‘मनगढंत’ या वेबमालिकेची कथा एका प्रसिद्ध चित्रपट लेखक माधव बक्षी यांची पत्नी रचना बक्षी हिच्या हत्येभोवती फिरते. इन्स्पेक्टर पार्थ, पोलीस अधिकारी यांचा तडफदार अभिनय आणि वेधक कथानक प्रेक्षकांना पडद्यावर खिळवून ठेवेल. थ्रिल, सस्पेन्स, विश्वासघात अशा विविध टप्प्यांवर ‘मनगढंत’ या मालिकेचे कथानक फिरत जातं. धक्कादायक पद्धतीने होणारी हत्या आणि त्यामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेताना संशयाची सुई प्रत्येक पात्रकडे सरकताना प्रेक्षक अंदाजांची साखळी तयार करतील आणि शेवट काय होईल या उत्सुकतेपोटी या मालिकेत गुंतून पडतील असं या वेबसीरिजचे दिग्दर्शक संजीव चढ्ढा यांनी सांगितले.
या वेबसीरिजमध्ये प्रिन्स रोडे, राजू खेर, रिब्बू मेहरा, डॉली चावला, सत्यंवदा सिंग, रौनक्क भिंदर, संगीता ओडवानी, आनंद अजय, श्वेत सिन्हा, आवेज खान, राम प्रसाद मिश्रा, समृद्धी यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांचा समावेश आहे. ‘वॉचो’ डिश टीव्ही इंडियाचे मार्वेâटिंग हेड सुखप्रीत सिंग म्हणाले की, ‘ही रोमांचक वेबमालिका प्रेक्षकांपर्यंत आणताना वॉचोला अभिमान आहे. हल्ली विविध शैलींमधील वेबसीरिज प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘मनगढंत’ ही याला अपवाद नाही, कारण ही मलिका प्रेक्षकांना एक चित्तथरारक अनुभव प्रदान करते.’ सिक्स्थ सेन्स एंटरटेनमेंट आणि शौशा एंटरटेनमेंट निर्मित ही आठ भागांची हिंदी वेबसीरिज १४ एप्रिलपासून ‘वॉचो’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येईल.