• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आत्मयोगगुरू संप्रसाद विनोद

- दिवाकर रावते, शिवसेना नेते

Nitin Phanse by Nitin Phanse
July 11, 2024
in भाष्य
0

आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांच्या योगकार्याची ५० वर्षे व वयाची ७५ वर्षे असा योग यंदा जुळून येणं ही खूपच आनंददायी घटना आहे. डॉ. विनोद यांचे वडील अध्यात्ममहर्षि न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद म्हणजेच अप्पासाहेब हे आमचे आध्यात्मिक गुरू.
१९६३-६४च्या दरम्यान मुंबईतील सरदारगृहात अप्पांची आणि आमची पहिली भेट झाली. मुंबईत आल्यावर अप्पांचा मुक्काम नेहमीच सरदारगृहात असे. अप्पांचं वागणं, बोलणं, त्यांचं असणं हे इतरांपेक्षा खूपच वेगळं असे. अतिशय वंदनीय आणि ज्यांच्यापुढे आपण आपोआपच नतमस्तक होऊ अशा या व्यक्तिमत्वाविषयी माझ्या मनात प्रचंड ओढ, प्रेम आणि श्रद्धा आपोआपच निर्माण होत गेली. त्यामुळे अप्पा मुंबईत असले की संध्याकाळी सातच्या सुमारास, इव्हीनिंग कॉलेजनंतर आम्ही त्यांची भेट घ्यायला आवर्जून जात असू. आम्ही ऐकलेले त्यांचे (जागतिक कीर्तीचे करोडपती रॉकफेलर यांच्यावर दिलेले) पहिले व्याख्यान आजही आमच्या स्मरणात आहे.
प्रचंड विद्वत्ता लाभलेले अप्पा अत्यंत मृदुभाषी होते. अध्यात्मिक क्षेत्रातील मोठी अधिकारी व्यक्ती म्हणून त्यांची जगभर ख्याती होती. त्यांना मिळालेल्या सर्व पदव्या कमी पडतील एवढे त्यांचे बौद्धिक व अध्यात्मिक सामर्थ्य होते. असे हे अलौकिक व्यक्तिमत्व आम्हांस गुरु म्हणून लाभले हे आमचे परमभाग्यच.
अप्पा आणि आमच्यातील गुरु-शिष्य नाते शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. ज्याचे वर्णनही करता येणार नाही असे जाणिवेतील हे नाते! सरदारगृहात भेटीस गेलो असताना दोन घास खाऊन मला जेवावयास दिलेले स्वत:चे ताट असो, किंवा आमच्या जीवनातल्या अत्यंत महत्वाच्या क्षणी पत्ररूपाने पाठवलेला आशीर्वाद असो, आमच्यासाठी हा अप्पांनी दिलेला प्रसादच असे. तो प्रसाद आजही आम्हांस व आमच्या कुटुंबियांस सांभाळतो आहे. आजही प्रत्येक क्षणी अप्पा आमच्याबरोबरच असतात.
अप्पांची पुण्यातील ‘शांतिमंदिर’ ही वास्तू आमच्यासाठी खरंखुरं मंदिर आहे. देवळात जाण्यात जो आनंद असतो त्यापेक्षाही अधिक आनंद इथे जाण्याने आम्हांस मिळतो. या वास्तूमध्येच असलेल्या ‘महर्षि विनोद रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून अप्पांचे कनिष्ठ चिरंजीव डॉ. संप्रसाद विनोद यांचे योग-प्रसाराचे कार्य गेली ५० वर्षे अविरतपणे चालू आहे. आज अप्पा देहरूपाने नाहीत, पण जेव्हा जेव्हा अप्पांच्या पायांवर डोकं ठेवायचे असेल, तेव्हा तेव्हा आम्ही डॉ. संप्रसाद यांची भेट घेतो. अप्पासाहेब जो मायेचा वर्षाव आमच्यावर करीत तशीच माया डॉ. संप्रसाद यांच्या सान्निध्यात आम्हांस जाणवते.
अप्पांनी १९४४ साली सुरू केलेल्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची, व्यासपूजा महोत्सवाची जबाबदारी अप्पांनंतर डॉक्टर समर्थपणे पुढे नेत आहेत. या महोत्सवात दरवर्षी संकल्प समाधी व निर्विकल्प समाधीचे प्रयोग करून अप्पा सर्वांना आशिर्वाद देत असत. तेच सामर्थ्य डॉक्टरांनी योगसाधनेतून विकसित केले आहे. त्यामुळेच आजही आशीर्वाद देणारे हात आमच्या व सर्वांच्याच पाठीशी आहेत. चारही वेद कोळून ज्यांच्या ज्ञानातून व्यक्त होत असत अशी विद्वत्ता, तरीही अत्यंत मृदुभाषी, विनम्रता, कार्याविषयी तळमळ आणि समरसता ही अप्पांची सर्व वैशिष्ट्ये डॉ. संप्रसाद यांच्यातूनही तशीच प्रकट होत आहेत. अप्पांकडून आलेला अध्यात्मिक वारसा अत्यंत मौलिक अशा योगकार्यातून डॉक्टर समर्थपणे पुढे नेत आहेत.
विचार करायलाही वेळ नसलेले आजचे गतिमान जीवन मानसिक अस्थिरतेने भरलेले आहे. अशा परिस्थितीत भरकटलेल्या अनेकांना मौलिक मार्गदर्शन करत पुन्हा मार्गावर आणण्याचे फार मोठे काम डॉक्टर करत आहेत. डॉ. संप्रसाद यांच्या संपर्कात आल्यानंतर सुरुवातीच्या भेटीमध्येच आपण त्यांच्यात लीन होतो, असे अध्यात्मिक सामर्थ्य त्यांच्यात जाणवते. अप्पांप्रमाणेच तेही अनेकांना शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आत्मिक पातळीवर आधार देत हळुहळू सक्षम करत आहेत आणि भविष्यातही करत राहतील अशी आम्हांस खात्री वाटते. त्यासाठी त्यांनी विकसित केलेली अभिजात योगसाधना, प्रयोगसाधना व आत्मबोध साधना त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याचा लाभ आपण सर्वांनी घेतलाच पाहिजे. त्यात सर्वांचे कल्याण आहे यात शंकाच नाही. विशुद्ध ज्ञानाची परंपरा सेवाभावनेने पुढे नेण्याचे हे कार्य असेच विस्तारत राहो ही अप्पांच्या (गुरुचरणी) प्रार्थना.

– दिवाकर रावते, शिवसेना नेते

Previous Post

मुंबईत आवाऽऽज शिवसेनेचाच!

Next Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

टपल्या आणि टिचक्या

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.