• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

उन्हाळा, स्मारक आणि जंगफ्रो!

- अनंत अपराधी

Nitin Phanse by Nitin Phanse
May 18, 2023
in भाष्य
0

प्रिय तातूस,
उन्हाळ्याच्या सुट्टीत चार दिवस तरी निदान कुठे जावे असे मनात सारखे वाटत होते. सगळ्यांना सुट्ट्या पडतात. शाळा, कॉलेजे, कोर्ट सगळं बंद ठेवतात. पूर्वी तर म्हणे ब्रिटिशांच्या काळात पोलीस स्टेशनपण बंद असायची, असं तात्या सांगायचे. अर्थात तेव्हा चोर्‍या होत नसत. एक काळ तर असा होता म्हणे की दागिनेसुद्धा गाडीवर चारचाकीवर ठेवून रस्त्यावर विकायला यायचे. ते बायकांना खूपच सोयीचं होतं! पुढे पुढे ही मोठीमोठी शोरुम्स आणि जाहिराती काय आणि मालिका प्रायोजित केल्यामुळे खरे तर दागिन्यांचे भाव वाढतच गेले. कोरोनामध्ये मात्र या सोन्याचांदीचे दागिने विकणारांचे फारच हाल झाले. काही काहींना तर म्हणे अक्षरश: दागिने विकून नोकरांचे पगार करावे लागले म्हणतात. असो. तर सगळं इतकं तापलंय की कशातच मन लागत नाही.
परवा मी एक कविता वाचली त्यात पाऊस म्हणजे वरती आभाळात ढगांना उकडतं आणि ढग घामाने थबथबतात, त्यामुळे पाऊस पडतो असे वर्णन केलेले. अर्थात कवीला काय सुचेल काही सांगता येत नाही. परमेश्वराने ही सृष्टी विनोदासाठी निर्माण केली आणि म्हणूनच ढगांचे गडगडाटी हास्य निर्माण झाले. पंख्याचा शोधदेखील चक्रीवादळामुळे लागला असं म्हणतात. आता परमेश्वर एक आहे म्हणून ठीक आहे. त्याला एखादा भाऊ वगैरे असता तर गोचीच झाली असती. मी खरा की तू खरा म्हणत मॅटर कोर्टात गेले असते. असो. तो काय आपला विषय नाही म्हणा, पण इतकं उकडतंय की उघड्या अंगाने बसावं असं वाटतं आता… परमेश्वराने देखील जन्माला घालताना काही कपडे घालून पाठवले नाही. त्यालाही उकडते याची कल्पना असणार.
पूर्वी ब्रिटिशांच्या काळात गव्हर्नर महाबळेश्वरला रहायला जायचे. आता समानतेचे युग आलेय. त्यामुळे मी तर ऐकलंय की कैद्यांनासुद्धा काही दिवस थंड हवेच्या ठिकाणी ठेवायचे असे धोरण येणार आहे. कैदी असली तरी तीसुद्धा माणसेच आहेत. एकदा समानतेचे तत्व स्वीकारले की आरोपी असो की फिर्यादी, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. खरे तर गाढवालादेखील सन्माननीय गाढव असे म्हणायला पाहिजे असे आपले मला वाटते. तुरुंगातसुद्धा एसीची व्यवस्था करायला काय हरकत आहे. सौरऊर्जेचा वापर केला तर हे परवडेलसुद्धा. अरे तातू हल्ली तुरुंगात इतक्या सुविधा आहेत की तिथे एक डाएटिशियन असतो. त्याच्या शिफारशीनुसार सगळ्यांना आहार दिला जातो. ते जेलर नानाच्या नात्यातले आहेत. ते सांगत होते की अलीकडे शिक्षा पूर्ण होऊन सुटकेची वेळ आली तरी कैद्यांचा पाय निघता निघत नाही. आपल्याकडे कसं रिटायर होताना निरोप समारंभ करतात तशी प्रथा हल्ली अनेक तुरुंगातही पसरलीय. जेलरनासुद्धा इतकी सवय होते की निघतांना ते हातावर दही देऊन पुन्हा या वगैरे म्हणतात. अरे तातू आपल्या आयुष्याचं खरं सार हे प्रेम आणि जिव्हाळा. सहवासाने आपण एकमेकांना जोडले जातो. पैशाचे व्यवहार उलटसुलट झाल्याने शिक्षा होते. आता सगळ्यांनाच थोडा हिशोब येतो. कधी कधी चूक होते. आता कायदे फारच बदललेत. पूर्वीच्या काळी म्हणे पहिला खून माफ असायचा!
मध्यंतरी माझ्या वाचनात अमूक एका देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण झाली तर एक कोटीच्या आतल्या व्यवहारात अडकलेले लोक होते त्यांची शिक्षा माफ करून त्यांना सोडून देण्यात आले. टीव्ही बघत बसलं की सगळ्या जगात काय काय गमती चालल्यात ते समजतं! आपली मुलं जरी दूर गेली असली तरी जग खूपच जवळ आलंय.
अरे तातू विषय कुठेच्या कुठे गेला बघ… सांगायचं म्हणजे आम्ही आंबाफणसाचे दिवस म्हणताना कोकणात जाऊन आलो तर तिथे सर्वत्र धांदल उडालेली… ‘मुंबई गोवा महामार्गाचे स्मारक कुठे उभे करायचे’ यावरून वादावादी चाललेली. सगळेजण आमच्या गावातच स्मारक झाले पाहिजे म्हणत आक्रमक. मूळ रस्ता कसा होता त्यावरचे जुने खड्डे यावरचे एक प्रदर्शन भरवून त्यात कुठल्या साली किती लांबवर गाड्यांची रांग लागली होती, याचे सर्व फोटो व त्या लोकांना अन्नाची पाकिटे व पाण्याच्या बाटल्या देणार्‍या सर्व संस्थांची माहितीपण गोळा केलेली होती. हा एक अतिशय अभिनव उपक्रम असल्याचे व असे भव्य स्मारक जगात कुठेच नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. आता या स्मारकासाठी लोकवर्गणी पण गोळा होत आलीय. मात्र उद्घाटनावरून वाद उत्पन्न होणार यात शंका नाही. तात्या म्हणतात. `मुंबई-गोवा’ महामार्गाचे स्मारक तयार झाले की पुन्हा पर्यटकांची गर्दी होणार आणि पुन्हा ट्रॅफिक जाम होणार. मात्र हे स्मारक कोकणवासीयांसाठी मोफत असून देशावरच्या मंडळींसाठी मात्र तिकीट असणार हे नक्की. देव करो आणि हे स्मारक माझ्या हयातीत बघायला मिळो असे तात्या म्हणाले. `लवकर निर्णय घ्या आणि पूर्ण करा’ म्हणाले. नाहीतर शताब्दी होण्यासाठी उगाचच शंभर वर्षे वाट बघत बसावी लागते?
अरे तातू मला असे वाटते की पुढे पुढे ज्ञानाचे महत्त्व कमी कमी होत जाणार. घराघरात बघ लोक एक तर काहीतरी खात तरी असतात किंवा बघत तरी असतात. टीव्हीमुळे विचार करायची सवयच निघून गेलीय असे वाटते. अरे पुस्तकं काय, मासिके काय, न उघडता रद्दीत घालतात. परवा मी एक सुभाषित वाचले त्यात `आजचे ज्ञान ही उद्याची रद्दी आहे’ असे म्हटले होते. मला काय, तुला काय, वाचनाची किती आवड आहे. अरे माझ्या कपाटात अंकलिपीचे पुस्तकपण मी जपून ठेवले आहे. ते आपल्याला मिळालेले पहिले पुस्तक. तत्वज्ञानात हे सगळं शून्यातून निर्माण झालंय आणि एक म्हणजे आपण सर्व एक आहोत. या आकड्यापासून आयुष्याच्या गणिताची सुरवात होते. कांबळे गुरुजी काय शिकवायचे, आपण विसरून जायचो. तल्लीन व्हायचो! बेरीज करत रहा! गुणत रहा! म्हणायचे ते अजून आठवते. अरे मी परवा जगातला खूपच श्रीमंत माणूस अमेरिकेतला वॉरेन बफेटचे चरित्र वाचत होतो. त्यात हा माणूस लहानपणी पेपरची लाइन टाकत होता असे वाचले. माणसे उगाच नाही मोठी होत! गंमत म्हणजे आपण लहानपणी नदीवर आंघोळीला गेलो की पाच पैशात पाठीला साबण लावून द्यायचे, पण हे घरी कधी कुणाला सांगितले नाही. त्या पैशाची रावळगाव टॉफी घ्यायचो. अरे तातू वॉरेन बघ कुठच्या कुठे गेला आणि मला तर हेडक्लार्कची पण पोस्ट मिळाली नाही. हा सर्व नशिबाचा भाग असतो.
तुला सांगायचं म्हणजे आमचं एक आठवड्यासाठी स्वीट्झरलंडला जायचे ठरतेय. जुलैमध्ये तिथे छान ऊन असते व फारशी थंडी पण नसते असं म्हणतात. मला सारखं वाटतं इतक्या लोकांचे स्वीस बँकेत अकाऊंट आहेत तर आपला पण अकाऊंट असायला काय हरकत आहे. त्यासाठी लागणारे पासपोर्ट साइज फोटो, आधारकार्ड व रेशनकार्डची झेरॉक्स हे सर्व व्यवस्थित बरोबर घेतलेय. आता कमीतकमी किती पैसे भरून खाते उघडता येते याची मात्र कल्पना नाही. पण काहीही लटपटी करून खाते उघडायचेच असा मी पण केलाय.
परत आल्यावर सगळ्या सोसायटीत माझे स्वीस बँकेतल्या खात्याचे पासबुक दाखवणार असा निश्चय केलाय. अरे इतकी वर्षे मी अपमान सहन केला. `शिरवळ’ला गेलावतात का? म्हणून कुत्सितपणाने विचारतात… गोष्ट तू अजून `कुठे वाच्यता करू नकोस. मात्र `स्वीस’हून परतल्यावर सगळे म्हणतील बघ अनंतराव! शिखर गाठलंत एकदम जंगफ्रो! सध्या हे फक्त तुझ्या माझ्यातच असू दे.
कळावे,
तुझाच
अनंत अपराधी

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

केशकर्तनालय ते सॅलॉन

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
भाष्य

स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

May 8, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 5, 2025
Next Post
केशकर्तनालय ते सॅलॉन

केशकर्तनालय ते सॅलॉन

कसायाहाती गाय देणारी लोकशाही?

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.