सरकारी विळख्यात!

Next Post

कुणबीपणाचा सन्मान

Related Posts

मर्मभेद

धर्म नव्हे, जात विचारणार!

May 8, 2025
मर्मभेद

धडा शिकवा आणि शिकाही!

May 5, 2025
मर्मभेद

जागो मराठी माणूस, जागो!

April 25, 2025
मर्मभेद

द ग्रेट अमेरिकन सर्कस!

April 17, 2025
Next Post

कुणबीपणाचा सन्मान

टपल्या आणि टिचक्या

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.