• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

केशकर्तनालय ते सॅलॉन

- संदेश कामेरकर (धंदा म्हणजे काय रे भाऊ!)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 18, 2023
in धंदा म्हणजे काय रे भाऊ!
0
केशकर्तनालय ते सॅलॉन

मराठी माणूस स्वतःबद्दल चांगलं सांगण्यात कमी पडतो. स्वत:बद्दल बोलायला लाजतो. व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर आपला ढोल आपल्यालाच वाजवावा लागतो. मी सिंगापूर अकॅडमी सर्टिफिकेट सलूनमध्ये लावलं. ‘जो दिखता है वही बिकता है’. भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे हे मराठी सेलिब्रिटी आणि इतर क्षेत्रातील अनेक नामांकित तारे माझ्याकडे हेअर कटिंगसाठी येऊ लागले. केश कर्तनालय ते हेअर क्राफ्ट सॅलॉन हा प्रवास करणारे तुषार चव्हाण सांगत आहेत.
– – –

साधी राहणी आणि उच्च विचार हे ऐकायला छान वाटतं असलं तरी स्पर्धेच्या युगात तुम्हाला काय येतं, यासोबतच तुम्ही कसे दिसता हेही खूप महत्त्वाचं ठरतं. रंग आणि उंची आपल्या हातात नाही, तरी व्यक्तिमत्त्व आकर्षक बनवणं मात्र आपल्याच हातात आहे. आकर्षक दिसण्याची पहिली पायरी म्हणजे चेहर्‍याला साजेशी केशरचना. साधा केसांचा भांग इकडचा तिकडे पाडला तरी चेहर्‍यात बदल जाणवतो. केशकर्तनाचे काम पूर्वी बारा बलुतेदारांपैकी एक असलेला नाभिक समाज करायचा. पण आज या व्यवसायाला ग्लॅमर प्राप्त झालं आहे आणि यामुळेच जातीधर्माच्या पलीकडे जाऊन या व्यवसायाकडे तरुण पिढी आज करीयर म्हणून पाहात आहे. श्मश्रू करण्यासाठी पेटी घेऊन फिरणारे नाभिक ते पर्सनॅलिटी मेकओव्हर करणार्‍या हेअर स्टायलिस्टपर्यंत हा व्यवसाय कसा पोहोचला, याचे मर्म जाणून घ्यायला मी केश कर्तनालय ते हेअर क्राफ्ट सॅलॉन हा प्रवास करणारे तुषार चव्हाण यांच्याशी संवाद साधला.
तुषार म्हणाले, ‘केस कापणे हा मागील तीन पिढ्यांपासून आमचा पारंपरिक व्यवसाय. आजोबांनी नायगाव दादर येथे १९४७ साली केशकर्तनालय सुरू केलं होतं. १२० स्क्वेअर फुटांच्या दुकानांमध्ये चार खुर्च्या, चार कारागीर अशी व्यवस्था होती. पण वडिलांना या धंद्यात रस नव्हता, त्यांनी प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी धरली. १९८५ साली प्रेस बंद झाल्यावर नाईलाजाने वडिलांना पुन्हा आमच्या पारंपारिक व्यवसायात यावं लागलं. वडिलांचा मूळ स्वभाव नोकरी करण्याचा होता. ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।।’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे गिर्‍हाईक स्वतःहून दुकानात येईल तेवढेच काम ते करायचे. व्यवसायवाढीच्या दृष्टीने काही गोष्टी कराव्या लागतात, हे धंद्यातील गमक त्यांना कळलं नव्हतं.
आईवडील, दोन बहिणी आणि मी असा आमचा परिवार. घरची परिस्थिती तशी बेताची होती. माझ्या आईचं नाव शैलजा. आईचं (जुनी मॅट्रिक) शिक्षण वडिलांपेक्षा जास्त होतं. आई व्यवहारकुशल होती, तिला शिक्षणाचं महत्त्व कळायचं, आम्हा तिन्ही भावंडांना ते तिने पटवून दिले. मला क्लासेस करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी आईने पाठिंबा दिला. कौटुंबिक, आर्थिक कोणतीही अडचणी आली की ती खंबीरपणे त्या अडचणींवर मात करायची. आईचेच गुण माझ्यात आलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वडील दरवर्षी मला प्रॉमिस करायचे की मी पाचवी पास झाल्यावर सायकल देईन; दहावी झालो, मग बारावी झालो, शेवटी पदवी मिळाली, पण सायकल मिळाली नाही. शेवटी मीच माझे पैसे कमावून सायकल घेतली होती. आज मागे वळून पाहताना असं वाटतं की काही गोष्टी सहज मिळाल्या नाही म्हणूनच संघर्ष करण्याची जिद्द मनात ठाण मांडून बसली.
शालेय शिक्षणात मी फिफ्टी-फिफ्टी होतो, म्हणजे अभ्यास केला तर मार्क मिळतील, नाही केला तर नाही मिळणार हे ठरलेलं. लहानपणी शाळेच्या मित्रांना केस कापायचे असतील तर माझ्या दुकानात घेऊन यायचो. वडील त्यांना थोडं कन्सेशन द्यायचे. कारागीर मित्रांचे केस कसे कापतात ते मी लक्ष देऊन पाहायचो. एखादा मूर्तिकार ओबडधोबड दगडातून सुबक मूर्ती घडवतो तशा पद्धतीने डोक्यावर अस्ताव्यस्त वाढलेल्या केसांवर चांगल्या कारागिराची कैची फिरते तेव्हा त्या वळणदार केसांमुळे त्या व्यक्तीचं रूपच पालटतं, हे पाहताना भारी वाटायचं. या कामात आवड निर्माण होऊ लागली. मला हे काम शिकवा असं वडिलांना सांगितलं, पण या व्यवसायात आता राम उरला नाही, तू शिकून नोकरी कर असं त्यांचं सांगणं होतं.
रत्नागिरीला वडिलोपार्जित जमिनीच्या कोर्ट केससाठी वडिलांना पंधरा दिवस गावी जावं लागायचं. त्यावेळी मी दुकानात बसून कारागीर काम कसं करतात याचं निरीक्षण करायचो. नायगाव दादरला पोलीस प्रशिक्षण आणि रहिवासी कॉलनी आहे. त्यामुळे आमचे बरेचसे ग्राहक तरुण पोलीस शिपाई असायचे. त्यांच्या केसांना पोलीस कट (याला पेहलवान कट असेही म्हटले जायचे) देण्यात आमचे कारागीर रामदास शिंदे यांचं नाव खूप फेमस होतं. हा कट झिरो मशीनने मारला जायचा. कैचीने कट केलेली लाईन आणि मशीनची लाईन जो चांगली एकरूप करेल तो चांगला कारागीर. हे काम सुरुवातीला मला जमत नव्हतं, पण निरीक्षण आणि सराव करून हे काम पहिल्यांदा जमलं तेव्हा वाटलं की या व्यवसायात आपल्यासाठी काहीही अवघड नाही. मग या कटमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करायला लागलो. काही दिवसांनी पोलीस कटचे ग्राहक माझ्यासाठी थांबू लागले. हळूहळू क्लासिक कट, हिप्पी कट या गोष्टीदेखील जमायला लागल्या.
मी पहिल्यांदा हातात कैची धरली, तेव्हाही हाथ थरथरले नाहीत. ही कैची म्हणजे माझ्या उत्पन्नाचं साधन आहे. ती जपली पाहिजे या जबाबदारीच्या भावनेने मी रोमांचित झालो. वडिलांच्या नकळत मित्रांना सलूनमध्ये आणून त्यांचे केस कापून प्रॅक्टिस करायला लागलो. न्हावी दुकानात चोपडी लिहायची पद्धत असते. कारागीर केस कापून व दाढी करून जितके पैसे मिळवतो, त्याची नोंद चोपडीत केली जाते. वडील गावी असताना मी केलेलं काम चोपडीत मांडलं गेलं होतं. गावावरून वडील परत आल्यावर त्यांनी हिशोब पाहिला, त्यांच्या लक्षात आलं की मुलाच्या नावावरही बरंच काम लिहिलं गेलं आहे. तेव्हा वडिलांना कळलं की मुलगा मोठा झाला आहे. तेव्हापासून ते दुकानात कोणी कारागीर नसेल तर मला बोलावू लागले. आमच्या व्यवसायात कारागीरांना त्यांनी केलेल्या एकूण कामाच्या पन्नास टक्के रक्कम दिली जाते. मला मात्र माझ्या कामाचा एकही रुपया वडिलांनी कधी दिला नाही. मला पैसे दिले तर मी नोकरी करण्याचा विचार सोडून हाच व्यवसाय करेन अशी भीती त्यांना असावी. मला मात्र पैशापेक्षा आवडीचं काम करायला मिळतंय याचंच अप्रूप वाटत होतं.
कॉलेज संपलं. मला सलूनमध्ये पूर्णवेळ काम करायचं होतं, पण वडिलांचा प्रखर विरोध होता. आज ना उद्या वडिलांचा विरोध मावळेल या आशेने वेळ काढण्यासाठी आयसीआयसीआय बँकेत नोकरी धरली. आठ हजार रुपये दरमहा पगार होता. तिथले माझे सहकारी आणि वरिष्ठांना केस कापायला आमच्या सलूनमध्ये घेऊन यायचो. काही दिवसांनी बँकेत माझ्या कारकुनी कामापेक्षा मी हेअरस्टाईल कशी मस्त करून देतो, याचीच चर्चा जास्त व्हायला लागली. काही महिन्यांनी बँकेतील एकसुरी कामाचा कंटाळा आला, दीड वर्षांनी नोकरी सोडली. वडिलांना कळल्यावर ते म्हणाले, मी तुला आशीर्वाद देतो की तू धंद्यात कधीही यशस्वी होणार नाहीस, तुला आयुष्यभर नोकरीच करावी लागेल.
काही दिवस घरी बसल्यावर मी पगारातील जमा पैसे आणि आईकडून थोडी आर्थिक मदत घेऊन आमच्याच एरियात एक स्टॉल भाड्याने घेतला. वर्ष होतं २००१. दहा हजार रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये महिना भाडे यावर मी माझं स्वतःचं सलून सुरू केलं. केस कापण्याचे पंधरा रुपये आणि दाढी करण्याचे सात रुपये असा दर मी आकारायचो. इथेच लहानाचा मोठा इथेच झालो असल्याने मला ओळखणारी भरपूर मुलं होती. तसंच माझं काम चांगलं असल्यामुळे ग्राहकांचा पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळाला. पण हा स्टॉल अनधिकृत असल्यामुळे दर तीन चार महिन्यांनी महानगरपालिकेची माणसे स्टॉल उचलून न्यायची. मग तो जाऊन सोडवून आणायचा आणि पुन्हा बस्तान बसवायचे, हा उद्योग असायचा.
धंदा चांगला चालत असला तरी इथे कामाचे पैसे लगेच मिळायचे नाहीत. पगाराला देतो असं सांगून लोक केस-दाढी करून जायचे आणि परत यायचे नाहीत. त्यामुळे आर्थिक ताळेबंद बसत नव्हता. तिकडे वडिलांच्या दुकानातील ग्राहक माझ्याकडे वळल्यामुळे त्यांनाही खोट बसत होती. वडिलांनी मला स्टॉल सोडून त्यांच्या दुकानात कामाला बोलावलं. त्यांच्याकडे पैसे न घेता वर्षभर काम केल्यावर इतर कारागीरांप्रमाणे मलाही कामाचा पन्नास टक्के वाटा मिळाला पाहिजे अशी मागणी मी वडिलांजवळ केली. त्यांनी ती मान्य केली.
सलूनच्या कामात हात बसल्यावर मला या व्यवसायातील नवीन गोष्टी शिकण्याची गरज वाटू लागली. माझे काका दामोदर चव्हाण डोंबिवलीला लेडीज हेअर कटिंग अकॅडमी चालवायचे. २००२ साली मी त्यांच्याकडे जाऊन लेडीज हेअर कटिंग, हेअर कलर ट्रेंड्स, केमिकल ट्रीटमेंट या गोष्टी शिकून घेतल्या. माझी होणारी बायको तन्वी मला या अकॅडमीमध्ये भेटली. ती सुद्धा इथे कोर्स करायला आली होती.
लेडीज हेअर कटिंग शिकून आल्यानंतर मी माझ्या ओळखीतील महिलांचे त्यांच्या घरी जाऊन हेअर कटिंग, हेअर डाय करायला लागलो. केस नेहमीच प्रथमदर्शनी नजरेस पडतात. माझ्या दर्जेदार कामामुळे माझ्या ग्राहकांना त्यांनी केस कुठे कापले, कलर कुठे केला याची विचारणा होऊ लागली. माऊथ पब्लिसिटीने मला नवनवीन ग्राहक मिळायला लागले. आमच्या व्यवसायात बदल होताना दिसत होते. जुन्या सलूनला मागे टाकत आधुनिक काळातील सॅलॉन लोकांच्या पसंतीस पडत होते. मलाही आमच्या ‘नॅशनल केशकर्तनालया’चं नूतनीकरण व्हावं असं वाटत होतं. मी वडिलांजवळ हा विषय काढला. ते म्हणाले, पैसे कुठून येणार, मी म्हणालो, बँकेतून लोन काढणार आहे. काहीशा नाराजीने वडिलांनी परवानगी दिली. सव्वा लाखाची कर्जाची फाईल सबमिट केली होती, पंच्याहत्तर हजार पास झाले. नूतनीकरणात दुकानाची तोडफोड करावी लागणार होती, ते वडिलांना सहन झालं नसतं, ते या कामावरून सतत माझ्याशी भांडत राहिले असते. म्हणून आईला सांगून मी वडिलांना तिच्यासोबत १५ दिवस गावी पाठवलं. जुन्या सलूनमध्ये प्रवेशद्वारावर अर्ध्या जागेत लाकडी पार्टीशन असायचं, ते तोडून मी सलूनचा आतील भाग दिसेल असं मोकळं प्रवेशद्वार बनवलं. काचा बदलल्या, नवीन हायड्रॉलिक चेअर विकत आणल्या, नावाचा बोर्ड नवीन बनवून घेतला, आकर्षक रंगकाम केलं, एलईडी लाईट्स लावल्या.
सलूनचे रुपडे बदलल्यावर काही ग्राहक म्हणाले की तू आता कामाचे पैसे वाढवशील. पण मी मात्र जराही दर वाढवले नाहीत, कारण माझं म्हणणं असं की ग्राहकाला तुमच्या जागेची, कामाची, व्यक्तिमत्त्वाची सवय लागू द्या, मग तो तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला द्यायला तयार होईल. काही जुन्या कारागीरांना सन्मानपूर्वक रजा दिली आणि काही नवीन कारागीर रुजू करून घेतले. माझ्या लग्नाला दोन महिने असताना, माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणारी एक घटना घडली, ती एका बाजूने दुर्दैवी आणि दुसर्‍या बाजूने सुदैवी असं म्हणता येईल. माझ्या वडिलांना अपघात होऊन त्यांचे घोट्याचे हाड मोडले. काही दिवसांनी ते बरे झाले, पण त्या अपघातानंतर त्यांनी आजवर कधीही कैची हातात घेतली नाही. वडिलांनी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाने व्यवसायाची सूत्रे माझ्या हातात आली. आज असं वाटतं की अजून दहा वर्षांनी वडिलांनी व्यवसाय माझ्याकडे सोपवला असता तर मी आज जिथे आहे तिथे नसतो. पण आज वडील माझ्या कामावर खूप खूश आहेत. महाराष्ट्रभर त्यांना माझ्याकडे शिकून गेलेले विद्यार्थी भेटतात.
२००५ला माझं लग्न झालं. मी लेडीज हेअर कटिंग ग्राहकांच्या घरी जाऊन करायचो, ते काम माझी बायको करायला लागली. मी सलूनच्या कामावर अधिक लक्ष द्यायला लागलो. पुरुषांचं सलून बंद असतं त्या दुपारच्या वेळेत महिला ग्राहक आमच्याकडे हेअर कटिंग करायला यायला लागल्या. त्यांची प्रसिद्धी होऊन या पद्धतीचे हेअर स्टाईल आम्हालाही शिकवा अशी विभागातील मुला-मुलींची मागणी होती. २००५ साली मी व्यवसायाला जोडधंदा म्हणून मी सलूनमध्ये दुपारी बारा ते तीन आणि सोमवारी पूर्ण दिवस या वेळेत हेअर कटिंग अकॅडमी सुरू केली. पण केस कापायला शिकणार्‍या शिकाऊ मुला-मुलींकडे केस कापायला कोण तयार होईल, हा प्रश्न उभा राहिला. यावर उपाय म्हणून आम्ही अकॅडमीमध्ये महिलांसाठी फ्री हेअर कटिंग अशी योजना सुरू केली. २००५ ते २०२३ असा गेली २१ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. यात कॉर्पोरेटमधे काम करणार्‍या, शिकलेल्या, उच्चभ्रू स्त्रियादेखील येतात. कारण आम्ही अनेक नवीन हेअर स्टाईल, हेअर कलर्सच्या ट्रेंड्सची चाचपणी आधी अकॅडमीमध्येच करत असतो. अगदी सुरुवातीला काही दिवस महिला आमच्या स्टुडंट्सकडून केस कापून घ्यायला बिचकत होत्या. पण आम्ही त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. मुलांना जेंट्स कटिंग शिकण्यासाठी त्यांच्या परिचयातील माणसांना आणायला सांगायचो. मुळात कोणत्याही विद्यार्थ्याने आज अकॅडमीत प्रवेश घेतला आणि उद्या त्याच्या हातात कैची दिली असं होत नाही. आमचा कोर्स तीन भागांत चालतो. आमच्याकडे विद्यार्थ्यांना थिअरी, प्रॅक्टिस आणि फ्लोर एक्सीपिरियन्स या तिन्ही गोष्टी शिकवल्या जातात. सगळं ज्ञान शिकल्यावर सगळ्यात शेवटी त्याच्या हातात कैची दिली जाते.
एक दिवस दोन समवयस्क मुली हेअर कटिंग करायला आल्या, काम झाल्यावर, ‘तुम्ही चागलं काम करता हां काका’ असं म्हणून गेल्या. स्वतः चांगलं दिसण्यापेक्षा आपलं काम चागलं दिसलं पाहिजे असा तोवर माझा समज होता. पण या घटनेने मला स्वत:मध्ये बदल करायला भाग पाडलं. मी ‘काका’ दिसतोय का हा प्रश्न मी स्वतःला विचारला. उत्तर मिळालं… होय!!! मग मी कपड्याची स्टाईल बदलली, व्यक्तिमत्त्व विकास, संभाषण कौशल्य शिकण्यासाठी गुंतवणूक केली. काळानुसार बदलत गेलो. या बदलांना ग्राहकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
ग्राहकांपैकी एक व्यक्ती मला कामाबद्दल, मी काय नवीन शिकतो आहे, व्यवसाय वाढविण्याचा काय विचार आहे याबाबत नेहमी प्रश्न विचारायची. मी आरंभशूर नाही, मी ग्राहकांप्रमाणे कर्मचार्‍यांनाही आदराने वागवतो. हाताशी फार भांडवल नसताना, मेहनत करून आणि अंगभूत हुशारीने मी ग्राहक वाढवत आहे हे पाहून त्या व्यक्तीने मला पार्टनरशिपची ऑफर केली. मराठी माणूस दुसर्‍याला मदत करत नाही, एकमेकांचे पाय ओढण्यात आनंद मानतो, असं मी ऐकून होतो, माझा हा समज खोटा ठरला. एका मराठी माणसाने माझ्या मेहनती स्वभावाकडे पाहून कोणतीही गॅरंटी न मागता माझ्या व्यवसायवृद्धीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. या पाठिंब्यामुळे मी २००७ साली भोईवाडा येथे मी माझी पहिली ब्रांच उघडली आणि आमची माझा व्यवसायवृद्धीचा नवीन प्रवास सुरू झाला.
आजूबाजूला जग वेगानं बदलत होतं. चित्रपट, सास-बहू सीरियलमधील फॅशनचं सर्वसामान्य लोक अनुकरण करत होते. आता काहीतरी नवीन शिकायला हवं असं प्रकर्षाने जाणवू लागलं. २००८ साली मी सिंगापूरला ‘टोनी अँड गाय’ या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घ्यायला गेलो. इतर प्रगत देशांच्या तुलनेत फॅशन क्षेत्रात आपण कुठे आहोत याचा अंदाज आला. सिंगापूरमधे सध्या काय हेअर फॅशन ट्रेंड सुरू आहे आणि ती फॅशन मुंबईत आणताना त्यात आपली स्टाईल मिसळून काय फ्युजन तयार करता येईल याचा विचार केला. कारण तिथली फॅशन जशीच्या तशी आपल्याकडे स्वीकारली गेली नसती. मी भारतात परतल्यावर इंटरनॅशनल हेअर स्टायलिस्ट ‘सिंगापूर रिटर्न’ शिक्का लागला.’
मराठी माणूस स्वतःबद्दल चांगलं सांगण्यात कमी पडतो. स्वत:बद्दल बोलायला लाजतो. व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर आपला ढोल आपल्यालाच वाजवावा लागतो. मी सिंगापूर अकॅडमी सर्टिफिकेट सलूनमध्ये लावलं. ‘जो दिखता है वही बिकता है’. तिथे शिकून आलेल्या स्टाईल भारतीय परंपरेत मिसळून प्रयोग करू लागलो. माझं काम नोटीस व्हायला लागलं. भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे हे मराठी सेलिब्रिटी आणि इतर क्षेत्रातील अनेक नामांकित तारे माझ्याकडे हेअर कटिंगसाठी येऊ लागले. माझे काही ग्राहक तर कल्याण, पुणे, नाशिकहून येत होते. त्यांना नायगाव आणि भोईवाडा येथील आमचे सलून येण्याजाण्यासाठी अडचणीचे ठरत होते. या सर्व गोष्टींचा विचार करून मी २०१० साली दादरला प्लाझा टॉकीजसमोर खांडके बिल्डिंगमधे तिसरी ब्रांच उघडायचे ठरविले. यावेळी सलून ते युनिसेक्स सॅलॉन ही उडी मारायची होती. युनिसेक्स सॅलॉन म्हणजे जिथे अद्ययावत उपकरणे वापरून स्त्री आणि पुरुष या दोघांचेही केस कापले जातात आणि ट्रीटमेन्ट केली जाते ती जागा. ही जागा नीटनेटकी, आकर्षक असतेच, शिवाय कारागीराची मानसिकता अंगावर पडलेलं काम उरकून टाकायचं अशी नसून एखादा कलाकार जसा कोर्‍या कॅनव्हासवर आपल्या मनातील चित्र उमटवतो, त्याप्रमाणे निवांत काम करून अस्ताव्यस्त वाढलेल्या केसांमधून एक वेगळी स्टाईल निर्माण करण्याची असते. प्रत्येक करागिराची कैची धरण्याची, केस कापण्याची पद्धत वेगळी असू शकते.
‘हेअर क्राफ्ट’ हे सलोन उघडल्यावर माझी ग्राहकांप्रती जबाबदारी आणखी वाढली. एखादी हेअर स्टाईल अथवा ट्रेण्ड एखाद्या ग्राहकाने मला करायला सांगितले आणि तो मला येत नाही असं सांगणं मला चालणार नव्हतं. सिंगापूरमध्ये ट्रेनिंग घेऊन आल्यावर व्यवसायात झालेला पॉझिटिव्ह बदल मी अनुभवला होता. माझ्या क्षेत्रातील नवनवीन बदल समजून आणि शिकून घेण्यासाठी मी बँकॉक, मलेशिया, श्रीलंका, पॅरिस, ऑस्ट्रेलिया अशा अनेक इंटरनॅशनल एज्युकेशन टूर्स केल्या. शिवाय बिझनेस प्लॅन तयार केला. एक एक करत सहा ब्रांचेस उघडल्या. त्या सर्व ब्रांचमधील विश्वासू आणि कर्तबगार कारागीराला भागीदारी देऊन त्या त्या सलोनची जबाबदारी त्यांच्यावर टाकली. कारण प्रत्येक ठिकाणी मी उपस्थित राहून गोष्टी सांभाळणे मला शक्य नव्हतं. तसेच मी जे ज्ञान इतकी वर्षे काम करून आणि परदेशातून शिकून आलो आहे ते येथील मुलांना शिकवायचे होते. हेअर कटिंग या कलेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने मी विविध शहरांत सेमिनार आयोजित करायला लागलो. त्यातून माझ्याकडे खेडेगावातून अनेक तरुण हेअर स्टायलिंग शिकायला यायला लागले. मी स्वतः गरिबी अनुभवली आहे, आज कुणा विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण असेल तर त्याला फीमध्ये सूट देतो. अगदीच वाईट परिस्थिती असेल आणि मुलगा होतकरू असेल तर आम्ही फ्रीमध्ये देखील शिकवलं आहे. आमच्याकडे झाडू-पोछा करणार्‍या मुलाने हे काम शिकण्याची इच्छा प्रकट केली आणि ही कला मोफत शिकून तो आज स्वतःचं दुकान चालवतोय.
तरुण पिढीला या व्यवसायात येताना विविध समस्या भेडसावतात, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी सलून ब्युटी असोसिएशनच्या मुंबई अध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. माझ्या हेअर स्टाईल कलेला, आयआयटीएफचा महाराष्ट्र गौरव, राष्ट्रीय नाभिक संघांचा कलारत्न पुरस्कार, लोकमत स्टाईल आयकॉन अशा अनेक पुरस्कारांच्या रूपाने गौरवण्यात आलं आहे.
हा व्यवसाय पंचवीस वर्षात आमूलाग्र बदलला. बार्बर चेअरच्या जागी हायड्रोलिक चेअर आल्या, कैची पूर्वी लोखंडाची असायची, आता जग्वार कंपनीची स्टीलची कैची वापरली जाते. केस कापण्याच्या पद्धती बदलल्या, काही कारागीर केस कापताना फणीऐवजी बोटांनी केस धरून त्यावर कैची फिरवतात. लाकडी खुर्च्या जाऊन, पुशबॅक हायड्रॉलिक चेअर आल्यात. पूर्वी हेअर कलर परदेशातून आणावे लागत असत, आज ते आज भारतात सहज उपलब्ध आहेत. झिरो मशीनला हाताने दाब द्यावा लागायचा, ती आज बॅटरीवर चालणारी झाली आहे. एलईडी मिरर, कंडिशन… या बाह्यरुपासोबत गेल्या २५ वर्षांतील केसांच्या स्टाईलमध्ये देखील अनेक बदल झाले, बॉब कट, अप्पर कट, ब्लंट कट, ग्रॅज्युएशन बॉबकट, कर्टन बँग्ज, साईड बँग्ज, वुल्फ कट, स्टेप कट, स्टेप विथ लेयर्स असे अक्षरशः शेकडो ट्रेंड्स या व्यवसायात आले. काही जुन्या फॅशन नवीन रूपात सादर केल्या गेल्या. त्याशिवाय एखाद्या फिल्मस्टारचा, स्पोर्ट्सपर्सनचा हेअर कट आवडीने फॉलो केला जातो. यात धोनीचा लाँग हेअर कट, अमिताभचा कट एव्हरग्रीन आहेत. हेअर कटसोबतच दाढीची विशेष काळजी घेतली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी सध्याची तरुणाई आवडीने ठेवते. दाढीची निगा राखण्यासाठी खास कंगवे, शाम्पू, कंडिशनर वापरले जातात.
कोणत्या चेहर्‍याला कोणता कट किंवा स्टाईल चांगली दिसेल हे ठरवण्याचे काही मापदंड असतात. ओव्हल शेप चेहरा अधिक सुंदर दिसतो. प्रत्येकाचा चेहर्‍याचा जन्मजात आकार, गोल, त्रिकोण, ओव्हल (लंबगोल), चौकोनी असतो. हेअर कट करताना हेअर केल्यावर चेहेरा, ओव्हल शेप दिसावा असा हेअर स्टायलिस्टचा प्रयत्न असतो. या व्यवसायात अजूनही सुधारणेला वाव आहे. उदा. काही ठिकाणी एकच जुना टॉवेल दहा लोकांचा चेहरा पुसायला वापरला जातो. तर पॉश सॅलॉनमध्ये प्रत्येक ग्राहकासाठी नवीन स्वच्छ टॉवेल वापरला जातो. यामागील धंद्याचे गणित सांगताना तुषार म्हणाले, ‘आपल्याकडे गरीब श्रीमंत असा सर्व प्रकारचा वर्ग आहे. फुटपाथवरील दगडावर ग्राहकाला बसवून दाढी करणारा नाभिक १५ रुपये घेतो, त्याला प्रत्येक टॉवेल लॉन्ड्रीचे आठ रुपये कसे परवडतील? नाही म्हणायला काळानुसार अनेक बदल सर्व ठिकाणी झाले आहेत, पूर्वी एका ब्लेडने तीन-चार दाढी केल्या जायच्या, पण एड्स रोग जनजागृतीमुळे रक्तसंक्रमण टाळायला साध्यातील साधा नाभिकदेखील आज प्रत्येक ग्राहकासाठी नवीन ब्लेड वापरतो. बाकी त्या त्या ठिकाणच्या आर्थिक परिस्थितीनुसार दर आणि त्या दरानुसार सुविधा ठरतात. घेतलेल्या दामाएवढी सुविधा ग्राहकाला निश्चित मिळायला हवी याची काळजी घेणे हेच व्यवसायातील गमक आहे.
हल्ली स्पेशलायझेशनचा जमाना आहे. लहान मुलांसाठी किड्स हेअर स्टाईल झोन आहेत. त्यांचे प्रमाण सध्या कमी आहे. पण सध्या चाइल्ड आर्टिस्ट, इन्स्टाग्रामची किड्स रील क्रेझ बघता ही नवी इंडस्ट्री जोर धरेल. मला कुणीतरी विचारलं होतं, केसांनी गळा कापणे हा वाक्यप्रचार कुठून आला असावा, मी त्यांना सांगितलं, ‘हे माहीत नाही पण गळ्यापर्यंत वाढलेल्या केसांना नीट आकार देऊन व्यक्तिमत्व सुंदर कसं करायचं हे मला माहीत आहे.’
पूर्वी गावाकडे न्हावी म्हणजे चुगली करणारा किंवा सगळ्या गावगप्पा करणारा माणूस म्हणून समजलं जायचं, ‘रिकामा न्हावी भिंतींना तुंबड्या लावी’ अशा म्हणी प्रचलित होत्या. आज या व्यवसायाला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली आहे. रोजगार मिळवून देणारा करीयर ऑप्शन म्हणून आता याकडे पाहिलं जातं. याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कैची, फणी, वस्तरा, दाढीचा साबण या वस्तू विकत घेऊन, अगदी अल्प भांडवलात देखील हा व्यवसाय सुरू होऊ शकतो. इतर कोणत्याही व्यवसायात मागणी कमी होऊन मोठी मंदी येऊ शकते, पण, डोक्यावरचे केस आणि चेहर्‍यावरची दाढी वाढायची कधीही थांबणार नाही. म्हणूनच या व्यवसायाला कधीही मरण नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन आपल्या मराठी मुलांनी कारकुनी लेखणीऐवजी कैची हातात घेऊन या व्यवसायाची फीत कापायला हवी.

Previous Post

उन्हाळा, स्मारक आणि जंगफ्रो!

Next Post

कसायाहाती गाय देणारी लोकशाही?

Related Posts

धंदा म्हणजे काय रे भाऊ!

मुंढेबाईंचा बहुगुणी बटवा

October 5, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

स्वच्छ ताजे मासे, साफ करून घरपोच!!

September 21, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

जुनाट लाँड्री व्यवसायावर नावीन्याची कडक इस्त्री!

August 24, 2023
धंदा म्हणजे काय रे भाऊ!

करिअरची गवसली वाट

July 27, 2023
Next Post

कसायाहाती गाय देणारी लोकशाही?

या असे सामन्याला...!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.