• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

बहारदार ठेक्याचे सम्राट

- दासू भगत (चंदेरी सोनेरी)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 3, 2024
in मनोरंजन
0

जन्मत: प्रत्येक माणसाच्या शरीरात ताल आणि मनात लय असतेच. अगदी लहान बाळ पण आईच्या अंगाईगीताने किंवा बाबाच्या चुटकीने क्षणभर का होईना रडायचे थांबतेच ना! खरं तर आपण निसर्गातले ध्वनी लक्षपूर्वक ऐकायला शिकलो तर त्यात नक्कीच लयबद्ध ताल ऐकू येईल. जसजशी आपली वाढ होत जाते तसतसे मग कानावाटे सूर मनात तर शरीराद्वारे ताल शरीरात भिनत जातो. आपल्याला नाचावेसे का वाटते? तालाच्या ठेक्यात असे काय असते की ज्यामुळे शरीर थिरकायला लागते? आपल्याला त्या शास्त्रीय नृत्याबित्त्यातले भलेही काही कळो की न कळो, पण तालाच्या लयीवर नाचतोच की! लग्नाच्या वरातीत आपण नाचायची हौस भागवून घेतोच ना!! तालाची ही जादू अगदी लहानपणापासून आपल्यावर गारूड करत आली आहे.
आज मला या तालासंबंधी काही सांगायचे आहे. चित्रपटसृष्टीत तालवाद्यकारांनी किती अप्रतिम काम करून ठेवलंय! पण आपल्याला मात्र कदाचित आज त्यांची नावंही आठवणार नाहीत. १९४२मध्ये १२-१३ वर्षांचा दत्तू नावाचा एक मुलगा आईबरोबर गोव्याहून मुंबईत आला. मराठी माणसांना अतिशय प्रेमाने सामावून घेणार्‍या त्या काळातल्या वस्त्या म्हणजे परळ आणि गिरगाव. हे दोघेही गिरगावातल्या ठाकूरद्वार या ठिकाणी राहू लागले. तिथे एक दिवस एक स्त्री दत्तूच्या आईला (जी स्वत: संगीतप्रेमी व गोव्याचीच होती) भेटली. तिने सर्वप्रथम दत्तूला एका संगीत गुरूकडे नेले. पंढरीनाथ नागेशकर या गुरूंनी त्याला विचारले, तबला शिकणार का? दत्तू हो म्हणाला. मग या गुरूने दत्तूला गंडा बांधला. त्यावेळी त्या गुरूला पण ही कल्पना नसेल की एक दिवस हा शिष्य आपल्या ठेक्याने अख्ख्या चित्रपटसृष्टीला डोलायला लावेल. तरुण दत्तू पुढे आखाड्यात व्यायाम करायला जाऊ लागला. या ठिकाणी शंकर नावाचा एक तरुण नियमित यायचा. दोघांची हळूहळू मैत्री झाली. एक दिवस व्यायाम झाल्यावर फ्रेश होण्यासाठी दत्तू आखाड्यातल्या बाथरूममध्ये गेला. अंघोळ करताना त्याच्या कानावर तबल्याचे बोल ऐकू आले. दत्तूला आश्चर्य वाटले. तो लगबगीने बाहेर आला. या आखाड्यात एका तबलाप्रेमी व्यक्तीने एक तबला आणून ठेवलेला होता. बाहेर येऊन बघतो तर शंकर तबला बाजवतोय… दत्तूच्या तोंडून सहजपणे व्वा… व्वा! असे उद्गार निघाले. शंकर तबला वाजवायचा अचानक थांबला… दत्तूकडे बघत म्हणाला, ‘तू व्वा… व्वा… कसे काय म्हणालास? तुला तबल्यातलं काही समजतं काय?’ यावर दत्तू म्हणाला, ‘हो… मलाही थोडा फार तबला वाजवता येतो…’ आणि त्याने एक मुखडा वाजवून दाखवला. शंकर उठला आणि दत्तूला कडकडून भेटला… भविष्यातले दोन महान कलावंत असे कडकडून भेटताना सर्वप्रथम त्या तबल्याने बघितले होते. यातील दत्तू पुढे महान ऱ्हिदम संयोजक व संगीतकार दत्ताराम बनला, तर शंकर देखील जयकिशनसोबत जोडी जमवून महान संगीतकार बनला.
त्या काळात पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरचे मोठे नाव होते. चर्नी रोड स्टेशनजवळ ऑपेरा हाऊस ही एकमेव इमारत त्या काळी नाटकांसाठी प्रसिद्ध होती. नंतरच्या काळात या ठिकाणी चित्रपटगृह झाले. या इमारतीत पृथ्वी थिएटरच्या नाटकाच्या तालमी होत असत. शंकर यांनी दत्ताराम यांना तिथे बोलावून घेतले. येथील कँटीनमध्ये जयकिशन, हसरत जयपुरी, शैलेंद्र, राज कपूर, राजा नवाथे, शम्मी कपूर असे सर्वजण येत असत. सर्वचजण काहीतरी बनायचे या ध्येयाने झपाटलेले होते. येथे जी नाटके होत असत, त्यातील मध्यंतरात सतार, सनई, तबला वाजवणारे कलावंत कला सादर करत. येथे दत्तारामदेखील तबला वाजवू लागले.
राज कपूर म्हणजे संगीतातील अत्यंत दर्दी व्यक्तिमत्व. संगीताची अतिशय उत्तम जाण या माणसाला होती. त्यांच्या चित्रपटातील गाणी म्हणजे त्या चित्रपटाचा प्राणच असत. १९४८मध्ये राज कपूर यांनी ‘बरसात’ चित्रपटाची जुळवाजुळव सुरू केली. १९४९मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि यातील संगीताने अक्षरश: धुमाकूळ घातला. शंकर-जयकिशन, शैलेंद्र, हसरत जयपुरी, लताजी, मुकेश यांनी संगीताचा बाजच बदलून टाकला आणि संगीताच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली.
शंकर-जयकिशन यांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ऑर्केस्ट्रेशनमधील महाप्रचंड ग्रँजर. सर्व काही भव्यदिव्य असे. त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगमध्ये वादकांचा खूप मोठा ताफा असे. मेलडी आणि ऱ्हिदम यांचे ते अनभिषक्त सम्राट होते. नंतरच्या काळात शंकर-जयकिशन यांनी मेलडीची जबाबदारी सॅबेस्टीन या प्रचंड प्रतिभाशाली संयोजकाकडे तर ऱ्हिदमची जबाबदारी दत्ताराम यांच्याकडे सुपूर्द केली. हे दोघे शंकर-जयकिशन यांचे प्रमुख सहाय्यक म्हणून अखेरपर्यंत सोबत राहिले.
‘बरसात’नंतर राज कपूरने ‘आवारा’ चित्रपटाची तयारी केली. यासाठी त्यांनी फेमस स्टुडिओत ऑफिस थाटले. दत्ताराम यांना सुरुवातीला फक्त रेकॉर्डिंगपूर्वीच्या तालमीतच वाजवायला मिळत असे. प्रत्यक्ष रेकॉर्डिंगमध्ये मात्र त्यांचे गुरूच वाजवत असत. त्यामुळे ते खट्टू होत असत. त्यांच्या प्रतिभेचा कस लागायचा शिल्लक होता. एक दिवस त्यांना ती संधी मिळाली. ‘आवारा’ चित्रपटातील…. ‘एक बेवफा से प्यार किया…’ या गाण्याचे रेकॉर्डिंग व्हायचे होते. पण दत्तारामचे गुरू, जे ढोलक वाजविणार होते ते आलेच नाहीत. वेळ महत्त्वाची होती. वाट बघून शेवटी राज कपूर म्हणाले, अरे… दत्तूलाच सांगा आता… आणि दत्ताराम यांनी यात ढोलक वाजविला. शंकर-जयकिशन, राज कपूर, लतादीदी सर्वचजण खूप खूष झाले. आणि येथून खर्‍या अर्थाने दत्ताराम यांच्या वादनाची कळी बहरू लागली.
१९५३मधील ‘राजा की आयेगी बारात…’ (आह) हे गाणेही हिट झाले. राज कपूर एकदा शंकर-जयकिशन, शैलेंद्र व दत्ताराम यांना घेऊन खंडाळा येथे गेले. एका नृत्य गाणे त्यांना हवे होते. त्यांनी शंकरजींना विचारले, एखादी चाल सुचते का? ते म्हणाले ‘हो’. मग ते दत्तारामला म्हणाले, एखादा ठेका दे बघू… दत्ताराम यांनी ताल धरला. यावर शंकरजी ‘रमैया वस्तावैया’ अशी ओळ म्हणू लागले. बराच वेळा तीच ओळ म्हणत राहिले. राज कपूर म्हणाले, ‘अरे आता पुढे काय?’ जवळच शैलेंद्र बसले होते त्यांनी पुढची ओळ म्हटली, ‘मैंने दिल तुझको दिया…’ आणि बघता बघता एक अजरामर गाणे तयार झाले. १९५५मधील ‘श्री ४२०’ या चित्रपटातील दत्ताराम यांनी वाजवलेली ‘ईचक दाना बिचक दाना…’, ‘प्यार हुआ इकरार हुआ है…’, ‘रमैया वस्तावैया’ ही सर्वच गाणी प्रचंड गाजली. यातील ढोलकवर वाजवलेले ठेके अप्रतिम आहेत.
दत्तारामजी चांगले कंपोजर पण होते. त्यांचे पूर्ण नाव दत्ताराम वाडकर. त्यांच्या मुलाचे नाव सुरेश वाडकर. अनेकजण गायक सुरेश वाडकर यांना त्यांचा मुलगा समजतात. पण फक्त नावसाध्यर्म्य. त्यांचा मुलगा फॅशन डिझाईनर आहे. १९५७मध्ये राज कपूरने एक वेगळा प्रयोग केला. लहान मुलांवर एक चित्रपट त्यांनी निर्मित केला. ‘अब दिल्ली दूर नहीं’ हे त्याचे नाव. राजेंद्रसिग बेदी आणि मुहाफिज हैदर यांनी कथा-पटकथा लिहिली होती. यात संगीतकार कुणाला घ्यायचे? असा विचार करत असताना शंकर यांनी दत्ताराम यांचे नाव सांगितले. राज कपूरनेही विश्वास दाखवत त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली. यातील ‘छुम छुम करती आयी चिडिया, दाल का दाना लायी चिडिया…’ हे रफी यांचे गाणे तुफान गाजले. याकूब या विनोदी अभिनेत्यावर हे गाणे चित्रित केले आहे. या गाण्यातील त्यांनी वाजवलेला ढोलक केवळ अप्रतिमच आहे. हाच ठेका पुढे त्यांची ओळख बनणार होता.
‘मधुमती’चे संगीतकार सलील चौधरी यांनी त्यांना बोलावले. दत्ताराम यांनी जेव्हा त्यांना विचारले, ‘या गाण्यावर कोणता ठेका वाजवू?’ यावर सलिलदा त्यांना म्हणाले होते, ‘हे मी तुला काय सांगणार? तूच ठरव की काय वाजवायचे!’ ज्यांना आपण ‘मोठी माणसं’ असं म्हणतो, ती अशा प्रसंगामुळे खरोखर मोठी होत असतात. यातील ‘घडी घडी मेरा दिल धडके’, ‘सुहाना सफर और ये मौसम हंसी’ आणि ‘आजा रे परदेसी’ या गाण्यांवर त्यांनी सुंदर ढोलक वाजवले.
१९५८मध्ये दत्ताराम यांना आणखी एक चित्रपट मिळाला. राज कपूर, माला सिन्हा यांचा ‘परवरिश’. यातील ‘आंसू भरी है ये जीवन की राहे…’ हे मुकेश यांचे गाणे तुफान गाजले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी वादक आणि कलावंताचा संप होता. त्यामुळे वादकच मिळत नव्हते. शेवटी दत्ताराम यांनी त्यांच्या ओळखीतील काही मित्रांना सारंगी, सतार वाजवायला सांगितली आणि गाणे रेकॉर्ड केले. यातील दुसरे उडत्या चालीचे ‘मस्ती भरा है समां…’ हे गाणे पण खूप लोकप्रिय झाले. यातील त्यांचा ढोलकचा ठेका चित्रपटसृष्टीत ‘दत्ताराम ठेका’ याच नावाने प्रसिद्ध झाला. संगीतकार कुणीही असो, पण वादकांना सूचना करताना ते म्हणत, अरे भाई वह दत्ताराम ठेका बजाना… राज कपूरच्याच ‘जिस देश में गंगा बहती है’मध्ये एका गाण्यात गाणे सुरू होण्यापूर्वी विविध तालवाद्ये वाजवली होती. याचे सर्व संयोजन दत्ताराम यांनी केले होते. यात लालाभाऊ नावाच्या ढोलकी बहाद्दराने केवळ बोटांनी डफावर अप्रतिम बोल वाजवले होते. हे तेच ढोलकीपटू होते ज्यांनी ‘घर आया मेरा परदेसी…’ या गाण्यावर अप्रतिम ढोलकी वाजवली होती. याच चित्रपटातील ‘हाँ मैने प्यार किया…’ या लताजीच्या गाण्यातील ऱ्हिदम ऐका… केवळ लाजबाब आहे.
‘बसंत बहार’ या चित्रपटातील सर्वच गाणी रागदारीवर आधारित होती. ती सर्वच लोकप्रिय झाली. ‘लव्ह इन टोकियो’मधील ‘सायोनारा… सायोनारा…’ हे गाणे व ‘गुमनाम’मधील ‘इस दुनिया में जीना है तो सुन लो मेरी बात…’ ही दोन गाणी म्हणजे दत्ताराम ठेक्याचा कळस म्हणता येईल इतकी अप्रतिम आहेत.
चित्रपटसृष्टीतल्या जवळपास सर्वच संगीतकारांसाठी त्यांनी काम केले. गोव्याने चित्रपटसृष्टीला अनेक नामवंत कलावंत दिले. यात गायक, साहित्यिक, संगीतकार, वादक, अभिनेते सर्वच आहेत. दत्तारामजी हे यातील अत्यंत लखलखणारे रत्नच होते. र्‍िहदम त्यांच्या नसानसातच भिनला होता, जो बोटाद्वारे उसळून बाहेर येत असे. खरं तर तबला, पखावज, मृदुंग हे भारतीय शास्त्रीय संगीतातल्या दरबारी मानाने रुजू झाले. या वाद्यांचा शास्त्रीय पद्धतीने विकास होत गेला. त्यात तालाचे बोल स्पष्टपणे लिहून व्याकरण तयार केले गेले, पण ढोलक, ढोलकी वा ढोलाला हा मान मिळू शकला नाही. या वाद्यांना दत्तारामजी यांच्यामुळे चित्रपटसृष्टीत मात्र मान मिळाला. १९७७पर्यंत ते चित्रपटसृष्टीत सक्रिय होते, पण नंतर मात्र गोव्यात मूळ गावी उर्वरित आयुष्य घालवले. ८ जून २००७ मध्ये त्यांचा श्वासाचा ठोका आणि हा बहारदार ठेका कायमचा बंद झाला.

Previous Post

कोलकाताच्या विजयगाथेचे शिलेदार!

Next Post

बाप-लेकीची हृदयस्पर्शी गोष्ट!

Related Posts

मनोरंजन

दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

May 15, 2025
पडद्यावरचा खरा नायक
मनोरंजन

पडद्यावरचा खरा नायक

May 15, 2025
मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
Next Post

बाप-लेकीची हृदयस्पर्शी गोष्ट!

चमचमीत, चविष्ट भोपळा!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.