□ मुंबईच्या ठेवींवर मिंध्यांचा दरोडा; ठेवी मोडून एमएमआरडीएला मेट्रोसाठी दिले एक हजार कोटी.
■ मुंबईतच नव्हे, देशात सगळीकडे चाललेली लाखो कोटींची तथाकथित विकासकामं हा सरकारचा पैसा ठेकेदारांमार्फत सत्ताधार्यांच्या खिशात वळवण्याचा मोठा घोटाळा आहे, अशी शंका येण्यासारखा वेग आहे तथाकथित विकासाचा!
□ विकासकामांच्या निधीवाटपात मिंधेंची मनमानीच! हायकोर्टाने ओढले ताशेरे.
■ आम्हाला मतं द्याल, तरच तुमची कामं होतील, अशी सुरी जनतेच्या मानेवर ठेवण्याचाच प्रकार आहे हा!
□ मुंबई पालिकेविरुद्ध अवमान कारवाई का करू नये? वांद्रे स्कायवॉकच्या रखडपट्टीवर उच्च न्यायालयाचा संताप.
■ न्यायालयं आपलं काय वाकडं करू शकतील असा उर्मट बाणा दिल्लीपासून गल्लीपर्यंत पसरला आहे सगळ्याच सत्ताधार्यांमध्ये.
□ एअर इंडियाची मनमानी; लेबर कोर्टात खटला सुरू असतानाही कर्मचार्यांना दिली सक्तीने व्हीआरएस.
■ यांचा काही भरवसा नाही, विमान हवेत असताना उतरवूनही देतील एखाद्याला.
□ नाराज हर्षवर्धन पाटलांसमोर फडणवीसांचे घालीन लोटांगण; मनधरणीचे प्रयत्न.
■ स्वबळावर किती लोक निवडून येतील याचं भान आहे त्यांना, त्यामुळे ज्यांना मूळ पक्षातही फारशी किंमत नव्हती, त्यांच्या नाकदुर्या काढण्याची वेळ येते.
□ शरद पवारांच्या पाठिशी महाराष्ट्र उभा राहील – सरोज पाटील
■ अजितदादांना हे मे महिन्यात कळेलच!
□ अजित पवारांनी अंधभक्तांनाही लाजवले; म्हणे, मोदी ही दैवी शक्ती…
■ त्यांची चेष्टा करू नका, मजबुरी समजून घ्या… चक्की पीसिंग अँड पीसिंगचं भय दाखवल्यावर कोणाच्याही डोळ्यांसमोर दैवी शक्ती चमकून जातेच!
□ बिहारमध्ये चिराग पासवान काकांविरुद्ध निवडणूक लढवणार.
■ घरभेद्यांना आणखी उरावर घ्या. यादवीची परंपरा चालू ठेवा!
□ भाजपच्या केंद्रीय मंत्र्यावर निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश.
■ बैल गेला आणि झोपा केला… उपयोग काय?
□ जागावाटपात एकमत नाही; म्हणून भाजप-जेजेपीची युती तुटली – दुष्यंत चौटाला.
■ तुमचा घास घेतला जात होता तेवढ्यात बाहेर पडलात, नशीब समजा!
□ मतदार जनजागृतीसाठी रायगडात विद्यार्थ्यांना जुंपणार.
■ विद्यार्थ्यांच्या मनात मतदान, निवडणूक यांच्याबद्दल कोवळ्या वयात नफरत निर्माण करण्यातच यशस्वी होतील हे उद्योग!
□ अलिबाग बस स्थानकाची नवी इमारत लालफितीत; साडेचार वर्षे उलटूनही इंचभर काम नाही.
■ साडेचारशे वर्षांत होईल बांधून, घाई काय आहे इतकी!
□ ठाण्यातही भाजपचे बंड; एकमुखी ठराव; मिंध्यांच्या उमेदवाराचा प्रचार नाही.
■ एकमेव दुकान बंद करायला सुरुवात झाली तर कायमचं! इथून पलीकडे ओळख काय आहे?
□ ईडीच्या आडून भाजपचा शिखंडी डाव; नाट्यमय घडामोडींत मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक.
■ जब गीदड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है, असं म्हणतात… भाजपला प्रचार सुरू होण्याच्या आधीच पराभव दिसू लागला की काय?
□ भाजपात गृहकलह; फडणवीसांच्या घरासमोर नाराजांचा जनसागर.
■ दुसर्यांसाठी खड्डे खणणारा कधी ना कधी त्या खड्ड्यांमध्ये पडतोच!
□ कोरोना काळात बॉडी बॅग घोटाळा झाला म्हणता, पुरावा कुठे आहे? हायकोर्टाचा पोलिसांना सवाल.
■ पुरावा काय करायचाय? पोलिसांनी गुन्हा दाखल केला, तो कुछ सोचके ही किया होगा ना!
□ सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर एसबीआय वठणीवर.
■ इतक्या सर्वोच्च थोबाडीत खाण्याची वेळ येण्याइतकी लाचारी का करावी पण सत्ताधीशांची!
□ दंगल उसळवण्याचा भाजपचा कट हायकोर्टाच्या रडारवर.
■ निवडणूक जिंकण्याचे बाकी मार्ग खुंटत चालले आहेत… आता एवढंच होऊ शकतं….
□ मोदी सरकारच्या व्हॉट्सअप प्रचारावर निवडणूक आयोगाची बंदी.
■ विकसित भारताच्या बंडलबाजीला चाप लागणार तर… वात आणला होता त्यांनी व्हॉट्सअपवर!
□ शिमग्याआधीच बोंबाबोंब; भाईंदरमध्ये भाजपच्या दोन गटांत तुफान हाणामारी.
■ अजून विधानसभा निवडणुकांची तुरी बाजारात आहे, इथे यांची मारामारी सुरूही झाली…
□ भाजपच्या छुप्या प्रचाराबद्दल काँग्रेसची आयोगाकडे तक्रार.
■ ते उघडपणे सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत, आयोग त्याला काही करत नाही; छुप्या प्रचाराला काय अटकाव करणार?