बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेले निवार चक्रीवादळ पुड्डुचेरीपासून 120 किलोमीटीर अंतरावर असून 11 किमी प्रतितास वेगाने हे वादळ रात्री 2 वाजता दक्षिण किनाऱयावर धडकण्याची शक्यता आहे. यामुळे आंध्र प्रदेशातील कराईकल तर तामिळनाडूतील महाबलीपूरमवरून हे वादळ जाणार असून 145 किमी प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे तामिळनाडूतील एक लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून 16 जिह्यांत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर चेन्नई विमानतळही बंद करण्यात आले आहे.
निवार चक्रीवादळाच्या परिणामी चेन्नईत मागील 24 तासांत पाऊस पडत आहे. अनेक भागांत पाणी साचले असून माजी मुख्यमंत्री सीएम करुणानिधी यांच्या घरात पाणी भरले. 2015 साली निर्माण झालेल्या पूरस्थितीतून धडा घेत चेन्नई प्रशासनाने 90 टक्के भरलेल्या चेंबरमबाक्कम धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून पुंद्रातूर, सिरुकलाथूर, तिरुमुडिवक्कम आणि तिरुनीरमलईमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
निवार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तामिळनाडू तसेच पुड्डुचेरीच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या असून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कोस्ट गार्डच्या 8 बोटी, 2 विमाने तैनात
तामीळनाडू आणि पुड्डुचेरी किनाऱयावर तटरक्षक दलाच्या 8 बोटी आणि 2 विमाने तैनात करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे व्यापरी बोटी तसेच मच्छीमारांना सतर्पतेचा इशारा देण्यात आला आहे.
सौजन्य : दैनिक सामना