• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

महाराष्ट्र हळहळला

- संतोष देशपांडे (देशकाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 7, 2022
in देशकाल
0

एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने राजीनामा देण्याआधी केलेल्या निरोपाचे भाषण ऐकून त्या राज्यातील घराघरातून शोककळा पसरते आणि भावनाविवश होऊन जनतेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, हे दृश्य आजच्या विधिनिषेधशून्य आणि भावनाशून्य कोरडवाहू सत्तेच्या राजकारणात अशक्यप्राय वाटणारेच आहे… पण २९ जून २०२२च्या रात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जेमतेम पंधरा मिनिटांच्या भाषणाने महाराष्ट्र हळहळला… इतकेच नव्हे तर ह्या देशातील प्रत्येक सुसंस्कृत नागरिक हळहळला. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा करणार्‍या ह्या भाषणानंतर लगेचच सोशल मीडियावर उद्धवजींबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करणार्‍या पोस्ट प्रचंड संख्येने येऊ लागल्या आणि काही तासांतच ह्यातून उद्धवजींच्या समर्थनार्थ उत्स्फूर्तपणे एक मोठी लाट निर्माण झाली. (‘मी पुन्हा येईन’फेम देवेन्द्र फडणवीस ह्यांचे मुख्यमंत्रीपदावरील पुनरागमन हे त्या लाटेतच वाहून गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना दिल्लीपतींनी एका आदेशाने, मानहानीकारक पद्धतीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला भाग पाडल्यानंतर तोवर चाणक्य असलेले फडणवीस हे फार मोठे त्यागमूर्ती आहेत, असे भासवणारी एक फुसकी लाट निर्माण करण्याचा निष्फळ प्रयत्न देखील झाला. पण शिळ्या कढीला आणलेला ऊत आणि भावनांचा उद्रेक यांच्यातला फरक सहज समजू शकतो कोणालाही.)
महाराष्ट्रातच नव्हे तर संबंध देशात हिंदुत्वाचा खरा राजकीय पाया विलेपार्लेची निवडणूक जिंकत शिवसेनेने रचला आणि त्या हिंदुत्वासाठी २०१९पर्यंत भारतीय जनता पक्षाला सावलीसारखी साथही दिली. केंद्र आणि अनेक राज्यातून सत्ता असलेल्या भाजपाने एका राज्याचे मुख्यमंत्रीपद तीन दशके एवढ्या जवळच्या सहकारी पक्षाला देणे २०१९ला निष्ठुरपणे नाकारले. त्यामागचे खरे कारण भाजपला शिवसेना आणि उद्धवजींच्या नेतृत्वाला फार मोठे होऊ द्यायचे नव्हते, हेच होते आणि आता तर ते सिद्ध देखील झाले. देशातील हिंदुत्ववादी मतदारांमध्ये भाजपाला कोणताही वाटेकरी नको आहे. २०१९ला भाजपाला तीनशेपार जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना मतदान ३७.३६ टक्के इतकेच झाले आहे आणि विभाजनाने ह्यातील थोडीशी घट देखील भाजपाचा लोकसभेतील आकडा बहुमतापेक्षा खाली खेचू शकते. मोदींच्या राजवटीने गेल्या आठ वर्षांत जनता त्रस्त आहे, पण नेहमी यांच्याच काळात खतरे में येणारे हिंदुत्व यांना तारते, हिंदुंचे सगळ्यात मोठे अहितकर्ते हेच आहेत, हे विसरून जनता भाजपाला परत परत मतदान करते हे दिसून आले आहे. महाराष्ट्रात मात्र हिंदुत्वावर भाजपाची मक्तेदारी नाही. इथे शिवसेना हा त्यांच्यापेक्षा अधिक प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखला गेलेला पक्ष प्रथमपासून आहे आणि आजच्या भाजपने शिवसेनेच्या खांद्यावर बसूनच विस्तार साधला आहे. त्यामुळेच भाजपाला हिंदुत्ववादात एवढा मोठा वाटेकरी आता गरज संपल्यावर नको आहे. ह्या देशात हिंदुत्वाचे सर्वाधिकार संघ आणि भाजपा हे स्वतःकडेच ठेवू पाहतात, हे वारंवार दिसून आले आहे.
उद्धवजींनी नुकतीच या दोघांच्या कच्च्या हिंदुत्वापेक्षा पूर्ण वेगळी अशी सच्च्या हिंदुत्वाची व्याख्या मांडली; इतकेच नव्हे, तर संघ आणि भाजपाच्या नकली हिंदुत्वाची जाहीर पोलखोल देखील केली. एकीकडे उद्धवजींची ही हिंदुत्वावरून आक्रमकता आणि दुसरीकडे त्यांची मुख्यमंत्री म्हणून वाढणारी लोकप्रियता ह्यामुळेच २०२४ लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील परिस्थिती भाजपासाठी फार बिकट होत चालली आहे, हे भाजपाला जाणवत होते. आदित्य ठाकरेंच्या अयोध्येतील राम मंदिर दर्शनाने एक वेगळा संदेश गेला आणि मग मात्र एका सत्तांध राजकीय पक्षाने अशा वेळी जो डाव खेळायचा तो भाजपाने खेळला. त्यात त्यांना साथ देणारे गद्दार देखील मिळाले हे महाराष्ट्राचेच दुर्दैव.
महाराष्ट्रातील आजवरच्या सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांपैकी एक अशी स्वतःची ओळख निव्वळ अडीच वर्षात निर्माण करणारे उद्धवजी हे मुख्यमंत्री बनल्यानंतर काही महिन्यातच महाराष्ट्राला करोना महामारीचा विळखा पडला. कोरोना काय भयंकर महामारी आहे हे लोकांना आज जरी वेगळे सांगावे लागत नसले तरी कोरोनाच्या सुरवातीच्या काही केसेसनंतर हे भयंकर संकट आहे हे ओळखणारे उद्धवजी हे एकमेव मुख्यमंत्री होते. त्या काळात राष्ट्रीय पातळीवर गो कोरोना गोची थाळीबाज नौटंकी सुरू होती आणि महाराष्ट्रात डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यवस्थित आखणी करून संकटाचा सामना केला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत नाटकी पद्धतीने लोकांसमोर येऊन बोलत होते, तेव्हा उद्धवजींचे बोलणे हे लोकांना घरातल्या वडीलधार्‍या माणसाच्या बोलण्यासारखे वाटत होते. त्यांचा संवाद सहज होता. त्यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राने केलेले काम आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखाणले गेले आणि देशातील टॉप फाइव्ह मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश झाला. साधारण दीड लाख लोक महाराष्ट्राने करोनामध्ये गमावले हे फार दुर्दैवी आहे, पण ऐंशी लाख लोक इथे उपचाराने बरे देखील झाले ह्याचे श्रेय कोरोनायोद्ध्यांच्या बरोबरीने उद्धवजींना देखील जाते. गुजरात, उत्तर प्रदेश या भाजपशासित राज्यांमध्ये झाली तशी मृतदेहाची विटंबना महाराष्ट्रात झाली नाही. नद्यांमध्ये मृतदेह वाहिले नाहीत. मुख्यमंत्री संकटांना धीरोदात्तपणे सामोरे गेले होते, तोच धीरोदात्तपणा त्यांनी सहजतेने सत्तात्याग करताना दाखवला.
राजीनामा देताना केलेल्या त्यांच्या भाषणात कोणताच आक्रस्ताळेपणा नव्हता, दोषारोप नव्हते, सत्ता जाण्याची खंत नव्हती, लालसा नव्हती, कटुता नव्हती; होता तो फक्त संयत सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा. उद्धवजींनी राजीनाम्याचे भाषण विधिमंडळात केलेले नसल्याने ते सभागृहाच्या पटलावर राहणार नाही; मात्र, ते त्याहून मोठ्या पटलावर म्हणजेच जनतेच्या मनःपटलावर चिरंतन राहणारे आहे.
उद्धवजींसमोर आज संकटांचा पर्वत उभा आहेच. पण त्याहून मोठे संकट हे मुंबई आणि महाराष्ट्र राज्यासमोर आज उभे आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आजवर मजबूत शिवसेनेमुळे कधीच यशस्वी नाही झाला. पण यापुढे महाराष्ट्रद्रोहींच्या ताटाखालची मांजरे तो डाव उधळून लावण्याची हिंमत दाखवतील ह्याची खात्री देता येत नाही. सीमाभागातील मराठी जनतेच्या मनाविरूद्ध बेळगावचे बेळगांवी हे नामकरण करणारा पक्ष भाजपा होता, हे मराठी माणसाने विसरू नये. महाराष्ट्राचा तुकडा पाडून विदर्भ स्वतंत्र करायचा ही मागणी देखील भाजपाला मान्यच आहे आणि ते ती आपल्या ताटाखालच्या मांजरांकडून साध्य करून घेतील देखील…
…या सगळ्या घटनाक्रमामुळे आठवले… महिना असा जूनचाच होता आणि साल होते १६६५. सगळेच मुसलमान सरदार पराभूत होऊन परत येताहेत हे पाहून औरंगजेबाने एक नवीन चाल आखली. थेट हिंदू सरदार मिर्झा जयसिंहला ऐंशी हजार सैन्य देऊन महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य आणि शिवाजीराजाला संपवायला पाठवले. स्वकीयांविरोधात स्वकीय हिंदूच लढवला जातो. दिलेरखान वज्रगडाचा आधी कब्जा करून होता आणि तेथूनच तोफांचा मारा करून त्याने पुरंदरच्या भक्कम तटाला भगदाड पाडले. ह्या युरोपियन बनावटीच्या महागड्या तोफा त्या काळातील व्यापारी आणि भांडवलदार इंग्रजांनी मोगलांना दिलेल्या होत्या. मोगलांच्या, संख्येने प्रचंड असलेल्या सैन्याला शिवरायांचा एकनिष्ठ सरदार मुरारबाजी सातशे मावळे घेऊन भिडला. मुरारबाजी देशपांडेंसमोर शरण अथवा मरण हा पर्याय उपलब्ध होता, पण मुरारबाजी लढले, इतकेच नव्हे तर असे म्हटले जाते की, मुंडके छाटले गेले तरी स्वराज्यासाठी मुरारबाजींची तलवार चालत राहिली. हे भीमपराक्रमी एकनिष्ठ मुरारबाजी सातारचे होते. सातारची माती गद्दार जन्माला घालत नाही. स्वराज्यासाठी जीव देणारे कोणत्या गावचे आणि कोणत्या जातकुळीचे होते हे महत्वाचे नाही. पराभव दिसत असताना देखील शरण न जाता लढून मरण पत्करणारे सैनिक आणि सरदार होते, म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. हा महाराष्ट्रधर्म गद्दारांना, फितूरांना गाडून टिकला तो मुरारबाजी, तानाजी, बाजीप्रभू ह्यांच्यासारख्यांच्या बलिदानानाने आणि असे सैनिक घडवणार्‍या त्या तेजस्वी शिवरायांमुळे.
आज पुरंदरच्या तहाची आठवण येते कारण तो तह हा शिवरायांचा सर्वात कसोटीचा काळ होता. त्या तहानंतर दिल्लीपती औरंगजेबाने शिवरायांचे तेवीस गड, किल्ले, सारे सैन्य हिरावून घेतले, पुत्र संभाजीला मोगलांचा पाच हजारी सरदार व्हावे लागले. शिवरायांना कैदेत देखील टाकले. अफगाणिस्तानला पाठवून शिवरायांना ठार मारण्याचा कट देखील रचलेला होता. एकदा शिवराय संपवले की हिंदवी स्वराज्य संपले, महाराष्ट्र संपला अशी दिल्लीपतीची समजूत होती. ह्यातून बाहेर निघणे अशक्यच होते. ही घटना १६६५ सालची आहे. त्यानंतर वर्षभरातच शिवराय सहीसलामत राजगडावर परत आले. त्यावेळी त्यांना उत्तर भारतीयांनी देखील जीव धोक्यात घालून साथ दिली होती. महाराजांनी सैन्य गोळा केले, सर्व गडकिल्ले परत घेतले, फितुरांना धडा शिकवला; इतकेच नव्हे तर त्यानंतर निव्वळ आठच वर्षात ६ जून १६७४ला मोगल, निजाम आणि आदिलशाहीच्या नाकावर टिच्चून ह्या महाराष्ट्राने आपल्या लाडक्या राजाचा देशातील पहिला हिंदू पतपादशहा म्हणून राज्याभिषेक केला.
महाराष्ट्र हा राष्ट्रनिर्माणाचे काम करतो म्हणून तर तो ‘महा’राष्ट्र आहे. हा महाराष्ट्र धर्म टिकवणे इथल्या जनतेचे परमकर्तव्य आहे. आज महाराष्ट्र धर्म टिकवायचा असेल, सच्चे हिंदुत्व टिकवायचे असेल, तर महाराष्ट्राने उद्धवजींच्या पाठीशी भक्कम उभे राहिलेच पाहिजे. तो तसा उभा राहिला आहे हे यापुढे येणार्‍या प्रत्येक लढाईत दिसून येईलच.

Previous Post

बेडकीचा फुगून बैल होईल काय?

Next Post

शिवसेनेशी गद्दारी, राजकारणातून हद्दपारी!

Related Posts

सुप्रीम कोर्टाने हातोडा हाणला तरी निर्लज्जम् सदासुखी!
देशकाल

सुप्रीम कोर्टाने हातोडा हाणला तरी निर्लज्जम् सदासुखी!

May 18, 2023
भाकरी, तवा जागच्या जागी; महाशक्तीचे ग्रह मात्र फिरले!
देशकाल

भाकरी, तवा जागच्या जागी; महाशक्तीचे ग्रह मात्र फिरले!

May 11, 2023
रामाच्या अयोध्येत रावणाचे राज्य!
देशकाल

रामाच्या अयोध्येत रावणाचे राज्य!

May 5, 2023
देशकाल

विसरा महाग भाजी, घ्या स्वस्त फाइव्ह जी!

October 6, 2022
Next Post
शिवसेनेशी गद्दारी, राजकारणातून हद्दपारी!

शिवसेनेशी गद्दारी, राजकारणातून हद्दपारी!

टपल्या आणि टिचक्या

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.