• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

नवदांपत्यांच्या अंतर्मनाचे `बोल्ड’ दर्शन!

- संजय डहाळे (तिसरी घंटा) (नाटक - विषामृत)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 14, 2024
in मनोरंजन
0

कथाकार व. पु. काळे यांनी म्हटले होते की, ‘जगातली कुठलीही गोष्ट ही परिपूर्ण नाही. त्यात अगदी नवरा-बायकोचं नातंही अपवाद नाही. परमेश्वराने सोनं निर्माण केलं. चाफ्याची फुलंही त्यानेच निर्माण केलीत. मग सोन्याला चाफ्याचा सुगंध का देता आला नाही? याचं उत्तर म्हणजे अपूर्णतेतही काही मजा आहेच की…!’ हे पुरेपूर पटतं.
नाटकांमध्ये सई परांजपे यांच्या ‘माझा खेळ मांडू दे’ यात नवरा दुसर्‍याच बाईत गुंतल्यामुळे ‘खेळ’ पूर्णपणे बिघडलेला होता. जयवंत दळवींच्या ‘महासागर’मध्ये परपुरुषाचे आकर्षण होते. रत्नाकर मतकरींच्या ‘जोडीदार’मध्ये तर नवर्‍यापासून दुसर्‍याच स्त्रीला झालेला मुलगा होता. प्रशांत दळवी यांच्या गाजलेल्या ‘चारचौघी’तही नवरा-बायको यांच्या नातेसंबंधातले अपूर्णत्व होते. नीरज शिरवईकरांच्या ‘आमने-सामने’त ‘लिव्ह इन रिलेशन’चा मार्ग पत्करून जोडीदार पारखून घेण्याचा पर्याय पुढे आला. चं. प्र. देशपांडे यांचे ‘बुद्धीबळ आणि झब्बू’ या नाटकात परपुरुष स्त्रीला पटविण्याचा सारा तपशील हा प्रायोगिक शैलीत आला. चंद्रशेखर फणसळकर लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित ‘आणि थोडी ओली पाने’ या नाटकात स्त्री-पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधावर भाष्य होते. गेल्या एकदोन वर्षांत तर ‘लग्नाळू’ विषयांचा महापूरच जणू आलाय, जो नवरा-बायको नातेसंबंधातल्या अपूर्णतेचे दर्शन घडवितो. नमनाला घडाभर तेल ओतण्याचे कारण म्हणजे त्याच आशयाजवळ जाणारे घन:श्याम रहाळकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘विषामृत’ हे नवं नाटक रंगभूमीवर दाखल झालंय!
पडदा उघडतो. एक दिमाखदार घर प्रकाशात येतं. काळ आजचाच वेगवान. इथे अमृता आणि विशाल हे नवदांपत्य राहातय. दोघेही सुखवस्तू. ती एका ट्रॅव्हल एजन्सीत तर तो सॉफ्टवेअर कंपनीशी संबंधित. नवदांपत्य असल्याने वातावरण रोमॅन्टिक. पालकांपासून तसे दूर असले तरी त्यांची आठवण, संदर्भ दोघांच्या संवादातून येत आहेत. दोघांची मुख्य समस्या ही की दोघेही रोजच्या तोचतोचपणाला पुरते कंटाळले आहेत. ‘आता गप्प बसू. जेवू-खाऊ आणि शांत झोपू. आपापलं काम पूर्ण करू. आता बोलायलाही नकोय एकमेकांशी!’ अशी त्यांची मानसिक स्थिती बनलीय. त्याचं प्रोजेक्ट, प्रोग्रॅम, कंपनीची न संपणारी कामे घरापर्यंत पोहोचलेली, तर तिच्या ट्रॅव्हल्स एजन्सीच्या कामाची चर्चाही सुरू आहेच. दोघेही टिपिकल, ठोकळेबाज विचार करताहेत, हे त्यांनाही पुरतं कळून चुकलंय. दोघे जणू एका चौकटीत अडकलेत. लग्नानंतर नव्याची नवलाई, नात्याची झळाळी कमी झालेली त्यांना जाणवतेय. एकाकीपणा वाटतोय. आता काहीतरी बदल हवाय.
या परिस्थितीतून सुटका करण्यासाठी विशाल अमृताला एक अजब पर्याय सुचवितो. तो म्हणजे नवरा-बायको यातलं नातं काही काळ विसरायचं! एक थ्रिल म्हणून दोघांनीही ‘अफेअर’ उर्फ ‘लफडं’ करायचं! होत असलेली कुचंबणा, घुसमट दूर करण्यासाठी काही काळ असा नवा डाव खेळायचा. असा खेळ खेळायचा, पण कुणी एकमेकांना सांगायचं नाही, असंही ठरतं. पार्टनर चेंज.
दोघांची एक मैत्रीण आहे राणी. ती विशालला सोबत करतेय. बिनधास्त आणि भरपेट दारू ठोसणारी. प्यायल्याशिवाय तिला खरं जणू बोलताच येत नाही. या दोघांचा वाढदिवस सारे सेलिब्रेट करतात. आणखीन एक मैत्रीण आहे. सावी तिचं नाव. ती विशालला एका भल्यामोठ्या प्रोजेक्टसाठी मदत करतेय. दोघेही जवळ आलेत. एक क्षण असा येतो की अमृताला एकटीने आफ्रिकेला जाण्याची तर विशालला इस्रायलला जाण्याची संधी मिळते. घरदार, सारं काही दोघांनाही मोकाट मिळतं.
मध्यंतरानंतर हे दांपत्य एकत्र येतात. या मध्यंतरात दोघांनी बाहेर काय केलंय, कुणाशी अफेअर वगैरे झालंय याचा शोध घेण्याचा छुपा प्रयत्न करतात. सावी, राणी या तरुणी आणि सॅम नावाचा तरुण-संशयाच्या भोवर्‍यात आहेत. करारानुसार ‘अफेअर’चा शोध घेण्याला बंदी आहे! दोघे मध्यंतरात कुणाशी ‘लफडं’ करतात? या खेळात समेट होतो का? पुन्हा दोघांची जवळीक साधली जाते का? प्रश्न आणि प्रश्न. याच्या उत्तरासाठी हे नाट्य बघणं उत्तम.
कुठल्याही नाट्यकृतीचे यश हे नावीन्यपूर्ण विषयावर अवलंबून असतं. नवरा चुकला, त्याचे वाकडे पाऊल पडले तर ते चालू शकते, पण बायकोनं मात्र चुकीचे पाऊल टाकता कामा नये, असा आपल्या समाजाचा नीतीनियम आहे. इथे तर चक्क दोघांनी ठरवून ‘चेंज’ म्हणून वाकडे पाऊल टाकले आहे! हा नवाच प्रकार नाटककार घन:श्याम रहाळकर यांनी मांडून हादरवून सोडलं आहे. या धाडसी विचारामागला युक्तिवादही भन्नाटच आहे. बोल्ड विषय मांडताना त्यातली सहजता नजरेत भरते. नव्या पिढीची ‘सत्यकथा’ वाटणारे ‘फ्रेश’ नाट्य बनलंय.
मूळचे हे नाटक काही वर्षापूर्वी एका थिएटर वर्कशॉपसाठी लिहिले गेले. अनेक वर्षे ही संहिता प्रयोगासाठी उभी होती. अखेर दिग्दर्शनाची शंभरी पार केलेले अभ्यासू कल्पक दिग्दर्शक विजय केंकरे यांनी त्यात रंग भरले आणि ‘मॅरेज विथ अफेअर’ हळूवारपणे गुंफले. ‘केंकरे टच’मुळे हे नाटक अधिकच तरुण बनलंय. सादरीकरणातला ‘फ्रेशनेस’ नोंद घेण्याजोगा. संहितेच्या पलीकडे जाऊन समर्थपणे पारदर्शक आविष्कार करणारे दिग्दर्शक केंकरे आणि वखवखलेपणा टाळून गंभीर विषयातही खेळकर संहितालिखाण करणारे नाटककार रहाळकर या दोघांनी या प्रयोगातून बाजी मारली आहे. तसा ‘गोष्टी’चा जीव एकांकिकेचा, तसेच विषय शारीरिक संबंधावरला, पण ही अडथळ्याची वाट दोघांनी सुकर केलीय. अन्यथा नाटक फसण्याचे भय अधिक होते. मराठी नाटक आज दिवाणखान्यातून घराबाहेर पडले आहे. अगदी स्त्री-पुरुष, नवरा-बायको यांच्या संबंधातील अंतर्मनापर्यंत पोहचले आहे. इथे वैवाहिक जीवनातील ‘विष’ आणि ‘अमृत’ याचे प्रभावी, बिनधास्त दर्शन होतेय, असे म्हणावे लागेल.
भावनिक गुंतागुंत आणि घुसमट हे प्रभावीपणे संवादासह देहबोलीतून व्यक्त होणं आवश्यक होतं. दोघा जिवांची ही मानासिकता कथानकाचा प्रमुख केंद्रबिंदूच आहे आणि तो या दोघांच्या साद-प्रतिसादातून ठळकपणे दिसून येतोय. उत्कट अनुभव देण्याची क्षमता असलेली यातली ‘टीमवर्क’ ही जमेची बाजू ठरलीय. नाहीतर निव्वळ ‘संवादनाट्य’ उरले असते. प्रियदर्शनी इंदलकर आणि शुभंकर तावडे यांची अमृता-विशाल ही जोडगोडी ‘मेड फॉर इच अदर’ अशीच म्हणावी लागेल, इतकं पक्कं ‘ट्युनिंग’, ‘बाँडिंग’ त्यात आहे.
प्रियदर्शनीचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ती घराघरात पोहोचली. तिचा ‘बोल्ड’ अंदाज कायम चर्चेचा विषय ठरला. सिनेमा, वेबसिरीजमध्ये दोघांची जोडी दिसली. आता प्रथमच नाटकात एकत्र आहेत. संवादातील हळुवारपणा तसेच खोचकता हा अमृताच्या भूमिकेत शोभून दिसतो. वावर सहजसुंदर आणि गेटअपही भूमिकेला शोभून दिसणारे.
शुभंकरचा विशालही चांगली साथसोबत करतोय. ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांचा रंगवसा तो चालवत आहे. या नाटकात त्याची कुचंबणा नजरेत भरते. नुसत्या नजरेतून खूप काही सांगण्याचे कौशल्य दिसतेय. दुसर्‍या अंकातल्या काही प्रसंगात अभिनय अप्रतिमच. या जोडगोळीचे ‘फॅन’ मुद्दाम नाटकासाठी गर्दी करतात, हे विशेष.
आरती मोरे (राणी), चैताली सोपारकर-कोहली (सामी) आणि शौनक रमेश (सॅम) यांच्या भूमिका नाट्यातील गाळलेल्या जागा भरण्याचे काम चोख बजावतात. राणीचा दारूचा प्रसंग, सामीचा आक्रमकपणा, सॅमची भिरभिरती नजर लक्षात राहाते. यातील पाचजणांचा ‘सेक्स’बद्दलचा ‘बोल्ड’ संवादही नव्या पिढीचे अंतरंग उलगडून सांगतो. कुशीतून मिठीत घेण्यापर्यंत आणि बेडरूमपर्यंत जाण्याचे प्रसंग हे कुठेही भडक वाटत नाहीत. कथानकाची ती गरज वाटते. त्यातील सहजता चांगली जपली आहे. शृंगारालाही सभ्यतेची एक झालर आहे. सूचकता त्यात जमली आहे.
नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी उभारलेला पॉश ब्लॉक अक्षरश: पंचतारांकित आहे. त्याची भव्यता आणि रंगसंगती शोभून दिसते. नेपथ्याचा अडसर न होता हालचालींना पूरक ठरतो. गॅलरी अप्रतिमच. ‘सफरचंद’ नाटकातील नेपथ्यरचनेपासून चर्चेत असणारे हे नेपथ्यकार विषयाला अनुरूप नेपथ्य उभारण्यात तरबेज आहेत. याचे यातली प्रत्यंतर येतेय. वेशभूषाकार मंगल केंकरे यांनी नाटकाची जातकुळी ओळखून एकूणच ‘गेटअप’ दिलाय. खास उल्लेख म्हणजे प्रियदर्शनीची अमृता ‘बोल्ड’ वाटावी यासाठी काही ‘प्रयोग’ केलेत. तसेच इतर कलाकारांच्या वेशभूषाही अभ्यासपूर्ण आहेत. त्याचा एकत्रित प्रभाव हा व्याक्तिरेखा वैशिष्टपूर्ण करण्यावर झालाय.
अजित परब यांचे संगीत आणि शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना चांगली जमली आहे. दिग्दर्शकाची तांत्रिक बाजूवरही हुकमत आहे. निर्माते राहुल भंडारे यांनी निर्मितीमूल्यांत कुठेही कसूर ठेवलेली नाही. नाट्याची मजबूत ‘पायाभरणी’ केलीय. त्यातला विषय कधी ‘रिटायर’ होणार नाही. नवरा-बायकोच्या नाजूक संबंधात एकमेकांना थोडी मोकळीक (म्हणजे ‘स्पेस’) असणं आवश्यक आहे. काळजीचा अतिरेक हा दुसर्‍याला गुदमरून टाकू शकतो. यावर उपाय म्हणून नव्या ‘संबंधांची’ काही काळ इच्छा करणे गैर नाही. पण त्यामागे जबरदस्ती नको. विवाहनंतरच्या अशा बाह्यसंबंधानंतरही पुन्हा मोकळेपणाने संयमाने हे नातं पुढे चालू शकतं. हक्काचे नवे विसाव्याचे स्थळ असावे. घटस्फोटापेक्षा हा पर्याय काय वाईट आहे, असा ‘मेसेज’ हा नाटककारांना कदाचित यातून द्यावासा वाटत असावा. देवाब्राह्मणांच्या साक्षीने जमलेले हे पवित्र नातं आज ‘लव्ह मॅरेज’वाल्यांना कालबाह्य वाटतंय. कालाय तस्मै नम: दुसरं काय?
एक सरडा एकदा माणसाला म्हणतो, ‘मी आजकाल रंग बदलण्यात तुम्हा माणसांची शर्यत जराही करू शकत नाही.’ यातील हिरो विशाल आणि हिरोईन अमृता हे नातं सोडून अफेअर करण्यापर्यंत आणि पुन्हा ‘यू टर्न’ घेण्यापर्यंतच्या रंग बदलण्यात जसे तरबेज झाले आहेत. यावरच या नाटकाचा सारा डोलारा उभा केलाय. बोल्ड आशय, विषय अँड ब्युटिफुल सादरीकरण असलेले नाट्य म्हणून याची दखल निश्चित घेतली जाईल. नाटक संपले तरी गोष्टीतला अस्वस्थपणा डोक्यात फेर धरतो. लग्नानंतरचे आयुष्य सुंदर जरूर आहे. पण ते सुरळीत मात्र नाही. हेच खरे!

विषामृत

लेखन – घनःश्याम रहाळकर
दिग्दर्शन – विजय केंकरे
नेपथ्य – संदेश बेंद्रे
संगीत – अजित परब
प्रकाश – शीतल तळपदे
वेशभूषा – मंगल केंकरे
सूत्रधार – सुनील पानकर/ गोट्या सावंत
निर्माता – राहुल भंडारे
निर्मिती संस्था – अद्वैत थिएटर्स

[email protected]

Previous Post

शोध

Next Post

घरच्या घरी मस्त मस्त पास्ता!

Related Posts

मनोरंजन

दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

May 15, 2025
पडद्यावरचा खरा नायक
मनोरंजन

पडद्यावरचा खरा नायक

May 15, 2025
मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
Next Post

घरच्या घरी मस्त मस्त पास्ता!

क्रेडिट कार्ड फ्रॉड

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.