• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टपल्या आणि टिचक्या

- टिक्कोजीराव

Nitin Phanse by Nitin Phanse
January 13, 2023
in टपल्या आणि टिचक्या
0

□ उत्तराखंडातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ जोशी मठ खचण्याच्या स्थितीत! आसपासची बांधकामे आणि जलविद्युत प्रकल्पामुळे मोठ्या भेगा पडून घरे खचली, मंदिर कोसळले.
■ भोगा बेबंद विकासाची फळे! संपूर्ण हिमालयाच्या संवेदनशील क्षेत्रांत असाच झटपट विकास सुरू आहे… जोशी मठ तो झाँकी है…

□ भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारचा विरोध न जुमानता बिहारमध्ये जातनिहाय जनगणना.
■ धर्म जागा केला की जाती जाग्या होणारच. आधी अमुकमुक्त भारत, तमुकमुक्त भारतच्या डिंग्या मारणार्‍यांनी जातिमुक्त धर्माच्या दिशेने वाटचाल करायला हवी.

□ पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी देशाला माओवादमुक्त करणार : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.
■ २०२२मध्ये बुलेट ट्रेन धावणार होती, त्यातलाच हा प्रकार ना? अमुकमुक्त, तमुकमुक्त करून फक्त भाजपयुक्त देश करण्याच्या विकृत लालसेतून तुम्ही कधी मुक्त होणार ते सांगा.

□ कर्नाटकच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करणार : मुख्यमंत्री बोम्मई यांचे संकेत.
■ अरेरे, म्हणजे बेळगावात एवढं वातावरण तापवून पण राज्यात काँग्रेसच्याच बाजूने वातावरण आहे तर.

□ नोटांच्या थप्पीवर बसून फोटो काढून घेतलेला गुंड सँट्रो रवी याची चौकशी करण्याचे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश.
■ अहो, तुमच्या मंत्र्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेला गुंड आहे तो. काही खोके तर त्यालाही मिळाले असणारच ना!

□ रेसकोर्स मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडवर हलवले जाणार; रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क उभे राहणार.
■ म्हणजे एक चिंटुकले थीम पार्क बनवून बाकीची जागा दोन मालकांच्या घशात घालणार!

□ पुणे शहर पोलीस दलात शिपाई बनण्यासाठी एमबीए, एमसीए, बीएचएमएस, बीएएमएस, बी फार्म अशा उच्च पदव्या घेतलेल्यांचे अर्ज.
■ आणि तिकडे देशाचे गृहमंत्री बिनधास्त फेका मारतायत की मोदींच्या सरकारने तरुणांना काम दिल्यामुळे माओवाद्यांचे कंबरडे मोडले!

□ नागपुरात इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये हळदीकुंकू, रांगोळ्या.
■ आता पुढच्या वेळी एक वडाचं झाड उभारून त्याच्याभोवती फेर्‍याही मारा आणि मंगळागौर करून फुगड्याही खेळा… त्यातलं विज्ञान सांगायला व्हॉट्सअपवरचे बिनपगारी, फुल अधिकारी छद्मवैज्ञानिक आहेतच तयार!

□ आता परदेशी विद्यापीठांना देशात मुक्तद्वार.
■ देशातल्या विद्यापीठांचा किचकट कायदे करून गळा घोटणार, परदेशी विद्यापीठांसाठी पायघड्या घालणार, अजब अडाणी सरकार!

□ सीबीएसई शाळांसाठी बनावट ना हरकत दाखले देणारी राज्यव्यापी टोळी उघड, अनेक शाळा बेकायदा.
■ फ्लॅट घेतला तर बिल्डिंग कायदेशीर असेलच, याची खात्री नाही; मुलांना शाळेत टाकले तर शाळा बनावट निघण्याचा धोका; और कितना विकास चाहिए आपको?

□ शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो, असे कोणीतरी म्हणाले, तेव्हापासून मी संसदेत जायला घाबरतो : शरद पवार यांची मिष्कील टिप्पणी.
■ पवारसाहेब, घाबरू नका. त्यांनी बालपणी जे जे काही केले (असे वेळोवेळी सांगितले), त्यातील संबंधित व्यक्ती एकत्र आल्या तर त्यांचा एक स्वतंत्र पक्ष स्थापन करता येईल, इतकी यादी मोठी आहे!

□ मालपाणी दिल्याशिवाय कोणतीही फाईलच हलत नाही : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
■ मालपाणी वरपर्यंत पोहोचते असे अधिकारी सांगतात गडकरी साहेब! मग फाईल हलेल कशी? बाकी भ्रष्टाचारमुक्त भारताचा फुगा फोडल्याबद्दल अभिनंदन!

□ मंत्रिमंडळ विस्तारावरून मिंधे गटात खदखद; ठाण्यात मिंधे गटाच्या बोलबच्चनला भाजपचे शाब्दिक तडाखे.
■ कागदाची बोट कधीतरी बुडणारच; मग उंदीर इकडून तिकडे उड्या मारतील… बच्चे लोग, दिल थाम के बैठो!

□ पुढच्या वर्षी एक जानेवारीपर्यंत अयोध्येत राम मंदिर उभे राहील : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.
■ मंदिरांच्या उभारणीच्या तारखा सांगणं हे तुमचं काम आहे काय? इतक्या संवेदनशील पदावर दुसर्‍या कुणाला तरी बसवा आणि तुम्ही विरोधी पक्ष फोडणे, मंदिरांमध्ये घंटा वाजवणे वगैरे पूर्णवेळ कामे करा की!

Previous Post

पुण्यात फुलतंय केशराचे शेत!

Next Post

तरी बरं…

Next Post

तरी बरं...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.