• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
May 18, 2023
in टपल्या आणि टिचक्या
0

□ युती म्हणून निवडणूक लढवल्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, तेव्हा कुठे गेली होती नैतिकता? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल.
■ मध्ये एक पहाटेचा शपथविधी झाला होता, त्याचा सोयीस्कर विसर पडला का मिंध्यांना? महाविकास आघाडी सरकारची इतकी नफरत होती, तर अडीच वर्षं त्यात महत्त्वाचं मंत्रिपद उपभोगण्याऐवजी तेव्हाच मारायची होती सत्तेवर लाथ आणि करायच्या होत्या नैतिकतेच्या बाता! लोक आधीच हसतायत… आपल्याला शोभतील असे शब्द उच्चारा.

□ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना ईडीची नोटीस.
■ अर्रर्र, दुसरी पहाट उधळली वाटतं शरद पवारांनी! ईडीचे अधिकारीही हसत असतील स्वत:ला आरशात पाहिल्यावर.

□ सनईच्या सुरांबरोबरच घुमला रिफायनरी विरोधाचा सूर, लग्नात रिफायनरीला विरोध.
■ सनईचा संदेश जुमानणारे राज्यकर्ते नाहीत हे, रणशिंग फुंकण्याची तयारी ठेवा.

□ परीक्षा तोंडावर; विद्यार्थी हॉलतिकीटाविना- सीईटी सेलचा पुन्हा गोंधळ.
■ गोंधळ नाही झाला तर मुलांना त्यांची परीक्षा खरोखरच झाली आहे, असं वाटणार कसं?

□ देशाला, संविधानाला वाचविण्यासाठी सर्वांची एकजूट करतोय – नितीशकुमार.
■ त्यातून चुकून माकून पंतप्रधानपदासाठी विचार झालाच तर कुणाला नकोय?

□ बेकायदा शाळांवर होणार फौजदारी कारवाई.
■ तिथे प्रवेश घेतलेल्या मुलांचं काय होणार ते सांगा… त्यांची चूक काय? बेजबाबदार प्रशासनाचे फटके मुलांनी आणि पालकांनी का भोगावेत?

□ वांद्रे येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी ५५० झाडे तोडणार.
■ ५५० सांगून ५५०० तोडून मोकळे होतील.

□ दिल्लीचे बॉस मुख्यमंत्री केजरीवालच! – सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला झटका.
■ यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावं लागतं, ही भारतीय जनता पक्षाच्या सत्तापिपासेने घडवून आणलेली भारतीय लोकशाहीची शोकांतिका आहे.

□ इम्रान खान यांची अटक बेकायदा- पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.
■ आपल्याकडचे ईडीचे, सत्ता हडपण्याविषयीचे खटले पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात शिफ्ट करायला हवेत, फारच वेगाने निकाल लागतो तिथे.

□ ‘बेस्ट’ची वॉटर टॅक्सी वेटिंगवरच; तिकिटाचे दर परवडणार नाहीत.
■ सुरू करायची. ज्यांना परवडेल ते जातील. मग हळुहळू तिकीटदरही कमी करता येतील.

□ रायगडातील मच्छीमारांवर अन्याय; २४ कोटींचा डिझेल परतावा लटकवला- खोके सरकार राजकारणात मश्गुल.
■ आता सरकार तुमच्या दारी येईल, तेव्हा उरलेल्या डिझेलचा वर्षाव करा!

□ जनतेची फसवणूक करणार्‍या राज्यपालांवर खटलाच भरला पाहिजे- उद्धव ठाकरे यांचा घणाघात.
■ त्यांचं सगळं चुकलं, पण तेव्हा ते घटनात्मक पदावर असल्याने त्यांना शिक्षा देता येणार नाही, असा निकाल येण्याची शक्यता अधिक आहे उद्धवजी!

□ माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सरकारची क्लीन चिट.
■ ते कोणाची सुपारी वाजवत होते, ते स्पष्ट झालं आपोआपच.

□ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सोलापुरात बोलती बंद – शहरविकासावर पत्रकारांनी घेरले.
■ सोलापुरातले पत्रकार प्रश्न पण विचारतात, तेही सत्ताधार्‍यांना अडचणीचे? त्यांच्या ट्रेनिंगमध्ये काही उणिवा राहिल्या आहेत काय?

□ १६ आमदारांसह विधानसभा अध्यक्षही अपात्र ठरतील- अनिल परब यांनी मांडली न्यायालयाच्या निकालातील निरीक्षणे.
■ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी केलेल्या सूचक वल्गना पाहता, हे घी काढण्यासाठी पुन्हा उंगली टेढी करायला लागणार परब साहेब!

□ समीर वानखेडेंवर सीबीआयचा छापा, अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकवून खंडणी वसुलीचा आरोप.
■ यांच्या देशभक्तीची दुहाई देत फिरणारे भक्तगण कुठे गायब झाले?

□ पंतप्रधान मोदी अकार्यक्षम : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांचा हल्लाबोल.
■ याला म्हणतात घरचा अहेर. बाय द वे, प्रभाकर यांचे आपल्या अर्धांगिनीबद्दल काय मत आहे? जस्ट आस्किंग!

□ मोदींची ‘मन की बात’ ऐकली नाही म्हणून नर्सिंगच्या विद्यार्थिनींना हॉस्टेलमध्ये डांबले.
■ ही शिक्षा देणार्‍यांना त्याच होस्टेलमध्ये डांबून मन की बातचे १०० एपिसोड ऐकायला लावले पाहिजेत… त्याहून मोठी शिक्षा असूच शकत नाही या अपराधाला!

□ रायगडात १३ हजार हेक्टर भातशेतीवर औद्योगिकीकरणाचे ‘नांगर’.
■ आता विकासावर वरण ओतून भुरके मारा!

□ मुरुडमध्ये नवीन रस्त्याच्या नावाखाली ठेकेदाराची थुकपट्टी.
■ जे आडात असतं, तेच पोहर्‍यात येतं… राज्यात, देशात इतरत्र काही वेगळं चालतं का?

Previous Post

सुप्रीम कोर्टाने हातोडा हाणला तरी निर्लज्जम् सदासुखी!

Next Post

उन्हाळा, स्मारक आणि जंगफ्रो!

Next Post

उन्हाळा, स्मारक आणि जंगफ्रो!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.