• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
May 11, 2023
in टपल्या आणि टिचक्या
0

□ बेळगावात फडणवीस यांच्याविरोधात निदर्शने.
■ सीमाभागातल्या मराठी जनतेच्या विरोधात प्रचार करायला आलेल्यांविरोधात निदर्शनं नाही करायची, तर काय सत्कार करायचा?

□ हायकोर्टात मिंधे सरकार तोंडावर आपटले; बारसूच्या आठ ग्रामस्थांवरील प्रवेशबंदी मागे घेतली.
■ तरीपण रेटारेटी सुरूच आहे, वरून ऑर्डर आहे, कोकणी माणसा, सावध राहा!

□ दुष्काळग्रस्त भागातील स्थलांतरित मजुरांचे हाल; मिंधे सरकार ढिम्म.
■ गतिमान बनून त्या मजुरांवर लाठीचार्ज केला नाही या वेगवान सरकारने याबद्दल आभार माना.

□ अपात्र साखर कारखान्यांना यापुढे सरकारी थकहमी मिळणार नाही; भाजप नेत्यांना बसणार मोठा धक्का.
■ उंदीर बोट सोडून दुसर्‍या बोटीत गेले आणि तिथे गेल्यावर ही पण बुडती बोटच आहे हे लक्षात आले.

□ भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाला बळी पडू नका- खासदार संजय राऊत यांचे सीमावासीयांना आवाहन.
■ कधी अली, कधी बजरंगबली, एवढ्यावरच भाजपच्या प्रचाराची परिसीमा झाली.

□ आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना कागदावरच; रायगडच्या ३०० जोडप्यांना ५० हजारांचे अनुदान मिळालेच नाही.
■ जे अस्तित्त्वात नसलेला लव्ह जिहाद सिद्ध करून आंतरधर्मीय विवाह बंद पाडायला निघाले आहेत, ते आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देतील?

□ महाविकास आघाडीला शिवसेनेकडून तडा जाणार नाही – उद्धव ठाकरे यांची स्पष्ट ग्वाही.
■ शिवसेनेकडून तडा जाणार नाही, पण बाकीच्यांचे काही सांगता येत नाही उद्धव साहेब!

□ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत चित्रपट – देवेंद्र फडणवीस.
■ पहाटे पहाटे मला जाग आली, या सुपरहिट गाण्याचा दुसरा भाग पाहण्यी संधी हुकली पण सिनेमा मध्येच संपल्यामुळे!

□ शरद पवारांचा निर्णय महाविकास आघाडीची ताकद वाढवणारा- अजितदादा पवार.
■ दादा, त्यांचा निर्णय आणि तुमची अंमलबजावणी असेल, तर मिंधे+महाशक्ती यांची वजाबाकी व्हायला वेळ नाही लागणार राज्यातून.

□ विमानतिकीटांच्या दराचे उड्डाण; अनेक महत्वाच्या मार्गांवरील तिकीटांचे दर दुप्पट.
■ म्हणून हल्ली कोणी कोणाला ‘जा उडत’ असं म्हणत नाही रागाने, न जाणो, विमानतिकीटाचे पैसे मागायचा!

□ कर्नाटक निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानेच भाजपकडून धर्माच्या नावावर संभ्रम- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले.
■ विकासाच्या डबल इंजीनचा दावा करणार्‍या ४० टक्के सरकारला अखेर आपल्या खर्‍या औकातीवर यावे लागणार होतेच.

□ लोकांच्या इच्छेचा मान राखत शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला.
■ एकदा ‘लोक माझे सांगाती’ असं म्हटलं म्हणजे मग लोकेच्छा सर्वोपरी मानावी लागणारच.

□ चोर्‍या करण्यासाठी तिघे चोरटे गुजरातहून मुंबईत यायचे.
■ तिघेच?

□ पोलीस भरतीत बोगस ‘राजपूत भामटां’ची घुसखोरी.
■ कुठेही आरक्षण आहे असं कळलं की लोकांना मागास बनून दाखवण्याची घाई होते… हे नाव सिद्ध करतायत.

□ दहशतवादाचे प्रमोटर, प्रवक्त्यांबरोबर चर्चा करणार नाही – भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांना सुनावले.
■ चीनपुढे दातखीळ बसते पण. तिथे भाषा बदलते, डोळे मवाळ होतात, शब्द मुळमुळीत होतात. परराष्ट्र व्यवहाराचाही राजकीय आखाडा करून टाकलेला आहे यांनी.

□ दहा वर्षांनंतर होणार भटक्या कुत्र्यांची गणना.
■ त्यांना आळा घालण्यासाठी काही केलं जाणार नसेल, त्यांना खाणंपिणं पुरवा, त्यांना पकडू नका, कुठे नेऊन सोडू नका, असे न्यायालयाचे आदेश असतील, तर गणना करून काय करायचं आहे नेमकं?

□ अमित शहा सपशेल अपयशी; मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधकांची मागणी.
■ अपयशी सोडा, डरपोक किती असतील? प्रचार सोडून तातडीने रवाना तरी झाले का इंफाळला?

□ कळव्यातील बेकायदा बांधकामांना सहाय्यक आयुक्तच जबाबदार; ठाणे पालिका आयुक्तांनी बजावली नोटीस.
■ लवकर कळलं.

□ ईडी सरकारने रोजगार हमी योजनेची कामे बंद केली.
■ खोके वाटणार असतील सगळ्यांना.

□ राहुल गांधींना दोषी ठरवणार्‍या न्यायाधीशांच्या बढतीला आव्हान.
■ एवढं महत्त्वाचं काम केलं आणि नेमकं बक्षीस मिळायच्या वेळेला खोडा? बहुत नाइन्साफी है!

□ पुण्यात डीआरडीओच्या अधिकार्‍याला हेरगिरी प्रकरणात अटक.
■ हा अधिकारी एका जाज्वल्य देशभक्त संघटनेचा सदस्य होता आणि देशभक्तीवर गावभर प्रवचने देत फिरायचा, हेही विशेष.

Previous Post

भाकरी, तवा जागच्या जागी; महाशक्तीचे ग्रह मात्र फिरले!

Next Post

पारदर्शकतेला पर्याय नाही…

Next Post

पारदर्शकतेला पर्याय नाही...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.