• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

करिअरची गवसली वाट

- संदेश कामेरकर (धंदा म्हणजे काय रे भाऊ!)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 27, 2023
in धंदा म्हणजे काय रे भाऊ!
0

बांबूचं भविष्य डोळे दिपवून टाकतं, पण या कामगिरीचं यश अवलंबून आहे ते योग्य प्रजातीच्या निरोगी बांबू कलमांवर. आणि हे मिलिंद दिगंबर पाटील यांनी अचूक हेरलं आहे. ग्राहकाभिमुख व्यवसायात न उतरता सप्लाय इंडस्ट्री हा व्यवसायासाठी एक उत्तम पर्याय आहे, याचं उदाहरण सह्याद्री नर्सरीने आपल्यासमोर ठेवलं आहे.
– – –

कोकणात कुडाळला गेलो असताना एका फलकाने लक्ष वेधून घेतले, सह्याद्री बांबू नर्सरी. माझं कुतूहल जागृत झालं, कारण आजवर विविध फुलझाडं, शोभेची झाडं, रोपं, फळांच्या नर्सरी माहिती होत्या, पण केवळ बांबूची नर्सरी कशी असते, असा प्रश्न मनात डोकावला. हा व्यवसाय नक्की कसा चालतो, त्यातून उपलब्ध संधी काय, हे समजून घेण्यासाठी नर्सरीचे संस्थापक मिलिंद पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या व्यवसायाविषयी जाणून घेतले.
ते म्हणाले, ‘आमच्या कुडाळ तालुक्याला जंगलाचं वरदान आहे, विविध झाडं-वेलींसोबतच पक्षी, वन्य प्राणी यांचा जंगलात मुक्त संचार आहे. सिंधुदुर्गातील हत्ती-मानव संघर्षाबद्दल गेल्या काही वर्षांपासून आपण ऐकत आहोतच. माझ्या आठवणीप्रमाणे मी आठ-दहा वर्षांचा असताना पहिल्यांदा हत्तींनी शेतात धुडगूस घातल्याची बातमी ऐकली होती. वर्षा-दोन वर्षांतून बिबट्या आल्याच्या वावड्या उठायच्या. भीती वाटायची, तरीही जंगलाच्या परिसरात वाढत असल्याने झाडांकडे, प्राण्यांकडे माझा ओढा होता. आमच्या शाळेतल्या मुलांना प्रश्न विचारला, मोठेपणी कोण होणार तर हमखास उत्तर यायचं, मुंबईला जाऊन नोकरी करणार. याचा अर्थ गाव सोडणार? मला नवल वाटायचं, कुळागार नसताना माणसं राहतातच कशी असा प्रश्न पडायचा. कुळागार म्हणजे इंग्रजीत ज्याला होम गार्डन म्हणतात ते. कोकणातील घराभवती हे कुळागार असतं, घराच्या बांधकामासाठी लागणारे लाकडी वासे, जनावरांच्या चार्‍या्साठी लागणारी वैरण, मसाले, औषधी, गरजेपुरती भाजी, औषधी वनस्पती असं सगळं कुळागारात असतं. रोजच्या स्वयंपाकात केवळ तेल आणि मीठ एवढंच काय ते विकतचं. ही श्रीमंती शहरात नाही. हे वैभव सोडून शहरात जाऊन नोकरी करायची? छ्या, आपल्याला नाही करायचं हे, आपलो कोकणच बरो असा.
माझा जन्म कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे झाला. आईवडील दोघेही शासकीय नोकरीत होते. बहीण आणि मी अशी दोन भावंडं. जिल्हा परिषद शाळेत माझं शिक्षण झालं. २०१०ला बारावी सायन्स उत्तीर्ण झाल्यावर, कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे बीएससी फॉरेस्ट्रीला प्रवेश घेतला. माझे अनेक मित्र मेडिकल-इंजिनीअरिंगला गेले. मी अभ्यासात हुशार होतो, मी करिअरची शहरी वाट सोडून जंगलाची कास धरली, तेव्हा अनेक मित्रांना या निर्णयाचं आश्चर्य वाटलं. त्यांचं म्हणणं होतं की चार वर्षांच्या कोर्सच्या कालावधीत जंगलातील झाडाफुलांची नावं आणि माहिती याशिवाय काय असेल त्यात! माझ्यासाठी मात्र जे आजवर पहात मोठा झालो त्याचा सखोल अभ्यास करणं रंजक होतं. भूशास्त्र, जीव रसायनशास्त्र, जंगल लागवड, जोपासना, जंगलात आढळणार्‍या सर्व सजीवांचा अभ्यास- ज्यात झाडे वेली फुले फळे प्राणी पक्षी निरनिराळ्या आदिवासी प्रजाती या सगळ्यांचा समावेश असतो. यासोबतच जंगलविषयक धोरणे, कायदे, जंगलातून मिळणार्‍या उत्पादनाचा उपयोग या पैलूंचा समावेश असतो. तीन वर्षे क्लासरूम लर्निंग आणि शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट. यातल्या शेवटच्या वर्षात मी अधिक रमलो. पीक पाणी, जंगली प्राण्यांचा धुडगूस, उत्पन्न, बाजारात असणार्‍या संधी याबद्दल शेतकर्‍यांकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करायला आवडायचं. कृषी कॉलेजात जाणारी पोरं म्हणून शेतकरीही उत्साहाने आम्हाला माहिती द्यायचे. या गप्पांतून शेतीविषयी इनसाइट्स मिळत गेल्या. जंगल आणि शेती हे पस्परपूरक आहेत. जंगल प्राण्यांसाठी आणि शेती माणसांसाठी असं सर्वसाधारण विभाजन आहे. जेव्हा हा समतोल बिघडतो, तेव्हा दोन्ही प्रजाती आक्रमक पवित्रा घेतात. त्यामुळे, जंगल वाचवायचं असेल तर शेती वाचवली पाहिजे आणि शेती वाचवायची असेल तर विवेक वापरून शेती केली पाहिजे, असं वाटू लागलं.
आपल्याकडे होतं काय की एखाद्या गोष्टीत यश आहे म्हटल्यावर सगळे तिकडे धाव घेतात, शेतीही त्याला अपवाद नाही. आंबा, काजू यांना भाव आहे म्हटल्यावर सगळे आंब्याची कलम लावतात. त्याचे बाजारभावावर होणारे परिणाम, पुढच्या काही वर्षांत होणारे हवामान बदल, जमिनीचा कस यावर विचार होत नाही, परिणामी हळुहळू उत्पन्न घटत जातं आणि उत्पन्न नसेल तर पुढची पिढी शेती करणार नाही. पण केवळ अर्थकारणाचा विचार करून रासायनिक शेती केली, तर चारसहा कापण्यांमध्ये जमिनीचा पोत कमी होईल आणि त्यानंतर शेतीसाठी ती जमीन नापीक होईल. यासाठी पीक असं हवं जे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असेल, नेहमीच्या शेतीसोबत काढता येईल आणि जमिनीसाठीही लाभदायी असेल. असं पीक कुठलं याच्या मी शोधात होतो. तेव्हा आढळलं की कोकणात शेताच्या बांधावर बांबू लागवड केली जाते. कोकणातील हवामान, हवा खेळती असणारी जमीन हे बांबूवाढीसाठी पोषक आहे. यासोबतच औद्योगिक क्षेत्र, फर्निचर, कारखान्यांत बांबूचे अनेक उपयोग आहेत. केळी, द्राक्षे, डाळिंब यांच्या बागांमध्ये आधारासाठी बांबू लागतात. रोजच्या पूजेतील अविभाज्य घटक असणार्‍या अगरबत्तीच्या काड्या बनवण्यासाठी बांबू लागतो. आपलं कोकण बांबूवाढीसाठी अनुकूल असूनही आंबा, काजू, नारळी, पोफळी, फणसापलीकडे इथला शेतकरी जात नव्हता. याचं प्रमुख कारण म्हणजे माहितीचा अभाव.
यावर उपाय म्हणून मी घरच्या शेतात बांबूची कलमं करायला सुरुवात केली, वेगवेगळी कलमं लावून प्रयोग करू लागलो आणि ज्या शेतकर्‍यांना बांबू लागवड करायची असेल, त्यांना माफक दरात रोपे देऊ लागलो. अगदी छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू केला. कॉलेजसोबत हा व्यवसाय मी सुरूच ठेवला. जोडीला त्यात काही प्रयोग करत राहिलो. बीएससीच्या शेवटच्या वर्षाचं प्रोजेक्ट सबमिशन झाल्यावर एमएससीही फॉरेस्ट्रीमधे करण्याचं ठरवलं. ‘वन्य प्राण्यांनी होणारं शेतीच नुकसान आणि उपाय’ हा माझा एमएससी प्रोजेक्टचा टॉपिक होता. सोबत बांबू नर्सरीही सुरू होती.
एमएससीनंतर काय असा सवाल होता, मला गावातच राहून काहीतरी करायचं होतं. जंगल आणि प्राणी हा माझ्या आवडीचा विषय. या विषयात काम करण्याचे दोन मार्ग आहेत, पहिला आहे धोरण तयार करून अंमलबजावणी करून घेण्याचा. हा बराचसा ऑफिस जॉब असतो. तर दुसरा मार्ग आहे, पूरक व्यवसाय करणे. मी दुसरा मार्ग निवडला. घरी आईवडील दोन्ही शासकीय नोकरीत असूनही मुलांनी नोकरीचा सुरक्षित कोश निवडावा, असा त्यांचा आग्रह नव्हता; तुम्हाला आवडेल ते करा असं त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिलं. घरची चार एकर सामायिक शेती होती, लहानपणापासून तिथे खेळत होतो, मग छोटी छोटी कामं करू लागलो. त्यामुळे असेल कदाचित की ऑफिस जॉबची कधीही भुरळ पडली नाही. २०१५-१६चा तो काळ होता. कोकणात बांबू लागवड क्षेत्र वाढत होतं, आधी कुठल्याही प्रकारच्या बांबूची लागवड केली जायची; पण उद्योगधंदे आणि कारखान्यांसाठी बांबू पुरवायचे, तर शेतकर्‍यांना बांबू लागवडीसाठी बांबूंच्या योग्य जातीच्या निरोगी कंदांची गरज वाटू लागली. म्हणजे केवळ सरसकट उगवेल तो बांबू व्यावसायिकदृष्ट्या उपयोगाचा नव्हता. योग्य प्रजातीचा योग्य लांबी असलेला बांबू आर्थिक लाभ देणारा होता. असा बांबू आणायचा कुठून, हा प्रश्न व्यावसायिक आणि शेतकरी दोघांपुढे असतो. आपण म्हणतो ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसंच जर योग्य प्रजातीच्या सुयोग्य कलमाची लागवड केली तर अपेक्षित बांबू उगवतो. माझ्या नर्सरीत प्रयोग करून वाढविलेल्या बांबूची योग्य निगा राखल्यास अपेक्षित बांबू तयार होत होता आणि म्हणून मागणी आणि पुरवठा यातलं अंतर कमी करावं, यासाठी मी नर्सरीच काम वाढवण्याचं ठरवलं. तरीही फक्त बांबूची नर्सरी का, या प्रश्नावर मिलिंद म्हणाले, यासाठी आपल्याला बांबूच अर्थकारण थोडं समजून घेतलं पाहिजे. आज जगातील बांबूचा व्यापार सुमारे २०० कोटी डॉलर एवढा आहे. त्यातील ६५ टक्के वाटा एकट्या चीनचा (११२ कोटी डॉलर) आहे. त्याखालोखाल इंडोनेशिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स आणि ब्रह्मदेश. भारत सोळाव्या स्थानावर (वाटा २१६ लाख डॉलर). या सर्व देशांचा देशांतर्गत बांबूवापरही लक्षणीय आहे. आपण मात्र आपल्याला लागणार्‍या बांबूपैकी निम्मासुद्धा उत्पादित करीत नाही. बांबू लागवडीचं सर्वाधिक जागतिक क्षेत्र भारतात असूनही कोट्यवधी रुपयांचा बांबू आपण आयात करतो. एक वेगळं उदाहरण देतो, बाटलीबंद फळांचा रस आणि शेतात पिकलेली रसाळ फळे यात पौष्टिकता कशात असेल तर शेतातल्या फळात. सोन्याच्या मोहरा घडवणारा सोनार आणि खाण यातील सोन्याच्या गुणवत्तेवर त्यातल्या त्यात अधिक शुद्ध सोनं कुठून येईल? सोन्याची खाणीतून. तसचं बांबू म्हणजे हिरवं सोनं आहे. कारण, सर्व प्रकारच्या जमिनीत याची लागवड करता येते. कर्बवायू शोषून मुक्तपणे प्राणवायू हवेत सोडणारा, जमिनीतून वाहणार्‍या पाण्यातील गढूळपणा मुळांमध्ये अडकवून शुद्ध करणारा बांबू पर्यावरण संवर्धनासाठी फायदेशीर आहे. अनेक वृक्षांपेक्षाही अधिक जैवभार देणारा, जमिनीची धूप थांबवणारा, याचबरोबर लाकडाला उत्तम पर्याय आहे. आलं, हळद, भाजीपाला ही आंतरपिके बांबूसोबत पिकवता येतात. बांबूमुळे जमिनीची धूप कमी करून पर्यावरण समतोल राखण्यास मदत होते. बांबूपासून घर, छप्पर, चटई, टेबल, पंखा हातमाग वस्तू, प्लाय, दागिने, टाईल्स, वाद्य यंत्र, अगरबत्ती, कपडे, एक्स्पोर्ट दर्जाचे कपडे बनवायला उपयोग होतो. इथेनॉल बनवता येतं. आता देशाच्या पेट्रोलियम खात्याने २० टक्के इथेनॉलचं पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यातून इंधन गॅस तयार करता येतो. बायोमास आणि पेपर इंडस्ट्रीसाठी बांबू आवश्यक आहे. याचसोबत बांबू लागवडीसाठी पूर्वी आवश्यक असणार्‍या परवानग्यांच्या कचाट्यातूनही या पिकाची आता मुक्तता झाली आहे. भारतात बांबू आयातीवर असलेला कर वाढवल्याने, कारखान्यात इथे पिकविलेल्या बांबूला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भारतात पिकविलेल्या बांबूला भारतीय बाजारपेठ सहज उपलब्ध झाली आहे. यासोबतच जागतिक बाजारपेठ खुली आहेच. पीकवैविध्य, जमीन-पर्यावरण संवर्धन आणि सधन शेतकरी ही उद्दिष्टं साध्य करण्यासाठी बांबू हे महत्वाचं पीक आहे, असं मला वाटतं. त्यामुळे या क्षेत्रात काम करायचं ठरवल्यावर केवळ उत्कृष्ट बांबूची कलमं निर्माण करणं हे मी माझं कार्यक्षेत्र निश्चित केलं आणि त्यात इतर व्यवधानं नकोत, म्हणून फक्त खास बांबूची नर्सरी असलेली ‘सह्याद्री बांबू नर्सरी’ सुरू केली.
मी नर्सरी सुरू केली आणि ती बांबूसारखी भरभर वाढत गेली असं मात्र झालं नाही. ही नर्सरी सुरू केल्यावर अनेक चॅलेंजेसना आम्हाला सामोरं जावं लागलं. नर्सरी सुरू केल्यावर पहिल्याच खेपेस लावलेली सगळी लागवड पाण्याखाली गेली आणि पाच हजार बांबूच्या कलमांचे नुकसान झालं. लहान प्रमाणावर नर्सरी चालवणं तुलनेने सोपं होतं. पण मोठ्या प्रमाणात कलमांची लागवड सुरू केली, तेव्हा ज्या तांत्रिक बाबी लक्षात घ्यायला हव्या होत्या, त्यांच्याकडे अनवधानाने दुर्लक्ष झाल्याने पहिल्याच वेळेस एवढ्या मोठ्या नुकसानाला सामोर जावं लागलं. पुढल्या एकदोनच वर्षांत त्या तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा करून आम्ही ते सगळं नुकसान झपाट्याने भरून काढलं. माझ्या चार एकर जमिनीमध्ये मी सुमारे ४० प्रकारच्या बांबू प्रजातींची लागवड करतो. यातल्या प्रत्येक प्रजातीचं वैशिष्ट्य आहे. काही प्रजाती केवळ फर्निचर बनवण्यासाठी वापरल्या जातात, काही शेतांमध्ये वापरल्या जातात, तर काही इतर उद्योगधंद्यांसाठी उपयोगी असतात. माझ्याकडून कलमं घेऊन जाणारा शेतकरी नक्की कुठल्या व्यवसायासाठी उपयोगी ठरणार्‍या बांबूची लागवड करणार आहे. त्यानुसार मी त्यांना बांबू-लागवडीच्या प्रजाती ठरवण्यास मदत करतो. केवळ नर्सरी सुरू करून बांबू लागवड वाढणार नाही, तर शेतकर्‍यांना यासंदर्भात माहिती देणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही कार्यशाळा आयोजित करतो, ‘अ‍ॅग्रोवन’सारख्या शेतीसंबंधी माहिती देणार्‍या वृत्तपत्रात वेळोवेळी मी बांबू लागवडीविषयी माहिती देणारे लेख लिहिले आहेत. आपल्याकडचा शेतकरी अस्मानी सुलतानी संकटातून तावून सुलाखून निघालेला असतो. त्याला नवीन लागवडीविषयक इत्थंभूत माहिती असल्याशिवाय तो पाऊल पुढे टाकणार नाही. त्यामुळे नवनवीन शेतकर्‍यांना योग्य माहिती देणे, हा मी नर्सरी चालवण्याचाच एक भाग समजतो. मी देतो ती साधारण माहिती अशी, बांबू लागवड केल्यापासून साधारण पाचव्या वर्षापासून उत्पन्न यायला सुरुवात होते. बांबू शेतीसाठी खर्च कमी येतो. पाण्याची गरज केवळ पहिले दोन-तीन वर्षे असते. त्यानंतर ४० वर्षे हे पीक शेतकर्‍याला प्रतिहेक्टरी दोन ते अडीच लाख रुपये उत्पन्न देऊ शकते. म्हणजे आज केलेली लागवड ही पुढच्या चाळीस वर्षांसाठी तुम्ही केलेल फिक्स्ड डिपॉजिट आहे. आज चीनमध्ये ७० टक्के लाकडाला पर्याय म्हणून बांबूचा वापर केला जातोय, तो भारतामध्ये १० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यातून बांबूच्या शेतीला आपल्या देशात किती संधी आहे, हे लक्षात घ्या. इतर शेतकी उत्पादनासोबत संपूर्ण राज्याने जरी बांबू लागवड केली तरीही बाजारभाव कोसळणार नाही, इतकी या पिकाची भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत मागणी आहे. फक्त कलमं विकून आमचं काम थांबत नाही.
आमच्याकडून बांबूची कलमे घेतल्यापासून पीक येईपर्यंत येणार्‍या अडचणीत मदत करण्यासाठी आम्ही उपलब्ध असतो. अगदी नवख्या शेतकर्‍याला बांबू लागवड करायची असेल तर त्यासाठी छोटं वर्कशॉप आपण घेतो. दोन इंच जाड आणि २५ ते ३० फूट वाढणार्‍या माणगा बांबूला बाजारात मागणी आहे. कोकणच्या जमिनीत माणगा बांबू उत्तम पिकतो. एक नग बांबूची किंमत सत्तर रुपयांपासून पुढे आहे. जितकी काठीची उंची अधिक तितकी बांबूची किंमत वाढते. उंच, जाड आणि भरीव बांबू जवळजवळ सर्व उद्योगात वापरला जातो. माणगा लागवडीला आम्ही उत्तेजन देतो, कारण ही हमखास फायदेशीर आणि कमी निगा राखूनही चांगलं पीक देणारी प्रजाती आहे.
व्यवसाय कुठलाही असो, तो एका माणसाच्या बळावर उभा राहत नाही. मी व्यवसाय करायचा ठरवला, तेव्हा शिक्षणाने जरी पोस्ट ग्रॅज्युएट असलो, तरी वयाने अनुभवाने लहान होतो. व्यावसायिक पार्श्वभूमी नव्हती. व्यवसायासाठी लागणारं मनुष्यबळ कसं मॅनेज करायचं, याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होतो. घरच्या अडचणी, सणवार, लग्नकार्य यासाठी वारंवार सुट्या घेणार्‍या कारागीरांना शिस्त लावणे हा कामाचा महत्वाचा भाग होता. तुमचं वय, अनुभव आणि तुमच्याकडे येणारा ग्राहक या सगळ्याचा प्रभाव तुमच्या कामगारवर्गावर पडतो. कामगार व्यवसाय उभा करू शकतात, तसंच उभा व्यवसाय आडवाही करू शकतात. त्यामुळे तुमचं प्रॉडक्ट कुठलंही असो, त्या प्रॉडक्टसोबत योग्य कामगार हेरणे, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करणे, त्यांचं सहकार्य मिळवणे या गोष्टी मी आजवरच्या प्रवासात शिकलो, अजूनही शिकतो आहे. माझ्या एका नर्सरीवर आज अनेक शेतात बांबू लागवड होते, त्यामुळे नर्सरी मेंटेनन्स हा २४ तास लक्ष देण्याचा विषय आहे. हे काम एकट्याने होणं शक्यच नाही. माझे सहकारी कामगार, कुटुंब यांच्यासोबत माझी पत्नी सिद्धी पाटील, तिचे पदव्युत्तर शिक्षण सांभाळून आमच्या नर्सरी व्यवसायाची सूत्रे देखील सांभाळते.’
बांबू लागवडीत यापुढे लक्षवेधी असे काय, या प्रश्नाला उत्तर देताना मिलिंद पाटील म्हणाले, बंगळूर येथे तयार होणारे केंपेगौडा टर्मिनल-२ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ संपूर्णतः बांबूने बनवले आहे. संपूर्ण बांबूपासून असणार्‍या या टर्मिनलला गार्डन टर्मिनल असे नाव देण्यात आले आहे आणि यावर्षी ११ नोव्हेंबर रोजी त्याचे उद्घाटन होऊन ते कार्यरत होईल. यासाठी इंजिनियर्ड बांबू बनवण्यात आला आहे. इंजिनियर्ड बांबू म्हणजे बांबूपासून पुन्हा एका विशिष्ट प्रकारचा बांबू तयार करणे. ज्यामुळे त्याच शेल्फ लाइफ आणि स्ट्रेंथ वाढवता येते, समान गुणधर्म असणार्‍या या बांबूपासून भिंती, जमीन, छप्पर, खांब अशा बर्‍याच गोष्टी बनवण्यात आल्या आहेत. असा बांबू तयार करण्यासाठी जो विशिष्ट प्रकारचा बांबू हवा. तो आपल्या देशात नाही, त्यामुळे तो आयात करण्यात आला. पण हे विमानतळ बांबू उद्योगास चालना देणार ठरेल. बांबूपासून जर आंतरराष्ट्रीय विमानतळ बनू शकतं, तर कोणतीही वास्तू उभी राहू शकते. आपल्या देशात आजवर बांबू उद्योग यशस्वी झाला नाही याचं कारण, आजवर बांबूपासून बनवलेल्या वस्तूंना सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. गरीबांची बांबूची झोपडी आणि श्रीमंतांचा सिमेंट काँक्रीटचा बंगला अशी वर्गवारी होती. पण आज अभिनेता अमिताभ बच्चनपासून उद्योगपती रतन टाटांपर्यंत अनेक लोक बांबूच्या वस्तू घरात वापरत आहेत आणि त्याचा प्रचार देखील करत आहेत. या सर्व प्रयत्नांनी येत्या काळात बांबूपासून हॉटेल्स, कॉटेजेस, फर्निचर आणि इतर साहित्य बनवून घेण्यास येत्या काळात प्राधान्य दिलं जाईल. याने बांबूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. या मागणीचा पुरवठा करण्यासाठी बांबू लागवडीला महत्त्व येईल. माझं उद्दिष्ट आहे की जेव्हा जेव्हा सुयोग्य बांबू कलमं निवडण्याची वेळ येईल तेव्हा माझ्या सह्याद्री बांबू नर्सरीचं नाव अग्रस्थानी असावं.’ सरळसोट वाढत जाणार्‍या बांबूचं भविष्य डोळे दिपवून टाकतं, पण या नेत्रदीपक कामगिरीचं यश अवलंबून आहे ते योग्य प्रजातीच्या निरोगी बांबू कलमांवर. आणि हे मिलिंद दिगंबर पाटील यांनी अचूक हेरलं आहे. प्रत्येक वेळेस ग्राहकाभिमुख व्यवसायात न उतरता सप्लाय इंडस्ट्री हा व्यवसायासाठी एक उत्तम पर्याय आहे, याचं उदाहरण सह्याद्री नर्सरीने आपल्यासमोर ठेवलं आहे. आपली आवड, आपलं शिक्षण आणि बाजारपेठेची मागणी याचा योग्य अभ्यास केला तर व्यवसाय आणि विकास याची विवेकपूर्ण सांगड घालणं मराठी तरुणांना अवघड नाही.

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

मराठी साहित्य संमेलनाची मंगळ-वारी!

Related Posts

धंदा म्हणजे काय रे भाऊ!

मुंढेबाईंचा बहुगुणी बटवा

October 5, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

स्वच्छ ताजे मासे, साफ करून घरपोच!!

September 21, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

जुनाट लाँड्री व्यवसायावर नावीन्याची कडक इस्त्री!

August 24, 2023
जगात भारी, चप्पल कोल्हापुरी!
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

जगात भारी, चप्पल कोल्हापुरी!

July 13, 2023
Next Post

मराठी साहित्य संमेलनाची मंगळ-वारी!

गरज आहे जोरदार यशाच्या किकची!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.