• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

स्वप्नांचा पाठलाग करणारे `बटरफ्लाय’

- संदेश कामेरकर (सिने परीक्षण)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 8, 2023
in मनोरंजन
0
स्वप्नांचा पाठलाग करणारे `बटरफ्लाय’

नवर्‍याने पैसे कमावून आणायचे आणि बायकोने घर सांभाळायचे हा आपल्या समाजातील पारंपरिक समज. बायको घरीच असते, म्हणजे ती ‘काहीच करत नाही’ असं पुरूष किती सहजतेने सांगतो! काळ बदलला आता हाऊसवाइफचं अंमळ सन्माननीय वाटणार्‍या होममेकरमध्ये रूपांतर झालंय… पण हे म्हणजे अपंगांना दिव्यांग आणि घरकामगारांना मदतनीस म्हणण्यासारखं आहे… फक्त नावात बदल. घराच्या थँकलेस जबाबदारीत तिच्या स्वत:च्या स्वप्नांचं काय? घरच्या जबाबदारीत स्त्रीचं सत्त्व कुठे हरवते आहे का? ‘बटरफ्लाय’ हा सिनेमा यावरच भाष्य करतो.
कागदापासून विविध आकारांचे पक्षी प्राणी बनवणार्‍या जपानी ओरिगामी कलेतून चित्रपटाची नामावली प्रस्तुत होते. ही कल्पना खूप छान आहे. सिनेमाची गोष्ट मध्यमवर्गीय घरातील आहे. नवरा-बायको, मुलगी अनन्या आणि सासरे असं हे चौकोनी सुखवस्तू कुटुंब. विराज देशपांडे (अभिजित साटम) व्यावसायिक असून तो व्यवसायवाढीसाठी एका परदेशी गुंतवणूकदारासोबत मीटिंगांमध्ये व्यग्र आहे. त्याची हाऊसवाइफ मेघा देशपांडे (मधुरा वेलणकर-साटम) ही अनन्या (राधा धारणे) आणि सासर्‍यांची (प्रदीप वेलणकर) काळजी घेत, घरातल्या सर्व जबाबदार्‍या पार पाडणारी एक आदर्श गृहकृत्यदक्ष गृहिणी. मेघामध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे. कोणतीही गोष्ट करताना त्यातून पुढे काय वाईट घडू शकतं याचा ती फार विचार करते. आरंभशूर असणे हाही तिच्यातील एक अवगुण. गाणं शिकायला जाणे असो की कुकिंग क्लास, मेघाची हजेरी फक्त सुरुवातीचे दोन दिवस लागते. यावरूनही घरातील सगळे तिची मस्करी करतात.
मुलीच्या गणिताच्या क्लासच्या निमित्तानं मेघाची ओळख बॅडमिंटन खेळणार्‍या मॉर्डन महिलांच्या ग्रुपसोबत होते. बॅडमिंटनशी मेघाच्या बालपणीच्या आठवणी गुंफलेल्या आहेत. हाच नॉस्टॅल्जिया अनुभवायला ती घरच्यांच्या नकळत बॅडमिंटन क्लासला प्रवेश घेते (इंग्लिश विंग्लिशची आठवण झाली ना?). अर्ध्यात क्लास सोडला तर पुन्हा आपलं हसं व्हायला नको, म्हणून कुणाला सांगत नाही. क्लासमध्ये तिची एका शिस्तप्रिय कोचशी (महेश मांजरेकर) गाठ पडते. सलग दहा दिवस यायचं आणि बॅडमिंटन कोर्टला धावत राऊंड मारायचे, तरच अकराव्या दिवशी बॅडमिंटन खेळायला मिळेल ही कोच सरांची पहिली अट. या अटीमुळे मेघा घरातल्या सगळ्या अडचणींवर मात करून क्लासला यायचा प्रयत्न करते. पण कोणत्याही वेळी घरातील जबाबदारी आनंदाने उचलणारी हाऊसवाइफ पूर्वकल्पना न देता अचानक स्वतःसाठी वेळ काढू लागली, तर घरात काय गहजब उडेल ना!
क्लास बुडू नये म्हणून मेघा अमेरिकेतून मुलीच्या लग्नाची खरेदी करायला आलेल्या नणंदेबरोबर खरेदीला जाणे टाळते. असे इतरही प्रसंग घडतात. पण आयुष्यात पहिल्यांदा मेघा नवर्‍याशी खोटं बोलते आणि ते उघडकीस येतं तेव्हा घरात वादळ निर्माण होतं. या वादळात मेघा आणि विराजचा संसार टिकतो का? तिच्या बॅडमिंटन क्लासचे दहा दिवस पूर्ण होतात का आणि मेघामधल्या सुरवंटाला फुलपाखरू बनून उडायची संधी मिळते का, याची उत्तरे या चित्रपटात मिळतील.
विभावरी देशपांडे आणि मीरा वेलणकर यांनी सिनेमाची कथा सर्वसामान्य माणसाला आपली वाटेल अशी गुंफलेली आहे. त्यामुळे प्रेक्षक त्यात गुंतून राहील. मात्र सिनेमात ताणतणावाचे प्रसंग घडतात, तेव्हा आता काहीतरी मोठं घडेल असं वाटत असताना ते पेल्यातील वादळच निघते, तिथे काहीसा अपेक्षाभंग होतो. दिग्दर्शक मीरा वेलणकर यांचा जाहिरातविश्वाचा मोठा अनुभव आहे. यामुळे सिनेमातील प्रत्येक फ्रेम सुंदर आणि सुबक दिसते. चित्रपटाची लांबी दोन तासांची आहे. फार फाफटपसारा न दाखवता मुद्द्याची गोष्ट सांगून हा चित्रपट संपतो, हेही या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य.
सुरुवातीची आत्मविश्वास नसलेली मेघा ते बॅडमिंटन खेळताना तिला स्वत्व गवसणे हा बदल मधुरा वेलणकर साटमने जिवंत केला आहे. बायकोला नेहमी गृहीत धरणार्‍या नवर्‍याच्या भूमिकेत अभिजित साटमने उत्तम कामगिरी बजावली आहे. आरंभशूर मेघाला बॅडमिंटनमधून सातत्य आणि वचनबद्धता शिकवणारे शिस्तप्रिय कोच म्हणून महेश मांजरेकर मजा आणतात. बालकलाकार राधा धारणे, सानिया परचुरे आणि प्रदीप वेलणकर यांनी भूमिका छान साकारल्या आहेत. गीतकार वैभव जोशी यांनी लिहिलेलं, वैशाली भैसने माडे यांनी गायलेलं आणि शुभाजित मुखर्जी यांनी संगीतबद्ध केलेलं ‘कोरी कोरी झिंग’ हे गाणंही मस्त जमून आलंय.
घरकामात बुडालेल्या स्त्रीने आणि तिला गृहित धरणार्‍या कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा सिनेमा आहे.

Previous Post

सलगी देणे कैसे असे!

Next Post

जिन्हें नाज है हिंद पर, वो कहा है?

Related Posts

मनोरंजन

सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

May 5, 2025
मनोरंजन

पहिली ‘विनोदवीरांगना’!

April 18, 2025
मनोरंजन

रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

April 18, 2025
वन अँड ओन्ली भारत कुमार
मनोरंजन

वन अँड ओन्ली भारत कुमार

April 11, 2025
Next Post
जिन्हें नाज है हिंद पर, वो कहा है?

जिन्हें नाज है हिंद पर, वो कहा है?

स्वप्नांचा पाठलाग करणारे `बटरफ्लाय’

गुन्हेगारी राजकारणाचा चौक!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.