पत्नी नोकरीसाठी दुबईला गेल्याच्या रागातून पतीने तिला फोनवरून ‘तलाक’ दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांत पतीविरोधात तिहेरी तलाकबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम दिन शहा (वय 32, मूळ रा. जम्मू कश्मीर, हल्ली रा. जोगेश्वरी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.
गुलाम दिन शहा याची पत्नी नोकरी करण्याकरिता दुबई येथे गेली होती. 14 नोव्हेंबर रोजी त्याची पत्नी परत आली. त्यावेळी त्याने पत्नीला फोन करून ‘तू हिंदुस्थानात आली का? माझे तुझ्यासोबत आणि मुलीसोबत कोणतेही नाते नाही. मला तुझ्यासोबत कोणताही संबंध ठेवायचा नाही,’ असे सांगून ‘तलाक, तलाक, तलाक’ म्हणत त्याने फोन बंद करून टाकला.
त्यामुळे गुलाम शहा याच्या पत्नीने भिंगार कॅम्प पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी तिहेरी तलाकबंदी कायद्याअन्वये गुलाम शहा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सौजन्य : दैनिक सामना