• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

व्यावसायिक यशाचे फॅब्रिकेशन!

- निलेश अभंग (सेवा परमो धर्म:)

Nitin Phanse by Nitin Phanse
April 2, 2024
in भाष्य
0

गेल्या दोन दशकांत कामाच्या, नोकरीच्या शोधात, व्यवसायासाठी ग्रामीण भागातील तरुणांचे शहराकडे स्थलांतर लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. बरेच तरुण शहरांत जाऊन नशीब आजमावत आहेत. अनेकांना यश मिळते, अनेक टिकून राहतात, रोजगाराचा प्रश्न मिटवतात, कुटुंबाला आधार देतात. मात्र त्यांना कुटुंबापासून दूर राहून, आपल्या सपोर्ट सिस्टमचा त्याग करत शहरांत जाऊन करिअर घडवावे लागते. शिवाय पालकांना, कुटुंबालाही या तरुण मुलांचा आधार होत असतो, जो त्यांच्या शहरांतील स्थलांतरामुळे गमावावा लागतो.
शरद धाडगे, एक असाच तरुण, आता वय अवघे तीस वर्षे, रा. नजीक चिंचोली, ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर. सहा-सात वर्षांपूर्वी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे आयटीआय करत छत्रपती संभाजीनगर शहरात काम म्हणजे नोकरी करायला गेला. आयटीआयचे शिक्षण घेतले असल्यामुळे तिथे एमआयडीसी एरियातील कंपनीत वाहनांच्या गिअर बनवणार्‍या फॅक्टरीत कामाला लागला. कामात हुशार, चपळ, अंगापिंडाने दणकट असलेले शरद तिथे व्यवस्थित काम करू लागले. तिथे शरद यांनी काम कसे चालते, फॅक्टरीमध्ये काम कसे पार पडते, माणसे कशी कामावर घेतली जातात, त्यांना जबाबदार्‍या कशा वाटून दिल्या जातात, त्यांच्याकडून काम कसे करवून घेतले जाते, इत्यादी बाबी निरीक्षणातून समजून घेतल्या, आपसूकच शिकायला मिळाल्या.
संभाजीनगर येथील काम व्यवस्थित चालू होते. पगारही बरा मिळत होता. आईवडील घरची तीन-चार एकर शेती करीत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी तोळामासाच होती, मात्र शरद नोकरीला लागल्यामुळे घरच्यांना बर्‍यापैकी हातभार लागू लागला. पंधरा-वीस वर्षांपासून नगर जिल्ह्यातील बरीचशी शेतकरी पालक मंडळी मुलांचे शिक्षण आटोपले की त्याला शहरात रोजगारासाठी जाण्यास सांगतात, त्यासाठी त्यांची आवश्यक तो त्याग करण्याची तयारी असते. शरद यांच्या आईवडिलांनीही तेच केले अन् शरद यांना संभाजीनगरला नोकरीला पाठवले. त्यांनीही तिथे दोनेक वर्षे नीट काम केले. या तरुणाची वयाच्या विशीत ही धडपड सुरू होती. मात्र आपण एक नियोजन करत असतो आणि जीवन आपल्याबाबतीत भलतेच नियोजन करत असते, ज्याचा आपल्याला अंदाजही नसतो, ज्याचा आपण स्वप्नातही विचार केलेला नसतो.
शरद यांच्या आईला २०१४ साली दिवाळीला `स्तनाचा कॅन्सर’ ह्या आजाराचे निदान झाले.
कॅन्सरचे निदान झाल्यामुळे कुटुंबातील सारेच सदस्य धास्तावले. त्यामुळे शरद यांना संभाजीनगरची नोकरी सोडून आईच्या इलाजासाठी गावी माघारी यावे लागले. संभाजीनगरची साथ तशी सुटली नाही, आईच्या इलाजासाठी त्यांना गावाहून तिकडेच जावे लागे. मात्र आता गावीच रोजगाराचे साधन उभे करणे गरजेचे वाटू लागले, जेणेकरून आईकडेही लक्ष देता येईल. आणि त्या गरजेतून शरद यांनी विविध रोजंदारीची कामे, गावातील, आजूबाजूच्या गावातील शेतीसंबंधित पडतील ती कामे करायला सुरुवात केली.
त्यात ऊस लागवड करणे, सेंट्रिंगचे काम (स्लॅब घेण्याआधी पूर्वतयारी म्हणून करावे लागणारे काम), शेततळ्यांची फिनिशिंग करून देणे, त्यात असलेले खडे काढून त्याला व्यवस्थित आकार देणे- जेणेकरून त्यावर अंथरणार असलेले ताडपत्री अणकुचीदार खड्यांनी फाटणार नाही, शिवाय मजूर म्हणून रस्त्याची कामे केली, रस्त्यावर खडी पसरवणे, डांबर मारणे अशी अनेक कामे शरद यांनी केली.
नोकरी सोडल्यानंतर कॅन्सर झालेल्या आईला सांभाळत, तिच्यावर हॉस्पिटलमध्ये इलाज करत एवढ्याशा वयात अशी अनेकानेक कामे करण्याचा प्रसंग शरद यांच्यावर आला. आयटीआयमध्ये फॅब्रिकेशनचा ट्रेड घेतल्यामुळे शरद यांना वेल्डिंगची कामे करता येत होती. शिवाय संभाजीनगर येथे नोकरी करताना कामाचा सरावही झाला होता. त्यामुळे त्यांनी २०१८ साली `ओम साई फॅब्रिकेशन अँड वेल्डिंग वर्क’ ह्या नावाने आपल्या गावातच व्यवसाय सुरू केला. शहरांत गेलेला तरुण आता आपल्या गावातच रोजगाराचे साधन उभे करू पाहत होता. शरद शेततळे फिनिशिंगचे काम करत होतेच. त्यात फिनिशिंग करून त्यावर कापड अंथरल्यानंतर त्या शेततळ्याला लोखंडी कंपाऊंड करावे लागत असल्याचे पाहिले होते.
मग त्यांनी शेततळ्याला कंपाऊंड करण्याचे काम घेतले, व्यवस्थित लोखंडी अँगल रोवून, जाळी लावून कंपाऊंड बांधू लागले. त्यासाठी लागणार्‍या लहानमोठ्या मशिन्स कर्जपाणी घेत बाजारातून विकत आणल्या. कामाचा दर्जा उत्तम राखल्यामुळे, ठरलेल्या वेळेत काम संपवल्यामुळे शेततळी बनवून घेणारे शेतकरी शरद यांच्याशी कंपाऊंड बांधणीसाठी संपर्क करू लागले. त्यांच्या कामाची मजबूती पाहून, काम पाहिल्यानंतर त्या त्या गावातील लोक सबंधित शेतकर्‍याला विचारू लागले की हे काम कुणी केले, खूप चांगले काम केले आहे, आम्हालाही आमच्या शेततळ्याला कंपाऊंड घालायचे आहे, शरद यांचा मोबाईल नंबर द्या. अशी एकाला एक कडी जोडली जात शरद यांना शेततळे कंपाऊंडची कामे मिळू लागली. आधीच अनेक कामे केलेली असल्यामुळे संभाव्य ग्राहकांपर्यंत आपला व्यवसाय नेण्यास फार वेळ लागला नाही.
त्यांनी ह्या कामासाठी उत्तम टीम बनवली, गावी टीमला टोळी असे म्हणतात. म्हणजे उत्तम टोळी बनवली. कॉन्ट्रॅक्टवर काम घेण्याला `उक्तं घेणे’ म्हणतात. यालाच प्रमाण भाषेत `ठेका घेणे’, `कंत्राट घेणे’ असे वाक्प्रचार रूढ आहेत.
ग्रामीण भागात एक उत्तम उत्पन्न देणारा व्यवसाय उभा करणे तसे आव्हानात्मकच असते, मात्र संधी शोधता आल्या पाहिजेत, ज्या शरद यांनी शोधल्या. ते केवळ शेततळ्याला कुंपण घालण्यापुरते मर्यादित राहिले नाहीत, तर शेतकर्‍यांच्या गुरांसाठी पत्र्याचे शेड बांधणे, मुक्त गोठा बनवून देणे, कांद्याच्या चाळी बांधून देणे, शेतीला कंपाऊंड बांधून देणे, ट्रॅक्टरला जोडलेले, नादुरुस्त झालेले नांगर दुरुस्त करून देणे, ऊसतोडीला आलेल्या बैलगाड्यांचे वेल्डिंगचे काम करून देणे असे आणि याशिवायही अनेक कामे शरद आणि त्यांची टोळी करू लागली.
रास्त दरात उत्तम काम करत असल्यामुळे आजूबाजूच्या गावांतून कामे येऊ लागली. आणि `ओम साई फॅब्रिकेशन आणि वेल्डिंग वर्क्स’ची कीर्ती वाढू लागली. पैशाला पैसा जोडत गेल्यामुळे मोठमोठी कामे घेण्यासाठी धाडस आले. कुठलेही व्यसन नसल्यामुळे पैसा मागे पडू लागला. कामगारांना वेळेत देणे अदा केल्यामुळे माणसे खुशीने कामाला येऊ लागली. त्यामुळे मनुष्यबळाची अडचण राहिली नाही.
त्यांनी कामातही केवळ आपल्याच गावात काम करायचे वा आजूबाजूच्या दोन-चार गावांतच काम करायचे असे स्वत:ला बंधन घालून घेतले नाही. पार दोन-दोनशे किलोमीटर दूरवर जाऊन कामे केली आहेत, अजूनही करत आहेत. नेवासा, शिर्डी, गंगापूर, पैठण, शेवगाव, अहमदनगर, पाथर्डी, पुणे, शिक्रापूर इथपर्यंत काम करत आहेत, त्यांनी तसे कामगारांचे आणि ग्राहकांचे जाळे उभारले आहे. बरीचशी कामे, ज्यांचे आधी काम केले आहे, त्यांच्या ओळखीने मिळतात.
तसेच ग्रामीण भागातील कामाच्या सरकारी निविदा घेणारे कंत्राटदार यांची वेल्डिंग वर्क्सशी सबंधित कामे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत करून देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काम मिळते.
व्यवसायाच्या जाहिरातीसाठी काय करता असे विचारले असता, त्यांनी सांगितले की व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो आणि लहान लहान व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर अपलोड करतो. तिथून काही संभाव्य ग्राहक संपर्क करतात, चौकशी करतात. शिवाय त्यांच्या कामाने संतुष्ट झालेले ग्राहक इतरांना त्यांचे रेफरन्स देतात. शेवटी उत्तम काम केले की ग्राहक मिळत राहतात, असे शरद यांचे म्हणणे आहे.
आता त्यांच्याकडे कामाचा ओघ आहे, टीम बनली आहे, उत्तम सहकारी लाभले आहेत, लोकांपर्यंत काम पोहोचले आहे. शिवाय नवीन वेल्डिंग वर्क्स, फॅब्रिकेशन क्षेत्रात आलेले नवनवीन तंत्रज्ञान विकत घेत कामाचा दर्जा आणखी उंचवायचा आहे, विविध अद्ययावत मशीनरीज मार्केटमध्ये आल्या आहेत, त्यांचा अधिकाधिक उपयोग करत शेतकर्‍यांचे काम हलके करायचे आहे.
सोसायटीचे चेअरमन अशोक विधाटे यांचा शंभर गायींचा गोठा शरद यांच्या कंपनीने बांधून दिला आहे. ह्या गोठ्याचे काम पाहून आणखी पशुपालक शेतकरी त्यांना संपर्क करू लागले आहेत. पन्नास शंभर जनावरांचा मुक्त गोठा बांधून देणे हे काम शरद यांची टीम लीलया करते.
ग्रामीण भागात व्यवसाय होऊ शकतो, लोकांची गरज ओळखून त्यांच्या गरजांची पूर्तता केली तर कुठेच कामाची कमी नाहीये, व्यवसाय उत्तम पद्धतीने, व्यावसायिकतेचे नियम पाळून केला तर लोक विश्वास ठेवतात, हे शरद यांनी दाखवून दिले आहे.
शरद यांच्या ह्या प्रवासात त्यांचे वडील मोहन त्र्यंबक धाडगे यांची विशेष मदत झाली आहे. त्यांच्या सहकार्यामुळे, ते घरच्या शेतीची जबाबदारी पार पाडत असल्यामुळे शरद यांना गावोगावची कामे घेता येतात, कामानिमित्त बाहेर फिरता येते. शिवाय त्यांची पत्नी पल्लवी धाडगे लागले सवरले सारे पाहत असल्यामुळे घरातील लहान मोठ्या कामांतून, जबाबदारीतून मुक्त झाले आहेत. आणि चुलत बंधू देवीचंद मल्हारी धाडगे यांच्या सहकार्याशिवाय हा व्यवसाय उभा करणे शक्यच नव्हते, असे शरद सांगतात. देवीचंद शरद यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत आणि अजूनही त्यांना सोबत करत आहेत. सारी टीम सांभाळणारे देवीचंद जिथे शरद यांना जाणे शक्य नाही तिथे जाणार आणि काम फत्ते करून येणार, साईटवर उभे राहून काम करणार आणि कामगारांकडून काम करवून घेणार, अशी त्यांची ख्याती आहे.
उत्तम सहकारी, कुटुंबातील मंडळी, कामगार बंधू यांचे मदतीशिवाय शरद हे काहीच करू शकले नसते, करू शकत नाही, त्यांचे ग्राहक, हितचिंतक यांच्या प्रेमामुळे, ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे शरद हा व्यवसाय उभा करू शकले, असे ते सांगतात. `मी माझ्या ह्या थोड्याबहुत यशाचे श्रेय ह्या माझ्या सहकार्‍यांना देतो,’ असे शरद यांचे म्हणणे आहे.
कित्येक प्रकारचे लहान सहान कामे करत करत, अवघ्या दहा वर्षापूर्वी पार रस्त्यावर डांबर मारण्याचे काम करणारा हा युवक आज नेवासा तालुक्यात फॅब्रिकेशन क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. या सगळ्या यशाच्या जोडीला एक फार मोठा आनंदही त्यांना लाभला आहे… त्याची बरोबरी कोणत्याही यशाने करता येणार नाही, असा तो अनमोल आनंद आहे… ज्या आईच्या कॅन्सरमुळे शरद यांनी शहर सोडून गावाची वाट धरली, ती आई त्या आजारातून खडखडीत बरी होऊन आजही शरद यांच्यावर मायेची सावली धरून आहे!

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

नाव ठेवायला जागा नाही…

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
भाष्य

स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

May 8, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 5, 2025
Next Post

नाव ठेवायला जागा नाही...

मूकपट ते चित्रपट : एक दीर्घ प्रवासी बाबुराव पेंढारकर

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.