मिका अझीझ (इंडियन एक्स्प्रेसपासून फ्री प्रेस जर्नलपर्यंत अनेक प्रकाशनांसाठी व्यंगचित्रे देणारे मुक्त व्यंगचित्रकार)
बाळासाहेबांची व्यंगचित्रं म्हणजे त्यांची ‘हार्ड लाइन’ आणि जबरदस्त ‘पंच’. आर. के. लक्ष्मण हे बाळासाहेबांचे समकालीन आणि मोठे व्यंगचित्रकार. पण त्यांची व्यंगचित्रं सावध, ‘डिप्लोमॅटिक’ वाटतात. बाळासाहेबांची व्यंगचित्रं मात्र गोळीबाराच्या फैरी झाडल्यासारखी आहेत, थेट आहेत, रोखठोक आहेत. त्यांचा विनोदही तसाच सडेतोड आहे. त्यांचा काळ वेगळा होता, त्यांची अनेक व्यंगचित्रं आजच्या काळात प्रक्षोभक ठरली असती. त्यांच्या कुंचल्याने कोणाचीही पत्रास बाळगली नाही, गय केली नाही.
शिवसेनेच्या स्थापनेनंतरच्या त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये एक ठाम राजकीय भूमिका आहे, पण तरीही त्यांच्या त्या व्यंगचित्रांमध्येही ‘संपादकीय आशय’ निश्चित होता, ही त्यांची महत्ता होती.