सहारा इंडियाचे मालक सुब्रत रॉय हे देशातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्यावर सध्या लोकांच्या चिटफंडच्या पैशाची अफरातफर केल्याचा आरोप आहे. या केसमुळे त्यांनी जेलची हवाही खाल्ली. त्यांच्या याच वादग्रस्त जीवनावर आता लवकरच एक चित्रपट बनणार आहे. त्यांच्या वाढदिवशी १० जूनला त्यांच्यावरील या बायोपिकची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या सिनमात त्यांची भूमिका कोण करणार हे मात्र अजून उघड करण्यात आलेले नाही. १० जूनला सुब्रत रॉय आपला ७३वा वाढदिवस साजरा करणार आहेत. पुढच्या वर्षापर्यंत या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. वास्तविक सुब्रत यांच्यावर यापूर्वी नेटफ्लिक्सवर ‘बॅड बॉय’ नावाची एक वेबसीरिजही आली होती. त्यात सुब्रत रॉय, नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय माल्या या कुख्यात पळपुट्या लोकांवर खास एपिसोड बनवण्यात आले होते.