• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

काम करत राहणं महत्त्वाचं!

- सई लळीत

Nitin Phanse by Nitin Phanse
August 3, 2024
in मनोरंजन
0
काम करत राहणं महत्त्वाचं!

अभिनेत्री छाया कदम हल्ली ‘लापता लेडीज’मुळे सगळीकडे `छा’ गयी है! या चित्रपटातला त्यांचा रोल जबरदस्त होता. जीवनाचे बरेवाईट घोट पचवून वरवर रखरखीत झाली असली तरी मनाचा एक प्रेमळ कोपरा राखून ठेवलेली… ती मंजुमाई. सिनेमात तिला बघितल्यावर मी फूलची (फुलकुमारी) काळजीच करणं सोडून दिलं.
अभिनेत्री छाया कदम यांचे सिनेमा एकाहून एक सरस येत आहेत आणि ते येत राहतीलच. त्यातही आपल्या कोकणातली, त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी बोलणारी आपल्या जवळची धामापूरची. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा त्रिगुणित झाला. ‘मार्मिक’च्या वतीने मी त्यांची फोनवरून मुलाखत घेतली. चांगली तासभर गजाली झाली.
मी : नमस्कार… मुंबईला ‘मामि’मध्ये ‘फँड्री’चं नागराज मंजुळे यांनी पहिल्यांदाच प्रदर्शन केलं होतं. तेव्हा मी तुम्हालाच विचारलं होतं की जब्याच्या आईचा रोल करणारी अभिनेत्री आली आहे का? त्यावेळी तुम्ही खूप हसला होतात…!
छाया : हो… हो. अजून एका पत्रकार मुलीने (पत्रकारीण) हाच प्रश्न विचारला होता. मी जीन्स आणि शर्टमधे होते. मला कुणी ओळखलंच नाही. आणखी एक किस्सा झाला होता तेव्हा. ‘फ्रँड्री’चं शूटिंग सुरू व्हायच्या आधी मला नागराज म्हणाला की आपण जरा इथल्या बायका वेताच्या टोपल्या वगैरे कशा बनवतात ते नीट बघून घेऊ. मग आम्ही गेलो. मी माझ्या नेहमीच्या कपड्यात शर्ट जीन्समध्ये होते. दोन दिवसांनी शूटिंग सुरू झालं तेव्हा त्या बायका तिथे आल्या. मी कॉश्च्यूम वगैरे करून गेटअपमध्ये बसले होते. त्या मला शोधत होत्या. मला त्यांनी ओळखलं नाही. माझी त्यांनी माझ्याजवळच चौकशी पण केली. त्या आपसात बोलत कुजबुजत होत्या की त्या आपल्याकडे शिकायला आलेल्या पोरीला एवढं जमत नव्हतं. म्हणून त्यांनी हिला घेतलं असणार. मजा आली ते ऐकून!
मी : ‘फ्रँड्री’ माझा अत्यंत आवडता सिनेमा. सिनेमा बघता बघता आपण त्याच्याशी समरस होतो. तुमचा हा पहिला सिनेमा का?
छाया : माझा पण तो आवडता सिनेमा आहे. या सिनेमाने मला माझी ठसठशीत स्वतंत्र ओळख मिळवून दिली. ‘सैराट’ नंतर आला. ‘फ्रँड्री’ काहीजणांना समजला नाही. काहींना तो समजूनच घ्यायचा नव्हता. त्यामुळे समाजात सर्वत्र पोचणारा, गाणीबिणी असलेला ‘सैराट’ आला..! त्यातूनही सामाजिक संदेशच दिला गेला. या आधी माझे बरेचसे चित्रपट आले होते. ‘बाबू बँडबाजा’, ‘सिंधुताई सपकाळ’, ‘बाई माणूस’ जो कविता महाजन यांच्या ‘ब्र’ कादंबरीवर आधारित होता. अरुण नलावडे यांनी केला होता. तो प्रदर्शित झालाच नाही.
मी : बरेच मतभेद झाले होते तो सिनेमा करताना, असं वाचनात आलं. त्यामुळे तो पडद्यावर आला नाही?
छाया : आता नेमकं काय झालं, कुणाचं चूक बरोबर मी काही सांगू शकत नाही. पण तो सिनेमा लागायला हवा होता. खूप मेहनत होती त्यामागे. शिवाय मला ते अधिक सोपं पडलं असतं. कारण जनरली नवा रोल देताना त्या व्यक्तीचं आधीचं काम बघितलं जातं. मला मग बराच काळ जवळपास ‘फ्रँड्री’ येईपर्यंत थांबावं लागलं.
मी : तुम्हाला खेळाची खूप आवड होती. त्यात चांगली गतीही होती. मग अचानक या क्षेत्रात कसा काय प्रवेश झाला?
छाया : मला खेळ आवडायचाच आणि कबड्डीमध्ये तर प्राविण्य होतं. पण नंतर असं झालं की माझा भाऊ गेला. वडील गेले. त्यामुळे मी खूप जास्त मानसिक तणावाखाली होते. परत परत तेच नैराश्याचे विचार मनात यायचे. मग एके दिवशी वामन केंद्रे यांच्या अभिनय शिबीराची जाहिरात माझ्या बघण्यात आली. मग म्हटलं आपण इथे जाऊया. मनातले विचार तरी जरा बाजूला पडतील. चांगल्या गोष्टीत मन रमेल. म्हणून मी तिथे गेले. तिथे मी खूप रमले. माझ्या विचारांना नेमकी दिशा मिळाली.
मी : खूप सुंदर गेले असतील ते दिवस!
छाया : ते दिवस छानच होते. मला आपल्यात काय चांगल्या गोष्टी आहेत, काय वाईट आहेत ते कळलं. ‘ण’ आणि ‘न’चा योग्य उच्चार करण्यात बरेच दिवस गेले. शुद्ध उच्चार म्हणजेच सगळं काही असं नाही, पण भूमिकेची गरज असेल तर नीट बोलता आले पाहिजे.
मी : या शिबिरानंतर तुम्हाला लगेचच ‘झुलवा’मध्ये भूमिका मिळाली का?
छाया : नाही गं सई! मध्ये पाच वर्ष गेली. तोपर्यंत मी बारीकसारीक कामं करून स्वत:ला जिवंत ठेवलं होतं. ‘झुलवा’ करताना साडेचार-पाच महिने आधी तालीम झाली. बरोबर पन्नास माणसं होती. मला तिथे थोडं दडपण यायचं. कारण तिथे मी सगळ्यात मोठी होते. त्यामुळे मला तिथे कमीपणा वाटायचा. वावरताना संकोच वाटायचा. पण नंतर हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला. या तालमीच्या निमित्ताने मला घबाडच मिळालं. तुमचं काम महत्त्वाचं हे चांगलंच लक्षात आलं.
मी : ‘लापता लेडीज’ हा सुंदर आणि परत परत बघावासा वाटणारा सिनेमा कसा मिळाला?
छाया : हेच… माझं अगोदरचं काम बघून. ‘फ्रँड्री’ त्यांना खूप आवडला होता. त्यामुळे या भूमिकेसाठी त्यांनी विचारणा केली.
मी : मग तेव्हा खूपच आनंद झाला असेल!
छाया : आनंद तर झालाच. पण आनंदाचा बहर जरा ओसरल्यावर लक्षात येतं की मिळालेलं काम हेच मौल्यवान मानून तिजोरीत ठेवता येत नाही. त्याच्यावर खूप काम करावं लागतं. त्यात बारकावे आणावे लागतात. मोठी जबाबदारी असते ती. खूप जीव ओतून पार पाडावी लागते. तेव्हा कुठे मन शांत होत्ां. पण मला या दोघांकडून खूप शिकता आलं.
मी : रवी जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ या सिनेमात पण तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्याविषयी काही सांगा.
छाया : या अशा प्रकारचं काम कलेच्या जगतात होत असतं हेच मला माहीत नव्हतं. ते यामुळे कळलं. सुरुवातीला मला इतरांसारखाच प्रश्न पडायचा की दुनियेत एवढी कामं पडलीत… हेच काम कशाला करायला हवं यांना? असं वाटायचं. पण नंतर मत बदललं. कला तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला शिकवते. हे जर त्यांनी केलं नाही, तर विविध पुतळे, मूर्ती कशा उभ्या राहतील? त्यातले डिटेल्स कसे दाखवता येतील? टीका करणारे ही गोष्ट लक्षात घेत नाहीत. शेवटी नग्नता तुमच्या डोळ्यात असते, ही गोष्ट खरी आहे.
मी : तुमचे चित्रपट बरेच आले. आता प्रत्येक सिनेमाचा आढावा घेणे शक्य नाही. तरीपण सिनेमांमधील आपल्या विविध भूमिकांबद्दल काय सांगाल?
छाया : माझ्या भूमिका या बहुतेक सगळ्या संघर्ष करणार्‍या कष्टाळू स्त्रीच्या आहेत. आता ‘फ्रँड्री’मधली भूमिका… तिच्यासाठी फारसे डायलॉग किंवा प्रसंग नाहीत. पण तरीही ती भूमिका तुमच्या लक्षात राहते.
मी : हो… अगदी तिच्यावर असलेला मानसिक ताण आमच्या लक्षात येतो. तिचं विनातक्रार राबणं लक्षात राहतं… आता जरा एका भरजरी क्षणाकडे येऊ. तुमचा कान फिल्म फेस्टिवलमध्ये झालेला सन्मान. तुमच्या चित्रपटाच्या टीमला मिळालेली स्टँडिंग ओवेशन. त्यात तुमचे दोन चित्रपट होते. कसं वाटतं या सगळ्याबद्दल?
छाया : माझी आई तेव्हा गेली होती. तिची आठवण म्हणून मी तिची साडी नेसले आणि नथ घातली होती. आई माझ्यासोबतच आहे असं मला वाटलं! खूप छान वाटलं. आजवरच्या कष्टाचं धडपडीचं चीज झाल्यासारखं वाटलं.
मी : आता जरा मालवणीकडे येवया. तुमचो ‘रेडू’ सिनेमा खूपच आवडलो. त्यात तुम्ही रंगवलेली छाया नावाची मालवणी स्त्री ही आमका आमच्याच आवारातली किंवा वाडीतली वाटली. वरवर बेफिकीर दिसणारी पण सगळ्यांची तिका काळजी. तुमका कसा वाटला?
छाया : मालवणी भाषा आधीच माझ्या आवडीची. तेतले गाळी तर प्रेमानं आपण कोणाकय घालतव. ते कोणच मनाक लावन घेणत नाय. माका एक बोलीभाषा येता ह्या माझा एक भाग्यच आसा. एक गंमत सांगतंय. खूप वर्षापूर्वी मी एक अ‍ॅवॉर्ड
देवच्या टायमाक एक मालवणीतून स्कीट केललंय. सुरुवातीचे दिवस होते ते! आता मालवणी म्हणजे विनोदी अशा एकाच अर्थान सगळीजणा घेतत. खरा तर मालवणी भाषा किती समृद्ध आसा. भावनांचे सगळे रंग आम्ही तिच्यात दाखवूक शकतव. त्या भाषेत काय नाय आसा? ती ताकदीची भाषा आसा. पण त्यात फक्त विनोद आणि विनोद होतो. तो पण ओढून ताणून कायतरी. ते कलाकार मोठ्यान आरडीत. मग मी त्यांच्यावर मोठ्यान आरडी. ह्योच विनोद. तेव्हा मी ठरवलंय. हेच्यापुढे स्कीट करायचा नाय. आता स्टेजवर यायचा ता अ‍ॅवॉर्ड घेवकच. म्हणजे स्कीट वायटच असा नाय. ही नम्रता संभेराव वगैरे मंडळी किती मस्त स्कीट करतंत. पण आपण यापुढे ता करायचा नाय. आपली भूमिका वेगळी आसा.
मी : मग ‘रेडू’तली भूमिका?
छाया : ती भूमिका छान होती. पाचकळ नव्हती. कोकणचा वेगळा रूप तेच्यात दिसला. दिग्दर्शक राजेशने मस्त सिनेमा केलो तो. सहकलाकार पण सगळे छान होते.
मी : आमका पण खूप आवडलो तो सिनेमा. खूप सहजता आसा त्या सिनेमात.
छाया : लहानपणीची एक गंमत सांगतंय. मालवणी भाषेत गाळी खूपच. आम्ही ते लहानपणी खूप ऐकले. धामापूर माझा आजोळ. तेव्हा माझ्या मामाच्या घरा शेजारी एक आपा नावाचे माणूस होते. ते रोज दारू पीत आणि गाळी म्हणजे शिव्ये घालीतच घराकडे येयत. आमच्या घराक एक लहानशी खिडकी होती. थयसून आमका ते क्लिअर दिसत. तर त्या खिडकीची जागा अडवण्यासाठी आमची भांडणा व्हायची. बरा ते गाळी (शिव्या) घालीत ते पण पूर्वी न ऐकलेले असत. दरवेळी ते नवीन गाळी स्वत: करून घालायचे. आणखी एक गंमत म्हणजे ते गाळी नुसते घालत नव्हते तर हावभावांसकट घालीत. ते बघूक खूप मजा येवची.
मी : तुमचा जीवन बदलत गेला तसा जेवण बदलत गेला काय? काय विशेष आवड खाण्याची?
छाया : माका नॉनव्हेज विशेष आवडता, मासे, मटण, चिकन सगळा. पण गावाकडे गेल्यावर माका फणसाची भाजी आवडता. शिरवाळे (तांदळाच्या शेवया) आवडतत. सात कप्याचे घावन आवडतत. तुम्ही जर नेरुरपारच्या सायडीक गेलात तर थयसर लाल पाल्याची भाजी मिळता. ती धुतली तरी लाल पाणी येता. चिरताना हात लाल होतत. ही भाजी गावाकडे गेल्यावरच खायची मस्तपैकी भरपूर.
मी : आईच्या हातचो विशेष आवडीचो पदार्थ?
छाया : आई सगळेच पदार्थ छान करी. साधो फोडणीचो भात एवढो चवदार करायची की सत्रा जिन्नस घालून, ती चव माका जमणा नाय. एखादीच्या हाताकच चव आसता… म्हणतत ना तसा होता तिचा.
मी : सेटवरचा विशेष आवडीचा जेवण?
छाया : नाय विशेष. पयली ती अपूर्बाय होती. तीन तीन भाजये. किंवा इडली मेदुवडे. रोज जो नाश्तो खावक आपणाक पैशे लागतत तो नाश्तो फुकट हयसर. पण आता काय्यैक वाटणा नाय. आता मी तिकडे बघनय पण नाय. माका आता फक्त भाकरी आणि भाजीच गोड लागता.
मी : बाकी फिटनेस कसो संबाळतास?
छाया : एकतर डाएट माझ्या मनातच आसा. बघूया कधी जमता ता. योगासना करुची पण म्ानातच आसत. चालणा मात्र खूप आवडता. एका टायमाक सात ते आठ किमी मी सहज चालू शकतय.
मी : तुमचे आगामी येणारे कोणते सिनेमा आसत?
छाया : नवीन एक सिनेमा, हिंदी सिनेमा २ ऑगस्टाक रिलीज होतलो. `बारडोवी’ नावाचो. मृत्यूनंतर पुनर्जन्म होईपर्यंतच्या काळावर ह्यो सिनेमा आधारित आसा. वेगळोच विषय आसा. अशा प्रकारच्या सिनेमात मी पयल्यांदाच काम केलंय. तुम्ही पण नक्की बघा…!
मी : बरा तर. तुमचो बरोच वेळ मी खाल्लंय. तुमची अभिनयाची कारकीर्द अशीच उजळत रवांदेत अशे मी तुमका शुभेच्छा दितंय. आमचे डोळे आसतच. गावाकडे कधी इलात तर अरधो तास माका द्या. प्रत्येक्ष गजाली मारुया. धन्यवाद.
छाया : धन्यवाद.

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

साऊथने हिंदी सिनेमा को कैसे मारा?

Related Posts

मनोरंजन

दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

May 15, 2025
पडद्यावरचा खरा नायक
मनोरंजन

पडद्यावरचा खरा नायक

May 15, 2025
मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
Next Post

साऊथने हिंदी सिनेमा को कैसे मारा?

मार्मिकचे मर्म, महाराष्ट्र धर्म!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.