• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
March 9, 2023
in टपल्या आणि टिचक्या
0

□ हिरकणी कक्षाच्या दुरवस्थेवर आमदार सरोज अहिरे संतप्त.
■ जिथे आमदारांच्या सोयीसुविधांची ही अवस्था, तिथे सर्वसामान्य जनतेची काय परिस्थिती असेल सरोजताई, विचार करा!

□ दडपशाहीचे साधन म्हणून कायद्याचा वापर करू नका- हायकोर्टाने पोलिसांचे कान उपटले.
■ पोलिसांना बोलून काय उपयोग? ते हुकमाचे गुलाम. त्यांचं क्रीम पोस्टिंग, बदल्या, इन्क्रीमेंट वगैरे ज्यांच्या हातात, त्यांचीच ते चाकरी करणार ना! जनताच सार्वभौम वगैरे सगळं फक्त भाषणबाजीपुरतं… एकदा न्यायाधीश महोदयांनी सामान्य नागरिक बनून पोलिस स्टेशनात जाऊन पाहावं…

□ गद्दार ते गद्दारच, रोज नुसती कारणं देतात- आदित्य ठाकरेंचा मिंध्यांना टोला.
■ गद्दारांना गद्दार म्हणू नका आदित्यजी, डायरेक्ट देशद्रोही ठराल!

□ चहापानावर बहिष्कार हा देशद्रोह कसा? – अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
■ एका (तेव्हा) अस्तित्त्वातच नसलेल्या रेल्वे स्टेशनवर न थांबणार्‍या मालगाड्यांना चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान झालेला आहे असं म्हणतात… मग चहाचा अपमान तो त्यांचा अपमान, त्यांचा अपमान तो देशाचा अपमान… म्हणजे देशद्रोहच की नाही?

□ जागरूक राहा… निवडणुकीच्या तयारीला लागा… आव्हान मोडून काढावेच लागेल- उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली हाक.
■ शिवसैनिक कधीपासून सज्ज बसलेले आहेत उद्धव साहेब… म्हणून तर निवडणुका लावण्याची मिंध्यांची हिंमत होत नाहीये.

□ तुम्हाला देश कायम अशांत ठेवायचाय का? – सर्वोच्च न्यायालयाने भाजप नेत्याला खडसावले.
■ असं राष्ट्रीय गुपित उघड करू नका हो! देशात सतत आग पेटलेली नसेल, तर यांची पोळी भाजली कशी जाणार?

□ मोदी सरकारने खाण्याचे वांधे केले; घरगुती एलपीजी ५० रुपयांनी महागला.
■ मालकांचा लाखो कोटींचा तोटा भरून काढणार कसा नाही तर?

□ हक्कभंगावरून रणकंदन; सत्ताधार्‍यांनीच विधिमंडळाचे कामकाज बंद पाडले.
■ कामकाज खरोखरच गांभीर्याने झालं तर ते साफ उघडे पडतील म्हणून या आयडिया!

□ हतबल शेतकर्‍याने आपल्याच पाच एकर कोबीवर फिरवला ट्रॅक्टर.
■ एकेकाळी शत्रू घरादारावर नांगर फिरवायचे; आता आपणच निवडून दिलेल्या सरकारची शेतकरीद्रोही धोरणं शेतावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आणतात…

□ बेस्टचा कारभार सुधारा- बेस्ट कामगार सेनेची मागणी.
■ त्यासाठी मुंबईचा आणि मुंबईची शान असलेल्या बेस्टचा अभिमान असायला हवा मनात. सगळीकडे दुभत्या गाई शोधल्या तर कारभार सुधारणार कसा?

□ अदानी समूहाला मदत करणार्‍या एनएसई कार्यालयाबाहेर मुंबई काँग्रेसची जोरदार निदर्शने.
■ काही उपयोग होणार नाही… सीबीआय, ईडी वगैरे पाळीव भुभू आहेत, ते मालकांच्या मालकांवर धावून जातील काय?

□ हक्कभंग समितीमध्ये ‘ईडी’ सरकारची मनमानी; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदारांना डावलले.
■ फिर्यादीच न्यायाधीश असा कारभार आहे यांचा. समितीत एक निष्ठावान आमदार आला तर त्याच्या डोळ्याला डोळा तरी भिडवू शकतील का?

□ वीज, गॅस दरवाढ करणार्‍या सरकारविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; विधान भवन दणाणले.
■ सामान्य लोक निपचीत आहेत पण. या सरकारने त्यांना रस्त्यावर आणले तरी ते रस्त्यावर उतरत नाहीत, ही खरी गोची आहे!

□ राजे, या सरकारला सुबुद्धी द्या- अंगणवाडी सेविकांचे रायगडावर छत्रपती श्री शिवरायांना साकडे.
■ ज्याला स्वबुद्धी असेल, त्यालाच शिवरायही सुबुद्धी देऊ शकतील ना ताई?

□ पाणीपट्टी भरूनही उरणकरांवर पाणीबाणी.
■ हायवे आहे ना तुमच्या बाजूला! उतरा रस्त्यावर. सरकारच्या तोंडचे पाणी पळवल्याशिवाय ते ढिम्म हलणार नाही.

□ ऐतिहासिक कुलाबा किल्ला मोजतोय अखेरची घटका.
■ गल्ला भरण्यात मग्न असलेले किल्ला काय वाचवतील?

Previous Post

चला चहा येऊ द्या!

Next Post

मराठे पाऊल पडते पुढे…

Next Post
मराठे पाऊल पडते पुढे…

मराठे पाऊल पडते पुढे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.