नरेंद्र मोदी
इतकी पॉवर दाखवून सुद्धा
असे कसे झाले शहा
त्यांचे घोडे आमच्या पुढे
अजून धूळ उडते पाहा
किती सभा, किती रोड शो
किती झाले साड्या वाटप
मतदारांनी पेकाट मोडले
भाजपाला केले लॉकअप
बजरंग दल, बजरंग बली
नाही आले कोणी कामी
मन की बात सांगूनसुद्धा
कसे ठरले ते कुचकामी
—– —– —–
अमित शहा
एकेक राज्य निसटत चालले
हाती घेऊनसुद्धा सोटा
असेच पुढे चालत राहिले
हातात काय राहणार घंटा?
अयोध्येत घातले साकडे
राम नाही कामी आला
इतक्या घंटा बडवून सुद्धा
आपलाच शेवटी रावण केला
मला तर अजून वाटते
शिकवू यांना चांगलाच धडा
केंद्र आपल्या हाती आहे
मी तर येतो घेऊन घोडा
—– —– —–
देवेंद्र फडणवीस
मला दाट शंका वाटते
दाढीचाच हा पायगुण नडला
नेतो तिथे येते अपयश
काय करू मी प्रश्न पडला
राज्यात सुद्धा धोका वाटतो
कसे करू यांना पुढे
वरून काय काहीही सांगतात
माझे सगळेच गाडे अडे
यांच्याबरोबर आमचीही गोची
यांना नाही लाजलज्जा
नाटक आता संपत आले
लवकर उडेल दारूण फज्जा
—– —– —–
एकनाथ शिंदे
भाजप कसाही असला तरीही
सरड्यासारखे चिपकून राहू
जेवढे खाता येईल तेवढे
त्याच्या संगती आम्हीही खाऊ
संकटात जो आमच्या मागे
आम्ही त्यांचे कायम नोकर
हाकलून दिले जरीही त्यांनी
राहू आम्ही नेहमी ब्रोकर
फडणवीसजी आहेत तापट
त्यांना चांगले बघवत नाही
त्यांच्यापेक्षा मोदी चांगले
माझे कौतुक करतात बाई
—– —– —–
आशिष शेलार
जेव्हा तिथे भाजप पडला
माझा घास तोंडात अडला
असे कसे झाले विनोद
असा कसा तो गडगडला
माझा पडका चेहरा पाहून
काहीजण सुसाट हसले
कॉमेंट केल्या वाटेल तशा
मलाच सारे टोचत बसले
गल्लीबोळात आमचेच स्थान
बोलायची काय गरज होती
सगळ्यांनाच ठाऊक आहे
माझी भुक्कड राजनीती