कोरोनाच्या संकटातून जात असताना सामान्य वर्गाला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा इंधन दरात वाढ केली. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात 11 पैसे तर डिझेलमध्ये 21 पैसे इतकी वाढ केली.
या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लीटर 88.40 रुपये इतका झाला आहे. तर डिझेलसाठी 78.12 रुपये प्रति लीटर मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोलचा भाव 81.70 रुपये असून डिझेल 71.62 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल 84.74 रुपये असून डिझेल 77.08 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 83.26 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 75.19 रुपये प्रति लीटर इतका झाला आहे. या बोझा सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे.
युरोपात पुन्हा लॉकडाउन केल्याने इंधन मागणीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरोपातील रिफायनरी तात्पुरत्या बंद ठेवण्याचा विचार केला जात आहे. 30 नोव्हेंबर रोजी ओपेक देशांच्या सदस्यांची बैठक होणार आहे. कोरोना लस, युरोपात पुन्हा लॉकडाउनची शक्यता आणि उत्पादन कपात यावर या बैठकीत निर्णय होणार आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून 40 डॉलरवर स्थिर असलेला कच्च्या तेलाचा भाव आता 45 डॉलरच्या आसपास गेला आहे.
सौजन्य :दैनिक सामना