• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

विश्वचषकाचं शल्य!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
October 5, 2023
in फ्री हिट
0

एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. अहमदाबादला होणार्‍या सलामीच्या सामन्यासाठी विश्वचषक स्थानापन्न झाला आहे. पण नेमक्या याच क्षणी तो चिंतेत आहे. एकदिवसीय क्रिकेट प्रकाराचं स्थान धोक्यात असल्याचं शल्य तो लपवू शकला नाही…. पाहूया काय आहेत त्याच्या व्यथा…
– – –

आज विश्वचषकाच्या तेराव्या पर्वाला प्रारंभ होतोय… या सुखद क्षणी मी, म्हणजे विजेत्यांच्या हाती विसावणार्‍या विश्वचषकानं आनंदानं बेभान व्हायला हवं, मला जिंकण्यासाठीच तर मैदानात उतरणार आहेत ना सर्व अतिरथी महारथी; पण आनंदाऐवजी ही विषण्णता का जाणवतेय?…
क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे एकदिवसीय क्रिकेट. यातील सर्वोत्तमतेची पोचपावती म्हणजे विश्वचषक. दर चार वर्षांनी होणारा हा जागतिक उत्सव अखंडपणे सुरू आहे. माझा रूबाब, माझं महत्त्व आणि माहात्म्य अपरंपार. पण तरीही या उत्सवी उत्साहात ही कारुण्याची छाया कशासाठी? बाणांच्या शय्येवरील भीष्माचार्यांप्रमाणे मला आता हताश आणि असहाय वाटतंय… कारण एकदिवसीय क्रिकेटला लोक कंटाळलेत. क्रिकेटरसिकांना आठ तासांची दीर्घ रंगत पाहण्याची उसंत नाही. साडेतीन तासांच्या ट्वेन्टी-२० सामन्यात ते रमू लागलेत. टेन-१० आणि ‘द हंड्रेड’ या मर्यादित षटकांच्या क्रिकेटच्या आणखी लघुरूपांचे प्रयोगही सुरू झालेत. मग एकदिवसीय क्रिकेट पाहाण्यात कुणाला असेल रस? मग एकदिवसीय विश्वचषकाचे तरी काय असणाराय कोडकौतुक?
७ जून, १९७५ हा दिवस दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषकाला या दिवशी लॉर्ड्सवर प्रारंभ झाला. तो सामना होता क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडचा, काही दशकांपूर्वी त्यांची गुलामी झुगारणार्‍या भारताशी. त्यावेळी ६० षटकांचे एकदिवसीय सामने व्हायचे. या पहिल्याच सामन्यातील सुनील गावस्करच्या कासवछाप फलंदाजीचं कवित्व अद्याप कायम आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात संथ खेळी गावस्करनं (१७४ चेंडूंत फक्त ३६ धावा) पहिल्याच सामन्यात नोंदवली. डेनिस अमिसच्या १३७ धावांच्या बळावर इंग्लंडनं ४ बाद ३३४ धावा उभारल्या. परंतु एस. वेंकटराघवन यांच्या नेतृत्वाखाली भारतानं ६० षटकांत फक्त ३ बाद १२३ धावा केल्या. प्रुडेन्शियल प्रायोजक असलेल्या पहिल्या तिन्ही विश्वचषकांचं यजमानपद इंग्लंडने भूषवलं आणि पहिल्या दोन जगज्जेतेपदांवर वर्चस्व होतं, ते वेस्ट इंडिजचं. पण दुर्दैवानं यंदाच्या विश्वचषकात ते नसल्याची मला खंत वाटतेय. क्रिकेटची नैसर्गिक गुणवत्ता कॅरेबियन मातीत असतानाही त्याचं क्रिकेट रसातळाला कसं गेलं, हा इतिहास मी डोळ्यांदेखत पाहिलाय. १९८३मध्ये भारतानं इतिहास बदलला. कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या, केवळ हजेरी लावणार्‍या भारतानं चक्क विंडीजची मक्तेदारी संपुष्टात आणली. त्या विश्वविजेतेपदानंच भारतात क्रिकेट हा खेळ खर्‍या अर्थानं रुजला, नव्हे जीवनाचा अविभाज्य भाग झाला. कपिल देव हा त्या ऐतिहासिक यशाचा शिल्पकार होता. कलात्मक आणि पाठ्यपुस्तकी क्रिकेटला तिलांजली देत कपिलनं मुक्तछंदी फटकेबाजी आणि हुकमी स्विंग गोलंदाजीनं भारताला सुवर्णकाळ दाखवला. सुनील गावस्करनं फलंदाजीची मोहिनी घातली. भारतीय क्रिकेटची हीच ज्योत मग सचिन तेंडुलकरनं जवळपास २४ वर्षे तेवत ठेवली. लॉर्ड्सच्या गॅलरीत कपिल आणि मोहिंदर अमरनाथनं मला उंचावल्याचं ते दृश्य आजही माझ्या ह्दयसिंहासनावर राज्य करतंय…
त्यानंतर १९८७ ते १९९६पर्यंतचं एक तप हे माझ्यासाठी स्थित्यंतराचं ठरलं. अनेक बदलांनी माझा आलेख उंचावला. जगमोहन दालमिया नावाच्या भारतीय संघटकानं क्रिकेटवर अंकुश ठेवणार्‍या इंग्लंडला खुले आव्हान देत मोट बांधली आणि यजमानपद इंग्लंडमधून बाहेर आणलं, ते भारत आणि पाकिस्तानमध्ये. ह्या विश्वचषकाला रिलायन्सचं प्रायोजकत्वही मिळवलं. क्रिकेटचं अर्थकारण बदलून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य करणारे दालमिया म्हणूनच ‘डॉलरमियाँ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आज क्रिकेटच्या नकाशावर ‘बिग थ्री’ राष्ट्रांमध्ये भारताची गणना होते, ते येथील क्रिकेटकेंद्रित अर्थकारणामुळे. याचं श्रेय दालमियांनाच जातं. १९८७मध्ये मर्यादित षटकांचं क्रिकेट ६० षटकांवरून ५० षटकांचं झालं. भारतीय उपखंडातील युरोपपेक्षा छोटा दिवस हे त्यामागील शास्त्रीय कारण. यावेळी अ‍ॅलन बॉर्डरच्या ऑस्ट्रेलियानं प्रथमच विश्वविजेतेपद पटकावलं.
पण १९९२च्या विश्वचषकानं एक दिवसीय क्रिकेटमध्ये खर्‍या अर्थानं क्रांती घडवली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या त्या विश्वचषकात पांढर्‍या कपड्यांची जागा रंगीत कपड्यांनी घेतली, तर लाल चेंडूच्या जागी पांढरा चेंडू वापरात आला. प्रकाशझोतातील दिवस-रात्रीचे सामने, क्षेत्ररक्षणाच्या बंधनांचे नियम यामुळे एकदिवसीय क्रिकेटची मजा द्विगुणित झाली आणि माझं महत्त्व आणखी वाढलं. या बदललेल्या नियमांनी खेळातली रंगत आणखी वाढली. वर्णद्वेषामुळे घातलेली बंदी संपवून दक्षिण आफ्रिकेचा संघ क्रिकेटसह मुख्य प्रवाहात सामील झाला. परंतु त्यांच्यावर ‘चोकर्स’ हा बसलेला शिक्का आजपर्यंत कायम आहे. या स्पर्धेत इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं विश्वचषकाचा मान मिळवला.
१९९६मध्ये दुसर्‍यांदा भारतीय उपखंडात म्हणजेच भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत विश्वचषकाचा उत्सव साजरा झाला. याचंही श्रेय दालमिया यांना जातं. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेविरुद्ध भारताची ८ बाद १२० अशी केविलवाणी अवस्था झाली असताना क्रिकेटरसिकांनी हुल्लडबाजी करीत सामना थांबवला. मैदानावर जाळपोळही झाली. या सामन्यात श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं. रडवेल्या चेहर्‍यानं माघारी परतणारा विनोद कांबळी मला अजूनही आठवतोय. या स्पर्धेत अर्जुन रणतुंगाच्या श्रीलंकेनं प्रथमच विश्वचषक जिंकला. ‘पिंच हिटर्स’ ही नवी संज्ञा सनथ जयसूर्यानं रूढ केली आणि संथ क्रिकेटला आक्रमक रूप दिलं गेलं. पुढे १९९९ ते २००७ पर्यंतच्या सलग तीन स्पर्धांवर ऑस्ट्रेलियानं अधिराज्य गाजवलं.
१९९९मध्ये इंग्लंडला झालेल्या विश्वचषकात वडिलांच्या निधनामुळे मायदेशी परतलेला सचिन विश्वचषकासाठी पुन्हा इंग्लंडला पोहोचला. केनियाविरुद्ध १४० धावांची खेळी वडिलांना समर्पित करीत त्यानं भारताला विजयाचा मार्ग दाखवला. २००३च्या दक्षिण आफ्रिकेतील विश्वचषकात रिकी पाँटिंगच्या घणाघाती शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत भारतापुढे ३६० धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु भारताचा डाव २३४ धावांत आटोपला आणि जगज्जेतेपदाचं स्वप्न धुळीस मिळाले. सचिन (६७५ धावा) स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी ठरला.
२००७मध्ये प्रथम यजमानपद कॅरेबियन बेटांकडे गेलं. पण १६ संघांची ती स्पर्धा माझ्या आयुष्यातली सर्वात वाईट आणि कटू स्मृतींची ठरली. आयर्लंडकडून धक्कादायक पराभवानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर हॉटेलमधील खोलीत मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मृत्यूचं गूढ अद्यापही उकललेलं नाही. भारत, पाकिस्तानसारखे संघ साखळीतच गारद झाल्यानं स्पर्धेची रंगत टिकली नाही. नेमक्या याच स्पर्धेनंतर ‘आयसीसी’च्या कॅलेंडरमध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या विश्वचषकानं चपखलपणे स्थान मिळवला. एकदिवसीय प्रकाराच्या अधोगतीला प्रारंभ झाली ती येथूनच… परंतु एक छान झालं. क्रिकेटमध्ये नवनव्या फटक्यांची नजाकत आणि तंत्र आलं.
भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या आशियाई राष्ट्रांनी २०११मध्ये विश्वचषकाचं यजमानपद सांभाळलं. २००९मध्ये श्रीलंकन क्रिकेट संघाच्या बसवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे पाकिस्तानला सह-यजमानपद गमवावं लागलं. यावेळी ऑस्ट्रेलियाची सलग ३५ विश्वचषक सामन्यांत अपराजित राहण्याची मालिका पाकिस्ताननेच खंडित केली. यावेळी प्रथमच दोन आशियाई राष्ट्रे अंतिम सामन्यात भिडली. पण भारतानं दुसर्‍यांदा विश्वचषक पटकावला. याचं श्रेय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मिडास टचला, सचिन तेंडुलकरच्या प्रेरणादायी खेळाला आणि युवराज सिंगच्या अष्टपैलू खेळाला जातं. २ एप्रिल, २०११ हाच तो दिवस… धोनीचा षटकार आजही काळजात घर करून राहिलाय… त्यानंतर मी हरवल्याची चर्चाही रंगली!
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनं २०१५मध्ये पुन्हा संयुक्तपणे यजमानपद भूषवलं. आयर्लंडनं आश्चर्यकारक तीन विजयांसह सर्वांना अचंबित केलं. पण अखेरीस ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला नमवून पाचव्यांदा जगज्जेतेपद जिंकलं. त्यानंतर २०१९मध्ये इंग्लंडनं यजमानपदाचा मान मिळवला. क्रिकेट जगाला शिकवणारा हा देश प्रथमच जगज्जेता झाला. लॉर्ड्सवर त्यांनी मारलेली विजयफेरी म्हणूनच संस्मरणीय. पण आतापर्यंतच्या सर्वच विश्वचषकांपेक्षा अधिक उत्कंठावर्धक ठरला, तो अंतिम सामना. इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील तो अंतिम सामना ‘टाय’ झाला. मग सुपर ओव्हरमध्येही तीच स्थिती. पण नियमानुसार सुपर ओव्हरमधील सर्वाधिक सीमापार फटक्यांच्या जोरावर इंग्लंडनं बाजी मारली… बेन स्टोक्स अजूनही विसरलेलो नाही.
चार वर्षं लोटली. करोनाच्या साथीतून सावरत आता क्रिकेट पुन्हा स्थिरस्थावर झालंय. मी अहमदाबादला इंग्लंड-न्यूझीलंड या मागील वेळच्या अंतिम सामन्यातील स्पर्धकांच्या सामन्याची प्रतीक्षा करतोय. गेल्या चार-पाच वर्षांत एकदिवसीय क्रिकेट कमालीचं ढासळत चाललंय. सामन्यांची रोडावणारी संख्या माझ्या चिंतेत भर घालतेय. एकीकडे दर दोन वर्षांनी ट्वेन्टी-२०चा विश्वचषक रंगू लागलाय. पण एकदिवसीय विश्वचषकाची उत्सुकता चार वर्षांनीही नसल्याचे जाणवत आहे. माझी उदासीनताही त्याचसाठी… कदाचित माझं वय पन्नाशीकडे झुकू लागल्यानं तर नव्हे?… नसावं… मला आता सारं विसरून आत्मविश्वासानं उभं राहायला हवं… अन्यथा भूतकाळ तर रमणीय, पण भविष्यकाळ कठीण असेल!
(अनेक आठवणी जागवल्या. मन अगदी मोकळं, मोकळं झाल्यानं विश्वचषक शांत आणि धीरगंभीर वाटत होता. नव्या आठवणींशी ऋणानुबंध निर्माण होणारा विश्वचषक तर सुरू होईल. पण या उत्सवाच्या काळात तो आपली चिंता आणि व्यथा बाजूला सारून सामील होईल, या विश्वचषक दिंडीत…)

[email protected]

Previous Post

बाळासाहेबांवर अँजिओप्लास्टी!

Next Post

मॉरिशस-३

Related Posts

फ्री हिट

संधीचा चेंडू त्यांच्या दिशेने वळलाच नाही…

March 16, 2025
फ्री हिट

मिश्कील, उमदा, खेळकर सुनील!

July 19, 2024
फ्री हिट

त्यांचं काय चुकलं?

May 10, 2024
फ्री हिट

‘ते’ सध्या काय करतायत?

February 16, 2024
Next Post

मॉरिशस-३

ये मोह मोह के धागे...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.