• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

नाय, नो, नेव्हर…

- संतोष पवार

Nitin Phanse by Nitin Phanse
April 12, 2024
in भाष्य
0

दक्षिणेतल्या किंवा इतर प्रादेशिक सिनेमांच्या नायकांप्रमाणे मराठी सिनेमांतल्या अभिनेत्यांना स्टार सुपरस्टारचा दर्जा का नाही मिळत कधी?
– रेवणनाथ पारपल्लीवार, सावली
कारण दक्षिणेकडचे किंवा इतर प्रदेशातले प्रेक्षक मराठी सिनेमा बघत नाही.. म्हणून मराठी अभिनेत्यांना सुपरस्टारचा दर्जा मिळत नाही (आणि मराठी प्रेक्षक दक्षिणेच्या इतर प्रादेशिक चित्रपटातील कलाकारांना स्टार बनवण्यात बिझी असल्याने त्यांच्याकडून मराठी अभिनेत्यांना स्टारचा दर्जा मिळण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. बिचार्‍या मराठी प्रेक्षकांनी काय काय करायचं?..) मराठी कलाकार तरी दुसर्‍या मराठी कलाकाराला कुठे स्टार समजतात? (कलाकार किती मोठा आणि महान असला तरी ते त्याला आपला लंगोटी यार किंवा काका ‘मामा’ समजतात..)

मराठी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनाच अनुदान देण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते?
– मनीषा इंगळे, धुळे
छान कल्पना आहे. कोणी मराठी चित्रपटाच्या विरोधात बोललं, तर अनुदान घेणारे ‘मायबाप’ प्रेक्षक, विरोधात बोलणार्‍याची ‘आय-माय’ काढतील आणि एखादा मराठी चित्रपट अगदीच टुकार असला तरी तो चालवण्यासाठी मोहीम चालवतील. किंवा तो चित्रपट फ्लॉप झाला तरी हिट झाला म्हणून बोंबाबोंब करतील.

एप्रिल फूल नुकताच साजरा झाला. तुम्हाला कधी कोणी मूर्ख बनवलं आहे का? आणि तुम्ही कुणाला?
– परवेझ शेख, मिरा रोड
(तुम्ही विचारलंत म्हणून माझा मूर्खपणा सांगतोय. प्लीज आपल्यातच ठेवा). मला २०१४ साली मूर्ख बनवले गेले (कोणी? असा मूर्खासारखा प्रश्न विचारू नका.. तुम्ही विचारलंत तरी कोणी मूर्ख बनवलं हे सांगण्याचा मूर्खपणा मी करणार नाही. (महत्त्वाचं म्हणजे मला मूर्ख बनवण्याचा आणि राजकारणाचा संबंध जोडण्याचा मूर्खपणा करू नका). मी मात्र कधीच कोणाला मूर्ख बनवू शकलो नाही, कारण तेवढा मी शहाणा नाही.

सकाळच्या वेळेला ग्रामीण भागात ‘रामाच्या पारी’ म्हणतात, शुद्ध मराठीत ‘रामप्रहर’ म्हणतात; दुपारच्या वेळेला काय म्हणतात आणि संध्याकाळच्या वेळेला काय म्हणावं?
– रेवणनाथ शिंदगी, नेवासे
हे कळल्याने आपला ‘दोन वेळचा’ प्रश्न सुटणार आहे का? आपल्यासारख्यांना राम राम करताना कामधाम पण करावं लागतं (तरी तुमचा हाच प्रश्न असेल तर दुपारच्या वेळेला ‘राम मध्यान’ म्हणा आणि संध्याकाळला ‘रामकाळ’ म्हणा… फक्त कोणाला ‘हे राम’ बोलायला लावू नका… ‘जय राम श्रीराम’ तर अजिबात बोलू नका.. ते लोक बोलतीलच.. ‘योग्य वेळी’)

एक उमेदवार तुम्हाला देवदर्शन घडवणार आहे, दुसरा तुम्हाला रोख रक्कम देतो आहे, तिसरा तुम्हाला घरगुती वापराची वस्तू वाटतो आहे आणि चौथा संसदेत देशाच्या हिताचे प्रश्न मांडण्यास, चर्चा करण्यास सक्षम उमेदवार आहे. तर तुम्ही कोणाला मत द्याल?
– इरगोंडा जैन, अकोले
आधी सांगा, मतदान पेपरवर करायचंय की मशीनवर करायचंय?… मग ठरवतो. कसंय, एरवी आपल्या मताला कोणी मोजत नाही (असं मला वाटतं) पण तुम्ही विचारताय म्हणून जरा भाव खातोय.

हल्ली कोकणात कुणी भुतांच्या गोष्टी सांगत नाही, देवचारांच्या गोष्टी सांगत नाही; कोकणातले मुंजे, हडळी, साती आसरा वगैरे गेले कुठे?
– अमोल सोनावणे, हुक्केरी
कोकणातलं सगळं कोकणातच आहे. आपण कोकण सोडून शहरात आलोय. चित्रपट आणि सिरीयलमध्ये भुताबितांच्या गोष्टी बघायला मिळत असताना, कोकणातल्या गोष्टींना कोण विचारतंय? (गावाकडे काजळ आंबा सडून जातो.. शहरात आम्ही विकत घेऊन खातो.. इतकी कर्म’श्रीमंत’ आहोत आम्ही कोकणी माणसं!)

हल्ली ९० टक्के मराठी सिनेमे महाराष्ट्रापेक्षा लंडनमध्येच अधिक चित्रित होतात, काही कलावंत, तंत्रज्ञ तिकडेच स्थायिक झालेत म्हणे! आता मराठी प्रेक्षकांना कधी नेतायत तिकडे कायमचे राहायला?
– श्रीनिवास भेगडे, भोकरदन
लंडनचे नाव भोकरदन झालं की लगेच!

Previous Post

कृतघ्नतेला माफी नाही!

Next Post

मुंबई महाराष्ट्राचीच!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
भाष्य

स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

May 8, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 5, 2025
Next Post

मुंबई महाराष्ट्राचीच!

तुम्ही कोणत्या हिंदूंचे नेते आहात?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.