नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या (एनएमएसीसी) दी ग्रॅण्ड थिएटरच्या रंगमंचावर पहिलं मराठी नाटक सादर करण्याचा मान जिगीषा क्रियेशन्स निर्मित ‘चारचौघी’ या नाटकाला मिळाला. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (एनएमएसीसी) येथे “साऊंड ऑफ म्युझिक” आणि वेस्ट साईड स्टोरी यासारखे मोठे इंटरनॅशनल प्राॅजेक्ट्सचे शो होतात त्या रंगमंचावर ‘चारचौघी’ या पहिल्याच मराठी नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग नुकताच रविवारी १३ ऑगस्ट रोजी दिमाखदारपणे सादर झाला.
विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे नाट्यरसिकांनी हा नाट्यप्रयोग अवघ्या 3-4 दिवसात हाऊसफुल्ल केला. प्रेक्षकांच्या जोरदार प्रतिसादामध्ये हा प्रयोग सादर झाला. या एतिहासिक घटनेमुळे चारचौघी नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ, निर्माता यांना खूप आनंद मिळाला. कारण मराठी नाटकाचा झेंडा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये (एनएमएसीसी) फडकला.