• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

आणीबाणीवर खुसखुशीत भाष्य!

- संदेश कामेरकर (सिने परीक्षण) (सिनेमा : 'आणीबाणी')

Nitin Phanse by Nitin Phanse
August 3, 2023
in मनोरंजन
0

अशा काही रात्री गेल्या
ज्यात काळवंडलो असतो
अशा काही वेळा आल्या
होतो तसे उरलो नसतो
वादळ असे भरून आले
तारू भरकटणार होते
लाटा अशा घेरत होत्या
काही सावरणार नव्हते…!

कवी अनिल यांनी आणीबाणीवर केलेली ही समर्पक कविता. २५ जून १९७५ रोजी भारतात लोकशाही स्थगित करून आणीबाणी लागू झाली. राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आलं आणि प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणण्यात आली. आणीबाणीच्या या अनुशासन पर्वाबद्दल सामान्य जनतेच्या मनात दोन प्रवाह होते. बरं झालं, देशाला शिस्त लागली, असं काहीजणांना वाटत होतं. सगळे सरकारी नोकर वेळेवर कामावर येतात आणि कामाची वेळ संपल्यावरच घरी जातायत. नेहमी उशिरा धावणार्‍या रेल्वे, एसटी वेळेवर सुटतात, याचा आनंद होता. तर आणीबाणी ही लोकशाहीला मारक आहे, हम करे सो कायदा हे धोरण सामान्य जनतेला मारक ठरेल असं काहींचं म्हणणं होतं. त्या काळात कुटुंब नियोजनासारखी चांगली योजना राबवताना प्रशासनाकडून झालेल्या किंवा मुद्दामहून केलेल्या दडपशाहीमुळे सामान्य जनतेत पुरुष ‘नसबंदी’बद्दल दहशत पसरली होती.
नसबंदी हाच विषय डोळ्यासमोर ठेवून लेखक अरविंद जगताप यांनी हलक्या फुलक्या शैलीत ‘आणीबाणी’ चित्रपटाची कथा गुंफली आहे. एका खेडेगावात अभिमन्यू (उपेंद्र लिमये) आणि विमल (वीणा जामकर) यांचा सुखाचा संसार सुरू आहे, पण लग्नाला अनेक वर्षे उलटली तरी घरात पाळणा हलला नाही, यामुळे सासूची (उषा नाईक) बोलणी खावी लागतात. हे दुःख विमलच्या मनात सलत असतं. घराला वारस हवा यासाठी ती घरात सवत आणू या असा नवर्‍यामागे लकडा लावते. विमलच्या नात्यातील लग्न मोडलेल्या ज्योतीसोबत (सीमा कुलकर्णी) अभिमन्यूचे दुसरे लग्न ठरतं, पण अभिमन्यूसोबत गैरसमजातून झालेल्या एका घटनेने ज्योतीचा पोलीस इन्स्पेक्टर भाऊ पिंटू शेठ (संजय खापरे) डूख घरून असतो. तो हे लग्न मोडतो. त्याच वेळी गावातील (सयाजी शिंदे) सरपंचाची बायको देवाघरी जाते आणि त्याला ज्योतीसोबत लग्न करायचं असतं. देशात लागलेली आणीबाणी आणि कौटुंबिक आणीबाणी यांच्यामध्ये अभिमन्यू आणि ज्योतीचे पळून जाऊन लग्न, पिंटू शेठने हे लग्न मोडण्यासाठी अभिमन्यूला नसबंदीसाठी पकडणे अशा अनेक घटना घडतात. पुढे हे लग्न टिकतं का? सरपंच आणि पिंटू शेठ त्यांच्या कटकारस्थानात सफल होतात का, हे पाहायला तुम्हाला स्वतःही मनोरंजनाची आणीबाणी अनुभवावी लागेल.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील संवेदनशील पत्रलेखक म्हणून अरविंद जगताप यांची ओळख आहे. त्यांनी या चित्रपटाची कथा लिहिताना त्या काळात झालेल्या अन्यायावर मार्मिक भाष्य केलं आहे. पोलीस पार्टी नसबंदी करायला गावातील लग्न न झालेले किंवा तरुण पुरुष उचलून आणत होते, पण त्याचवेळी बक्षिसाच्या आशेने गावातील एक म्हातारा माणूस (किशोर नांदलस्कर) ‘माझी नसबंदी करा’ असं रोज सांगत असतो, पण त्याला डावललं जातं अशा अनेक विसंगती त्यांनी टिपल्या आहेत. जेव्हा अभिमन्यू आणि सरपंच दोघेही ज्योतीशी लग्न जुळवायचा प्रयत्न करत असतात, तेव्हा ‘एकाच्या बायकोला मुलं नाही म्हणून आणि दुसर्‍याच्या मुलाला आई नाही म्हणून दोघे खटाटोप करत आहेत’ असे चटकदार संवाद सिनेमात हास्य निर्माण करतात. चित्रपटाचा पूर्वार्ध रंजक आहे, पण कथेचा जीव लहान असल्यामुळे उत्तरार्धात काही प्रसंग वारंवार घडताना दिसतात. दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी हाताशी इतके सक्षम अभिनेते असताना चित्रपट एकसंघ बनविण्यासाठी आणखी काम करायला हवं होतं असं वाटतं.
सर्वच कलाकारांनी नावाला साजेशी कामगिरी केली आहे. सयाजी शिंदे यांनी बाईलवेडा सरपंच त्यांच्या ‘सिग्नेचर स्टाईल’मध्ये साकारला आहे. उपेंद्र लिमये आणि वीणा जामकर यांच्यातील प्रेमळ गुजगोष्टी, ‘एक माणूस रागावलाय आमच्यावर’ या जुन्या काळातील संवादाची आठवण करून देतात. संजय खापरे यांचा पोलीस इन्स्पेक्टर दमदार आहे. प्रवीण तरडे, सुनील अभ्यंकर, सीमा कुलकर्णी यांनी आपल्या वाट्याला आलेली भूमिका चोख बजावली आहे. सिनेमाचे पार्श्वसंगीत (पंकज पडघन) विषयाला अनुरूप आहे. प्रेक्षकांना त्यांच्या वेळेची आणीबाणी नसेल तर हा सिनेमा एकदा बघायला हरकत नाही.

Previous Post

बॉक्स ऑफिसची देवी

Next Post

वर्क लाईक अ डॉग डे

Related Posts

मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
मनोरंजन

रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

April 18, 2025
वन अँड ओन्ली भारत कुमार
मनोरंजन

वन अँड ओन्ली भारत कुमार

April 11, 2025
Next Post

वर्क लाईक अ डॉग डे

नियती

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.