नवनीत राणा
गालावरची जखम पाहून
केवढा धक्का बसला मला
सॉससारखा ओघळ दिसता
टॉमॅटो कॅचअपचा भास झाला
मला पाहून आले धावून
जीव स्वत:चा धोक्यात घालून
मी तर वाट पाहात होते
डाग पुसण्याची तयारी करून
जखम जर का खोल असती
किती सॉस लागला असता
नशीब पॉईंट एकवर भागले
नाहीतर चेहराच दिसला नसता
—–
रवी राणा
नवनीत माझी किती हुशार
हनुमानाची करते भक्ती
म्हणूनच तिच्या अंगी येते
त्यांच्यासारखीच बेफाम शक्ती
ती कुणालाच घाबरत नाही
तिला हव्या त्या देते शिव्या
त्यांच्याकडूनच सुपारी मिळता
गाते मग ती त्यांच्या ओव्या
सतरा साली मोदींवर ती
ऐका कशी तुटून पडली
तेव्हा म्हणाली पवार बाप
आता अक्कल कुठे नडली?
—-
नरेंद्र मोदी
अपयश सोडत नाही पाठ
जेव्हा घसरते माझी वाट
हिंदुत्वाच्या नावाखाली
सज्ज होतो आणण्या लाट
देशात अराजक माजण्यासाठी
कुणाकुणाचा वापर करू
ज्वलंत प्रश्न गेले उडत
भोंगा स्पीकर हाती धरू
कोरोनाची भीती दाखवत
तेव्हा कसा घातला गोंधळ
जनता विचलित होते तेव्हा
महागाईलाही येते भोवळ
—-
किरीट सोमय्या
केवढा अन्याय! केवढा अन्याय!!
या राज्यात चाललेय काय
इडीकाडीला घाबरत नाहीत
मीच रागाने आपटतो पाय
माझ्यावर झाला तिसरा हल्ला
केवढा मार बसला मला
किती बँडेज बांधली त्यांची
गणतीच नाही या देहाला
गालावर तर जखम लावून
मेकप केला म्हणतात मला
सॉस होता तर का नाही चाटला
ब्रेड लावून मीच तो खाल्ला
—-
राज्यपाल कोश्यारी
मी तर त्यांचा रुपया बंदा
तरीही कोर्ट धमक्या देतात
घटनाबाह्य वर्तन करतो
म्हणून मला फैलावर घेतात
इकडे आड, तिकडे विहीर
माझे दोन्हीकडून मरण
पाय कुणाचे धरू आता मी
जाऊ कुणाला सपशेल शरण
राष्ट्रपती राजवटीसाठी
कारणेच हवी तशी भक्कम
राज्य सरकार आहे मजबूत
उलट भाजप होतोय कंडम