• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

मॉरिशस-३

- डॉ. सतीश नाईक, डॉ. उर्मिला कबरे

Nitin Phanse by Nitin Phanse
October 5, 2023
in भाष्य
0

मॉरिशसवर निसर्ग फारच फिदा आहे, कारण या इवल्याशा देशात अनेक प्रकारचे नैसर्गिक चमत्कार पाहायला मिळतात. त्यातलाच एक म्हणजे ‘शामरेल’. नावावरून काहीच अर्थबोध होत नाही. पण जागा आणि अनुभव नक्कीच वेगळा आहे. हा भाग मॉरिशसच्या पश्चिम दिशेला आहे. शामरेल नावाच्या फ्रेंच माणसाची मालकी असलेलं हे गाव. त्याच माणसाच्या नावावरून आजही ओळखलं जातं. या ठिकाणी साधारण काही एकर क्षेत्रावर असलेली माती रंगीत आहे. जमिनीतून निघालेला लाव्हा थंड होताना त्यातले लोह आणि अल्युमिनाचे क्षार मातीला रंग देऊन गेले. लोक म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा तर ही माती सप्तरंगी आहे. नजरेला मात्र इतके रंग दिसतात की ते रंग नक्कीच सातापेक्षा जास्त वाटतात. सुदैवानं आमच्यासोबत एक अभ्यासक होता. त्याने हे रंग चाळीस असल्याची माहिती आम्हाला दिली. काहीही असो, या रंगीत मातीचा परिसर डोळ्यांत साठवावा तितका थोडाच असं वाटून जातं. अर्थात या गोष्टी नजरेत साठवून ठेवायच्या असतात. त्या फक्त अनुभवल्या जाऊ शकतात. त्यावर भाष्य करून उपयोग नाही. सुदैवानं इथल्या सोव्हेनीरच्या दुकानात ही माती भरलेल्या काचेच्या बाटल्या मिळतात. त्याही तितक्याच सुंदर दिसतात.
आम्हाला जवळच असलेलं जंगल पाहायचं होतं. रस्त्यात अगदी दीड दोन किलोमीटर अंतरावर ड्रायव्हरने गाडी थांबवली. समोरच सुंदर धबधबा होता. यालाही स्थानिक लोक शामरेल धबधबाच म्हणतात. तो ज्या कातळावरून खाली कोसळतो तो भागही रंगीत पथ्थराचा बनलेला होता. किमान लांबून पाहताना आम्हाला तरी तसं जाणवत होतं. कुठलाही धबधबा नेहेमीच विलोभनीय वाटतो. इथलं पाणी धबाधबा कोसळण्याऐवजी एका संततधारेनं खाली पडत होतं. परिसराच्या सौंदर्यामुळं तसा बारीक प्रपात देखील देखणा दिसला.
पुढे आम्हाला तिथल्या नॅशनल पार्कला जायचं होतं. पण जाताना रस्त्यात एक गोष्ट करा, असं आमच्या मॉरिशसमधल्या यजमानांनी सांगितलं होतं. रस्त्यात ती जागा दिसल्याबरोबर ड्रायव्हरने पुन्हा गाडी थांबवली. समोर असलेल्या झुडुपांच्या जंगलाकडे बोट दाखवलं. आम्हाला आमच्या यजमानांनी कल्पना दिली होतीच. तिथं चायनीज पेरू मिळतात. आपणच तोडायचे आणि आपणच खायचे. कोणीही ओरडत नाही, विचारत नाही. हे सगळं आम्हाला नवं होतं. एकतर पेरू झुडुपाला लागतात! रस्त्यात कोणीही अडवणारं नसताना ते झुडुपांवर शिल्लक राहतात! त्यावर कोणीही आपला हक्क सांगत नाही. सगळ्या गोष्टी समजण्याच्या पलीकडे होत्या. पण हे सत्य होतं. आम्ही प्रत्यक्ष अनुभवत होतो. त्यामुळं विश्वास ठेवणं क्रमप्राप्त होतं. नंतर कळलं या पेरुंचा चीनशी काहीच संबंध नाही. हे झुडूप दक्षिण अमेरिकेतून आलं. पण त्याला चीनचं नाव कसं चिकटलं हे कोणालाच माहित नाही. स्थानिक लोक याला चायनीज पेरू म्हणून ओळखतात.
आमचा ड्रायव्हर थोडा रसिकपणे जगणारा होता. त्याने आपला मोर्चा एका डिस्टिलरीकडे वळवला. ‘र्‍हुमॅरि दे शामरेल’ या नावानं ती ओळखली जाते. इथं उसाच्या मळीपासून दारू बनते. तिथल्या कर्मचार्‍यांना आवर्जून सांगायला आवडतं की ही डिस्टिलरी पर्यावरणपूरक आहे. आम्ही काही तिची चव घेतली नाही. पण ही फारच उत्तम असल्याचं तिथली ग्राहक मंडळी सांगत होती.
इथं आम्ही स्थानिक अननस खाल्लं. केवळ दोन घासात संपेल इतकं छोटं अननस आम्ही प्रथमच पाहत होतो. चव मात्र अप्रतिम आणि मधुर होती. सोबत त्यावर पेरलेली मिरचीची भुकटी चवीत आणखीच भर घालत होती. त्यानंतरच्या मॉरिशसमधल्या मुक्कामात आम्ही या अननसाचा खूप वेळा आस्वाद घेतला.
आम्ही गेलो तेव्हा मॉरिशसमध्ये रेल्वे पाहिल्याचं आठवत नाही. पण नुकत्याच मॉरिशसला जाऊन आलेल्या व्यक्तीकडून कळलं की आता तिथं रेल्वेचं जाळं आहे आणि त्यातला प्रवास आजारी माणसांना, विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना मोफत आहे. आठवली म्हणून एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते. तिथल्या ज्येष्ठ नागरिकांना खूप मदत केली जाते. त्यांना बर्‍याच सवलती मिळतात. वर्षातून एकदा त्यांना सहलीला नेलं जातं. सहल मोफत असते. आमच्या ओळखीच्या आजीबाईंना तर अशा सेशल्सच्या परदेशी सहलीची आठवण सारखी सांगावीशी वाटत होती. तिथल्या जंगलात आम्ही एक सरडा पाहिला. मस्त रंगीत सरडा. मुळात तो गेको जातीचा प्राणी आहे. त्याची पाठ खूप रंगानी मढलेली आहे. आम्ही पाहिलेली प्रचंड आकाराची कासवं देखील मूळची याच जंगलात सापडतात ही नवी माहिती आम्हाला मिळाली.
मॉरिशसमधल्या अनुभवांमध्ये तिथल्या समुद्रामध्ये केलेली मजा कधीच विसरता येणार नाही. एक तर तिथले समुद्रकिनारे अत्यंत स्वच्छ आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी समुद्राची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. शांत पहुडलेल्या समुद्राच्या किरकोळ लाटांमधून तुम्ही चालत जाऊ शकता. पाणी अगदी नितळ आणि स्वच्छ. लहानमोठे मासे तुमच्या पायाच्या आसपास घोटाळत असतात. लांबवर समुद्र उथळ असल्यानं कंटाळा येईपर्यंत तुमची सैर सुरू ठेऊ शकता. जोडीदाराचा हात हातात घेऊन असं फिरणं किती रोमँटिक असतं ते शब्दात मांडता येणं अशक्य आहे. हा अनुभव आम्ही इतर कुठेही घेतलेला नाही.
यावरची कडी म्हणजे समुद्रखेळ. समुद्राच्या तळाशी चालण्याचा अनुभव आम्ही प्रथम तिथंच घेतला. तुम्हाला लहान होडीतून मोठ्या बोटीत नेलं जातं. तिथं एक प्रशिक्षित व्यक्ती तुमचा ताबा घेते. तुम्हाला सगळं नीट समजावून सांगते. समुद्रात तुम्हाला बोलता येणं शक्य नसतं. तुमचं सर्व संभाषण खुणेनं चालतं. त्या सगळ्या खाणाखुणा तुम्हाला सांगितल्या जातात. तुमच्याकडून पुन्हा पुन्हा घोकून घेतल्या जातात. तुमच्या डोक्यावर एक खूप वजनाचं लोखंडी शिरस्त्राण चढवलं जातं. बोटीतून शिडीवरून खाली समुद्रात उतरताना ते शिरस्त्राण डोक्यावर चढवतात. आणि तुम्हाला समुद्रात उतरवलं जातं. साधारण वीस ते चाळीस फूट खाली असलेल्या समुद्राच्या तळाशी तुम्ही जाता. तुमच्या आसपास मस्त रंगीत मासे फिरत असतात. तुमच्या हातात दिला जाणारा पाव खायला हे मासे तुमच्या अगदी जवळ येतात. समुद्राच्या तळाशी असलेल्या पाणवनस्पती तुम्ही पाहू शकता. या प्रकाराला ‘सी-बेड वॉकिंग’ म्हणतात. अनुभव खूपच वेगळा आणि छान असतो.
असाच एक खेळ मॉरिशसमध्ये लोकप्रिय आहे. आकाशात भल्या थोरल्या फुग्याला लटकलेल्या अवस्थेत समुद्रात फेरफटका मारण्याचा आनंद काही वेगळाच. आपण याला ‘पॅरासेलिंग’ म्हणतो. आपल्याकडेही अनेक ठिकाणी हा खेळ आणि त्याचा थरार अनुभवता येतो. पण एखादी गोष्ट नवीन असली की त्याची गंमत निराळीच. त्यात या मंडळींनी आमच्यापैकी एकाला भर समुद्रात पाण्यात बुडवलं आणि पुन्हा आकाशात उंच नेलं. थरार मस्तच होता. तळाशी काच लावलेल्या बोटीतून समुद्राच्या पोटातले जीव पाहणं हा आणखी अनुभव. अर्थात हाही अनुभव तुम्हाला असंख्य ठिकाणी घेता येतो. अगदी भारतातही तो उपलब्ध आहे.
तर ही होती आमची मॉरिशसची सहल. तेरावं ज्योतिर्लिंग समजलं जाणारं मॉरिसेश्वरचं देऊळ, आम्ही न पाहिलेला पण खूपच लोकप्रिय असा पंचमुखी गणपती, तिथली मराठी माणसं, त्यांचं आपल्या मूळ देशावर अजूनही असलेलं प्रेम, तिथली आपल्याला जवळची वाटणारी खाद्यसंस्कृती, समुद्रकिनारे, आधुनिक पण तरीही जुनं जपणारी माणसं अशा कितीतरी कारणांसाठी ही सहल लक्षात राहिली, अजूनही ध्यानात आहे.

Previous Post

विश्वचषकाचं शल्य!

Next Post

ये मोह मोह के धागे…

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025
भाष्य

सोमीताईचा सल्ला

May 15, 2025
भाष्य

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025
भाष्य

‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

May 8, 2025
Next Post

ये मोह मोह के धागे...

लोककलाकारांचा अप्रतिम जागर!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.