• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

व्यंग आणि चित्र…

- प्रदीप म्हापसेकर

Nitin Phanse by Nitin Phanse
February 2, 2023
in भाष्य
0

व्यंगचित्रकला म्हणजे कागदावरची रेषांच्या माध्यमातून केलेली विनोदनिर्मिती अशी अनेकांची समजूत असते. व्यंगचित्रे ही हास्यचित्रेच असतील असे नसते. व्यंगचित्र हे समाजातल्या घडामोडींवरचं व्यंगचित्रकाराचं भाष्य असतं… सखोल चिंतनातून आलेलं… हे चिंतन कसं घडतं, त्यातून चित्र कसं आकार घेतं, याची प्रोसेस मांडणारे लेखन मराठीत फार नाही… ज्येष्ठ व्यंगचित्रकार, लेखक, कवी प्रदीप म्हापसेकर यांचा ही प्रक्रिया उलगडणारा लेख ऋतुरंग प्रकाशनाच्या ‘तो कधी एकटा नसतो’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे… तोच मार्मिकच्या दर्दी वाचकांसाठी दोन भागांत देत आहोत… आज पहिला भाग!
– – –

‘‘पिथसचा नागरिक मेलेटस, त्याचा मुलगा मी मेलेटस शपथ घेऊन सॉक्रेटिसवर असा आरोप करतो की अँलोपिसीचा रहिवासी सॉफ्रॅनिकस, त्याचा मुलगा सॉक्रेटिस, या सॉक्रेटिसची अ‍ॅथेन्सच्या देवदेवतांवर श्रद्धा नाही. तो नवनवीन देवदेवता प्रचारात आणीत आहे. त्यामुळे सॉक्रेटिस गुन्हेगार ठरतो. शिवाय तो तरुणांना बिघडवतो आहे. हा त्याचा दुसरा अपराध आहे. या अपराधांकरिता शिक्षा देहान्त!’’
ख्रिस्तपूर्व ३९९मध्ये मेलेटस नावाच्या एका नागरिकाने सॉक्रेटिसवर आरोप करत त्याला न्यायालयात खेचले होते. इतकी जुनी घटना दहा-बारा वर्षांपूर्वी कुठल्यातरी पुस्तकात मी वाचली होती. पण आजही डोळे बंद करताच ही घटना स्पष्ट दिसते. सॉक्रेटिसचा तो प्रसंग मेंदूत कुठेतरी कायमचा चित्रित झालेला… कधी कधी यूट्यूबवर एखादा व्हिडीओ पहावा तसा मी तो मेंदूतच ऑपरेट करून पाहतो. ही फिल्म चार-दोन मिनिटांची असावी. पण या जुन्या घटनेचे संदर्भ मला अजूनही सतत लागत असतात. दिसत असतात. अस्वस्थ करत असतात. बरेचसे मेलेटससारखे लोक अवतीभवती वावरताना दिसतात. दोनेक आठवड्यांपूर्वी एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर मला एका कोपर्‍यात कुणाच्या तरी पायातला जोडा पडलेला, भिरकावलेला दिसतो. मला उगाचच वाटून जातं, सॉक्रेटिस इथून पुढे अनवाणी तर गेला नाही ना… येथे कुणाला त्याने प्रश्न विचारले असतील का? त्याचे समाधान न झाल्याने त्याने निषेध म्हणून त्याच्या चप्पला इथे भिरकावल्या तर नाहीत ना? ख्रि.पू. ३९९ची घटना मी आता २०१८ सालात जोडू पाहतोय.
घटना पूर्वी घडत होत्या. आता घडत आहेत. पुढेही घडत राहतील. पण संदर्भ जुने-नवे माझ्यासोबतच प्रवास करत असतात. गच्च ट्रेनमध्येही ते मला बिलगलेले असतात. चित्रकार म्हणून हे नवनवे संदर्भ माझा पिच्छा पुरवत असतात. अधूनमधून मला जागे करत असतात. कधी नव्याने माझ्या मानगुटीवर बसत असतात. वैतागून कधी मी त्यांना दूर झटकतो. पण ते पुन्हा रेषांतून, रंगातून, शाईतून माझ्या कागदावर पाझरत असतात.
डॅफोडील्सची फुले पाहून वर्डस्वर्थला कमालीचा आनंद झाला होता म्हणे. इतका की त्यामुळे त्याने खूप काही काव्य केले. तो म्हणायचा ‘मी जेव्हा जेव्हा डोळे मिटतो तेव्हा डोळ्यांसमोर ती हसरी फुले येतात नि पुढे सगळं सुखमय होऊन जातं.’ अशा अनेक गोष्टी कलाकाराच्या मनावर कोरल्या जातात. विसावल्या जातात. कलाकार अशा घटनांमध्ये डुबक्या मारतो. कधी गटांगळ्या खातो. घटनांच्या विविध विचारांत तो एकटा कधीच नसतो.
जोसेफ स्टालिन म्हणाला होता, ‘‘सोविएत सैन्याला पुढे जाण्यापेक्षा मागे सरकण्यास जास्त हिंमत लागते.’’ काय ही स्टालिनची खुन्नस. किती दहशत असेल त्याची. केवढा धाक असेल त्याचा सैन्यावर. त्याचा धाक, दहशत त्याच्या मिश्यांवर जास्त दिसायची. या मिशांवर त्याचा पुरुषार्थ दिसायचा. पूर्वी एक स्टालिनच चित्र केलं होतं. म्हणून त्याच्या मिशा कायम लक्षात राहिल्या. मिशांवरून आठवतंय. ‘पद्मावती’ सिनेमा प्रदर्शित व्हायचा होता. संजय लीला भन्साळी या सिनेमामुळे आधीपासूनच अडचणीत आलेले. शूटिंगदरम्यान त्यांना धक्काबुक्की झालेली. सेटवर झालेली मोडतोड. काही संघटनांनी केलेला निषेध वगैरेंनी ‘पद्मावती’ कमालीचा वादग्रस्त ठरला होता. त्या वेळी एक चित्र केले होते. क्रूर महमद खिलजीचा रोल रणवीर सिंगने केला होता. त्याच्या झुपकेदार मिश्या त्या वेळी पोस्टरवर होत्या. माझ्या चित्रात एका बाजूला खिलजीच्या मिशा, दुसर्‍या बाजूला कट्टरपंथी आंदोलन करणार्‍या संघटनेचा लालबुंद चेहरा.
त्याच्या मिशा खिलजीच्या दुप्पट मोठ्या व घाबरवणार्‍या आणि त्या दोघांच्या मधे पद्मावती बिच्चारी घाबरलेली. असे ते चित्र. असो. तर पुढे भन्साळी यांना या सिनेमाचं नाव थोडं बदलावं लागलं. ‘पद्मावती’ऐवजी ‘पद्मावत!’ या नावबदलावरही एक चित्र केलं होतं. मूळ नाव ‘पद्मावती’ असं होतं. मी त्यातले शेवटचं ‘आय’ हे अक्षर घेऊन पद्मावती खाली मान घालून निघून जातेय असं दाखवलं होतं. ‘आय’ म्हणजे मी. मला काही ओळख आहे की नाही? का स्त्री म्हणून मला दुय्यम लेखणार तुम्ही? असा तो अर्थ होता चित्राचा.
अमेरिकेत एकदा काही चित्रांवर संशोधन झाल्याचं मित्राने सांगितलं होतं. म्हणजे एखादं चित्र पाहून माकडाला काय वाटलं असावं. चिंपाझीला काय वाटलं होतं किंवा गोरिलाला काय वाटलं? चित्र पाहून त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव कसे बदलले. त्यांच्या डोळ्यांत नेमके काय बदल झाले वगैरे वगैरेंचा ते लोक अभ्यास करतात. मग हीच चित्रं नंतर वकिलांना दाखवली गेली. न्यायाधीशांना दाखवली गेली, त्यांना नेमकं काय वाटते याचं विश्लेषण केलं गेलं. या प्रयोगासाठी तिकडे लोक स्वतःहून पुढे येतात. आपल्याकडे तसं होत नाही. कितीतरी घटना मानवी मेंदूत भरलेल्या असतात. एक एक क्षण, घटना अशा लाखो, अब्जावधी घटना मेंदूत कोंबलेल्या असतात. मग एक वेगळाच प्रश्न मला सतावतो. मानवाच्या मेंदूची क्षमता किती? कुठेतरी वाचलं होतं. मेंदूची क्षमता अंदाजे २.५ पेटाबाईट असते. १ पेटाबाईट म्हणजे १००० टेराबाईट. १ टेराबाईट म्हणजे १००० जीबी. म्हणजे बघा १६ जीबी मेमरीचे १ लाख ५६ हजार फोन म्हणजे आपला मेंदू!
अंतोन चेकॉव्ह म्हणाला होता, ‘कलाकाराची भूमिका प्रश्न विचारणारी असावी उत्तर देणारी नव्हे!’ मला आजही सतत प्रश्न विचारावेसे वाटतात. सगळ्यांचीच उत्तरं मिळत नाहीत. एक जुना प्रश्न आजही सतावतो. गिरणीकामगारांचा संप का झाला? तो का बारगळला? माझं सगळं लहानपण, शिक्षण गिरणगावात परेलमध्ये गेलं. लहानपणी कधी कधी वडिलांच्या मिलमध्ये जायचो. वडिलांना तिकडे मोठा मान असल्याने मलाही मान मिळायचा. डबेवाल्यांना फार जवळून पाहता आलं. आमचा डबेवाला कधी लोअर परेल ब्रिजवर गाडी घेऊन धावताना दिसायचा. त्याला म्हणावंसं वाटायचं, ‘हळू रे बाबा… आमची आमटी सांडायची…’ पण त्याचं लक्ष घड्याळाकडे लागलेलं. गिरणगाव फार जवळून पाहिलेलं होतं. मग जे.जे.ला असताना संप झाला. दत्ता सामंतांचा जयजयकार पाहिला. संपानंतरची भीषण परिस्थिती अनुभवली. कामगारांची मुलं गुन्हेगारीकडे वळलेली पाहिलं. वाईट वाटायचं. नंतर २०-२२ वर्षं कशी निघून गेली कळलं नाही. ‘सकाळ’ पेपरात काम करत असतानाची गोष्ट. एकदा एल्फिन्स्टन पुलावरून टॅक्सीने जाताना बाजूच्या मिलच्या चिमणीवर तीन-चारजण उभे राहिलेले पाहिले. पहारीचे घाव घालून त्यांनी अर्धीअधिक चिमणी पाडली हाती. मिलच्या या चिमण्या कामगार भागाची शान होत्या. तर त्या ढासळत्या चिमणीचे हाल बघवेनात. एका फोटोग्राफर मित्राला फोन केला. म्हटलं, ‘‘लगेच ये इकडे. हे बघ, चिमणी पाडताहेत. तुलाही वेगळा फोटो मिळेल.’’ दुसर्‍या दिवशी तीन-चार पेपरात तो चिमणी पाडतानाचा फोटो पहिल्या पानावर येतो. नंतर चार-सहा वर्षांत उरलेल्या गिरण्याही बंद झाल्या कायमच्या.
दोनेक वर्षांपूर्वी या चिमण्यांवर एक चित्र काढलं होतं. दोन भागांत चित्र होतं. एकात १९८२ सालची ताठ मानेने उभी असलेली चिमणी नि दुसर्‍यात आडवी झालेली २०१२ सालातली चिमणी. ही ताठ मानेने उभी राहिलेली उंच चिमणी आडवी झालेली मलाच अस्वस्थ करते. असो. आताही चिमण्या दिसतात काही. पण त्या भेदरलेल्या दिसतात. त्या आजूबाजूच्या टॉवरकडे पाहताना दिसतात. हे टॉवर कधीतरी आपल्यावर झडप घालतील या काळजीत दिसतात.
गिरणी कामगार संपल्यानंतर त्यांना घर देण्याची एक योजना नंतर निघाली होती. कमी किमतीत त्यांना घरं मिळणार होती. कोकणात, किंवा आपापल्या गावी गेलेले त्या वेळचे गिरणीकामगार आशेने पुन्हा अधेमधे मुंबईत यायला लागले. अर्ज भरून द्यायला लागले. लॉटरीपद्धतीने काहींना घरं मिळाली, पण बरेच अजून बाकी होते. पुन्हा लॉटरी, पुन्हा अर्ज. पुढच्या तारखा… पुन्हा कार्यालयात त्यांच्या खेपा वगैरे चालू होतं. काहीजण चकरा मारून थकलेले… कधीतरी घर मिळेल या आशेवर. ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. या घटनेवर मी एक चित्र केलं होतं. चारएक वर्षांपूर्वी. चित्र असं होतं. गिरणी कामगारांचे घराचे अर्ज स्वीकारणारं कार्यालय होते. तिथे एका खिडकीवर हे अर्ज स्वीकारले जात आहेत. अन् अर्ज देण्यासाठी एका मनुष्याचा सापळा-सांगाडा गुडघ्यावर रांगत पुढे सरकत आपला अर्ज त्या खिडकीकडे देतोय! चित्र ‘प्रहार’मध्ये छापून आलं. दुसर्‍या दिवशी दुपारी प्रहार कार्यालयात एक फोन येतो. फोन करणारा माणूस आपलं नाव सांगत नाही. तो इतकंच म्हणतो, ‘‘ज्याने कुणी ते चित्र काढलंय त्यांना सांगा माझ्या वडिलांची अवस्था तशीच झाली. घरासाठी त्यांनी खूप वणवण केली. पण घर काही मिळालं नाही. अखेर त्यांचं निधन झालं.’’ ओक्साबोक्शी रडत त्याने फोन ठेवला. प्रतिक्रिया नंतर मला कळली. पण त्या भेदक परिस्थितीवरची ही प्रतिक्रिया कायम माझ्या मनात राहिली.
जे.जे.च्या पहिल्या-दुसर्‍या वर्षाला असताना कलेतल्या नवनव्या गोष्टी, घडामोडी कळायच्या. त्या वेळी कुणीतरी सांगितलं होतं. जे.जे.चे एक प्राध्यापक म्हणे इतकं स्केचिंग करतात की दिवसाला त्यांची एक अख्खी पेन्सिल संपते, झिजते. नवल वाटायचं त्या वेळी. इतकी स्केचेस दिवसभरात? किती घटना, किती प्रसंग, क्षण त्यांनी कागदावर उतरवले असतील. एकदा असाच कागदांच्या पसार्‍यात मी अडकलेलो असताना पत्नी शेवंताबाई म्हणाल्या, ‘‘किचनच्या खिडकीवर एक कावळा रोज सकाळीच येऊन ओरडत असतो. त्याची वेळ पण ठरलेली आहे.’’ ती पुढे म्हणते, ‘‘कुणाला तरी विचारायला हवं काही वाईटसाईट बातमी तर येणार नाही ना कानावर? वाईट बातमी, वाईट घटना.’’ मला आठवतं, काही आठवड्यांपूर्वी तो जो कोण कावळा-कावळीण येऊन बसून ओरडतो त्या जागी त्यांनी घरटं बांधलं होतं. ज्यांच्या खिडकीच्या वरच्या बाजूला त्याने हे घरटं बांधलं होतं त्यांनी ते उचकवून फेकून दिलं होतं. घरट्यामुळे घरात जीवजंतू पसरत होते. म्हणजे त्या कावळ्याला आपलं घर तर आठवत नाही ना? कुणाचंही घर तोडणं-मोडणं चांगलं नाही. पण… मी मलाच विचारतो, ‘पण काय? माझं घर असं तुटलंबिटलं तर?’ खाली रस्त्यावर मेट्रोचं काम चालू आहे. दोन इमारती त्यांनी खाली केल्यात. आमची इमारत जुनी. तीसुद्धा पडलीबिडली तर. बरं पाडून पुन्हा इथेच घर मिळेल का? त्यावेळी शेजारचा तो पिंपळ असेल का? रोज जाता-येताना मादूस्करांच्या गणपती कारखान्यातले गणपती पुढे दिसतील का? कोपर्‍यावरचं लहानसं मंदिर. जाताना आपसूकच मान वळायची. ते पुन्हा तिथेच असेल का? नाना प्रश्न डोक्यात आणले त्या कावळ्याने. मेट्रोच्या कामामुळे, मोनो रेल्वेच्या कामामुळे मुंबईतली खूप झाडं तोडली गेली, तोडली जाणार असल्याच्या बातम्या मी पेपरात वाचत होतो. या मेट्रो मोनोवर एक चित्र केलं होतं. तर चित्र असं होतं : चित्राच्या वरच्या भागात मोनो रेल्वेचा एक डबा दाखवलेला. खालच्या चित्रात मेट्रो रेल्वेचा एक डबा दाखवलेला. खालच्या चित्रातल्या मेट्रो डब्याचा आकार करवतीसारखा. झाडांची काटछाट होतेय म्हणून. तर असं हे सगळं डोक्यात भिनभिनत असतं आजूबाजूचं पाहून. दर दोन-तीन महिन्यांनी आपण आपल्या डोक्यावरच्या केसांची काटछाट करतो पण त्याखाली दडलेल्या विचारांची करता येत नाही.
अलेक्झांडरच्या जन्माच्या दिवशी आर्टिमेसच्या मंदिराला आग लागली. सर्व देव म्हणे अलेक्झांडरच्या जन्मोत्सवात व्यस्त राहिल्याने देवळाकडे दुर्लक्ष झालं. आपल्याकडेही तसंच काही झालं का? परळ रेल्वे पुलावरच्या घटनेला आता वर्ष झालं असेल. चेंगराचेंगरीत २९ जणांचा जीव गेला होता. कुणी म्हणे अफवा पसरवल्याने ही घटना घडली तर अचानक धावपळ झाल्याने घटना घडली असेही काही म्हणत होते. त्या पुलावरनं मी खूपदा गेलोय. घटनेआधीही आणि घटनेनंतरही. त्यावेळी ‘इंडियाबुल्स’मध्ये एका कामासाठी जाताना रोज त्या पुलावरून जात-येत असे. पण असं काही घडेल असं वाटलं नव्हतं. सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेला जोडणारा तो पूल होता. मला वाटतं घटना घडली त्याच्या दुसर्‍या दिवशी दसरा होता. त्या घटनेवर तीन-चार चित्रं केली होती. रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. घरून जाताना आपण सुखरूप परत येऊ ना याचाही हे फार विचार करत नसावेत. कारण हा जीवन-मरणाचा खेळ आता रोजचा झालाय. रोजच रेल्वे प्रवासात मृत्यू आजूबाजूने जातो. चित्रकार म्हणून मला तो जाणवत असतो. होतं काय की कलाकार एखादी घटना, दृश्य पाहताना आजूबाजूची स्पेस पाहतो. निगेटिव्ह स्पेस पाहतो. अवकाश पाहतो. सामान्य माणूस एखादा ढग पाहतो, पण कलाकार त्या ढगाचं डिझाइन पाहतो. त्याला ढगांत वेगवेगळे आकार दिसतात. हाच काय तो दोघांमध्ये फरक असतो. तर खूपजण प्रवास करत असतात रेल्वेने. आज मला सरकत्या जिन्यावरून माणसांचे कळप वर सरकताना दिसतात. पाठीवर, खांद्यांवर बॅगा घेतलेले लोक, ट्रेनची वाट पाहणारे लोक, कुटुंबासोबत जाणारे लोक, ऑफिसमधून परत घराकडे जाणारे लोक! कितीतरी लोक मी प्लॅटफॉर्मवर निरखत असतो. तर त्या परळच्या घटनेमुळे रोज प्रवास करणार्‍यांवर काय फरक पडला असेल? माझ्या डोक्यात वेगवेगळी एलिमेंट फिरत राहतात. रेल्वे रूळ, रक्त, स्ट्रेचर वगैरे वगैरे. त्यावेळी आपण तिथे असतो तर… मला माझी पत्नी आठवते, मुलगा आठवतो. सगळ्यांनाच आपापलं घर आठवत असेल. आईवडील आठवत असतील. जे सोडून गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल? मी वेगवेगळ्या पैलूंवर विचार करतो. मला चित्र काढायचं असतं.
रेल्वे प्रवासात आता बर्‍याच जणांच्या खांद्यांवर बॅगा दिसतात. मनातलं काहीतरी दुःखद थंडपणे कागदावर येतं. चित्र असतं, लोक प्रवास करतायत. त्याच पुलावरून जातायत. आता त्यांच्या खांद्यावर बॅगांऐवजी स्ट्रेचर आहेत! प्रत्येकजण आपापला स्ट्रेचर सोबत घेऊन चाललाय. न जाणो आपला जीव गेला तर… उचलायला आपलंच स्ट्रेचर कामी येईल. रेल्वेकडे दोन-तीन असतील फारतर. पण माझं माझ्यासोबत असू दे. हे चित्र त्यावेळी खूप गाजलं होतं. लोक अशा घटना विसरत नाहीत.
चित्रकार, व्यंगचित्रकार म्हणून अशा घटनांबाबत मलाही फार विचार करावा लागतो. लोकांची भावना, त्यांचं दुःख मांडावं लागतं. याच घटनेवर अजून एक चित्र केलं होतं. परळचा पूल एल्फिन्स्टनला जोडणारा आहे. म्हणून मी दाखवलं होतं परळच्या पुलावरचा धडधाकट जिवंत माणूस. एल्फिन्स्टनच्या पुलातून पुढे सापळा-सांगाडा बनून बाहेर येतोय. मानवी जीवनाचे हाल दाखवणारं चित्र असतं ते. अजून एक चित्र आठवतं त्या घटनेवरचं. एक स्ट्रेचर दाखवला होता. त्याच्या एका बाजूला परळ म्हटलं होतं तर दुसर्‍या बाजूला एल्फिन्स्टन! म्हणजे हा दोन स्थानकांना जोडणारा पूल नसून ते शव वाहणारं साधन स्ट्रेचर होतं. त्या घटनेमुळे आजही अंगावर शहारे येतात. मृत्यू इतक्या जवळ असावा आपल्या? आपल्या जाण्यामुळे काय हाल झाले असतील आपल्या कुटुंबाचे? अचानक जाण्याने कितीतरी प्रश्न अर्धवट राहिले असतील. शेवटी मी जगू नये का? इथपर्यंत वेगवेगळे भीषण प्रश्न डोक्यात घुमत होते. त्या वेळी ती चित्रं पुढे खूप फॉरवर्ड झाली होती. लोकांचे विचार पुढे सरकत होते. घटना पुढे विचार करायला लावत होती.

(लेखाचा दुसरा भाग पुढच्या अंकात)

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

झगमगाटाआडचा भेसूर चेहरा : सलाम बॉम्बे

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
भाष्य

स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

May 8, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 5, 2025
Next Post
झगमगाटाआडचा भेसूर चेहरा : सलाम बॉम्बे

झगमगाटाआडचा भेसूर चेहरा : सलाम बॉम्बे

द किंग इज बॅक!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.