• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

आनंदचा प्रज्ञावान वारसदार

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 31, 2023
in फ्री हिट
0

रमेशबाबू प्रज्ञानंद हा चेन्नईचा युवक आता बुद्धिबळात ध्रुवतार्‍याप्रमाणे चमकत आहे. विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या जेतेपदाने त्याला हुलकावणी दिली असली तरी तो पाच वेळा विश्वविजेता बनलेल्या भारताच्या विश्वनाथन आनंदचा वारसा चालवू शकेल, असा आशावाद नक्कीच दिसत आहे. प्रज्ञानंद कसा घडला, विश्वचषक स्पर्धा कशी रंगली आणि त्याच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे कुटुंब आणि आर. रमेश यांची चेस गुरूकुल अकादमी यांचा घेतलेला वेध.
– – –

कृत्रिम बुद्धिमत्तेला वैभवाचे दिवस येण्याच्या कित्येक शतके आधी मानवी बुद्धिमत्ता ही अतुल्य आहे, असा समज होता. ६४ चौकटींच्या खेळाला बुद्धिबळ हे नाव पडले, याचे साधेसोपे कारण म्हणजे यात बुद्धीचा कस लागतो. सातव्या शतकात हिंदुस्थानात ‘चतुरंग’ नामक खेळला जाणारा खेळ हा बुद्धिबळाप्रमाणेच होता. येथून तो पर्शियात गेला आणि त्याला पुढे ‘शतरंज’ हे आणखी एक नाव मिळाले. तशाच प्रकारे चीनमध्ये ‘शियांगी’ आणि जपानमध्ये ‘शोगी’ हे खेळ बुद्धिबळासारखेच होते. १५व्या शतकात युरोपियन राष्ट्रांनी पुढाकार घेऊन बुद्धिबळाचे नियम बनवले. १९व्या शतकात बुद्धिबळाचे प्रमाणीकरण झाल्याने जागतिक स्तरावर त्याचा विकास होऊ लागला. कालांतराने या खेळाचे सिद्धांत म्हणजेच थिअरीजसुद्धा अस्तित्वात आल्या. आता जगातील लोकप्रिय क्रीडाप्रकार म्हणून त्याची ख्याती आहे. विश्वनाथन आनंदच्या उदयानंतर भारत बुद्धिबळातील महासत्ता झाला. आज बुद्धिबळातील प्रज्ञेची देशात मुळीच वाणवा नाही. त्यामुळे प्रज्ञानंदसारखा युवक विश्वचषकाच्या उपविजेतेपदापर्यंत भरारी घेऊ शकला.
१९५५मध्ये रामचंद्र सप्रे हे देशातील पहिले राष्ट्रीय विजेते ठरले होते, तर मॅन्युएल आरोन १९६१मध्ये भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय मास्टर झाले. १९७१मध्ये जीवनातील क्षणभंगुरतेवर भाष्य करणारा ‘आनंद’ चित्रपट प्रदर्शित झाला, त्याच्या दोन वर्षे आधी विश्वनाथन आनंदचा जन्म झाला. १९८८मध्ये विश्वनाथन देशातील पहिला ग्रँडमास्टर झाला. मग त्याने बुद्धिबळातील विश्वविजेतेपदही २०००, २००७, २००८, २०१० आणि २०१२ असे पाच वेळा पटकावले. आता देशात पुरुषांमध्ये ८२ ग्रँडमास्टर, १२४ आंतरराष्ट्रीय मास्टर, २३ महिला ग्रँडमास्टर आणि ४२ महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आहेत. आनंदपर्वाची ही धुरा वाहण्यासाठी आता चेन्नईचा रमेशबाबू प्रज्ञानंद सज्ज झाला आहे. भारतीय बुद्धिबळाचे भवितव्य सुरक्षित हातात आहे, असे मत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावरील आनंदने व्यक्त केले.

कौटुंबिक पाठबळ

प्रज्ञानंदचे वडील रमेशबाबू हे बँक व्यवस्थापक. त्यांना आयुष्यात पोलिओशी संघर्ष करावा लागला. पण आता सोशल मीडियावर लक्ष वेधते ती त्याची आई नागालक्ष्मी. दाक्षिणात्य गृहिणी. मुलाचे बुद्धिबळातील स्वप्न पूर्ण व्हावे, या जिद्दीने मेहनत करणारी. त्याचा आहार आणि मानसिकता ती उत्तम प्रकारे सांभाळते. ज्या वयात मुले खेळणी खेळतात, त्या वयात प्रज्ञानंद बुद्धिबळाच्या प्याद्यांमध्ये रमला, याचे श्रेय त्याची मोठी बहीण आर. वैशाली हिला जाते. बालपणी प्रज्ञानंदला कार्टून्स मालिका पाहण्याचा छंद जडला. त्या व्यसनापासून रोखण्यासाठी वैशालीने त्याला बुद्धिबळ शिकवण्याची चाल रचली. ती विलक्षण यशस्वी ठरली. २०१६मध्ये प्रज्ञानंदने आंतरराष्ट्रीय मास्टर किताब प्राप्त केला, तेव्हा तो फक्त १० वर्षे आणि ९ महिन्यांचा होता. मग जून २०१८मध्ये तो ग्रँडमास्टर झाला. त्यावेळी त्याचे वय होते, १२ वर्षे आणि १० महिने. त्याने २६०० एलो रेटिंगचा टप्पा पार केला, तेव्हा तो १४ वर्षे, ३ महिन्यांचा होता. २२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी प्रज्ञानंदच्या अचाट क्षमतेचा प्रत्यय जगाला आला. वयाच्या १६व्या वर्षी त्याने तत्कालीन जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला नमवण्याची किमया साधली. एअरथिंग्ज मास्टर्स जलद बुद्धिबळ स्पर्धेमधील त्या सामन्यातील यश प्रज्ञानंदसाठी आशा उंचावणारे ठरले.

टायब्रेकरची मालिका

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रज्ञानंदसह डी. गुकेश, अर्जुन एरिगैसी आणि विदित गुजराथी अशा भारताच्या चारजणांनी स्थान मिळवले, हेही तसे ऐतिहासिक. प्रज्ञानंदसाठी ही स्पर्धा खडतर ठरली. पण आनंदनंतर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला. प्रज्ञानंदला स्पर्धेत बहुतांश सामन्यांत टायब्रेकरचे आव्हान पेलावे लागले. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळालेल्या प्रज्ञानंदने दुसर्‍या फेरीत मॅक्झिमे लॅग्रेड आणि तिसर्‍या फेरीत डेव्हिड नॅव्हाराला टायब्रेकरमध्ये हरवले. चौथ्या फेरीत प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावरील हिकारू नाकामुराला सहजगत्या ३-१ असे नामोहरम केले. उपउपांत्यपूर्व फेरीत तो फेरेन्स बेर्किसपेक्षा वरचढ ठरला, पण टायब्रेकरमध्ये. उपांत्यपूर्व फेरीत १९ वर्षीय अर्जुनने प्रज्ञानंदला कडवी लढत दिली. पण सडन डेथमध्ये त्याने यश मिळवलेच. उपांत्य फेरीत प्रज्ञानंदचा सामना झाला, तो जागतिक क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावरील फॅबिआनो कारूआनाशी. हा सामनासुद्धा टायब्रेकरमध्ये निकाली ठरला. प्रज्ञानंद आणि कार्लसन यांच्यातील अंतिम फेरीतील दोन परंपरागत लढतींचा सामना बरोबरीत सुटल्यामुळे हासुद्धा निकाल टायब्रेकरपर्यंत लांबला. पुढे दोन जलद सामन्यांपैकी पहिल्याच सामन्यात कार्लसनने बाजी मारली. वेळ हातातून निसटत असताना झालेल्या चुका सुधारण्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे दुसर्‍या सामन्यात कार्लसनचा आत्मविश्वास उंचावलेला. प्रज्ञानंद दुसर्‍या लढतीत प्रत्येक चाल रचण्यात अधिक वेळ दवडू लागला. त्याचा फायदा कार्लसनने घेत पुन्हा कुशल रणनीती आखली. प्रज्ञानंदने अखेरीस दुसर्‍या लढतीत बरोबरी मान्य केली. त्यामुळे कार्लसनला विजयासह विश्वचषक जेतेपदही प्राप्त करता आले.

बुद्धिबळाचे गुरूकुल

प्रज्ञानंदच्या यशात चेन्नईस्थित चेस गुरूकुल अकादमीची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रँडमास्टर रामनाथन रमेश हे येथील गुरू. दररोज प्रत्येक शिष्याने १० बुद्धिबळ सामन्यांचे व्हिडीओ पाहायचे, हा त्यांचा नियम. परंतु शाळा, अभ्यास, गृहपाठ आणि अन्य आव्हाने यामुळे बर्‍याचशा मुलांना हे लक्ष्य गाठता येत नाही. परंतु प्रज्ञानंद प्रत्येक दिवशी ३० व्हिडीओ पाहतो. त्यामुळे रमेश यांचा तो पट्टशिष्य. चेस गुरूकुल अकादमी ही प्रज्ञानंदच्या घरापासून एक तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे बस किंवा रिक्षा पकडून तिथे जाणे चार ते सहा तास बुद्धिबळाचा सराव करणे हा त्याचा शिरस्ता. शारीरिकदृष्ट्या मजबुतीसाठी टेबल टेनिस आणि जलतरणही तो करतो.
रमेश वयाच्या ३२व्या वर्षी राष्ट्रकुल विजेता झाला. पण खेळाडू म्हणून कारकीर्द घडवण्याऐवजी २००७मध्ये त्याने प्रशिक्षक होण्याचा निर्णय घेतला. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमधील उत्तम पगाराच्या नोकरीचाही त्याने त्याग केला. त्याच्या निर्णयाची रसाळ गोमटी फळे आता मिळत आहेत. रमेशच्या चेस गुरूकुल अकादमीतून घडलेले अनेक बुद्धिबळपटू आता जागतिक ठसा उमटवत आहेत. त्याच्या याच मार्गदर्शक कार्याबद्दल ‘फिडे’ या जागतिक बुद्धिबळ संस्थेने त्याला २०१८मध्ये सन्मानित केले होते.

जगज्जेतेपदाची आशा

२०१३ मध्ये आनंदला नमवून कार्लसन विश्वविजेता झाला, तेव्हा तो फक्त २३ वर्षांचा होता. आता प्रज्ञानंद १८ वर्षांचा आहे. गतवर्षी विश्वविजेतेपदाचा कंटाळा आल्यामुळे कार्लसनने माघार घेतली होती. त्यामुळे चीनचा डिंग लिरेन हा नवा जगज्जेता उदयास आला. पण प्रज्ञानंद हा पुढील काही वर्षांत विश्वविजेता होऊन आनंदचा वारसा चालवेल, असा आशावाद निर्माण होत आहे.

[email protected]

Previous Post

चलो जिंदगी को मोहब्बत बना दें..

Next Post

आपण यांना पाहिलंत का?

Related Posts

फ्री हिट

संधीचा चेंडू त्यांच्या दिशेने वळलाच नाही…

March 16, 2025
फ्री हिट

मिश्कील, उमदा, खेळकर सुनील!

July 19, 2024
फ्री हिट

त्यांचं काय चुकलं?

May 10, 2024
फ्री हिट

‘ते’ सध्या काय करतायत?

February 16, 2024
Next Post

आपण यांना पाहिलंत का?

सुंदर मी होणार

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.