• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

महाराष्ट्रात झटका देशभर फटका!

- संतोष देशपांडे (देशकाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 23, 2024
in कारण राजकारण
0

ध्यानीमनी नसताना यंदाची निवडणूक जनतेने स्वतःच्या प्रश्नांवर स्वतःच हातात घेतली. त्यामुळे भाजपाने जंग जंग पछाडून देखील निवडणूक त्यांना अनुकूल असा धार्मिक रंग घेऊ शकली नाही. नेहमीसारखे मुसलमान अथवा पाकिस्तानची अनाठायी भीती घालणे देखील चालले नाही आणि लोक भर सभेत कांद्यावर बोला असे पंतप्रधान मोदींना सुनावू लागले… फटका तर बसणारच!
– – –

महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांसाठीची मतदान प्रक्रिया २० मे रोजी पूर्ण झाली आणि उमेदवारांसोबत महाराष्ट्राचे व देशाचे भविष्य देखील आता मतपेटीत सीलबंद झाले आहे. महाराष्ट्रातील मतदान जरी पूर्ण झाले असले तरी ह्या सात टप्प्यात विनाकारण लांबवलेल्या निवडणुकीचे शेवटचे दोन टप्पे अजून शिल्लक आहेत. या शेवटच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यात अनुक्रमे ५८ आणि ५७ अशा ११५ जागांवर २५ मे आणि १ जून रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जूनला मतमोजणी होईल आणि त्याच दिवशी निकाल देखील जाहीर होतील. आतापर्यंत ज्या ४२८ जागांवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्याकडे पहाता भारतीय जनता पक्षाचे विद्यमान सरकार, ज्याला मोदी सरकार म्हणायची गोदी मीडियाची पद्धत आहे, त्या सरकारच्या कामगिरीवर मतदारांनी नाराजीचे बटण दाबले आहे, असे म्हणता येईल. अगदी ज्यांनी भाजपाला परत मतदान केले आहे त्यांनी देखील अत्यंत नाईलाजाने ते केल्याचे प्रकर्षाने आढळून येते. मोदी सरकारवर कोणीच फारसे खूष नाहीत आणि म्हणूनच मोदी यावेळेस प्रचारात स्वतःच्या कामगिरीवर न बोलता विरोधकांवर टीका करत फार खालच्या पातळीवर घसरल्याचे दिसले. जनता नाराज झाल्यावर एखाद्या दिग्गज नेत्यालाही किती घाईला आणू शकते, हे यंदा दिसले आहे.
२०२३च्या अखेरीस राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाने निर्विवाद विजय मिळवल्यानंतर २०२४ची लोकसभा भाजपासाठी फारच सोपी ठरणार असे आडाखे मोठमोठ्या तथाकथित राजकीय पंडितांनी मांडले. मात्र ४२८ जागी मतदान झाल्यानंतर आता जी एक गोष्ट जाणवते आहे, ती म्हणजे ही निवडणूक भाजपासाठी सोपी तर अजिबातच नव्हती; पण कदाचित आजवरची कसोटीची आणि प्रचंड दमछाक करणारी निवडणूक ठरली. मतदानात सुरुवातीच्या टप्प्यात निवडणूक हातातून निसटू लागली आहे असे समजल्यावर भाजपाकडून सर्वात आधी मोबाईल कंपन्यांना वेठीस धरले गेले आणि त्या कंपन्यांवर सातत्याने मतदान जागरुकतेचे संदेश पाठवण्याची सक्ती प्रधानमंत्री कार्यालयातून केली गेली, अशी एक कुणकुण ऐकू येते आहे. भाजपा आणि पंतप्रधान मोदी राजकीय संकटात आहेत व त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व मोदीभक्तांनी मतदान करणे फार गरजेचे आहे, असे आवाहन करण्यात येत होते. उमेदवार कसाही असला, अगदी भ्रष्टाचाराने बरबटलेला असला तरी मोदींकडे बघून मत द्या असे आवाहन करण्याची वेळ भाजपावर आली. अनेक भाजपाचे समर्थक अजितदादांच्या पक्षाला व मिंध्यांना मतदान करावे लागल्याने चडफडत होते, पण कट्टर भक्त असल्याने त्यांनी हे पाप देखील माथी घेतले. थोडक्यात भाजपाचे मतदार हे भाजपा व मोदींना वाचवण्यासाठी मतदान करत होते. देशासाठी, प्रगतीसाठी, विकासासाठी ते भाजपाला मतदान करत नव्हते. २०२४ची निवडणूक ही एक मोदी बचाव मोहीम होती. चारशे पारच्या वल्गना करणारा पक्ष कसाबसा बहुमताच्या पार तरी जाता यावे यासाठी धडपडू लागला असेलतर मग अशी स्थिती नक्की काय दर्शवते? एकीकडे भाजपा अवघड परिस्थितीत अडकला असताना त्याउलट काँग्रेस, शिवसेनेसह इंडिया आघाडीमध्ये एक वेगळाच जोष आला होता. महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील कार्यकर्त्यामध्ये, मतदारांमध्ये व नेत्यांमध्ये प्रचंड सकारात्मक उत्साह होता. भाजपाने दरोडा टाकून महाराष्ट्रातील सत्ता व राज्य लूटल्याने एक चीड होती, संताप होता. इथे स्वतःचे काही वाचवण्यासाठी नाही तर मिंधे, गद्दार, भ्रष्ट गाडण्यासाठी मतदार सरसावले होते. संविधानाची रक्षा करण्याची जबाबदारी देखील मतदारांनी स्वतःवर घेतली होती. त्यामुळेच इंडिया आघाडीचे समर्थक जात, पात, धर्म, भाषा, राज्य याच्या पलीकडे जाऊन एकत्र आले. मुसलमान युवकांपासून ज्येष्ठ नागरिकही शिवसेनेची मशाल घेऊन प्रचारफेरीत सहभागी होत होते तर शिवसैनिक काँग्रेसच्या पंजाचा आणि राष्ट्रवादीच्या तुतारीचा घरोघरी जाऊन प्रचार करत होते. शेकाप, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट असे सर्व लहान मोठे पक्ष व कार्यकर्ते एकदिलाने इंडिया उमेदवारासाठी मेहनत घेत होते. एक कप चहाची देखील अपेक्षा न करता हे सर्व होत होते. इंडिया आघाडीत प्रचंड एकजूट दिसून येत होती तर मिंधे, भाजपा, अजितदादा यांच्यात रूसवे, फुगवे व बेबनाव होता. वरवर आलबेल दिसत असले तरी आतून धुसफूस होती.
इंडिया आघाडीच्या मतदारांचा उत्साह असा होता की पक्षाच्या कार्यकर्त्यांची वाट न पाहता स्वतःच मतदार यादीतील नाव शोधून तपासून घेऊन त्यानी मतदानाची तयारी केली होती. अर्थात अशा मतदारांसमोर भाजपाने थैली रिकामी करताना मागे पुढे बघितले नाही. मतदारांना अनेक आमिषे दाखवली गेली तरीदेखील आज महाराष्ट्रात इंडियाचे पारडे जड आहे, कारण महाराष्ट्रातील मतदार हा आमिषाला बळी पडला नाही. अनेक मतदारांनी यावेळेस आपले उन्हाळ्यातील सहलीचे बुकिंग रद्द करून मतदानाला प्राधान्य दिल्याच्या देखील घटना निदर्शनास आल्या आहेत. कधी एकदा मतदानाचा दिवस येतो आणि आपण आपल्या चिन्हासमोरचे बटण दाबतो याचा जो एक उत्साह इंडिया आघाडीच्या मतदारात होता, तो अभूतपूर्व असाच होता. पण समोर धूर्त, कावेबाज आणि धनाढ्य भाजपा असल्याने महाराष्ट्रात सगळेच आलबेल आहे, असे म्हणता येत नाही. मतदानाचा घसरलेला टक्का धक्कादायक आहे.
एकतर महाराष्ट्रातील मतदानाचा टक्का देशात सर्वात कमी झाला आहे आणि याची थेट जबाबदारी राज्य सरकार व निवडणूक आयोगाची आहे. मतदार जागृती म्हणावी तितकी केलेली नाहीच, शिवाय पाच टप्प्यांत थकवणारी रटाळ निवडणुक ठेवायची महाराष्ट्रात तरी गरजच नव्हती. मतदान केंद्रावर पुरेश्या संख्येत ईव्हीएम ठेवून मतदानाचा वेग वाढवणे, मतदार यादीतील घोळ संपवणे, गायब नावाची तक्रार गंभीरपणे घेऊन अशा व्यक्ती मतदानापासून वंचित रहाणार नाहीत हे पाहणे कोणाचे काम आहे? दहा वर्षांत मतदानप्रक्रियेत सुधारणा काहीच झाल्या नाहीत, उलट आधीचीच व्यवस्थाच बरी असे वाटू लागले. मतदान किती झाले याची फक्त टक्केवारी दिल्याने व संपूर्ण आकडेवारी न दिल्याने निवडणूक आयोग वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे आणि आता सर्वोच्च न्यायालयाने देखील याची दखल घेतली आहे. डिजिटल युगात मतदानाची आकडेवारी गोळा करणे इतके अवघड आहे का? त्यासाठी अकरा दिवस का लागतात? महाराष्ट्रातील व देशातील मतदान २०१९पेक्षा वाढण्याऐवजी थोडेफार कमीच झाले आणि ते देशातील सर्वात कमी मतदान झाले हे धक्कादायक आहेच. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात मतदान घटले आहे ज्यात नांदेड (-४.७५ टक्के), मावळ (-४.७२ टक्के), बारामती (-२.३२ टक्के), शिरूर (-५.२८ टक्के), सांगली (-३.६५ टक्के), हिंगोली (-३.३ टक्के), शिर्डी (-१.९ टक्के), रायगड (-१.६६ टक्के), औरंगाबाद (-०.५२ टक्के), बुलढाणा (-१.५७ टक्के), रामटेक (-१.२९ टक्के), नागपूर (-०.६२ टक्के), भंडारा (-१.७७ टक्के), गडचिरोली (-०.४५ टक्के), परभणी (-०.८६ टक्के), धुळे (-०.४४ टक्के), दिंडोरी (-३.०५ टक्के), नाशिक (-२.४३ टक्के), पालघर (-२.५८ टक्के), उत्तर मुंबई (-४.८८ टक्के), उत्तर पूर्व मुंबई (-०.७ टक्के), उत्तर मध्य मुंबई (-२.२६ टक्के), उत्तर पश्चिम मुंबई (-३.४८ टक्के), दक्षिण मुंबई (-३.८९ टक्के), दक्षिण मध्य मुंबई (-३.५२ टक्के) या मतदारसंघांचा समावेश आहे. तर जिथे थोडेफार मतदान वाढले त्यात बीड (४.७५ टक्के), जालना (४.४३ टक्के), पुणे (३.६५ टक्के), सातारा (२.६९ टक्के), नंदूरबार (२.०३ टक्के), जळगाव (१.९२ टक्के), रावेर (२.५१ टक्के), अकोला (१.७३ टक्के), अमरावती (२.९१ टक्के), वर्धा (३.३२ टक्के), चंद्रपूर (२.६६ टक्के), यवतमाळ (१.५६ टक्के), अहमदनगर (१.८२ टक्के), सोलापूर (०.५२ टक्के), रत्नागिरी (०.५३ टक्के), कोल्हापूर (०.७३ टक्के), हातकणंगले (०.५१ टक्के), भिवंडी (३.२१ टक्के), कल्याण (१.७७ टक्के), ठाणे (०.४२ टक्के) या मतदारसंघाचा समावेश आहे.
महाराष्ट्रात निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे आणि सबंध देशाचे येथेच लक्ष लागले होते. येथे खरी लढत ही इंडिया आघाडी विरुद्ध भाजपा व त्यांचे दोन टेकू पक्ष अशीच होती. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, मनसे या पक्षांचा प्रभाव यावेळेस नगण्य होता. भाजपाने जितक्या विद्यमान खासदारांना तिकीटे दिली त्या सर्व खासदारांचे निवडून येणे सोपे नाही, कारण कामेच न केल्याने त्यांच्यावरची नाराजी सर्वत्र दिसून येत होती. मराठा आरक्षण, कांद्याचा तापलेला मुद्दा, बेरोजगारी, संविधान बदलून आरक्षण कायमचे रद्द होण्याची भीती असे अनेक मुद्दे यावेळेस महाराष्ट्रातील निवडणुकीची दिशा ठरवत होते. भाजपाने महाराष्ट्रातील राजकारणात जी माती कालवली त्याचा प्रचंड राग देखील जनतेमध्ये दिसून येत होता.
आणीबाणी नंतरचे वातावरण ढवळून काढणारी चुरशीची निवडणूक असेच २०२४च्या या लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रापुरते तरी वर्णन करावे लागेल. महाराष्ट्रातील जनतेने भाजपाला बहुमतात जाण्यास मदत केली आहे की चारशे व्होल्टचा झटका दिलेला आहे हे ४ जूनला समजेलच.
गेल्या वर्षभरापासून या देशात २०२४ची लोकसभा निवडणूक ही जणू परत मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठीची एक औपचारिकताच आहे, अशीच वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. विरोधक जणू औषधाला देखील दिसणार नाहीत अशी गोदी मीडियाने हवा भरलेली होती. पण भाजपाचे अंतर्गत सर्व्हे मात्र त्यांची अस्वस्थता वाढवू लागले. भाजप सरकारच्या कारभारावर जनता प्रचंड नाराज आहे, हे लक्षात आले तोपर्यंत फार उशीर झाला होता. कामगिरीवर भर देण्याऐवजी अपूर्ण राम मंदिराचे उद्घाटन करून भावनिक मुद्द्यांवर निवडणूक लढवावी असे भाजपाने ठरवले. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करू नये असे संत, महंत व संघाचे मत धुडकावून लावले गेले. सर्वेक्षणाचे आकडे प्रतिकूल आल्याने भाजपाने २०२४ साठी फक्त रामभरोसे जायचे ठरवले. दहा वर्षातील कामगिरीवर मते न मागता ती राम मंदिराच्या भावनिक मुद्द्यावर मागायची तसेच मुसलमानविरोधी वातावरण निर्माण करून २०२४ लोकसभा खिशात टाकायची, असा पंतप्रधान मोदींचा बरेचदा यश मिळवून दिलेला जुना मास्टर प्लॅन अंमलात आणला गेला. २२ जानेवारीला प्रभू श्रीरामांची प्रतिमा छापलेले फॅक्टरी मेड झेंडे देशभर पाठवले गेले ते यासाठीच. Dाादेशाचे गुलाम स्वयंसेवक व भाजपाचे कार्यकर्ते चौकाचौकात, रस्त्याच्या दुतर्फा ही झेंडेबाजी करत होते. यातून थेट भाजपाला मतदान करण्याचा जरी संदेश नव्हता तरी धार्मिक भावनेचा उन्माद वाढवण्याचा हा प्रकार होता. हा उन्माद मतदानापर्यंत टिकला की भाजपा नैय्या पार करेल अशी भाजपाची रणनीती होती. इकडे राजकारण कोळून प्यायलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यानी निवडणूक भावनेकडून मुद्द्यावर वळवण्याची तयारी केली. राहुल गांधींची न्याय यात्रा व त्यातून बेरोजगारी, महागाई व इतर मूलभूत प्रश्नांवर सरकारला घेरले गेले. इलेक्टोरलबॉन्डचा मुद्दा सरकार भ्रष्ट आहे, हे दर्शवू लागला.
सामान्य मतदारांना राममंदिराचे कौतुक होते, पण मग रोजच्या जगण्याशी संबंधित मुद्दे देखीलत्यांना महत्वाचे वाटू लागले. भाजपाची भिस्त ही स्वतःचे संघटन, पैसा, मोदींची लोकप्रियता, राम मंदिर आणि पूर्णपणे रद्द न केलेले कलम ३७० यावर होती, तर इंडिया आघाडी वंचिताना न्याय देण्याची गोष्ट करू लागली. भाजपाकडे अनेक राज्यांत व केंद्रात सरकार हाताशी असल्याने व भावनिक मुद्द्यावर मजबूत मोर्चेबांधणी केलेली असल्याने विजय मिळवण्यासाठी जास्त अनुकूलता होती, हे खरेच होते. पण आता विजय सहज शक्य आहे असे समजून भाजपाची घमेंडखोर चारशेपारची घोषणा आली. इथेच वातावरण बदलू लागले. ही घमेंडखोर घोषणा जनतेला रुचली नाही. भाजपच्या कच्च्या चाणक्यांनी २०२४साठी जी रणनीती आखली, ती तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा निवडणूक ही राजकीय पक्षांमधली सत्तेच्या वर्चस्वासाठी परंपरागत राजकीय डावपेचाने लढवली जाते. २०२४ची निवडणूक तशी झाली असती तर भाजपाची रणनीती बरोबर होती. पण तसे झाले नाही व ध्यानीमनी नसताना यंदाची निवडणूक जनतेने स्वतःच्या प्रश्नांवर स्वतःच हातात घेतली. याचा परिणाम असा झाला की भाजपाने जंग जंग पछाडून देखील निवडणूक त्याना अनुकूलअसा धार्मिक रंग घेऊ शकली नाही. नेहमीसारखे मुसलमान अथवा पाकिस्तानची अनाठायी भीती घालणे देखील चालले नाही आणि लोक भर सभेत कांद्यावर बोला असे पंतप्रधान मोदींना सुनावू लागले. जनता अचानक जगण्याचे खरेखुरे अवघड प्रश्न विचारू लागल्यावर भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली. कोठे पंतप्रधान मोदी आणि कोठे ध्रुव राठी; पण सोशल मीडियावर ध्रुव राठीचे ऐकून लोक मतदान कोणासाठी करायचे ठरवू लागले. भाजपावर हा अनपेक्षित सर्जिकल स्ट्राइकच झाला. चारशेपार दूर दिसू लागले आणि बहुमत देखील अशक्यप्राय वाटू लागले.
आज उत्तर प्रदेशासारख्या राज्यात भाजपाला फटका बसू शकतो, असे म्हटले जात आहे, कर्नाटकात देखील फटका बसेल, दिल्लीत काही जागांवर फटका आहे थोडक्यात ४२८ जागावरील मतदानानंतर भाजपसाठी महाराष्ट्रात झटका आणि देशभरात फटका आहे का हे ४ जूनला समजेल.

Previous Post

प्रबोधनकारांची प्रतिज्ञा

Next Post

अब की बार, नय्या तरी होणार का पार?

Related Posts

कारण राजकारण

पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

May 8, 2025
कारण राजकारण

जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

May 8, 2025
कारण राजकारण

आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

May 5, 2025
कारण राजकारण

(ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

May 5, 2025
Next Post

अब की बार, नय्या तरी होणार का पार?

आमुचा राम राम घ्यावा…

आमुचा राम राम घ्यावा...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.