• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

स्किमरने बँक खाते साफ केले…

- सुधीर साबळे (सायबर जाल)

Nitin Phanse by Nitin Phanse
October 6, 2023
in पंचनामा
0

सुरेश आणि सुरेखा बापट हे पुण्यात राहणारे कुटुंब. अनेक वर्षांपासून त्यांचा इंजीनिअरिंग प्रोडक्ट तयार करण्याचा व्यवसाय होता. दर वर्षी मे महिन्याच्या सुटीत हे सर्वजण सहलीसाठी देशातल्या एका राज्यात जात असत. गेल्या वर्षी त्यांनी सुटीच्या काळात कुलूला जाण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार सगळी तयारी झाली, ते कुलूमध्ये येऊन पोहोचले. पाच दिवसाची ती सहल होती, त्यामुळे साईट सीईंग, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे असा उपक्रम सुरू होता.
इथे आलोच आहोत तर काहीतरी इथल्या खास वस्तूंची खरेदी करावी, या विचाराने सुरेखा या तिथल्या एका मॉलमध्ये गेल्या. कपडे आणि अन्य काही वस्तूंची त्यांनी खरेदी केली. बिल देण्यासाठी मॉलच्या काउंटरवर आल्या. रोख रक्कम देण्यापेक्षा आपल्या एका बँक खात्यात पुरेशी रक्कम आहे, त्यामुळे आपण डेबिट कार्ड स्वाइप करू, असा निर्णय त्यांनी घेतला आणि ते कार्ड काउंटरवर दिले. तेव्हा ट्रान्झॅक्शन डिक्लाइन्ड असा मेसेज आला. दोनवेळा त्यांनी कार्ड स्वाइप करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही झाले नाही, म्हणून त्यांनी रोख पैसे देऊन त्या वस्तू खरेदी केल्या.
डेबिट कार्ड स्वाइप का झाले नाही, हे तपासण्यासाठी त्यानी बँकेचे एटीएम सेंटर गाठले, तिथे मिनी स्टेटमेंट काढले, तेव्हा खात्यात १०० रुपयेच असल्याचे त्यांना दिसले. बँकेच्या त्या खात्यामध्ये एक लाख चाळीस हजार रुपये होते ते कुठे गेले, असा प्रश्न त्यांना पडला. या प्रकारामुळे त्यांचा त्या सहलीमधला रस निघून गेला होता. आपण कधी एकदा पुण्याला जातोय आणि बँकेत जाऊन त्याचा शोध लावतोय, याची ओढ त्यांना लागली होती. पुण्याला पोहचल्यावर त्यानी बँकेत जाऊन या प्रकारची शहानिशा केली तेव्हा त्यांच्या खात्यातील एक लाख ३९ हजार ९०० रुपयांची रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर केली गेली हे त्यांना समजले.
आपले डेबिट कार्ड तर आपल्याकडेच होते, ते कोणाला दिले नव्हते, त्याचा कुठे ऑनलाइन वापरही करण्यात आलेला नव्हता, या कार्डची माहिती कुणाला दिली नव्हती, तरी देखील या खात्यामधले पैसे कसे काय ट्रान्सफर झाले याचे सगळ्यांना आश्चर्य वाटत होते. सुरेखा यांनी या सगळ्या प्रकाराची पोलिसात तक्रार केली. पोलीसही हा सगळा प्रकार ऐकून पेचात पडले, त्यांनी याचा तपास करण्यास सुरूवात केली. सुरेखा यांचे पैसे ज्या बँक खात्यामध्ये गेले होते ते बँक खाते कर्नाटकामधील होते आणि त्या खातेधारकाचे नाव होते आर. संजू. पोलिसांनी बँक खाते उघडताना दिलेल्या आधार, पॅनकार्ड, फोटो याची माहिती घेऊन प्राप्तिकर खाते, यूआयडीचे कार्यालय इथून त्या व्यक्तीची माहिती मिळवण्यास सुरुवात केली, तेव्हा भटकळ गावात ही व्यक्ती राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी भटकळ गाव गाठून आर. संजू नावाच्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरवात केली, तेव्हा त्या पत्त्यावर अशा नावाची व्यक्ती राहताच नसल्याचे निष्पन्न झाले. बनावट कागदपत्रांचा वापर करून त्या नावाने हे बँक अकाउंट तयार करण्यात आल्याचे उघड झाले होते. दरम्यान, पोलिसांनी बँकेत तपास करताना ज्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले होते तिथून दुसर्‍या बँकेत ज्या ठिकाणी हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते तेदेखील आर. संजू याच नावाने तयार करण्यात आलेले होते. पोलिसांनी त्या बँकेत जाऊन शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा आर. संजू नावाने दोन बँकांत दोन अकाउंट तयार करताना दिलेल्या फोटोंमध्ये तफावत असल्याचे दिसत होते. दुसर्‍या बँकेत देण्यात आलेला मोबाईल नंबरही वेगळाच होता. तो पश्चिम बंगालमधील आसनसोल गावात राहणार्‍या मुर्तुझा याच्या नावावर असल्याचे आढळून आले. ज्या दिवशी ही रक्कम बँकेत ट्रान्स्फर झाली होती, त्या दिवशी त्याला पाच फोन करण्यात आल्याचे सीडीआर रिपोर्टवरून स्पष्ट झाले होते.
सायबर पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने मुर्तुझा याचा आसनसोलमधील पत्ता शोधला. तेव्हा त्या ठिकाणी त्याचे वयस्कर आईवडील रहात असल्याचे आढळून आले. मुर्तुझा आणि त्याचा भाऊ आदिल हे कामाच्या निमित्ताने पुण्यात असल्याचे समजले. नोकरीला लावणार्‍या एका कंत्राटदाराच्या माध्यमातून ते पुण्यात आले होते. त्यांचा शोध घेतला तेव्हा मुर्तुझा हा सारसबागेच्या परिसरात दाबेलीची गाडी चालवत होता, तर आदिल शिकलेला होता म्हणून तो एका हॉटेलमध्ये काउंटरवर कॅशियर काम करत असे. दोन महिन्यांपूर्वी त्याला एका थ्री-स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन काउंटवर काम मिळाले होते. त्या हॉटेलची एक शाखा अमरावतीमध्ये सुरु होणार होती, त्या ठिकाणी आदिल याला पाठवण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
दरम्यान, पोलिसांनी सुरेखा यांच्याकडे तुम्ही काही काळापूर्वी कुठे बाहेरगावी गेला होतात काय, तिथे हे कार्ड नेले होते काय, तुमच्या जुन्या बँक खात्यामधील व्यवहारांची तपासणी तुम्ही केली आहे का, अशी विचारणा केली. तीन महिन्यांपूर्वी आम्ही अमरावतीमध्ये एका बिझनेस कॉन्फरन्ससाठी गेलो होतो, तेव्हा तीन हजार रुपयांचे बिल या डेबिट कार्डाने भरले होते, त्यानंतर आजतागायत त्याचा वापर केलेला नाही, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. हे कळल्यावर हा सगळा प्रकार स्किमरच्या साहाय्याने कार्ड क्लोन करून झाला होता, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला. तपासाची चक्रे पोलिसांनी आता अमरावतीच्या त्या स्टार इन या हॉटेलच्या दिशेने फिरवली होती. आसनसोलमधील आदिल त्याच हॉटेलात रिसेप्शन काउंटवर काम करत होता. पोलिसांचे पथक तिथे पोहचले, त्यांनी मॅनेजरला विश्वासात घेऊन सांगितले की ‘आम्हाला रिसेप्शन काउंटरच्या भागात दोन ते तीन छुपे कॅमेरे लावायचे आहेत. महिनाभर आम्ही त्याच्या आधारे तुमच्या काउंटरवर नजर ठेवणार आहोत, हे सगळे सुरु असताना त्याची कुठे वाच्यता होता काम नये, ते कुणाला समजता कामा नये.’
पोलीस काउंटरवरच्या सगळ्या हालचाली बारकाईने तपासात होते, तेव्हा आदिल बिल भरण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड दिल्यानंतर ते स्वाइप करण्याच्या आधी समोरच्या व्यक्तीचे लक्ष विचलित करून एक हात खाली नेत असे, ही गोष्ट सीसीटीव्ही तपासताना पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. आदिल नाइट डयुटीला असताना पोलिसांनी छापा टाकून त्या काउंटरची झडती घेतली, तेव्हा तिथल्या ड्रॉवरमध्ये कार्ड स्किमर आढळून आले. पोलिसांनी आदिलला ताब्यात घेऊन बोलते केले, तेव्हा त्याने सांगितले की, इथे कामाला लागल्यापासून ज्या व्यक्ती कार्डने बिल भरण्यासाठी येतात, त्यांना बोलण्यात गुंतवून मी कार्ड स्किमरच्या सहाय्याने त्यांचा डेटा चोरत असे, कार्डवर पिन नंबर टाकताना माझे त्याकडे बारीक लक्ष असायचे, तो मी एका डायरीत नोंद करून ठेवायचो. माझ्याकडे पुरेसा डेटा जमला की मी तो माझा भाऊ मुर्तुझा याला पाठवत असे. तो सगळा डेटा माझा भाऊ राजेश मंडल या बनावट नावाने बँक खाते उघडून ती रक्कम बँकेत वळती करत असे, आम्ही हा प्रकार अनेक दिवसांपासून करत होतो. याचे प्रशिक्षण आम्ही पश्चिम बंगालमधल्याच आसनसोलमध्ये घेतले, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. या सगळ्या प्रकारात पोलिसांनी आदिल, त्याचा भाऊ मुर्तुझा, राजेश मंडल या तिघांना अटक केली, तेव्हा त्यांनी अशा प्रकारच्या फसवणुकीचे २४४ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. सायबर कायद्यानुसार त्याच्यावर खटला दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

हे लक्षात ठेवा…

कोणत्याही ठिकाणी तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या द्वारे बिल भरणार असाल तर आपले कार्ड कुणाच्याही हवाली करू नका. ज्या ठिकाणी तुम्ही कार्ड स्वाइप करणार आहात, तेव्हा अन्य गोष्टींकडे लक्ष न देता, त्याच कामावर लक्ष द्या. आपला पिन क्रमांक समोरच्याला दिसणार नाही याची काळजी घेऊन कार्ड स्वाइप करा. कार्ड ज्या व्यक्तीच्या हातात दिले आहे, त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा, त्याच्याशी अन्य कोणत्या विषयावर चर्चा करणे टाळा. आपल्या डोळ्यासमोरच कार्ड स्वाइप करा, त्यामुळे स्किमरसारख्या धोकादायक प्रकारापासून तुम्हाला वाचता येऊ शकेल.

Previous Post

आधीच थोडे, त्यात नातेवाईकांचे घोडे!

Next Post

पत्रकार, ढाब्यावर या!

Related Posts

पंचनामा

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
पंचनामा

डिसीप्लिन

May 8, 2025
पंचनामा

टेक सपोर्ट नव्हे, लुटालूट!

May 5, 2025
पंचनामा

कर भला, तो हो भला!

April 25, 2025
Next Post

पत्रकार, ढाब्यावर या!

राशीभविष्य

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.