• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

आत्मनिर्भर आणि निर्भय!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 19, 2024
in खेळियाड
0

भारतीय क्रिकेटचा नवनिर्वाचित प्रशिक्षक गौतम गंभीर हा आक्रमक वृत्तीचा. धोनीच्या नेतृत्वाखालील भारताच्या दोन विश्वविजेतेपदांमध्ये त्याच्या फलंदाजीचा सिंहाचा वाटा. तसंच कोलकाता नाइट रायडर्सला कर्णधार आणि प्रेरक म्हणूनही त्यानं यश मिळवून दिलंय. आता भारताला क्रिकेटच्या यशोशिखरावर कायम राखण्याचं शिवधनुष्य त्याला पेलावं लागेल.
– – –

भारताला क्रिकेटच्या लघुप्रकारातील विश्वविजेतेपद मिळवून देत समाधानानं मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारा राहुल द्रविड हा शांत स्वभावाचा, शिस्तीचा आणि योग्य लक्ष्य समोर ठेवत त्याकडे संघाला घेऊन जाणारा कोच; तर त्याआधीचा प्रशिक्षक रवी शास्त्री मुक्तछंदातला, लहरी. पण खेळाडूंच्या कलानं चालणारा ज्येष्ठ मार्गदर्शक. खेळ आणि आयुष्याचा आनंद लुटावा, ही त्याची विचारसरणी.
या दोघांच्या तुलनेत नुकताच नेमण्यात आलेला नवा प्रशिक्षक गौतम गंभीर हा वरकरणी धीरगंभीर स्वभावाचा. पण त्याच्या मनात सामन्याचं वादळ घोंघावत असतं. काही महिन्यांपूर्वी कोलकाता नाइट रायडर्सला ‘आयपीएल’ जेतेपद मिळवून देणारा तो हाच प्रेरक (मेंटॉर). त्यावेळी डगआऊटमधील त्याचं हेच गांभीर्य सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. त्याआधीच्या दोन वर्षांत त्यानं प्रेरक म्हणून लखनौ सुपर जायंट्सला ‘आयपीएल’मध्ये समर्थपणे उभं करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली. सत्ताधारी भाजपाशी जवळीक असल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षकपदाच्या जाहिरातीचे आणि प्रक्रियेचे सोपस्कार पूर्ण करीत अखेरीस गंभीर यांच्या गळ्यात ही माळ घातली आणि एका गंभीरपर्वाला प्रारंभ झाला.
गंभीरचं वेगळेपण अनेकदा मैदानावर दिसून आलेलं आहे. विराट कोहलीच्या उमेदीच्या दिवसांत स्वत:चा सामनावीर पुरस्कारसुद्धा त्याला देण्याचा मनाचा मोठेपणा गंभीरनं दाखवला होता. पण नंतर हेच दोन दिल्लीकर मैदानावर एकमेकांशी भिडले होते. तसे त्याचे वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्रसिंह धोनी यांच्याशीही मतभेद गाजले. पण ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्धी संघांचा सामना करताना आवश्यक असलेली निर्भय वृत्ती गंभीरमध्ये होती. त्यामुळेच काही वादांशीसुद्धा त्याचं नाव जोडलं गेलं. गंभीरची कारकीर्द लवकर संपण्यास जशी त्याची कामगिरी आणि वृत्ती कारणीभूत आहे, तशीच भारतीय क्रिकेटमधील राजकारणाची भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे. अन्यथा, सौरव गांगुलीप्रमाणे खडूस कर्णधार म्हणून त्यानं नक्की नाव कमावलं असतं. पण जगज्जेत्या धोनीच्या जागतिक घोडदौडीत गंभीरच्या नेतृत्वगुणांना संधीच मिळाली नाही आणि धोनीनंतर हे कर्णधारपद अचाट कामगिरी करणार्‍या कोहलीकडे आपसूकच गेलं. पण गंभीरनं कर्णधार म्हणून ‘आयपीएल’च्या व्यासपीठावर ‘कोरबो, लोरबो, जीतबो रे’हा कोलकाता नाइट रायडर्सचा नारा बुलंद केला. कोलकाताला दोनदा ‘आयपीएल’जेतेपद मिळवून दिलं. याशिवाय, सलामीच्या स्थानांसाठीही सेहवाग, सचिन यांच्याशी त्याला स्पर्धा करावी लागली. परिणामी ऑस्ट्रेलियातील एका स्पर्धेत तर सलामीसाठी या तिघांमध्ये ‘रोटेशन फॉर्म्युला’वापरण्यात आला होता.
गंभीरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ झाला तो २००३-०४मध्ये. योगायोग म्हणजे धोनीची क्रिकेट कारकीर्दही याच वर्षी सुरू झाली. दिल्लीच्याच वीरेंद्र सेहवागनं तीन वर्ष आधी पदार्पण केलं होतं. यापैकी धोनी २०१९पर्यंत दीर्घकाळ टिकला. सेहवागच्या कारकीर्दीचा २०१३मध्ये अस्त झाला. तर २०१८मध्ये वयाच्या ३७व्या वर्षी भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा स्थिरावण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे गंभीरनं निवृत्तीचा निर्णय घेतला. कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे त्याच्या कारकीर्दीला शेवटच्या काही वर्षांत उतरती कळा लागल्यामुळे हा निर्णय तसा योग्यच होता. पण सलामीच्या स्थानांसाठी अडचणीची परिस्थिती असताना गंभीरला अधूनमधून भारतीय संघात बोलावण्यात आलं. त्यामुळेच त्यानं निवृत्तीला उशीर केला.
२००७चा ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि २०११चा एकदिवसीय विश्वचषक भारतानं धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले असले, तरी या दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये गंभीरच्या फलंदाजीचा सिंहाचा वाटा होता. २०११च्या विश्वचषकानंतर एक-दोन वर्षांतच त्याच्या फलंदाजीतील रया हरवली होती. त्यामुळे देशोदेशींच्या मैदानांवर एकेकाळी फलंदाजीची नजाकत पेश करणार्‍या गंभीरच्या कामगिरीचा आलेख बर्‍याचदा खाली जायचा आणि अधूनमधूनच उंचावायचा. २०१३च्या ‘आयसीसी’चॅम्पियन्स करंडक विजेत्या भारतीय संघात त्याचा समावेश नव्हता. भारतीय क्रिकेट संघातील ‘फॅब फाइव्ह’च्या अस्तानंतर २०१३-१४मध्ये गंभीरचं स्थानही डळमळीत झालं.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सेहवागप्रमाणे मुक्तछंदातली आक्रमकता जपणारा शिखर धवन आणि मोठी खेळी साकारण्याची क्षमता असलेला रोहित शर्मा हे सलामीवीर उदयास आले. मुरली विजय हा पर्यायही उपयुक्तता सिद्ध करीत होता. त्यामुळे गंभीरचा पर्याय निवड समितीच्या दृष्टीनं २०१४ आणि २०१६मध्ये एखाद-दुसर्‍या सामन्यांपुरताच मर्यादित राहिला. कसोटी क्रिकेटमधील ४२ धावांची सरासरी त्याला फार काळ आंतरराष्ट्रीय क्षितिजावर टिकवू शकली नाही. कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीकडून तो स्वत:ला टिकवण्यासाठी धीराने प्रयत्न करीत होता. २०१४च्या आयपीएलमध्ये सलग तीन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला. त्यावेळी त्याच्या कामगिरीवर जोरदार टीका झाली. पण २०१२ आणि २०१४मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली केकेआरनं आयपीएल विजेतेपदाला गवसणी घातली.
कालांतरानं या संघासाठीसुद्धा तो ओझे झाला. २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळेल, अशी त्याला आशा होती. परंतु युवराज सिंगप्रमाणेच गंभीरलाही या संघात स्थान मिळवता आलं नाही. २०१८च्या ‘आयपीएल’मध्ये फलंदाजी मनासारखी बहरत नसल्यामुळे त्यानं स्वत:ला संघाबाहेर ठेवणं पसंत केलं. इतकंच नव्हे, तर कामगिरीचं स्वत:लाही समाधान मिळत नसल्यामुळे लिलावाच्या कराराअन्वये ठरलेले दोन कोटी, ८० लाख रुपये मानधनसुद्धा त्यानं नाकारलं.
निवृत्तीनंतर वर्षभरातच गंभीरनं देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि पूर्व दिल्लीतून लोकसभेची निवडणूक जिंकत तो खासदार झाला. पण त्याची राजकीय कारकीर्द अपेक्षेप्रमाणे बहरली नाही. परिणामी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्याला निवडणुकीचं तिकीट नाकारण्यात आलं. पण क्रिकेटच्या मार्गावर तो कार्यरत राहील, हे धोरण ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी आखलं.

सामाजिक दायित्व

राजकारण करणं जरी गंभीरला जमलं नसलं तरी त्याचं सामाजिक दायित्व अनेकदा दिसून आलं. काही वर्षांपूर्वी आशियाई सुवर्णपदक विजेता बॉक्सिंगपटू डिंको सिंग कर्करोगाशी झुंजत असताना त्याला आर्थिक मदतीचा हात गंभीरनेच दिला होता. त्याने अनेकदा आपल्या बक्षीसांच्या रकमा समाजकार्यासाठी बहाल केल्या आहेत. याच प्रेरणेतून त्यानं गौतम गंभीर फाऊंडेशनची स्थापना केली. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २५ जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च तो करतोय. याचप्रमाणे अनंतनाग (काश्मीर) येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या अब्दुल रशीद या सैनिकाच्या मुलीची शिक्षणाची जबाबदारीसुद्धा त्याने सांभाळली आहे. भारतीय आइस हॉकी संघाला परदेश दौर्‍यासाठी आर्थिक मदतीची गरज असताना गंभीरच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता.
काही वर्षांपूर्वी माथ्यावर टिकली आणि डोक्यावर दुपट्टा घेऊन त्याने तृतीयपंथियांच्या अधिकारांचं समर्थन केलं. ‘स्त्री आणि पुरुष होण्याऐवजी माणूस होणं सर्वात महत्त्वाचं ठरेल’अशा आशयाचं ‘ट्विट’त्यावेळी त्यानं केलं होतं. कुणीही उपाशीपोटी झोपू नये, ही भावना जपणार्‍या गंभीरनं नवी दिल्लीत ‘एक आशा… जन रसोई’ समुदाय स्वयंपाकाची (कम्युनिटी किचन) संकल्पनासुद्धा राबवली आणि गरीबांना एक रुपयांत जेवण उपलब्ध करून दिलं.

पुढील आव्हानं

द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतानं एकदिवसीय विश्वचषकाचं उपविजेतेपद आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील जगज्जेतेपद जिंकलंय. परदेशी खेळपट्ट्यांवर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासारख्या दिग्गज राष्ट्रांना भिडण्याची क्षमता भारतानं गेल्या काही वर्षांत कमावलीय. हाच रुबाब कायम ठेवण्याचं आव्हान गंभीरपुढे असेल. येत्या वर्षात भारताला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडशी सामना करायचाय. त्यामुळे गंभीरची सत्त्वपरीक्षा असेल. याचप्रमाणे कोहली, शर्मा यांच्यासारख्या तारांकितांशी जुळवून घेत लक्ष्य निर्धारित करण्यासाठीही त्याला कसरत करावी लागणार आहे.

[email protected]

Previous Post

एक दिवस तरी वारी अनुभवावी

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Related Posts

खेळियाड

बिहारी बालकाचं वैभव टिकेल का?

May 8, 2025
खेळियाड

चंपक आहे साक्षीला…

May 5, 2025
खेळियाड

चला दोस्तहो, बॅटसंदर्भात बोलू काही…

April 25, 2025
खेळियाड

काही फिकुटले, काही चमकले…

April 17, 2025
Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

मिश्कील, उमदा, खेळकर सुनील!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.