• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

चार दिवस सासूचे…

- प्रसाद ताम्हनकर (पंचनामा)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 28, 2022
in पंचनामा
0

‘हो. जवळपास पस्तीस लाखाचे दागिने आणि रोकड पळवण्यात आली आहे. चोरी करताना बहुदा आजींची आणि चोरट्यांची झटापट देखील झाली असावी. त्यांचा प्रतिकार मोडण्यासाठी चोरट्यांनी त्यांचा गळा चिरला आहे. सोसायटीत सीसीटीव्ही नसल्याने आमची थोडी अडचण झाली आहे. त्यामुळेच आता तुमची मुलगी आणि जावई पटकन भानावर येणे आवश्यक आहे.’
– – –

अनघा शून्य नजरेने समोर पाहत होती. आपला स्वत:चा जन्मदाता असे काही बोलेल असे कधी तिच्या ध्यानी मनी देखील आले नव्हते; पण आज ते चक्क प्रत्यक्षात घडत होते. आपला अखेरचा आधार देखील गळून पडल्यासारखी ती गलितगात्र होऊन बसून राहिली होती.
‘अनघा.. ए अनघा मी तुझ्याशी बोलतोय.. लक्ष कुठे आहे तुझे?’ रावसाहेब जरा घुश्शातच ओरडले.
‘दादा.. अहो पण मी करू तरी काय? हे सगळे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. निदान मन मोकळे करायला मला तुम्ही लोक तरी होतात; पण आता तुम्ही देखील..’ अनघा दोन्ही हाताच्या तळव्यात तोंड खुपसून ढसढसा रडायला लागली.
अनघाची ती अवस्था पाहून रावसाहेबांचे काळीज देखील गलबलले. आधीच आईविना पोर म्हणून त्यांना तिच्याविषयी थोडी जास्तच काळजी असायची. त्यात आता हे सगळे असे होत असलेले बघून त्यांना देखील प्रचंड मानसिक त्रास होत होता. लग्नाला अवघे तीन महिने झालेले आणि अनघाची दर चार दिवसांनी सासरविषयी काही ना काही तक्रार ही असायचीच. अनघा कामचुकार किंवा भांडकुदळ नक्कीच नव्हती. उलट नोकरी सांभाळून संसार देखील निगुतीने करत होती. पण अनघाची सासू जरा खाष्ट आणि फटकळ स्वभावाची. सून नोकरी करते हेच मुळात तिला आवडायचे नाही. सुनेने कसे २४ तास घर सांभाळावे, सासूची सेवा करावी अशा तिच्या अपेक्षा. मग सतत अनघाला टोमणे मारणे, कपड्यांवरून हिणवणे, सतत मुलापाशी तिच्या कागाळ्या करणे हे उद्योग जोरात सुरू असायचे. नोकरीवरून दमून आल्यावर असा तमाशा सुरू झाला की मग कधीतरी अनघाचा देखील तोल सुटायचा, एखादा दुसरा शब्द शब्दाला भिडायचा आणि मग घरात रणकंदन झालेच समजायचे. अनघाचा नवरा अमर तसा कर्तृत्ववान माणूस; पण आईच्या शब्दाबाहेर त्याचे जग नव्हते. त्यामुळे अनघाला समजून घेणे लांबच, तर तिच्या वाट्याला अमरकडून देखील गप्प राहण्याचे सल्ले येत असत.
आज अनघाला आपण सावरले नाही, तर तिला हा आयुष्यभराचा त्रास होणार आहे हे रावसाहेबांना कळत नव्हते, असे नव्हते. पण, त्यांना आश्चर्य याचे वाटत होते की लहानपणापासून धाडसी असलेली, कॉलेजच्या इलेक्शनमध्ये नगरसेवकाच्या भावासमोर वाघिणीसारखी निवडून आलेली, वेळेला टवाळी करणार्‍या पोराची कॉलर धरण्याची हिंमत असलेली आपली मुलगी अशी एकदम शामळू कशी काय झाली आहे? एकेकाळची ती बुद्धिमान, फिअरलेस अनघा गेली तरी कुठे? हे कुठले नवे रूप आहे? अर्थात उतारवयात वडिलांना अधिक त्रास होऊ नये, मोठ्या भावाला, वहिनीला चिंता लागून राहू नये ह्यासाठीच अनघा धडपडत होती हे त्यांना माहिती होते. पण रोज उठून तिला होत असलेला त्रास देखील त्यांना मानसिक वेदना देत होताच.
‘अनघा, माझ्या बोलण्याचा तुला कदाचित राग आला असेल. पण लक्षात ठेव, मी काही जुनाट विचारांचा नाही. लग्न झाले की मुलगी आम्हाला कायमची मेली असले फालतू विचार देखील माझ्या डोक्यात नाहीत. पण तुझ्यासारख्या हुशार आणि निडर मुलीने दर चार दिवसांनी माहेरी येऊन गळे काढणे देखील मनाला पटत नाही. एकेकाळी काय होतीस तू, हे आठव. तू स्वत:च स्वत:ला मदत करायला हवी आहेस. आम्ही सोबत आहोतच, पण जोवर तू निर्धाराने परिस्थितीला सामोरी जात नाहीस, तोवर आमचे असणे देखील व्यर्थ म्हणावे लागेल. शांतपणे विचार कर, योग्य तो निर्णय घे आणि परिस्थितीत बदल घडव. तुझ्या प्रत्येक निर्णयामागे आम्ही ठामपणे उभे राहूच. आणि तू मुलगी आहेस म्हणून मी हे सांगत नाहीये. तुझ्या जागी तुझा दादा असता, तरी मी त्याला हेच सांगितले असते.’
रावसाहेबांच्या बोलण्याचा परिणाम म्हणून म्हणा किंवा ’आता आपले नशीब आपल्यापाशी’ असा अनघाने विचार केला का काय माहिती नाही, पण गेले पंधरा दिवस अनघाच्या बाजूने कोणतीच कुरबूर रावसाहेबांच्या कानावर पडली नाही. पंधरा दिवसात तिने स्वत: कधी फोन केला नाही, पण जेव्हा जेव्हा रावसाहेबांनी फोन केला तेव्हा तेव्हा तिने थोडक्यात बोलणे उरकले होते. मात्र बोलण्यात कटुता किंवा विषाद असा त्यांना कधी जाणवला नाही. त्यामुळे रावसाहेब थोडे निर्धास्त झाले होते. मात्र हा निर्धास्तपणा फार थोड्या काळाचा सोबती आहे, याची त्यांना कल्पना नव्हती…
—
रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे रावसाहेब कॉलनीजवळच्या बागेत फेरफटका मारून आले. बाहेरून आले, तर घरी स्वागताला अनघा आणि अमर हजर. अनघा नेहमीप्रमाणेच स्वयंपाकघरात होती, तर अमर शांतपणे पेपर चाळत हॉलमध्ये विसावला होता.
‘वाह वाह.. आज सकाळी सकाळी जावईदर्शन.. भाग्यच म्हणायचे.’ रावसाहेबांनी उगाचच विनोदाचा प्रयत्न केला. मात्र आज काहीतरी विचित्र घडणार आहे असे त्यांचे मन उगाच त्यांना बजावत होते.
‘तुमचे भाग्य कायमच तुम्हाला साथ देत असते रावसाहेब. पण आम्हाला इथे आमची स्वत:ची माणसे साथ द्यायला तयार नाहीत!’ अमर स्वयंपाकघराकडे पाहत जरा रागातच गरजला.
‘काय झाले अमरराव? अनघाकडून काही चूक झालीये का?’ अमरच्या शेजारीच बसत रावसाहेबांनी आपुलकीने विचारले.
‘रावसाहेब, तुमच्या मुलीला माझ्या आईचा त्रास होतो, माझा त्रास होतो, घरात एक गोष्ट तिच्या मनासारखी घडत नाही अशी तिची कायम तक्रार असते, तोपर्यंत ठीक आहे. आता तिला बाहेरच्या माणसांचा देखील त्रास व्हायला लागला आहे. मला तर हसावे का रडावे तेच कळत नाहीये. माझ्या आईचा राग असा इतरांवर कशासाठी काढायचा?’
‘काय झाले आहे ते मला सविस्तर सांगाल का जावई?’
‘आता काय सांगायचे? दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे घराची डागडुजी आणि रंगकामासाठी आईने तिच्या ओळखीतून चार माणसे कामासाठी बोलावली. एक दिवस काम नाही झाले, तर तुमची मुलगी ही माणसे कामाला नको म्हणून हट्ट धरून बसली आहे. आता इतक्या स्वस्तात चांगले काम करणारी माणसे मिळाली आहेत, तर ही असा काहीतरी वेडगळ हट्ट धरून बसली आहे.’
अमरचे बोलणे चालू असतानाच अनघा हॉलच्या दारात येऊन थांबली होती. रावसाहेबांनी एकवार तिच्याकडे नजर टाकली. ‘पण काहीतरी कारण असेल ना…उगाच कशाला अशी वागेल ती..’
‘तिलाच विचारा कारण.. आणि तुम्हीच ठरवा काय ते!’ अमर पुन्हा गरजला.
‘अनघा, काय गं? काही झाले आहे का? काय अडचण आहे तुला?’
‘दादा ती माणसे चांगली नाहीत येवढेच मी सांगते. मला अजून काही विचारू नका.’
‘ही कामावरून आली तेव्हा ती माणसे सामान आवरून निघाली देखील होती. दहा मिनिटात हिला माणसांची ओळख पटली? ती चांगली का वाईट हे कळले?’ अमरचा राग अजून तसाच होता.
‘बायकांना पुरुषांची नजर कळायला एक सेकंद देखील पुरतो अमर. त्या माणसांची नजर चांगली नाही. माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीयेस तू? मी उगाच असा कोणा परक्यावर आरोप करेन का?’
‘ती माणसे आईच्या ओळखीने आली आहेत, ह्याचाच फक्त तुला राग आहे. आणि आता काम करतील तर हीच माणसे करतील, नाहीतर कामच करायचे नाही असा आईने हट्ट धरला आहे. मी काय करायचे? आणि मुळात त्या माणसांचा आणि तुझा संबंध काय येणार आहे? तू येईपर्यंत शक्यतो ती काम संपवून निघून देखील गेलेली असतील. मग तू विनाकारण नको तो हट्ट धरून का बसली आहेस?’
‘अमर मी विनाकारण हट्ट धरत नाहीये. माझे मन मला हे योग्य नाही असे वारंवार सांगत आहे. एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेव.’
‘नाही अनघा. केवळ तुझे मन तुला काहीतरी सांगते म्हणून मी आईला दुखावणार नाही. तुला अगदीच पटत नसेल, तर चार दिवस काम चालू आहे, तोवर तू कामावरून सुटल्यावर इथे दादांकडे येत जा. मी घरी जाताना तुला बरोबर घेत जाईन.’
‘अनघा, मला देखील जावयांचा हा मार्ग योग्य वाटतो आहे. विनाकारण वाद वाढवण्यापेक्षा हा उपाय उत्तम आहे.’ रावसाहेबांनी देखील त्याला दुजोरा दिला आणि अनघाने नाईलाजाने मान डोलवली.
‘ठीक आहे तर मग. सकाळी ती माणसे आली की, अनघा त्यांना दिवसाचे काम समजावेल आणि बाहेर पडेल. संध्याकाळी माझ्याबरोबर घरी परतेल,’ अमरने तुकडा पाडला आणि तो विषय तिथेच संपला.
—
रावसाहेब सुन्न चेहर्‍याने अमरच्या घरातल्या समोरच्या देखाव्याकडे पाहत बसले होते. दोनच दिवसांपूर्वी सगळा रुसवा मागे सोडून हसत खेळत त्यांच्या घरातून बाहेर पडलेले अमर आणि अनघा कुठे आणि आता समोर बसलेले अमर आणि अनघा कुठे… घराच्या एका कोपर्‍यात गुढघ्यात मान खुपसून ढसढसा रडत बसलेला अमर आणि जणू जगाची शुद्ध हरपली आहे अशा चेहर्‍याने किचनच्या दरवाज्यात बसून असलेली अनघा आणि… आणि हॉलच्या मध्यभागी पांढर्‍या कापडात गुंडाळून ठेवलेला अनघाच्या सासूचा निष्प्राण देह…
‘जरा बाहेर येता का?’ खाकी कपड्यातल्या माणसाने विचारले आणि सभोवताली चालू असलेली पोलिसांची गडबड पुन्हा एकदा रावसाहेबांच्या जाणीवपर्यंत पोहोचली.
‘तुम्ही?’
‘मी अनघाचा, ह्या घरातल्या सुनेचा बाप.’
‘आम्ही जुजबी चौकशी केली आहे. घरात रंगकामाला बोलावलेल्या लोकांपैकीच कोणाचा हात ह्यात असावा असा आम्हाला दाट संशय आहे. तसे काही धागे दोरे देखील आमच्या हाताला लागले आहेत. आम्ही आमची माणसे कामाला लावली आहेतच. पण तुमची मुलगी किंवा जावई ह्यापैकी कोणी एक लवकर सावरले आणि आम्हाला या लोकांविषयी अधिक माहिती दिली, त्यांची स्केचेस काढायला मदत केली, तर आम्ही लवकरात लवकर गुन्हेगारांच्या जवळ पोहोचू आणि मुद्देमालही ताब्यात घेणे सोपे होईल.’
‘मुद्देमाल?’
‘हो. जवळपास पस्तीस लाखाचे दागिने आणि रोकड पळवण्यात आली आहे. चोरी करताना बहुदा आजींची आणि चोरट्यांची झटापट देखील झाली असावी. त्यांचा प्रतिकार मोडण्यासाठी चोरट्यांनी त्यांचा गळा चिरला आहे. सोसायटीत सीसीटीव्ही नसल्याने आमची थोडी अडचण झाली आहे. त्यामुळेच आता तुमची मुलगी आणि जावई पटकन भानावर येणे आवश्यक आहे.’
रावसाहेबांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आणि अमर, अनघा थोडेफार सावरले. अमर भानावर तर आला होता, मात्र आई जगात नसल्याचा त्याला बसलेला धक्का क्षणोक्षणी त्याच्या वागण्यात जाणवत होता. अमर आणि अनघाच्या सूचनेनुसार चारही कामगारांची स्केचेस बनवण्यात पोलिसांना यश आले. त्यातील दोन कामगार हे पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगारच निघाले आणि पोलिसांचे काम आणखी सोपे झाले. एका आठवड्यात पोलिसांनी त्यातील तिघांना जेरबंद देखील करण्यात यश मिळवले. आरोपींनी गुन्हा तर कबूल केलाच पण संपूर्ण मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले.
हे सगळे प्रकरण हळूहळू मागे पडत असतानाच एके दिवशी अचानक अनघा माहेरी आली. तिला पाहून रावसाहेबांना खूपच बरे वाटले. खरेतर गेल्या पंधरा दिवसात तिची अवस्था अगदी दयनीय झाली होती. पण निदान आता ती घराबाहेर तरी पडली आहे, हे बघून त्यांना जरा बरे वाटले होते.
‘ये बाळा.. अशी एकदम न कळवता? मला सांगितले असते, तर मी आलो असतो न्यायला.’
‘पोलिस स्टेशनला बोलावले होते आरोपींची ओळख पटवायला. अमर होता बरोबर..’
‘मग जावई गेले कुठे?’
‘ऑफिसला जाऊन चार दिवस आणखी रजा वाढवून येतो म्हणाला. मग एकटी घरात बसण्यापेक्षा मी इकडे आले.’
‘बरे केलेस बाळा. भले आपले एखाद्याशी संबंध जुळत नसतील. पण माणूस असा अचानक निघून जाणे जिवाला चटका लावून जातेच रे बाळा.’
‘खरे आहे बाबा. इतके भकास वाटते ते घर आता कधी कधी..’
‘खरे आहे. सहवासाची सवय असते माणसाला. काय योगायोग आहे बघ, त्या दिवशी मी सहज तुला बोलून गेलो की अडचणीसमोर ठामपणे उभी राहा, अडचण सोडवण्यासाठी योग्य निर्णयाचा वापर कर. पण देवाने तुझी अडचणच त्या आधी नाहीशी केली. दैवदुर्विलास! तरी तू सांगत होतीस, की ही माणसे चांगली नाहीत, त्यांची नजर चांगली नाही. पण ना सासूने ऐकले ना नवर्‍याने. विनाशकाले…’
‘खरे आहे दादा. पहिल्या दिवशी मी कपाट उघडले तेव्हाच त्या माणसांची कपाटावर पडलेली नजर माझ्या लक्षात आली होती. सासूला मी हजारदा सांगितले होते की, दागिने बँकेत ठेवा, पण मी कुठेतरी ते हडप करेल ही त्यांना भीती. म्हणून हट्टाने घरात ठेवले होते.’
‘जाऊ दे बाळा.. काही गोष्टी आपल्या हातात नसतात.’
‘आपल्याच हातात असतात दादा. एकदा नजर लक्षात आल्यावर, मग मी रोज कामाला जायच्या आधी कपाट मुद्दामच उघडे टाकायला सुरुवात केली. लोभाची मोहिनी बरोबर काम करून गेली आणि पुढे जे घडायचे तेच घडले! सुपारी द्या.. काटा काढा ह्यापेक्षा हे जास्ती सोपे झाले नाही का? काटाही निघाला आणि घरचा मुद्देमालही घरातच राहिला..’ डोळा मारत अनघा म्हणाली आणि डोक्याला हात लावत रावसाहेब दाणकन कोचात आदळले.

(मुकेश माचकर यांच्या मूळ धक्कथेवर आधारित)

Previous Post

थाय फूडचा नाद करायचा नाय!

Next Post

गोष्टीतून उलगडणारी नात्यांची गोष्ट… ‘एकदा काय झालं!’

Related Posts

पंचनामा

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
पंचनामा

डिसीप्लिन

May 8, 2025
पंचनामा

टेक सपोर्ट नव्हे, लुटालूट!

May 5, 2025
पंचनामा

कर भला, तो हो भला!

April 25, 2025
Next Post

गोष्टीतून उलगडणारी नात्यांची गोष्ट... ‘एकदा काय झालं!'

भविष्यवाणी - ३० जुलै

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.