• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

लढण्यावाचून पर्याय काय?

- निळू दामले (तळ नितळ)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 10, 2024
in भाष्य
0

खारकीव, रशियाच्या हद्दीपासून १९ मैल. १९ एप्रिलची संध्याकाळ. आसमंतात सायरन वाजत आहेत, बाँब किंवा गोळा पडण्याची शक्यता आहे. नागरिक सुरक्षित जागी रवाना झाले. खारकीवपासून दूरवर कुठंतरी तोफ गोळे पडले. सायरन थंड झाला. नागरिक रस्त्यावर आले, आपापल्या कामाला लागले.
चौकात माणसांचा गट गोळा झाला. त्यात नागरिक आहेत, सैनिक आहेत. इराण आणि इस्रायलमधील तणावांवर चर्चा चाललीय.
इराणच्या दूतावासावर इस्रायलनं हल्ला केला. आता इराण इस्रायल युद्ध सुरू होईल. युद्ध सुरू झाल्यावर अमेरिका इस्रायलकडे मदतीचा ओघ सरकवेल. तसं झालं तर आपले वांधे, आपली मदत कमी होईल. इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर इराणचं खूप नुकसान होईल. ड्रोन तयार करण्याची त्यांची क्षमता कमी होईल. तसं झालं तर आपल्यावर हल्ले करणारी इराणी ड्रोन रशियाला मिळणार नाहीत, आपल्याला दिलासा मिळेल. पाहूया काय होतंय.
युक्रेनी नागरिक आणि सैनिक चर्चा करत होते. आणि तिकडं बर्‍याच ओढाताणीनंतर अमेरिकन काँग्रेसनं युक्रेनला मदतीचा हप्ता मंजूर होण्याच्या वाटेवर होता.
लष्करी अधिकारी हताश आहेत. पण लढण्याची इच्छा तसूभरही कमी झालेली नाही.
दूर पल्ल्याची क्षेपणास्त्रं आमच्याजवळ नाहीत, अमेरिका ती देत नाहीये. त्यामुळं रशियन सैनिक दूर असतानाच त्यांना आम्ही रोखू शकत नाही. ते जवळ आल्यावर आम्ही त्यांच्यावर हल्ला करतो. रशियन पाच दहाच्या संख्येनं सैनिकांच्या तुकड्या पाठवतात. त्यांना मारण्यासाठी आम्हाला दूर पल्ल्याची अस्त्रं वापरता येत नाहीत. त्यामुळे रशियन सैनिक जवळ येऊन पोचतात, नुकसान करतात… रशियाकडे ड्रोन नष्ट करणारी यंत्रणा आहे. आमच्याकडं ती नाही. त्यामुळं आमचे ड्रोन रशियन नष्ट करतात… देशभरातून, बाहेरून उत्साहानं नवे युक्रेनी सैनिक इथं पोचतात. परंतु पुढं सरकण्यावर मर्यादा पडतात. तुकडीला पुढं सरकायचं असेल तर तोफखान्याचं संरक्षण मिळायला हवं. तोफांचा मारा करून क्षेत्र निर्धोक केल्यावर पायदळ पुढं सरकतं. पण त्यासाठी लांब पल्ल्याच्या तोफा (आर्टिलरी) हव्यात. त्यांच्या अभावामुळं आमचे सैनिक मरतात. काहीच दिवसांपूर्वी १४ नुकतेच प्रशिक्षित झालेले युक्रेनी सैनिक इथं आले आणि मारले गेले.
रशियन सैनिकांची रणनीती आम्हाला फार घातक ठरतेय. रशिया नुकतेच प्रशिक्षित झालेले किंवा प्रशिक्षण न झालेले तरुण आमच्या प्रदेशावर पाठवते. आम्ही त्यांचा प्रतिकार केला की रशियाला आमची जागा समजते, मग रशियन आमच्यावर हल्ला करतात. हे तरुण सैनिक मरण्यासाठीच पाठवलेले असतात, त्यांनाही कळत नाही की आपण बकरे आहोत. या तरुण सैनिकांच्या मागोमाग रशियन सीनियर सैनिकांची तुकडी असते. तरुण सैनिकांना परत माघारी फिरू न देणं हे या तुकडीचं काम असतं. मागं फिरले तर त्यांना ढोकसून मरायला पाठवलं जातं. तरुण सैनिक मरतात, युक्रेनी सैनिक मारले जातात आणि नंतर सुरक्षित झालेल्या जागी रशियन सैनिक आपला तळ उभारतात…दुसर्‍या महायुद्धात ही रणनीती रशियनांनी विकसित केली.
तिथंच एक साठ वर्षाची महिला आहे. ती पत्रकार, सैनिकांना आपल्या घरात घेऊन जाते.
हे माझं घर. इथंच मी जन्मले, वाढले, अजून शिल्लक आहे. पहा माझ्या अंगणात टुलिप फुलं कशी छान फुललीत. बाहेर पडझड आहे, पण माझी बाग मात्र आश्चर्यकारकरीत्या शिल्लक आहे. टुलिप फुलताहेत तोपर्यंत मी इथेच रहाणार. रस्त्यावर पलिकडे बसेस उभ्या आहेत. मी इथं राहाणं धोक्याचं आहे, मी हे शहर सोडून जावं, शेजारच्या देशात जावं, असं मला सांगत आहेत. पण मी का जाऊ? मी इथलीच आहे आणि इथंच रहाणार आहे, माझं इथं काहीही होवो.
घराच्या खिडकीत सॅशेमध्ये फुलझाडांच्या बिया ठेवल्यात. ते सॅशे हातात घेऊन ती महिला सांगते, मला बिया पेरायच्या आहेत. झाडं वाढवायची आहेत. मी या हातानं वाढवलेल्या स्ट्रॉबेरी मला खायच्या आहेत,
टोमॅटो खायचे आहेत…
वातावरण आणि घर हादरतं. तोफेचे गोळे पडलेले असतात. तिच्या शेजारी तिचा भूभू बसलेला आहे. तो शांत आहे.
हे जे गोळे पडले ना ते रशियन तोफांचे नाहीत, आमच्याच तोफा रशियावर डागल्या त्याचा हा आवाज आहे. आता आम्हाला आवाजावरून गोळे कोणाचे आहे ते कळतं. या माझ्या गोड भूभूलाही ते समजतं. रशियन गोळा असेल तर भूभू अस्वस्थ होतो.
त्या वृद्ध महिलेनं एक छोटीशी बॅग भरून ठेवलीय. स्वत:ला सहज उचलता यावी इतकी ती बॅग हलकी आहे.
आता समजा या घरावरच गोळा पडला तर? घरच नष्ट झालं तर? मग इलाजच रहाणार नाही. त्यासाठी ही बॅग भरून ठेवलीय.
ती महिला पाहुण्यांसाठी चहा करायला लागली.
जे खारकीवमधे तेच थोड्याफार फरकानं कीव या राजधानीच्या शहरात.
पोलंडमधून एक स्वयंसेवक महिला खारकीवमध्ये आलीय. तिनं युक्रेनी जनतेला मदत म्हणून एक बुलडोझर आणलाय. लोकांनी आपापल्या खिशातले पैसे खर्च करून ही देणगी युक्रेनला दिलीय.
खरं म्हणजे युक्रेनला दूर पल्ल्याची बाँबफेक करणारी विमानं आणि दूर पल्ल्याच्या तोफा हव्या आहेत. ती सामग्री त्यांना ना युरोपियन देश देत आहेत, ना अमेरिका. सर्वजण सतत म्हणतात की आपण शेवटपर्यंत युक्रेनला मदत करू पण शस्त्रं मात्र पुरेशी पुरवत नाहीयेत. गेला आठवडाभर अमेरिकेच्या काँग्रेसमधे युक्रेनला शस्त्र-आर्थिक मदत पुरवण्यावर चर्चा चालली होती. अध्यक्ष बायडन यांचा काही अब्ज डॉलर पाठवण्याचा प्रस्ताव आहे. परंतु काँग्रेसमध्ये रिपब्लिकन पक्षाचं बहुमत असल्यानं त्यांनी ही मदत रोखून धरलीय.
पोलिश नागरिकांनी पैसे गोळा करून बुलडोझर पाठवलेत. हे बुलडोझर खंदक खणायला मदत करतात. याचा अर्थ असा की रशियात घुसून रशियाला थोपवणं युक्रेनला जमत नाहीये, खंदक खणून बचावाची लढाई करणं येवढंच युक्रेनच्या हाती उरलंय.
कीवमधला फ्रीडम चौक, एक ऐतिहासिक चौक. गेल्या शंभर वर्षात अनेक उलथापालथी झाल्या तेव्हां या चौकात सभा होत, लोक मिरवणुका काढून या चौकात जमत.
चौकाच्या चारही बाजूंना उद्ध्वस्त इमारती दिसतात.
कालच संध्याकाळी रशियन बाँबर्सनी कीवमधल्या वीजनिर्मिती केंद्रावर हल्ला केलाय, केंद्र नष्ट झालंय. या केंद्रातून काही विभागांना वीज मिळत होती, ती केंद्रं आता वीजहीन झालीत. वर्षभर सतत बाँबिंग होत असूनही कीव अजून शिल्लक आहे.
उद्ध्वस्त इमारतीच्या तळघरात शाळा भरतात. उद्ध्वस्त इमारतीतही एखादं दुकान शिल्लक असतं, तिथं नागरिक खरेदी करतात. सरकार, परदेशी संस्था शहराला पाणी, अन्नपदार्थ पुरवतात.
सायरन वाजतो. पटापट माणसं आडोशाला जातात, तळघरात जातात. उद्ध्वस्त रस्ते निर्मनुष्य होतात. शेलिंग होतं. आधीच पडलेल्या किंवा अजूनही उभ्या असलेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यांवर गोळे पडतात. सायरन मुका होतो. मिनिटाभराचा ब्रेक आणि माणसं पटापट मुंग्या वारुळातून बाहेर पडाव्यात तशी बाहेर पडतात. बंबवाले आग विझवायच्या कामी लागतात. माणसं दुकानांकडे वस्तू विकायला रवाना होतात.
एक शिल्पकार आहे. तो ओडेसा या शहरातून कीवमधे आलाय, पडेल ते काम करायला. शेलिंग आणि बाँबिंगचे दणके संपले की तो मुलं, नागरिक यांना शिकवतो. कला आणि राजकारण या विषयावर तो लेक्चर देतो.
खरं म्हणजे या मध्यमवयीन माणसानं देश सोडून जायला हवं होतं. पण तो हलायला तयार नाही.
`मला पत्रकार विचारतात की येवढं बळ, येवढं मनोधैर्य तुमच्याकडे कुठून आलं, सैनिकांकडे कुठून आलं? मग मी त्यांना सांगतो की लढण्यावाचून आम्हाला पर्याय उरलेला नाही. हेच आमच्या चिकाटीचं सिक्रेट आहे.’
रशियानं युक्रेनवर सुरू केलेल्या आक्रमणाला, युद्धाला आता सव्वादोन वर्षं होत आहेत. लष्करी ताकदीच्या हिशोबात रशिया युक्रेनच्या तुलनेत कितीतरी पटीनं जास्त बलाढ्य आहे. युरोप-अमेरिकेनं मदत दिली नाही तर युक्रेन किड्यासारखं चिरडलं जाईल.
युरोप-अमेरिका युक्रेनला मर्यादित लष्करी मदत देतंय. युक्रेननं शस्त्रबळावर रशियावर आक्रमण केलं तर जागतिक युद्ध भडकेल अशी भीती युरोप आणि अमेरिकेला वाटते. अमेरिका-युरोप युक्रेनला आक्रमण करण्याएवढी सामग्री देत नाहीये, केवळ बचावापुरतीच युद्धसामग्री पुरवतंय. कधीतरी रशिया थकेल ही अमेरिका युरोपची रणनीती दिसतेय.
अमेरिकेनं ६१ अब्ज डॉलरची मदत द्यायचं ठरवलं होतं. पण गेले चारेक महिने अमेरिकेतल्या राजकारणानं ती मदत थांबवली. रिपब्लिकन पक्षातला ट्रम्पवादी गट युक्रेनला मदत देण्याच्या विरोधात होता. पण काँग्रेसमधील काही रिपब्लिकन फुटले, त्यांनी मदतीला मान्यता दिली आणि एप्रिलच्या शेवटल्या आठवड्यात काँग्रेसनं मदत मंजूर केली. ही मदत पुरेशी नाही. या मदतीवर युक्रेन रशियाला हरवू शकणार नाही. पण निदान रशियाची दौड युक्रेन रोखू शकेल.

Previous Post

धोबीघाट आणि सफाईचं कंत्राट!

Next Post

त्यांचं काय चुकलं?

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
भाष्य

स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

May 8, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 5, 2025
Next Post

त्यांचं काय चुकलं?

बाळासाहेबांचे फटकारे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.