• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

ग्रेटा कुठे काय करत्ये?

- जोसेफ तुस्कानो

Nitin Phanse by Nitin Phanse
August 3, 2023
in भाष्य
0

इजिप्तमधील शर्म-अल-शेख येथे नोव्हेंबर २०२२मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची सीओपी-२७ (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज) ही हवामानासबंधी परिषद भरली. या परिषदेद्वारा सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख, विविध सामाजिक संघटना, पर्यावरण संघटना, कामगार संघटना, विचारवंत यांना एकत्र आणून पर्यावरणविषयक चर्चा झाली. तेव्हा प्रारंभीलाच यूएन सेक्रेटरी जनरल अंटोनिओ गुटेरेस यांनी सावधानतेचा इशारा दिला की आपल्या जीवन-मरणाचा संघर्ष सुरू झाला आहे व आपण सारे पराभवाच्या छायेत आहोत. आपला प्रवास हवामान बदलाच्या महामार्गावर सुरू झालाय आणि आपला पाय एक्सलरेटरवर आहे. धूर्त राजकारणी आणि मतलबी शासनकर्ते हवामान बदलाची समस्या गंभीरपणे घेत नाहीत आणि आपले भवितव्य अंधारात चाललेय याची तीव्र जाणीव झाल्याने जगभरातील शाळकरी मुले आपला अभ्यास बुडवून रस्त्यावर उतरत आहेत.
ग्रेटा थुनबर्ग ही स्वीडनमधील शाळेकरी मुलगी २०१८ साली तिच्या ‘Skoletrejk for klimatet’ या चळवळीमुळे चांगलीच प्रकाशझोतात आली होती. पर्यावरणाचा र्हागस रोखण्यात मोठी माणसे कुचकामी ठरली आहेत, तेव्हा आपल्या भवितव्याचे रक्षण करण्यासाठी शाळेत शिकणार्‍यास मुलांनी पुढाकार घ्यायचा, असा त्या उपक्रमाचा उद्देश होता. काही अंशी तो सफल देखील झाला. देशोदेशीचे नेते या शाळकरी पोरीपुढे नतमस्तक झाले. जगभरात तिची व्याख्याने झाली. नोबल पुरस्कारासाठी तिची शिफारस झाली. सीओपी-२४ जागतिक स्तरावरील परिषदेत या शाळकरी मुलीच्या रूपात या मोठ्यांच्या गदारोळावर ठिणगी पडली. ग्रेटा थुनबर्ग शाळा सोडून रस्त्यावर आली, देशोदेशी जागृती करत फिरली आणि तिने जगभरच्या मुलांचा पाठिंबा मिळविला. पर्यावरणरक्षणासाठी आंदोलने केली. ‘आमचं भवितव्य तुडविण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?’ हा तिचा राज्यकर्त्यांना खडा सवाल होता.
नोव्हेंबर २०२१मध्ये स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे भरलेल्या सीओपी-२६मध्ये भारतीय कन्या विनिशा उमाशंकर हिला इंग्लंडचे प्रिन्स विल्यम यांनी आमंत्रित केले होते. तिने तिथे ठणकावून सांगितलं, ‘आय अॅम नॉट गर्ल फ्रॉम इंडिया, आय अॅम अ गर्ल फ्रॉम अर्थ’. तिथे उपस्थित जागतिक नेत्यांना ती म्हणाली, ‘स्टॉप टॉकिंग अ‍ॅण्ड स्टार्ट अ‍ॅक्टिंग’. या परिषदेत वृक्ष-तोडीवर बंदी आणणारा ठराव १५० देशांतर्फे मंजूर झाला. दुर्दैवाने आपल्या देशाने त्यावर सही करण्यास नकार दिला. आज वातावरणाची जी स्थिती आहे, तीत बदल झाला नाही तर २०५० साल प्रलयकारक असेल, जग समुद्रांनी व्यापलेले असेल.
हरिद्वारमधली नऊ वर्षाची सिंधिमा पांडे हे आणखी एक उदाहरण आहे. ‘माझा देश हवामान बदलावर उपाययोजना करण्यासाठी कोणती पावले उचलत आहे,’ असा सवाल ती राष्ट्रीय हरित लवादाला (एनजीटी) विचारते आहे व जगभर खळबळ माजवते आहे. ती ‘चिल्ड्रेन वर्सेस क्लायमेट क्रायसिस’ हा लढा लढत आहे.
मतलबी नेते आणि स्वार्थी राजकरणी या शाळकरी मुलींच्या धाडसी उपक्रमाचा उपहास करीत त्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करतात व जगभर भटकण्याची सोस पुरविण्यासाठी असले चाळे करतात, अशी टीका करीत आपली हवामान बदलासबंधीची जबाबदारी झटकून टाकीत आहेत. ते या मुलींना नाऊमेद करण्याचा व्यर्थ प्रयत्न करीत आहेत. चारेक वर्षापूर्वी स्वीडनच्या संसदेच्या फुटपाथवरून उमटलेला ग्रेटाचा आवाज युरोपभर दुमदुमला होता. तिथली निवडणूक पार पडली आणि तिने लोकांच्या हवामान मोर्चाचा (पीपल्स क्लायमेट मार्च) प्रारंभ केला. हा मोर्चा एकाचवेळी सात शहरांत आयोजित केला गेला होता. ग्रेटाने मोर्चासाठी तयार केलेले भाषण सर्वत्र गाजले. नंतर ती बेल्जियममधील बृसेल्स येथे गेली. ती फिनलंडला पोहचली. ती लंडनला देखील जाऊन आली. आपल्या चळवळीला पाठिंबा मिळवा म्हणून युरोपभर जावे लागणार होते. त्यासाठी तिला आपल्या आईवडिलांचं सहकार्य व आधार हवा होता. त्या दोघांनी तिला प्रोत्साहन दिले. आपल्या पोरीचा आग्रह त्यांना रास्त वाटला होता आणि त्यासाठी तिच्यासोबत प्रवास करायला तयार होते. जमिनीवरून आणि समुद्रातून प्रवास करणे खूप त्रासदायक व वेळखाऊ होते. पण ग्रेटाची मानसिक तयारी झाली होती. स्वच्छ पर्यावरणासाठी ती जिवाची बाजी लावला तयार होती. शाळेत आज्ञाधारक असलेली ग्रेटा पुरती बंडखोर बनली होती. लहान वयामुळे आपल्याला मतदान करता येत नाही म्हणून काय झाले, मोठ्यांना निवडून दिलेल्या राजकीय पुढाऱ्यांना आपण जागे तर करू शकतो ना, ही तिची धारणा प्रबळ झाली होती. जगातल्या विविध कोपर्‍यांत निरनिराळी मंडळी पर्यावरणासाठी झगडत आहेत, हे वाचून तिचे मनोबल वाढत होते. परक्या लोकांसमोर केलेली तिची इंग्रजी भाषेतील मोठमोठी गंभीर भाषणे ऐकून तिच्या आईवडिलांना किती अभिमान वाटे! तिचे धाडस आणि विविध कल्पना कौतुकास्पद होत्या. जगाच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या ऑस्ट्रेलियात तिचा आवाज पोहचला आणि तिथली मुलेदेखील आंदोलनात उतरली. खुद्द ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानांनी मुलांना ‘शाळेत जाण्याचे’ आवाहन केले, तेव्हा ग्रेटाने आपल्या इनस्टाग्रामवरुन उत्तर धाडले. ‘आय अ‍ॅम सॉरी प्राइम मिनिस्टर स्कॉट मॉरिसन, बट वुई कान्ट ओबे.’
सध्या ती काय करत आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण ती आपल्या ध्येयासाठी कार्यरत आहे. जगातल्या शंभरेक तज्ज्ञाच्या सहाय्याने हवामानासबंधी विविध कंगोर्‍यांचा अभ्यास करून गेल्या ऑक्टोबरपासून ‘दी क्लायमेट बुक’ नावाचा माहिती कोश ती तयार करीत आहे. या ग्रंथात पाच भाग आहेत. आपला ग्रह कसा बदलत चालला आहे, त्याचा आपल्यावर कोणता परिणाम होत आहे, त्या बदलासाठी आपण काय करीत आहोत, आता काय केले पाहिजे, या गोषवार्‍याचा ग्रेटाने घेतलेला धांडोळा याचा समावेश आहे. सामान्य माणसासाठी हा ग्रंथ सर्वकष महितीचा स्त्रोत आहे.
जर्मनीतील हवामान परिणामंचा अभ्यास करणारे पोट्स्डम इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञ जोहान रॉकस्त्रोम यांनी ‘बर्फाचे विरघळणे व त्याचा पृथ्वीचे विनाशीकरण’ यावर प्रकाश टाकीत म्हटलेय, ‘आपण भावी पिढीला वास्तव्यास कमीत कमी उपयुक्त ठरणारा ग्रह बहाल करीत आहोत. या ग्रंथात जागतिक ख्यातीचे लेखक अमिताव घोष यांनी माणसाच्या चंगळवादाचा पर्दाफाश केला आहे. गरीब आणि श्रीमंत देशतील वसाहतवाद डोके वर काढीत असल्याचे स्पष्टीकरण करताना बांगलादेशातील सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड डेव्हलपमेंटचे सलीमुल हक म्हणतात, ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंजच्या भूमिका समस्या केवळ सौम्य शब्दात मांडण्याची आहे, पण आर्थिकदृष्ट्या विकलांग असलेल्या राष्ट्रांना श्रीमंत देशांची जबाबदारी आणि भरपाई यांची गरज जास्त आहे. ‘नॉर्वेचे मानसशात्रज्ञ आणि राजधुरीण स्टोकेंस यांनी नेत्यांच्या उदासीनतेची पाच कारणे मांडली आहेत व ती आहेत; डिस्टन्सिंग, डूम, डिसोनन्स, डेनियल आणि आयडेन्टिटी. हवामान बदल ही दूरची गोष्ट आहे असे वाटत असतानाच, आपल्याला आपत्तीची भीती वाटते आणि आपण अपराधी भावनेने हा विषय टाळतो. आपल्या चंगळवादी वृतीतून उमटणारे आपसातील मतभेदाचे सूर आपसात समजून न घेता आपण वैयक्तिक दैनिक जीवन सुशेगात जगू पाहतो. फ्रान्समध्ये तर आंतरदेशीय विमान वाहतूक कमी करून रेल्वे गाड्यांना उत्तेजन देण्यामागे हेच कारण आहे. आपली जीवनशैली बदलली तर आपली ओळख कमी पडेल, हे भय उराशी बाळगीत आपण जगतो. या साऱ्यांचा दुष्परिणाम जैवविविधता, मानवी समता, सामाजिक न्याय, नैसर्गिक विकास या घटकांवर होतो. प्रत्येकाने आपल्या कार्बनच्या पाऊलखुणा मोजून सजग झाले पाहिजे. संशोधकांनी दिलेले पर्याय समजून घेण्याची आणि त्याचा अवलंब करण्याची ही तातडीची वेळ आहे.
आपल्या मनोगतात, ग्रेटा आवाहन करते की आशेची अपेक्षा इतरेजनांकडून करण्यापेक्षा आपण स्वत:ला विचारू या की आपण जो बदल घडत आहे तो स्वीकारायला तयार आहोत का? बदल आशा पल्लवित करतो व आशा बदल घडवून आणते. अर्थात त्यासाठी कार्यशीलतेची गरज असते. हवामान बदल ही समस्या आहे नि संकट हे संकट असते, तिने या ग्रंथात आपण काय करू शकतो याची भलीमोठी यादी दिलेली आहे. ती प्रत्येकाने वाचायला हवी आणि स्वत:ला बदल घडवण्यासाठी सक्षम केले पाहिजे.

Previous Post

विकासपुरुष नामुअप्पांच्या गावात

Next Post

‘अनुराग’ लाल के हसीन सपने!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

‘अनुराग’ लाल के हसीन सपने!

कमाल कारागिरीच्या कुशलतेची!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.