हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी आणि शरीरात उष्णता टिकवण्यासाठी उबदार कपडे घालण्यासोबतच आहाराकडे लक्ष देणेही गरजेचे असते. या काळात शरीरात उष्णता निर्माण करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. आहारात योग्य ते बदल केल्याने शरीराला आवश्यक असलेली उष्णता मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.
हिवाळ्यात गाजर, मुळे, बटाटे, कांदा आणि लसूण यांचा आहारात समावेश केल्यानेही फायदा होतो. हे पदार्थ उष्ण प्रकृतीचे असल्याने त्यांचा आहारात समावेश करावा. तसेच हे पदार्थ पचायला हलके असून शरीरात उष्णता निर्माण करतात. हिवाळ्यात शरीरात आवश्यक ती उष्णता मिळवण्यासाठी या पदार्थांचा जास्त प्रमाणात वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. हे पदार्थ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून निरोगी राहण्यास मदत करतात.
हिवाळ्यात गोड पदार्थांमध्ये साखरेएवजी मधाचा वापर करावा. सकाळी लिंबूपाण्यासह मध घेण्याचेही अनेक फायदे आहेत. तसेच सलादवरही मध टाकून घेतल्यास त्याचा स्वाद वाढवता येतो. मध शरीराला फायदेशीर असले तरी मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचा वापर डॉक्टरांच्या सल्लानेच करावा. मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने शरीरीतील उष्णता वाढवण्यासह त्याचे अनेक फायदेही होतात.
इतर ऋतूंमध्ये मसाल्याचे सेवन योग्य प्रमाणात करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मात्र, हिवाळ्यात मसाल्याचे पदार्थ पचवण्याची शरीराची क्षमता वाढते. त्यामुळे हिवाळ्यात मसाल्याचा वापर आहारात करण्याने फायदा होतो. लवंग, दालचिनी, आले, चक्रफूल यासारख्या मसाल्यांनी शरीराला आवश्यक ती उष्णता मिळते. तसेच आराहाचा स्वादही वाढतो. तसेच हे मसाले सूप आणि चहामध्ये टाकूनही घेता येतात. त्यामुळे हिवाळ्यात या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास नैसर्गिकरित्या शरीराला आवश्यक ती उष्णता मिळते. तसेच निरोगी राहण्यासही मदत होते.