• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

उपमामु कोडगा भाऊ स्कीम

- ऋषिराज शेलार (नौरंगजेबाची बखर)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 11, 2024
in भाष्य
0

(तुंबाडवाडीचे `सहेतु कार्यालय’. वर मधोमध फलकावर बत्तीसलक्षणी मो. नौरंगजेबांचा फोटो. कोपर्‍यात सहेतु कार्यालयाचं नाव. दुसर्‍या कोपर्‍यात गावाचं नाव व इतर माहिती. नुकत्याच पहिल्या पावसात गळून डबकं झालेलं नि आताशी जर्राऽऽऽ सुकलेलं हे अप्रतिम कार्यालय. हडप्पाच्या उत्खननात सापडलेले कम्प्युटर चालवत एक किडकिडीत बांध्याचा तरुण टेबलाच्या त्यांगून बसलेला. बाकी कार्यालयात त्याच्याशिवाय तीन पाठ तुटलेल्या खुर्च्या, डोईवरचा हातपंखा आणि भिंतीवरचं दरपत्रक. तितक्यात नौरंग सडक योजनेत बांधलेल्या रस्त्यावरची धूळ उडवत एक इलेक्ट्रिक एसयूव्ही येऊन समोर थांबते. कम्प्युटरमागचा किडकिडीत कडकडने मान वाकडी करून आशाळभूत नजरेने तिच्याकडे बघतो. एसयूव्हीतून एक सुपोषित बांध्याचा सुटबुटातला गडी उतरतो. हातात एक भरीव फाईल आहे. ती घेऊन तो कंप्युटरवाल्या कडकडनेसमोर उभारतो.)

गडी : (भारदस्त आवाजात) नमस्कार! कुणी आहे का इथं?
कडकडने : (पिचलेल्या आवाजात) काऽऽऽय्येऽ? काय काम होतं?
गडी : (डोळ्यावरला मोरपंखी गॉगल काढत) स्कीम! स्कीम चालुय ना?
कडकडने : कसली पाहिजे? (एक कागद घेऊन त्यावरील एक्सपायरी उलटलेल्या स्कीम चाळत) नौरंग गर्दभपालन स्कीममध्ये आता फक्त मुकी गाढवं उरलीत, मामु काकपालन स्कीममध्ये दहाव्याचे कावळे तेवढे मिळतात, तर शहाजहान कौशल्य विकास योजनेतील विमानाच्या चाकाला वंगण लावण्याच्या प्रशिक्षण वर्गाचेच केवळ अर्ज शिल्लक आहेत. आता यांपैकी कुठल्या स्कीम पाहिजेल?
गडी : (गॉगल शर्टाच्या टोकाने पुसत) ह्या नाहीत ओ! तेऽऽऽ काही नवीन आलं ना एवढ्यात?
कडकडने : (एक बोटाएवढे पाऊच टेबलवर ठेवत) सध्या हेच नवीन आलंय!
गडी : काय आहे यात?
कडकडने : (उत्साहाने) हे खास प्रकारचे डायपर आहेत, गळक्या नाकाला लावण्यासाठी! स्पेशल हात भट्टीत डिझाइन केलेत!
गडी : पण हे तर सहेतु कार्यालय आहे ना? मग इथे वस्तू कश्या काय आणि का विकता तुम्ही?
कडकडने : त्याचं काय आहे ना? आम्ही फारतर फॉर्म भरू शकतो. त्याचे पर फॉर्म रुपयापासून पन्नासेक रुपयांपर्यंत मिळतात. त्यात काही भागत नाहीय हो!
गडी : मग दुसरा काही उपाय करायचा ना?
कडकडने : आमच्या संघटनेने केलीय मागणी, अर्जाला हमीभाव देण्याची! मिनिमम एक लाख! म्हणजे किमान फॉर्म लीक केला तरी पोटापाण्यापुरते पैसे मिळतील.
गडी : (मूळ विषय आठवत) तुमची मागणी स्तुत्य आहे, पण माझ्या स्कीमचं सांगा ना?
कडकडने : कुठली म्हणताय?
गडी : भावासाठी काही स्कीम आलीय ना?
कडकडने : हो ती होय? `उपमामु कोडगा भाऊ’ स्कीम आहे ती!
गडी : त्यासाठी निकष आणि कागदपत्रं काय लागतील?
कडकडने : निकष? निकष म्हणजे बघा, पहिलं हेच ते शुद्ध अंगभूत कोडगेपणा…
गडी : तो तर आहेच हो!
कडकडने : असून उपयोग नाही हो, तो उतू जायला हवा! दिसायला हवा!
गडी : आहेच की! आता हेच बघा. मी आलोय दहा मिनिटं आधी! पण अजूनही तुम्ही साधं बस म्हणालेला नाही. इथे तीन रिकाम्या खुर्च्या असूनही!
कडकडने : पण एवढ्या-तेवढ्याने भागणार नाही. तुम्हाला शुद्ध निगरगट्ट कोडगेपणा सिद्ध करावा लागेल.
गडी : त्यात काय? आता मागच्या फाट्यावर एकाकडे तंबाखू मागितली, त्याने दिली नाही. मी हिसकावून घेतली, तर त्याने कानसुळात जाळ काढला. तरीही मी हसून `जाऊद्या ना भौ.’ म्हणत दात दाखवले. अशी शेकड्याने उदाहरणं देता येतील.
कडकडने : बरं! गद्दारी, विश्वासघात वगैरे गोष्टींची काही पार्श्वभूमी?
गडी : (निर्लज्जपणे हसत) ते तर रक्तातच आहे माझ्या. आता जी माझी मालमत्ता आहे ती मी एका भल्या माणसाकडे काम करत असताना दांडगाईने बळकावून घेतलीय, तर राहातं घर चुलत्याला हाकलून कब्जात घेतलं आहे.
कडकडने : व्वा!! पण पुढला निकष तुम्ही पळपुटेचा आहे. काय तुम्ही कुठल्या जबाबदारीपासून पळालाय?
गडी : (चेहर्‍यावर कोडगेपणा ओसंडून येतो.) हो, मी बायको गर्भार असताना तिला फारकत दिली होती. त्यामुळे ते ओघाने आलंच!
कडकडने : बरं तुमचं उत्पन्न?
गडी : ते फार काही नाहीय! कधी कधी महिन्याला दहा एक लाखसुद्धा मिळत नाहीत. आता रोज लोकांना फसवणं सोपं राहिलं नाहीय. मागे एक हॉटेलवाल्याने बिल दिलं नाही म्हणून अगदी पंतापर्यंत बोंब पोचवली होती. म्हणून ह्या स्कीमचा लाभ मिळवायच्या प्रयत्नात आहे. असं ऐकलं की यात एक खोके ते पन्नास खोकेपर्यंत लाभ मिळतो आणि सोबत दरबारात काही वतनं, जहागिर्‍या वगैरे मिळतात म्हणे?
कडकडने : त्यासाठी आधी तुम्हाला निकष पूर्ण करावे लागतील ना?
गडी : झाले की सर्व निकष! आता कुठला बाकीय?
कडकडने : तुमच्यावर काही भ्रष्टाचाराचे आरोप लागलेत की नाही? आणि काही इतर काही गुन्हे?
गडी : छे! छे! हे यांपैकी काही नाहीय! फक्त विरोधक आरोप करत असतात, आता मला सांगा ठेकेदाराने नजरचुकीने स्मशानाचा ओटा मंदिराच्या सभामंडपात बांधला. किंवा दोनशे लोकवस्तीच्या गावावरून उड्डाणपूल नेला वा घरकुल योजनेत अमिताभ बच्चन यांच्या नावे घर बांधून दिलं तर त्यात काय भ्रष्टाचार होतो? बकवास आरोप हो! त्यात मागे एक ठिकाणी हॉटेलात जेवणानंतर केवळ हात पुसण्यासाठी एक महिलेचा पदर वापरला तर लगेच विनयभंग, बलात्काराचा प्रयत्न असले आरोप लावलेले. पण तुम्हाला म्हणून सांगतो, असले फुटकळ आरोप माझ्यासारख्या विकासाच्या वाटेवर चालणार्‍या कार्यकर्त्यांवर होतच असतात.
कडकडने : हेच विचारत होतो. किमान आरोप तरी हवेतच! बाकी निकष फार महत्त्वाचे नाहीत. आता पेपर दाखवा! काही कागदं आणलीत का?
गडी : (हातातील जाड फाईल टेबलवर सरकवत) ही काय? पूर्ण कागदपत्रं पाहिजे, तेवढं सांगा!
कडकडने : पहिलं काळं रेशनकार्ड
गडी : हे काय असतं?
कडकडने : तुमच्या दोन नंबरच्या पैशाची हवालामार्फत जी रेशनिंग होते, तेच!
गडी : ते होय? ते रिन्युअलसाठी दिलंय!
कडकडने : स्विस वा इतर बँकेचं पासबुक?
गडी : हे घ्या! स्विस वगैरे जुने झालेत. हे जरा नवीन आहेत.
कडकडने : एखादा नौरंगजेबांसोबतचा फोटो?
गडी : (एक फोटो काढून देत) हा घ्या!
कडकडने : हे काय? हा नौरंगजेबांचा भाषण करतानाचा फोटो आहे, यात तुम्ही कुठं आहात?
गडी : (बोटाने खुणावत) हे काय! स्टेजखाली हात वर केलेलं डोकं दिसतंय ना? तो मीच! दोन्ही हात जोडून स्टेजवर डोकं टेकवत होतो, तेव्हाचा हा फोटो.
कडकडने : बरं, बरं! सोबत एक स्वयंघोषणापत्र लिहून द्या.
गडी : पण यात काय लिहून द्यायचंय?
कडकडने : सोप्पंय हो! `मी अबक राहणार ठ येथील रहिवासी शपथेवर लिहून देतो की मा. नौरंगजेबांच्या विकासाच्या कार्याने प्रभावित झालोय. त्यामुळे त्यांच्यासोबत धनसेवेच्या खडतर मार्गावर चालण्याचे मी स्वेच्छेने ठरवले असून सोबत जोडलेली कागदपत्रं आणि माहिती सत्यापलाप करणारी आहे, ही खात्री देतो.’ आणि इथे खाली कोपर्‍यात सही करा!
गडी : (सदरहू फॉर्म भरून त्यावर सही करत) एवढंच आहे का, आणखी काही बाकीय?
कडकडने : फॉर्म फी भरा!
गडी : ती किती आहे?
कडकडने : पूर्ण एक पेटी! आणि ती पुन्हा मिळणार नाही. म्हणजे अनरिफेंडेबल!
गडी : ही फार मोठी रक्कम आहे हो! किमान धनसेवकांना काही सवलत नाही का?
कडकडने : त्यासाठी नियमित व्हायकर टॅक्स भरल्याचं विवरण द्यावं लागेल.
गडी : पण ते कुठं मिळतं?
कडकडने : ती येडीराम आणि सीभॉय देतात.
गडी : पण त्यासाठी त्यांनी महिना लावला तर?
कडकडने : नाही हो! त्यांना पूर्ण रक्कम मिळाली आणि नौरंगजेबांच्या समर्थनाची खात्री दिली की ते कार्यालयीन कामकाजाची वेळ टळून गेली तरी सात तासाच्या आत देतात.
गडी : ठीक आहे, ते उद्या आणून देतो. पण यापलीकडे काही बाकी नाहीय ना? `कोडगा भाऊ’ स्कीमचा पूर्ण लाभ मिळेल ना मला?
कडकडने : तुमची आहेत हो कागदपत्रं पूर्ण! पण तरी लाभ मिळतील की नाही याची गॅरंटी देता येणार नाही.
गडी : का? आता कसली अडचण आहे? आणखी काही कागदपत्रं लागली तरी तीही देतो. पण शाश्वती द्या बुवा!
कडकडने : त्यासाठी एक कागदपत्रं लागेल.
गडी : कोणतं?
कडकडने : हयातीचा दाखला द्यावा लागेल.
गडी : अहो, मी जिवंत उभा आहे. आणखी कसला पुरावा मागताय?
कडकडने : तुम्ही आहात हो उभे! पण दाखला तुमचा नकोच आहे.
गडी : मग कुणाचा हवाय?
कडकडने : (शांतपणे) सरकारच्या हयातीचा दाखला आणा. कारण यांची एक्सपायरी संपत आलीय. मागाहून तुम्हाला लाभ मिळाला नाही तर तुम्हीच मला दोष द्याल, काय?

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या गळ्याला नख!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या गळ्याला नख!

आध्यात्मिक शांती देणारी ज्ञानपीठ अभ्यासिका

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.